Wednesday 30 March 2011


वारा सुटला,वादळ झाले
द्श दिशा बुडल्या अंधारात,
निश्चल उभा हा वृक्ष तरी
पाही प्रकाशाची वाट!
दृढ निश्चय अन् संकल्पाने
सोसली सैतानाची रात,
कवेत घेण्यात्याही अनुभवा
फैलावले त्याने हात,
राखेतूनही पुन्हा उगाविण्याची !
जिद्द त्याची फिनिक्स पक्षाची!
 
   
आदर्श निर्मिण्यास नवा
सारला पर्णसंभार जुना,
वसंताच्या पालविने उभारला 
पुन्हा स्वप्न गाव न्यारा 
हलला नाही डुलला नाही 
संकटात कधी विचलला नाही,
वास्तवाशी झुंज़ताना 
कर्तव्य कधी विसरला नाही,
पर्ण राशी पायावर विसावल्या!
खंत त्याची बाळगली नाही!

पण.... वेळ जेव्हा फुलावर आली
कणखर वृक्षही तो हेलावला,
उमलण्या आधी मिटल्या
पाकळ्यां साठी तो रडला,
सार्‍या वेदना मनात दडवून
जगण्याचा त्याने यत्न केला,
वेदनांचा आक्रोशच जेव्हा असह्य झाला
उभा वृक्षही तो ढासळला,
वादळाशी झुंझणारा तो वृक्ष !
फुलच्या वेदनेने स्वत:च संपून गेला..
 
... Reshma






प्रत्येकीच्या आयुष्यात असं
   एकदा तरी होत...
अवचित कोणी येऊन
   मन चोरून नेतं,
एका शांत निवांत  संध्याकाळी
    हूरहुर लावून जातं,
हळूच येऊन कोणीतरी
    जगण्याला अर्थ देऊन जातं
कळीच फूल व्हाव ना अगदी तसचं
      "ती "च जीवन उमलुन जातं  ......

                                                                                                 
                                                                                      ...  रेश्मा अपटे 



   


Friday 25 March 2011

निळे डोळे



            गणपति बाप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया, उंदीर मामाकी जय, अरे मुलुंड आले सुध्धा? काळातच नाही ना सकाळी मुलुंड कसे आले ते? हेहेहे .. चला मुलुंड आले म्हणजे आता place shifting :) उठ ग ए बँक ऑफ इंडिया, चल c a तू बस ग पटापट ... ए आज ती ठाणे काकू नाही का ग चढली आज? चला मग आता काढ तुझा खाऊ :) (महिला दिन निमित्त इथेहि celebration सुरु होते) ,,, ए माझा उपास आहे हा आज ,,, हो हो साठे काकू माहित आहे नीता दी ने तूला उपासाचा चिवडा आणलाय ... 
हे ऐकून सोलिड वाटले मला ... खरच relations किती complicated असतात nah? एकीकडे भाऊ भावाशी एस्टेटीवरुन भांड्तो ,, बहिण- बहिणिला परकी होते, आई वडील मुलांना जड होतात ,,, आणि एकीकडे कोण कुठल्या त्या पोरी- बायका एकमेकींवर किती जिव लावतायत ,,, जणू एका तासात त्या सार्‍या जणी  पुर्ण दिवस जगून घेत होत्या .. सगळे काही मस्त मस्त रोजच्या सरखे सुरु होते. बड्बड, खिदळणे, मस्ति,गप्पा, कुठे भांड्णे वैगरे सारे काही सुरु होते...  एक नविन दिवस गजबजाटात सुरु झाला होता.

                 मी सगळॆ काही पाहात, ऐकत बसले होते  आणि  त्या गोंधळात महिला दिन निमित्त असलेल्या कार्यक्रमासाठी मिच लिहिलेल्या सूत्रसंचालन आणि भाषणाची जरा उजळणी करत होते. ते वाचण्याचा प्रयत्न करत होते, :) ... तेव्हढ्यात एक clips  विकणारी आली ... मला ना त्यांचा जाम राग येतो गर्दीच्या वेळी तर जस्तीच ... आधिच उभे राहायला नाही जागा, त्यात त्यांना पुढे-मागे फ़िरायचे असते .. 4th  सीट वर बसले न की त्यांचे trey लागणार,  नाही तर पायावर पायाच पडणार, नुसती कटकट ... आणि हिने तर माझ्या आणि माझ्या कागदाच्या मध्येच तो ट्रे धरला असलं डोकं फिरले ना माझे ... वर म्हणे " ताई जा राही हून ना " ... मी पुढे काहीतरी बोलणार होते ,. तिच्यावर ओरडणार होते पण .... तिच्या त्या हिरवट घार्‍या पाणीदार डोळ्यांत बघितल्यावर माझे शब्द तोंडातच राहिले ,,,, 

                   तेच माऊ सारखे डोळे , सरळ आणि छोटेसे नाक, विस्कटलेले केस, आणि रापलेला पण सावळा रंग, सश्यासारखे भित्रे भाव ,,,, तिचे आहे का ही? उगाज मी त्या क्लिप्स बरोबर खेळत होते ,,, एक काळ्या रंगाचा क्लिप  उचलला तेव्हढ्यात ती म्हणाली," ता हल्ली colourful क्लिप्स नाही लेते क्या आप?" हे ऐकून मी चपापलेच हो तिच ही ,,, त्या प्रचंड गर्दीत त्या आवाजात माला तिचे शब्द स्पष्ट ऐकू आले " बहोत दिन बाद ताई ? मै आज भी चित्र काढती है चोरी चोरी ;) अभी नाही होता है बच्चा भी है ना, अच्छ लागा ताई  मिलके मै धुंडती थी तुमको, ये वाली, एक तो क्लीप लो ना ताई " , मी काहीच न बोलता १० रु. तिच्या हातावर टेकवले ती हसून पुढे गेली ,,, "१० का एक बढीया क्लीप लेलो... लेलो एकदम अच्छ दुकान मै भी नाही मिलेगा.. आईसा माला " ठाण्याला चढली ती आणि दादरला उतरली त्यात 2 मीन्स माझ्यासमोर होती आणि मुख्य म्हणजे इतक्या लोकांत आम्ही एक-मेकीना ओळखले ...

        
                  तिला पाहून मी चकित झाले ,,, तीही माझ्याकडे बघून हसली,,, मी फक्त बघत होते तिला ,,, सरावाने तिचे गर्दीत वाट काढत पुढे जाणे, गोड गोड बोलून माल विकणे, पण हे काय ??? जर ती तीच असेल तर साडी????? आणि पाठुंगलीला बांधलेले ते बाळ ??? ते तिचे?? अरे वय ते काय तिचे?/ .. पण हो तिच आहे ही .. हातात वजनदार ट्रे ,, उंची ५ फुटाच्या आत-बाहेरची सडसडीत शरीरयष्टी  ,,,  खरच तिला अजून रंग, चित्र , सारे सारे ,आवडते कारण मी हातात पकडलेल्या त्या पुठ्याच्या ट्रे वर आजपण काही चित्र रेखाटलेले होते ,,,,  आज किती वर्षांनी दिसतेय माला ही,, साधारण ३ वर्षे झाली ,,, मी तर तिला विसरूनही गेलेले पूर्णपणे पण तिचे ते निळे डोळे ज्यात आधी हसू असायचे,  ते आज भावनाशुन्य असले तरी तिची ओळख पटवून द्यायला पुरेसे होते ,,  कधीतरी एकदाच विन्चारलेल्या आणि घट्ट आवळून  बंधलेल्या तेलकट दोन वेण्यान्च्या जागी आता एक वेणी आली होती एवढंच ... तिला पाहून मी तीन वर्षे मागे गेले ,,, law चे 1st इयर .. ती 12.३० p m   ची दादर फ़ास्ट ट्रेन,,,, दुपार असल्यामुळे जास्ती गर्दी नसायची त्या ट्रेन ला .. त्या गाडीत इतर विक्रेत्यांप्रमाने एक क्लिप्स वाली चढायची ,,, निळे हसरे डोळे, घट्ट बांधलेल्या दोन वेण्या तरीही विस्कटलेले केस,  परकर पोलका टाइप काहीतरी मळकट कपडे अंगावर चढवलेले आणि तोंडात साखर पेरल्यासरखी बोलायची ,,, ती ठाण्याला चढायची आणि डोंबिवलीला उतरायची ,,, क्लिप्स विकून झाल्या की फावल्या वेळात त्या पुठ्याच्या ट्रे वर काहीतरी रंगवत बसायची ,,, माला कौतुक वाटायचे तिचे किती निरागस पोर ,,,, काम करायची कधिही ओरडा-आरड नाही की इतर विक्रेत्यांसारखी एक-मेकांशी भांडणे नाहीत ,,, धंदा करा आणि चित्र काढा इतकी सरळ पोर ,.. ४थी पर्यंत शिकालीये मी असे अभिमानाने सांगायची ,,, एक दिवस बुक्स आवरताना माला माझे जुने जुने क्रेयोन्स मिळाले ,,, मी आठवणीने ते एका पिशवीत भरून पर्सेमध्ये ठेवले .. दुसर्‍या दिवशी ते तिला दिले ,,, ते तुटलेले रंग बघुन सुध्धा ती खूप खूप खुश झाली  ... ते निळे डोळे अधिकच चमकू लागले ,,, ती मला स्वच्छ शब्दात आणि उच्चारात " thanks "  म्हणाली ... मी हरखून गेले ती म्हणाली ," thanks ताई, अब मै रोज एक चित्र निकालेगी और दिखायेगी आपको" तिने त्या नंतर जवळ जवळ महिना भर रोज एक चित्र काढले ते रंगवले आणि माला दाखवले ,,, माझ्या एका  मैत्रिणीने तिला कागद दिले,, त्यातले एक चित्र तिने माझ्या मैत्रीला "गिफ्ट" केले ( ते अजुन सुध्धा  तिने जपून ठेवलाय) .. सुंदर फुलाचे चित्र गम्मत म्हणजे प्रत्येक पाकळीला वेगवेगळा रंग ,,, तिला विचारले ," हे असे का केलेस ग? असे कधि बघितलेयस का  फ़ुल? " तर म्हणाली ," सगळे रंग  किती प्यारे असतात आणि फुलं कितना सुंदर इसलिये उसमे सब रंग दिये है अंधेरेका काला भी और झाड का हार भी ( हे रंग, चित्र, thanks हे सारे शब्द आमचे ऐकून शिकली ती) .... खूपच सुंदर आणि हुशार पोरगी ,,,  त्या एक महिन्यानंतर माझी ती ट्रेन सुटली आणि ती निळे डोळेवाली बाहुली पण ...... 

                  तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद, ते समाधान, मी कधीच नाही विसरू शकले इतके कष्टाचे जीवन पण जणू ती त्या तुटक्या क्रेयोन्स च्य मदतीने त्यात रंग भरणार होती ... सगळे रंग ,, आणि ते जगणार होती ,,, तिला शिकायचे होते ,,, वाचायचे होते .. तिचे ते डोळे सारे काही बोलायचे व्यक्त करायचे तिला ...  पण आज ते काहीच बोलले नाहीत .. ते भावनाशुन्य होते ... की, आजही ते तिला व्यक्त करत होते ???... पाठीवर कापडाच्या झोळीत बांधलेल्या बाळासाठी ती कष्ट करत होती, खपत होती, १५-१६ व्या वर्षी लग्न मुल या जबाबदारीच्या ओझ्याखाली सगळ्या तरल हळुवार भावना स्पप्न विसरली होती , किंवा तिने ती स्वत:नेच मारून टाकली होती, आणि तिचे ते निळे डोळे आज तेच व्यक्त करत होते??? तिची व्यथा मांडत होते का ??????? ,,... 

                   त्या निळ्या डोळ्यांनी माला आज खूपच अस्वस्थ केले ,,, " women empowerment "  "women and law", "domestic violence " " issues relating to child marriage " etc etc सार्‍यातला फोल पाणा जाणवायला लागला . हातातला स्पीच तसाच पकडून मी किती किती वेळ विचार करत बसले ,,, महिला दिनाचे celebration ( गाडीतले ) फ़क्त पाहत राहिले ... माझ्याच speech मधली वाक्य मला खुपत होती, प्रश्न विचारात होती ,,, अस्वस्थ करत होती  ,,,, मी इप्सित स्थळी पोहोचले ,, कार्यक्रमाची सूत्र सांभाळली, कार्यक्रम मस्त पार पडला, छोटेखानी कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे भाषणही केले ... पण ... त्या लिहून आणलेल्या भाषाणातली काही वाक्य मात्र निश्चितच बदलली ,,, लोकांच्या टाळ्या मिळाल्या काही वाक्यांवर, एका मित्राने आवर्जून सांगितले " फार सुंदर झाले हो" पण माला ते ऐकण्यात काहिच रस नव्हतां कारण ते निळे डोळे अजूनही माझा पाठलाग करत होते, मझ्या भोवती त्यांनी रिंगन घातले होते, मी लिहीलेले भाषण पोपटपंजी तर नव्हते ना? ते डोले मला विचारात होते ,,, कष्टाना आणि नशिबाला सीता द्रौपदीचे नशीब म्हटले म्हणून मी राणी होणारे का??? काही क्षणांसाठी तरी होणार आहे का ????  खूप प्रश्न प्रश्न . उत्तरे माझ्याकडे नाहीत,.. माझ्या किंवा इतर कोणाच्या भाषणातही नव्हतीच ,,, तुमच्याकडे आहेत का??? की  "women empowerment .. वैगरे शब्द फक्त पाण्याचे बुडबुडे आहेत?? की ते फक्त काही ठराविक क्लास च्या लोकांसाठीच " RESERVED" आहेत ????????? ....

                                                                            ...  रेश्मा आपटे 

Wednesday 16 March 2011

चूक कोणाची?

सगळे धाव पळ करत होते,... घरातला फोन ठण ठाणत होता ,... छोटा चिंटू एका कोपर्‍यात बसला होता  ... तिच्या बाबांच्या डोळ्यातले पाणी तर आज लपतच नव्हते ... आजोबा, देव न मानणारे आजोबा, चक्क देवाच्या दारी हात जोडून उभे होते, ... आजीने देवाला पाण्यातच ठेवले होते ,... tommy सुद्धा शांत शांत होता .... तिचे बाबा आणि काका हॉस्पिटल मध्ये गेले होते ... आणि बाकी सगळे जाणं घरी त्यांची वाट पाहत होते,

आई तिच्या बेडरूम मध्येच बसली होती पायाखालून जमिनच सरकली होती म्हणा तिच्या. हातात तिचे ते पत्र घेऊन त्याकडे वेड्यासारखी पाहात बसून होती ती ,, थरथरणारे हात,... रडून रडून सुजलेल्या डोळ्यातले पाणीच आता आटले होते ... ते भयानक भावनाशून्य डोळे हातातल्या त्या पत्रावरून फक्त फिरत होते ... पत्रातली ती वळणदार अक्षरे .. एरवी "वा छकुली काय सुंदर अक्षर काढल्यास ग!" असे उद्गार निघाले असते आई च्या तोंडून पण ... आता निघत होता तो हुंदका फक्त हुंदका ,,,, त्या वळणदार अक्षरांनी जणू आई चे आणि घरच्यांचे आयुष्याच आडवळणावर नेवून टाकले होते. ,, डोळे फिरत होते तिच तिच अक्षरे, शब्द डोळ्यासमोरून नाचत होते ... अर्थ दरवेळी कळत होता की नाही? की तो समजून घ्यायचाच नव्हता आईला ते देवच जाणे ,, 

पत्र:

" प्रिय आई -बाबांस 

             मला माहीत आहे की, तुमच्या माझ्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या, आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहेनत पण घेतलीत ग. लहानपणापासून माला कुंभार सारखे घडवलेत, आई मला आठवतंय की तू स्वत: नोकरी सांभाळून मला शिकावायाचीस, मी काय वाचावे, काय पाहावे, काय ऐकावे, या सगळ्या बाबतीत तू खूपच जागरूक असायचीस, कसे बोलावे आणि कसे लिहावे हे तू माला खूप काळजी पूर्वक शिकवत होतीस. बाबाही मला टफ बनवायचे आणि मला पाण्याची असलेली भीती जावी म्हणून वेळात वेळ काढून माला त्यांनी swimming शिकवले स्वत: घेऊन जायचे ग मला ते swimming शिकवायला. मी रामरक्षा म्हटलीच पाहिजे या आजीच्या हाट्टाने माझे उच्चार स्वच्छ बनले, मी ही शाळेत नेहमीच पहिला नंबर मिळवायचे वक्तृत्व स्पर्धा तर मीच जिंकायचे. 
          मी १० वीत गेले, वर्षभर सगळ्यांनी खूप खूप adjustments केल्या, t v बंद, जेवण नाशता सगळे वेळेत, क्लास ला जायला आजी असल्यामुळे कधीच उशीर झाला नाही, तू तर सुट्टी घेऊन घरी बसलीस, बाबांनी सुधा सुट्टी घेतली, क्लास साठी भरपूर fees भरलीत, शाळेत principal सरांनी पाण मी पहिलीच आले पाहिजे असा हट्ट धरला होता, आई मला तू  खूप आवडतेस ग, खुप खुप आवडतेस .. पण हे अपेक्षांचे ओझे मला नाही पेलवते खरच, मी मनापासून अभ्यास केला पण  तरिही मला खूपच भीती वाटत होती ,,, सतत स्वप्न पडायची मी नापास झाले ,,, सगळे मला ओरडतायत ,,, आजी रडतेय, बाबा काहीच न बोलता निघून गेले माझ्या बाजूने, सर म्हणतायत की, "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला " ते वाक्य खुपच लागल ग आई !!!!
             मला ,,, मला खुप खुप भीती वाटतेय ,,, आता मला हे सहन नाही होते ,,, जर मी पहिली नाही येऊ शकले तर????? उद्या माझा १० चा result आहे ग!!, शेजारच्या मावशी पण म्हणाल्या," तुला कसलं आलाय मेल tension आमच्या बंटीला आले तर ठिक आहे", तुझं आपले उगाच नाटक तू काय पहिलीच येणार. माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय आई मला भीती वाटतेय, वाटतंय की तुझ्या कुशीत शिरून रडावे, मी सुध्धा लहानच आहे ग मलाही भीती वाटते, tension येते ग! आई पण काय करणार रडले तर बाबा ओरडतील ना?? आजीने तर कालच सोनी च्या आजीला सांगितले परवा आमचा निकाल आहे मग येते पेढे घेऊन ,,, बाबा म्हणतात की "पहिला तो पहिला दुसरा कोणाच्याच लक्षात नाही राहत",, मी प्रयत्न केलेत ग पण मला science II चा पेपर जरा जड गेलाय ग, असे सराना नुसते म्हटले तरी सर म्हणाले,"उगाच काही बोलू नकोस मला मान खाली नको घालायला लाऊस हा" ,,,
              आई मी पळपुटी नाहीये ग पण मला आता काहीच सहन नाही होते, मला खूप खूप भीती वाटतेय पण ती बोलून दाखवायाचीही सोय नाहीये मी डायरीत लिहिले होते की मला भीती वाटतेय result ची ते कालच बाबांनी वाचले असे चिंटू सागत होता आणि ते खूप चीडलेतही होते ग, त्यांना वाईट वाटलेले, आता मला ओरडतील का ग ते??? नाही मी जर पहिली नाही आले तर सगळ्यांचा किती हिरमोड होऊल सगळे म्हणतील उगाच वर्षभर नाटकं केली आणि निक्काल लागलाय हो अगदी प्रगतिपुस्तकात ... नकोच ते मला result च नकोय, 
            तो पाहायची हिम्मतच नाहीये माझ्यात आता ,,, म्हणून मी ठरवलंय स्वत:ला संपवायचं .. मीच नसेन तर result मध्ये कोणालाच इंटरेस्ट नसेल आणि जरी कोणी काही बोलले तरी मला ते ऐकू नाही येणार ना ग .. माला समजून घे ,,,, तू तरी नको चिडूस ग माझ्यावर, बाबांना समाजाव की मी पळपुटी नाहीये पण भीती मलाही वाटतेच ग ,,, त्यांना सांग की चिंटू पण हुशार आहे पण त्याला समजून घ्या तो घाबरला तर त्याच्याशी बोला ,,, त्याला जवळ घे आई नाहीतर मार बसेल त्याला ,,, त्याला सांग खूप अभ्यास कर जिद्दीने पण तू त्याच्याबरोबर रहा हा आई ... आणि .. आणि मला कधी कधी विसरणार नाहीस न ग आई ??

तुझीच लाडकी
 छकुली


आई ने ते पत्र निदान १०० दा  तरी वाचले असेल पण ते खरच, खरच खरे होते की स्वप्न होते घाणेरडे, अप्रिय, भयंकर हे तिलाही ठाऊक नव्हते............

रोजच्या सारखा गरम दुधाचा ग्लास घेऊन आई तिला हाक मारत होती "छकुली लवकर आवर माझी बस मिस  होऊल, ए  छकुली SSSS " खूप हाका मारून बाहेर नाही आली तेव्हा आईच आत गेली बघते तर हातात चुरगळलेला कागद घेऊन तिची छकुली पंख्याला लटकली होती ,,,, काही सामाजायाच्या आताच तिच्या तोंडून किंकाळी फुटली आणि मग घरात वेगळेच नाटय सुरु झाले, सगळ्याना भयानक धक्का बसला बाबा आणि काका तिला घेऊन Central hospital ला गेले. आणि घरावर स्मशान कळा पसरली. चिंटू घाबरून एका कोपर्यात बसून होता. आजीने देवांना पाण्यात ठेवले आणि आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडले .. 

आई !!!   ...  ती स्तब्ध बसली होती... तोंडातून ब्र ही न उच्चारता! हातात तो कागद, तिच्या भावनासारखा, मायेसारखा चुरगाळलेला! डोक्यात १०० प्रश्न, का? कसे? कुठे चुकले मी? समजून घेण्याचा प्रयत्न केला न मी तुला? ,,, माझ्याशीही बोलायलाही तू घाबरलीस?? का ग बाळा ? तुला भिऊ नकोस म्हटलेले कधीच हारू नकोस म्हटलेले पण आम्हालाच हारवून जा असे नाही म्हटले ग कधी,,, आणि हिम्मत आली कुठून ग इतकी तुझ्यात? आम्हाला खरच तुला इतकाही निर्भीड नव्हते बनवायचे की तू स्वत:चाच गाळ्याला फास लावून माझा जीव असा टांगणीला लावशील,... काय करू ग सोन्या कसे परत आणू तुला आता? लवकर घरी ये आम्ही वाट पाहतोय तुझी ,,, सगळेच तुझ्यावर खूप खूप प्रेम करतात ग सोन्या ...... आईची अवस्था तर खरच शब्दात मांडता येत नव्हती. 

बाबाही म्हणाले आई ला फोन वर की परीक्षेचे tension काय असते ते दाखवायला देवाने इतकी मोठी परीक्षा नको होती ग घ्यायला आपली...  समजतेय माला आता परीक्षेचे तेन्सिओन, ,,,, भीती, अस्वस्थता कशाला म्हणतात तेही समजलेय आता ,,,, मालाही गरज आहे आज तुझी; मालाही रडावेसे वाटतेय ,,,.. मी छकुलीला अती कणखर बनवू पाहत होतो का ग? तिला समजून घेण्यात फारच कमी पडलो ग मी ,,, पण ती कणखर झाली तर आयुष्यातल्या मोठ मोठ्या संकटानाही तोंड देऊ शकेल असे वाटले होते, त्या नादात मी तिच्या भावनांचा विचारच केला नाही कधी, एका मुलीचे हळुवार मन माला कधीच उमगले नाही. पण .. माला आज भीती वाटतेय, माझ्या छकुलीला गमवायची भीती!! ह्या Compititive world मध्ये तिने पुढे जावे प्रगती करावी अशीच इच्छा होती माझी ... पण आज ती हवीये माला आधी होती तशीच हसरी बाहुली !!!

आईला सगळे काही आठवत होते तिचे विचार चक्र खूप वेगात फिरत होते तिचा जन्म, तिचे बालपण, शाळा, मित्र मैत्रिणी, सगळे सगळे जसेच्या तसे आठवत होते तिला .. आणि समोर दिसत होता तो दोर आणि ते पत्र  मनाची घालमेल सुरु होती तिच्या. त्या उध्वस्थ अवस्थेत दारावरची बेल पण तिला ऐकू नाही आली...  बाबा आणि काका घरी आले परत, छकुलीला घेऊन पण ,,,,,,, ती खरच छकुली होती का??? थंड पडलेले शरीर, सताड उघडे आणि निस्तेज डोळे, उताणी पांढर्या चादरीत गुंडाळलेली ,,,,, ते पाहून सगळेच रड रड रडले ,,,, दुख:, भीती , आणि हुंदके याने ते हसरे घर पुर्णपणे भरून गेले ,,,

घरच जणू रडत होते उत्तर शोधात होते हजारो प्रश्नाची ,,, अशी कशी सुखाला दृष्ट लागली? कुठून आली इतकी हिम्मत आयुष्याच उधळून टाकायची त्या १५ वर्षांच्या आत बाहेरच्या वायात??? चूक कोणाची??/ खरच कोणाची??/ अपेक्षांचे ओझे लादणार्या मित्रांची,शेजार्यांची, शिक्षकांची?? की त्या अपेक्षांचे ओझे सहन न करू शकणार्या निष्पाप जीवाची ?? मुलांनी मोठे व्हावे नाव कमवावे म्हणून धडपडणाऱ्या, आणि याच धडपडीत मुलांचे मनोबल वाढवावे कसे हेच न उमगलेल्या आई - वडिलांची ???? आणि चूक कुठे झाली? अपेक्षा ठेवली ही? की त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हुशारी आणि जिद्दी बरोबरच विश्वास लागतो याचा विसरा पडून तोच निर्माण केला नाही इथे झाली चूक? की आदरयुक्त भीती आणि भीतीयुक्त आदर यातला फरकच पालकांना समाजाला नाही इथे? की आपयाशाला सामोरे जाण्याची हिम्मतच न ठेवता फक्त स्वत: पुरता (??) विचार करून पळपुटे पणाची वाट निवडली गेली इथे चूक झाली??

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न ,.... उत्तरे मिळून काहीच फायदा नव्हता कारण "ती" आता परत येणार नव्हती ... मनाचे पिंजरे तोडून तिचा जीव केव्हाच भुर्रकन उडून गेला होता,
तेव्हढ्यातच दारावर शाळेचा शिपाई आला, ,,,, बाबारे! पण आता तू येऊनही उपयोग नाही कारण तिचे बोर्डात येणे ही बातमीही आता तिचा जीव परत अणू शकत नव्हती ,,, पण वर मात्र ती आता सुखावली असेल सर्वांच्या अपेक्षा तिने पूर्ण केल्या होत्या पण त्याचे अप्रूप आता कोणालाच उरले नव्हते कारण, "ती" बाहुलीच त्या घराच्या भिंती तोडून निघून गेली होती कायमची.......................

Friday 11 March 2011

          "आज पण लेट का ग ट्रेन?" "अरे देवा म्हणजे परत घरी जायला उशीर आणि सगळाच गोंधळ ग" , "रेल्वे वाले ना काही सिस्टिमच नाही", "अगदी वैताग आहे, "अरे ४ दिन भी ट्रेन time से आई ना तो वो central railway  ही नही" ... C. S .T .  स्टेशन वरची ती एक संध्याकाळ असते .. थोडक्यात दिवस नॉर्मल असतो, central railway च्या trains पुन्हा  एकदा काही अपरिहार्य, घोषित अथवा अघोषित कारणासाठी उशिराने धावत असतात ......  या सगळ्या गोंधळात "ती"ही अशीच सामान्य स्त्री सारखी गाडीची वाट पाहणारी, घारीसारखे पिल्लांकडे डोळे लावणारी, रोज तीळ तीळ खपणारी, स्वतःचे पोट मारणारी पण पिल्लांना खाऊ मात्र न विसरता नेणारी ,,, साडीचा पदर खोचून पर्स  छातीशी कवटाळून आक्रमाण च्या तयारीत उभी असलेली,... तेवढ्यातच  ट्रेन  येते ...  अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळाच फक्त दिसलेला महाभारतात तसेच तिलाही train चे door च फक्त  दिसत असते, सगळ्यांना ढकलून, स्वतः  धक्के खाऊन ती एकदाची आत जाते आणि 2 nd right window मिळाली म्हटल्यावर जग जिंकल्या सारखी खुश होते.

           मग कोणी 4th seat साठी भांडत असते तर कोणी स्वतःच्या group बरोबर मस्त गप्पा ठोकत असते, सुख- दुःख share करत असते तर कोणी मिळालेला वेळ मस्त एन्जोय करत असते, रुमालापासून ते अगदी ड्रेस मटेरियल पर्यंत आणि शेंग्दण्यांपासून ते खाकरे, सामोसे पर्यंत काहीतरी विकणारे विक्रेते ओरडत असतात   .... ती हे सगळे सरावाने बघत असते आणि त्यात गजबजाटात झोपायचा प्रयत्न ही करते, सकाळपासून दमल्याने कधी कधी तिचा डोळाही लागतो, आजही डोळ्यावर झापड येत असते तोच तिला पुसटसा हुंदका ऐकू येतो,.. आणि ती जागी होते बघते तर काय निलीमा काकू आणि त्यांचा ग्रुप शांत शांत आणि काकू डोळ्याला मध्येच पदर लावतायत ,,, हे बघून तिची झोप पार उडून जाते ,,, आणि जरा आजू बाजूला चौकशी केल्यावर कळते कि निलिमा काकू रीटायर होतायत ह्या महिन्याच्या ३० तारखेला ... अरे म्हणजे परवाच की ... ऐकून तिलाही जरा आत कुठेतरी वाईट वाटते ,,, मग त्या ग्रुपच्या आज शांत शांत असण्याचे कारण कळते ,,. ती जराशीच पण खिन्न होते,,,,,
              तिला आठवते तिची आणि निलीमा काकूंची पहिली भेट ..  नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये jump करताना  सुटलेला तिचा हात .. तिच्या हातावर पाय देऊन चढलेल्या त्या २ मुली  ...मग तिला झालेली जखम  ,,, आणि गाडी खाली जाता - जाता अचानक तिच्या हाताला मजबूत बसलेली पकड ,,,, जीवन दानच म्हणा ना ... हो निलीमा काकूच ती ,, स्वतःच्या स्पोन्डेलीसीस चा विचार न करता त्यांनी तिला दुखऱ्या हातानेही घट्ट पकडून ठेवले ,,  पाणी दिले, ती जरा शांत झाल्यावर तिला आईच्या मायेने यथेच्छ ओरडून, "तुला काही अक्कल आहे का तुला?? काही झाले मग? मुलांचे काय होईल ह्याचा तरी विचार करत जा जरा!", असे म्हणून त्या चक्क रडल्या ,,, तशी तिची नि त्यांची काही खास ओळख नव्हती नाही म्हणायला ७.४७ pm च्या S ट्रेन ला त्या दोघी डोंबिवली पर्यंत एकत्र असायच्या ... त्यातही फक्त smile exchange पुरतीच काय ती ओळख. पण ती बघायची त्यांच्या group मधली त्यांची जागा, त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल तिच्या मनात एक आदर होता आणि तो दुणावलेला तिचा सुटलेला हात त्यांनी सावरल्यावर, तिच्या डोळ्यात सहज पाणी आले, ते पाणी 'त्या दिवशी त्या नसत्या तर काय झाले असते? म्हणून होते कि त्या उद्यापासून train मध्ये नसणारेत यामुळे जास्त होते? हे तिलाही आता सांगता नाही येणार".आणि तिच्या मनात सहजच एक विचार आला, खरच आपल्याला एखाद्या गोष्टीची व्यक्तीची किती सवय होते ना! ज्या गाडीच्या लेट होण्याला आणि प्रवासाला आपण त्रासून कटकट करून सामोरे जातो त्याची पण सवय होऊन जाते. रुळावरून धावणाऱ्या त्या ट्रेन च्याही पेक्षा जास्त वेगात तिचे विचार धावत होते, खरंच निलीमा काकू काय करणार उद्यापासून? घरात कोंडल्यासारखे तर नाही ना वाटणार त्यांना? ४ दिवस गावाला गेले आणि ट्रेन पासून लांब असले की  ऑफिस rejoin केल्यावर  आणि सकाळ संध्याकाळ त्या ट्रेन चे दर्शन घेतल्यावर आपले life रुळावर आल्यासारखे वाटते. दिवसाचे ३- ४ तास तर प्रवासातच सरतात. किती लोक भेटतात, खुप काही शिकवून जातात, कधी कधी आपल्यालाच आपण पुन्हा नव्याने भेटतो, तर कधी कोणामध्ये स्वतःला पाहत असतो नकळतपणे, काहींशी ऋणानुबंध जुळतात तर काहीवर दिवसभराचे frustration निघते ... आणि .."
               "३ Cheers for निलीमा aunty " yeeeee ... "ओये दिदी, केक लो ना aunty की send -off party हे  आज, ध्यान किधर है आपका?" ह्या sweety च्या वाक्याने "ती" भानावर येते तिच्या तुफान धावणाऱ्या विचारांना जरा लगाम घालते आणि black forest वर मस्त ताव मारते. निलीमा काकुना सगळ्या मिळून मस्तपैकी एक group फोटो gift करतात will miss u असे सांगतात आणि सगळ्या मिळून त्यांना bye bye करतात, त्यांच्या नवीन life साठी शुभेच्छा देतात आणि ती काकूंच्या मागूनच train मधून उतरते,.. आणि दोघीही एकमेकींकडे पाठ करून आपलाल्या घराचा रस्ता धरतात,
                  आणि सोमवार उजाडतो.. ती तिथेच तशीच आक्रमांच्या तयारीत उभी असते, धापडत आत शिरून जागा पकडते, बाजूच्या group मध्ये सगळे चेहेरे तेच असतात पण आजपण wrong window रिकामी ठेवलेली असते निलीमा काकूंसाठी ,,, मग कोणीतरी म्हणते "अरे आता त्या नाही ना येणार बस ग कोणीतरी दुसरे येऊन बसायच्या आत 'shift '  व्हा "... त्या window seat वर आज काकू नसतात पण त्यांच्या जागेवर कोणीतरी shift झालेलेच असते ,,,, 
                 ते पाहून तिला उगाच हसू येते, अजून एक धडा शिकते ना ती ७.४७ च्या कर्जत ट्रेन मध्ये, " आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते बाकीच्यांसाठी सगळे काही तेच असते फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ... live your life to  its  fullest ... cheers and move on  


                                                                                                         रेश्मा आपटे 
                  
                  

Friday 4 March 2011

संध्याकाळ

एक संध्याकाळ स्वत:साठी जगलेली,
सर्वांकडून हिरावून घेऊन फक्त माझ्यासाठी राखलेली ..

ना  ट्रेन मिळण्याचे टेन्शन, ना कामाचे मेन्शन,
आरामाचे मिळाले मस्त एक सेशन .

शांत शांत सगळीकडे मस्त हा एकांत ! 
हातात कप  कॉफीचा आणि मीही होते निवांत !

फुला फुलांवर उडून उडून मन फुलपाखरू झाले  
पाहता पाहता निसटून ते भूतकाळात हरवले ...

काही माणसे सहजच भेटली, नकळत आपलीशी झाली
काही आपली आपली म्हणता, तुकडा मोडून चालू पडली

कधी कोणी भेटली ज्यांनी डोळा आणले पाणी 
तर कित्येक  जणांना  प्यारी होती फक्त नाणी 

कधी खूप मिळाले, सुखाने डोळेही पाणावले
तर कधी किती उसासे प्रयत्नाने परतवले  ...

अशी  काही  निमिष  हुकती  चुकती 
 तर कित्येक  क्षणांनी गायलीयेत  गाणी 

बसल्या बसल्या सहज काही आठवलं
इवलेसे मन त्यात किती काय काय साठवलं

किती माणसे, किती गोष्टी, किती किती ह्या आठवणी, 
या निवांत संध्याकाळी मानाने केली सगळ्याचीच उजळणी !

                                                     ... रेश्मा  आपटे 

Thursday 3 March 2011


रात्र नक्कीच  सरेल 
रात्रीशिवाय  पहाटेची किम्मत कशी कळेल ??
आयुष्य जसं जसे पुढे पळेल 
"त्या" आठवणींवर अलगद पडदा पडेल !!!   
     
                            ...रेश्मा आपटे 

Wednesday 2 March 2011

साठवण


एक गोष्ट वाटते तुला सांगाविशी
नाजूकपणे जपलेली मनाच्या तळाशी,

तुला पाहून वाटायाचें माला मनापाशी 
जग सुरू होते की संपते माझे तुझ्यापाशी ?

तुझे समोर असणे, बोलणे, कॉल करणे
सारेच काही भासे मोरपीसा सरशी

स्वप्न तुझी कळलीच नाहीत, झाली कधी माझी कशी?
त्यांच्यात हरवणे, तुला आठवणे, स्वत:शीच हसणे!
सारच अडकलंय त्या दिवसन पाशी..

मध्येच काही बोलून, "तू नाही सामझेगी"  म्हणणे,
त्याच म्हणण्यातून मला सगळं काही समजून जाणे

आज बसलिये मी त्या स्वप्नातल्या नदी काठाशी,
पुन्हा: तुझ्याच विचारांच्या डोंगर पायथ्याशी

खरंच कळले नाही का रे तुला कधी?
सारेच कळत होते मला, तेव्हा आधी ...

अर्थच नाहीये आता का, कसे, कधीला ?
कारण उत्तरही नाहीयेत आता तुझ्यापाशी ...

पण मी मात्र गुंतलीये अजून त्या स्वप्नवत क्षणांपाशी,
आता आठवण तुझी इतकीच राहिलीये साठवण माझ्यापाशी ..

एक गोष्ट वाटते तुला सांगाविशी,
नाजूकपणे जपलेली मनाच्या तळाशी...

                                             ...  रेश्मा आपटे 

कोपरा


मनाची घालमेल, नि:शब्द कातरवेळ
मनातल्या भावना साधतात मग हिच वेळ
साज लेऊन सोनेरी, आठवणी येतात सामोरी,
स्वच्छ कॅनव्हास मनाचा
त्यावर चितारला जातो चेहरा त्याचा!
हर्षभरीत होते त्याच क्षणी ती खरी ....
गोड आठवणीत न्हाते, ते सोनेरी क्षण सुखाने न्याहाळते
एक सुक्ष्म स्मित ओठी फुलतं .....
तेव्हढ्यातच एक बेसूर हास्य जन्म घेत !
निघून जरी गेला असला तो,खरं प्रेम तिने केलेल असत
मन तळमळतं, भावना आक्रंदु लागतात
ओठांचा बांध घालता येतो, डोळे मात्र दगा देतात
ते त्या भावनाना जणू वाट करून देतात
मनातला एक कोपरा जणू रिता करू पाहतात
गालावरचे अश्रु पुसत जेव्हा जड मनाने ती उठते
मनाचा तो अव्यक्त कोपरा, तसाच बंदिस्त पाहते ........

                                                           ... रेश्मा आपटे