Sunday 31 July 2011

पाऊस

पाऊस बाहेर कोसळणारा
पाऊस मनात झिरपणारा

पाऊस रिमझिम निनादणारा 
थेंबा थेम्बातून आनंद वाटणारा

पाऊस संतत धारेत पडणारा
सतत सुखाची बरसात करणारा 

पाऊस मुक्त बेधुंद बरसणारा
तना मनाला भुलवणारा



पाऊस धीर गंभीर कोसळणारा
पार अंतर्मनाचा ठाव घेणारा 

पाऊस धुंद, बेभान करणारा,
सर्वस्वात भरून राहणारा

पाऊस वेडा पिसा भिजवणारा
आठवणींच्या गावात नेवून चिंब करणारा  .....

                                                         . .  .रेश्मा आपटे 

Wednesday 6 July 2011

पिकनिक

पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी :) वा वा !! किती सुंदर या ओळी! 

त्यात अशा या पावसात मस्त पिकनिक मग काय ,.  त्यात जर ती पिकनिक river touch resort वर असेल तर , मस्तच न?? एक दोन मीट्स झाल्या जाऊ जाऊ पिकनिक ला हे फिक्स केल आणि आज -उद्या, हा वीक एंड तो वीक एंड करतात करता एकदा झाली फायनल आमची पिकनिक ... "वांगणी ला ",, मग काय bags pack केल्या नी सुटलोच की :) .... 

निघायला झालेला उशीर ( एका मित्राच्या कृपेने) आणि थोडीशी कटकट या नन्तर ओघानेच (हेहेहे ) पण पिकनिक मस्त सुरु झाली,, इप्सित ठिकाणी पोहोचलो ( बर्‍याच उशिराने) आणि त्या सुंदर निसर्गाने भूल घातली की राव आम्हाला ,,,  रूम वैगरे फ़यनल करून आणि जरा झोपाळ्यावर झुलून आम्ही आताच नदीवर जायचं असे फिक्स केलं. या नंन्तर जरा क्लिक क्लिक्लीकाट झाला आणि मग आमची स्वारी निघाली नदीवर,,, अहाहा!! सुंदर नितळ पाणी,दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी, नदीच्या पल्याडच्या देवळाचा दिसणारा कळस, सुंदर फुलं, त्यावर भिरभिरणारी ती फुलपाखर, निळ निळ आकाश, सुंदर गार वारा, झुळू झुळू वाहणार नदीच पाणी, सगळ्या जणांनी पटापट जागा पकडल्या म्हणजे दगड reserve केले :D :D :D ,... मी त्यातल्या त्यात जरा बाजूचा पण सगळ्यांच्यात असेल असा दगड निवडला. पाण्यात पाय टाकून हातात कॅमेरा घेऊन मस्त निवांत बसले. काही जणी पाण्यात पाय आपटून आपटून ते शांत पाणी अशांत करत होत्या. ते तुषार अंगावर उडल्यावर मस्त फ्रेश वाटत होत. आता काही वेळ फक्त हातातला कॅमेरा बोलत होता आणि पाय त्या नदीतल पाणी फील करत होते बाकी फारस कुठे माझ लक्ष नव्हत..

 तेव्हढ्यात माझ्या फोटोग्राफी करण्याच्या इंतरीम इच्छेला सुरुंग लागेल की काय असे वाटले, कारण  काही काळे ढग आकाशात गोळा व्हायला लागले होते. तो निसर्ग मला कॅमेरात बद्ध करायचा होता म्हणून मग त्यांना (ढगांना ) "जरा थांबा, बरसू नका जरा वेळ! असेच सुंदर फिरत रहा," असे सांगण्यासाठी, आणि त्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी मी पटापट त्यांचेच ४-५ फोटो काढले. सूर्य आता मावळतीकडे झुकला होता, त्याची लाली आकाशात पसरली होती आणि बिंब पाण्यावर तरंगत होत. ते तरंगत बिंब मला खुणावत होत. केशरी लाल रंग पाण्यावर सांडला होता, वार्याने तो पाण्यावर  हेलकावत होता. ते रंग ती लाली मला खूपच खुणावत होती. तिच्या जवळ जवळ जाव अस वाटत होत. पण तेव्हाढ्यात लक्षात आले की आपल्याला पोहता येत नाही सो (नको शहाणपणा! : हे अर्थातच मनात म्हटलं) मग असा आव आणला की पाय टाकून पाण्यात बसण या सारखा आनंद नाही, ते उगीच नदीत पूर्ण भिजण्यापेक्षा ( जे मला खूप खूप आवडत पण काय करणार :(  ..) हे बर! मग तो नजारा, ते सौदर्य निदान कॅमेरात टिपू शकतच होते की मी!! मग  ते कॅमेरात टिपायची सगळ्यांचीच धडपड सुरु होती.. पण !!!! ते मस्तीखोर ढग :( ...सारखे मध्ये मध्ये येत जात होते,, त्यांचा तो पोरकट मस्तीखोर पणा बघून की काय कोण जाणे पण मग त्या धीर-गंभीर सुर्यनारायणांनाही लपाछुपी खेळायचा मूड आला ,,, कॅमेराने पोझिशन घेतली रे घेतली की लपलेच हे महाशय ढगांच्या मागे पण आम्हीही पठ्ठे सोडणा‌र्‍यातले नव्हतो काढलेच आम्ही काही पिक्स :) ... केलेच ते केशरी, लाल बिंब कॅमेरात कैद!!

मग आम्ही सगळेच मी, माझे सवंगडी, वारा, पाणी सगळेच जरा शांत झालो. ते वेडे पिसे ढग मात्र पसरत होते, भिर-भिरत होते, वार्‍याबरोबर आणि वार्‍यावर झुलत होते, जणू आकाशात एक चित्र रेखाटत होते. खूप खूप खुश होऊन फिरून फिरून, नाचून, दमून मग ते जड झालेले ढग हळुवार खाली येत होते आणि हलकेच मोकळे होऊ पहात होते. त्यांचा आनंद , उत्साह ते पाण्याच्या थेंबांनी आमच्यापर्यंत पोहचवू पहात होते. सोनेपे सुहागा काही थेंब भरभर खाली आले, पाऊस, पाऊस  कॅमेरा ठेवा म्हणे पर्यंत तो आलाच!  वा वा!! कॅमेरे आणि फोनस ठेवायला कोणीतरी आत पळाला आणि आम्ही सगळे त्या मुसळधार पावसात  भिजत होतो. माला त्याने वेड लावलं होत. दोन्ही हात पसरून मी त्या धारा झेलत होते. तो सहस्त्र धारांनी बरसत होता. मला गाव नाही सो मग नदीवर पावसाच्या धारांमध्ये चिंब चिंब होण्या मागची धम्माल अनुभवायची ही माझी पहिलीच वेळ होती. मग काय हवाराटा सारखा तो क्षण मनात भरून घेत होते. खूप जोरदार  कोसळल्यावर तो थोडा शांत झाला.

तशी मीही जरा वरचा दगड शोधून टेकले. आणि बघत राहिले त्याचे नाट्य... नदीच्या पाण्यात पडणारे थेंब उठणारे तरंग,...  केवळ सुंदर, पाऊस आता जवळ जवळ गेलाच होता. जाताना वातावरण मात्र सुंदर सुंदर, भारावून, फ्रेश करून, गेला होता. . एक मैत्रीण कानाच्या मागे फुल खोवून इकडून तिकडे हिंडत होती, एक मित्र मस्त बिनधास्त बनला होता, दुसरा त्या ग्रुप मध्ये नवीन असून मस्त मिक्स झाला होता, आमच्यातला फोटोग्राफर निसर्गाचं ते प्रत्येक रूप आणि आमच्या सगळ्यांच्या मनावरचे कवडसे उमटलेल्या चेहऱ्यांचे रुपडे कॅमेरात बध्द करण्यात गुंग होता. एक सगळ शांत पणे बघत होता, एक जण आपल्याच विचारात आणि नैराश्यात जरा काही क्षण गढून गेली होती, तर दुसरी खूप आनंद लुटत होती पावसाचा पाण्याचा!! कोणी पाण्यात दगड मारत होता आणि पाणी उडाल्याचा आवाज येत होता, तर कोणी कलात्मकतेने चपटे दगड शोधून, ते विशिष्ट प्रकारे पकडून, ठराविक उंचीवरून, लयबद्ध्तेने नदीकडे भिरकवत होता ... आणि ते सगळ correct जमल की मग पाण्यावर उठणारे ते नाजूक तरंग !!! वाह वाह !! अप्रतिम, किती सुंदर,, पाणी कापत गोल गोल तरंग बनवत,   दगड टप्पे खाऊन शेवटी बुडून जात होता

निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत आणि कृतीत नाद आणि सौंदर्य दडलेलं असत ना मला ते जाणवत होत. पाण्याच्या संथ प्रवाहात, वार्‍याच्या वाहण्यात, फुलांच्या फुलण्यात, फुलपाखरांच्या उडण्यात, नदीपल्याडच्या देवळाच्या  कळसात, दोन्ही काठांवर डोलणार्‍या झाडांत, पक्षांच्या आवाजात, उमललेल्या फुलांच्या रंगत, अगदी नदीकाठच्या दगडांत सुंदर सगळ काही सुंदर. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात बसलेले, वावरणारे आम्ही ८ जण !! प्रत्येक जण आपल्या स्वभाव, मनःस्थिती   आणि विचारांप्रमाणे त्या निसर्गाला प्रतिसाद देत होता. तो निसर्ग प्रत्येकाला काहीतरी देत होता. कोणाला सुख, कोणाला समाधान, कोणाला शांती, कोणाला फक्त निव्वळ आनंद, कोणाला अंतर्मुख बनवत होता, तर कोणाला मन मोकळ करायला भाग पडत होता!! प्रत्येकाचा अनुभव वेग-वेगळा आणि तरीही एक साम्य तो खूप बोलका आणि सुखावणारा .....

मग जरा काळोखाच्या छटा उमटायला लागल्या, नदीकाठ हळुह्ळू काळोखाच्या कुशीत शिरत होता. तसे मग आम्हीही इच्छा नसताना तिथून हललो. निघताना मी एकदा मागे वळून ते निसर्गच सुंदर निरागस रूप पुन्हा डोळ्यात साठवून घेतलं!! ... स्वतःला खुश राहायचं आणि सर्वाना सामावून घ्यायचं असं वचन देऊन!! एकदाच डोळे बंद केले मनापासून मोकळा श्वास घेतला आणि ...
 आणि मग निघालो आम्ही रूम्स कडे. पोटातले कावळे आता जरा खाऊ मागत होते. मग आता पुढे काय? पत्ते? की  गप्पा? की गाणी? की अजून काही ... असे discussion करत करत आम्ही सगळे निघालो आणि रूम वर पोहोचलो. जेवण खाण करून जरा गप्पा गोष्टी करून शेवटी सगळ्या ideas सोडून आम्ही "डम शेराज"  खेळलो धम्माल धम्माल धम्माल ,,,, एकेकांच्या अक्टिंग बघताना हसून हसून आणि चिडवून, पीडून रात्रीचे ( खरेतर दुसर्या दिवशीच्या  सकाळचे) ४.३० कधी वाजले कळलेच नाहीत मग एक एक ढेपाळले. हळू हळू गाद्या पसरून स्वतःला त्यावर उलगडायला लागले. हे हे हे हे मग दिवस संपला एक सुंदर धुंद दिवस !!!!!!

एका दिवसात किती किती मस्ती केली. खूप काही अनुभवलं. खूप काही बघितलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो नदीवरचा एक दीड तास वा वा!!! बस अजून काय हव? थोडस miss management झालं त्यामुळे पिकनिक चा उत्तरार्ध आणि म्हणजे दुसरा दिवस रटाळ गेला ,,, पण त्या नदीकाठच्या एक-दीड तसा साठी आणि नदीवरून परत आल्यापासुनचा  वेळ ते " डम शेराज" संपेपर्यंतच्या वेळासाठी सगळ माफ तुला रे !!!! हेहेहे  m i right guys ???

fun fun fun  

Friday 1 July 2011

यंदाचा पहिला पाऊस



घाम ,चिपचीप, मरगळ, रख रख, खूप खूप विचार, मी गलरीत उभी होते,,,, समोर दिसेल ते बघत (बघत होते की नाही देव जाणे पण डोळ्यासमोरून काहीतरी सरकत होत ) माझ्या मनावरच मळभ, एक अस्वथपण, कशातच लक्ष लागत नव्हत! सगळच कसं निरस वाटत होतं, त्यात पोरांचा गलका!!, एरवी मी घरात म्हणजे त्यांची मजा असते त्यांचा श्रोता आणि खेळातला पार्टनर असते मी, कधी त्यांचा जज्ज तर कधी चक्क कुक ( जास्ती वेळा ते माला कुक किंवा spare partner बनवण पसंत करतात) आजही नेहमी सारखेच ते सगळे माझ्याकडे येऊन गलका करत होते,, हे सांग, त्याला ते पाहिजे, तिची चूक, तिला ओरड and all पण मी मात्र नेहमीसारखी त्यांच्यात mix नाही झाले जोरदार ओरडले त्यांच्यावर तसा तो ताफा हिरमुसून परत गेला ,,, सगळं कस शांत शांत झालं,,

आणि त्यात भरीला " जब दिलही तुट गया ... हम जिके क्या करे..  " सारखी भयानक गाणी समोरचे काका ऐकत होते ( म्हणजे त्यांनी चुकीच्या वेळेला चुकीची गाणी लावणं किंवा कोणतीही sad songs कधीही ऐकणं यात आता काहीच नवल नाही,)  पण तरीही मला आपल उगाचच हिंदी पिच्चर मधल्या त्या " मे लुट गई, बरबाद हो गई .. " वैगरे च्या situation मध्ये गेल्या सारख वाटलं,... इतकी भडकले ना मी की वाटलं जाऊन सरळ बोलाव त्या "काकांना" आजी म्हणते तसं  " भिकेची लक्षण कुठली ,,, तिन्हीसांजेला काय हा तमाशा लावलाय???? " ,,, पण मग स्वतःला आवरलं! ,,, मी अजूनही तशीच त्याच स्थितीत उभी होते ,,, उदास हाताश !!

तेव्हढ्यात,.. अचानक एक वार्याची झुळूक आली, एक हळुवार फुंकर मारून गेली, मागोमाग काही वेडे पिसे ढग आमच्या गल्लीतल्या चिमुरड्यांन प्रमाणे धावू लागले,,, उष्ण- गरम, सगळ करपवून टाकेल अशी हवा अचानक शांत शीतल बनत होती, आणि ती माला जाणवत होती  ,,, त्या तालावर पान-फुल डोलू लागली ,,, आताशा वारा जरा भाराराच सुटला,... आमच्या बिल्डिंग मधली बच्चे कंपनी माझा मागचाचा ओरडा विसरून परत गलका करायला लागली ,,, आणि .. आणि तो आला ,,,, ज्याची वाट पाहत होतो, ज्याच्या साठी अधीर झालो होतो, ज्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेने खुलून फुलून जातो,.. तो आला ,,, येईल येईल म्हणता उशिरा की लवकर कधी येईल आता की उद्या म्हणता म्हणता तो आला,  त्याचा पहिला स्पर्श, पहिला गंध, पहिला ओलावा अहा काय वर्णावा,... उहू ,,, तो फक्त अनुभवायचा,... ते सार  सार  जमिन आसुसून साठवून घेत होती ,,, उडणारी धूळ, गळणारी पान, गोंधळलेले पक्षी, धावणारी घाबरलेली जनावर, वातावरणात अचानक होणारा तो बदल, कशा काशाच भान नव्हत तिला! ती फक्त साठवून घेत होती.. त्याला! स्वतःत. आणि तिचा तो आनंद, सुख ती त्या सुखाची उधळण मृद्गान्धातून करत होती, सर्वाना तो आनंद वाटत होती... 

पहाता पहात सगळ काही बदलून गेल होत ,, एक नव चैतन्य आजूबाजूला पसरत होत ... आता मस्त कोसळत होता तो,, पाणी नव्हे खूप खूप उत्साह, आनंद घेऊन आला तो ,,, मी अजूनही तशीच उभी होते , पण चेहर्यावाचे भाव rather मनातले विचार निरुत्साह सगळच मावळल होत,, लोकांची धांदल छात्रांचे रंग पहात होते, त्या रंगांनी माझ्या चेहर्यावर हलकाच हसू पसरलं .., वा वा आता सगळे कडे रंगच रंग, नवीन पालवीचे, लवकरच उमलणार्या फुलांचे, आकाशाचे, पानांचे, वार्यावर डोलणार्या झाडांचे, हिरवा रंग एकाच पण त्याच्या किती अगणित shades  पहायला मिळणार आता ,,, आणि आवाज,  ते पण किती वेग-वेगळे पावसाचा आवाज, वाहत्या पाण्याचा आवाज, पाण्यातून भरधाव जाणार्या गाडीचा आवाज आणि त्या पाठोपाठ ( नालायक किंवा तत्सम ) ज्याच्या अंगावर हे पाणी उडालं त्याचा आवाज ,... हे हे हे हे ,, सगळच सुंदर !!! अरे पण आता तर कुठे तो आलाय, त्याला येऊ देत, स्थिरवूदेत, मग आवाज, रंग सगळ अनुभवायचं .. थोडक्यात काय तर त्याच्या फक्त काही थेंबानेच सगळं काही खुलूनं गेलं ,, आणि त्या सुंदर वातावरणात मी कशी दु:खी राहीन??? तो आला ना मग? माझ मनही हसलं, खुललं, आणि त्याच्यावर भाळलं, भुललं :) :) :)  ,,,, सगळी मरगळ  शीण अचानक नाहीसा झाला ,,, अस्वस्थ मन अचानक खुलून गेले ,,,  पाऊस ,, त्याने सगळच धुतलं मनावरची मरगळ पण :) :) :)

त्यात आमचे बंधुराज त्यांच्या सवंगड्यांना म्हणतात कसे " dont worry , मी आहे ना, तिला काहीतरी प्रोब्लेम असेल, माझी ताई आहे ना , मी विचारेन ना तिला ... हे ऎकून मी खूप खूप हसले ,,, ते चुमुरड पिल्लू ,,, माझ्याशी माझ्या प्रोब्लेम बद्दल बोलणार होतं :D :D :D हे ही हे हे  ,,,, sweetheart bro ....

मग काय, ताई ओरडली, चिडली याची शिक्षा काय तर कांदा भाजी ,,, सो मग, आमच्या बिल्डिंग मधल्या बच्चे कंपनीने मस्त कांदा भाजींवर ताव मारला ,,,, ( माझं चिडणं त्यांच्या पथ्यावर आणि माझ्या आजीच्या पित्तावर पडलं) ,, कारण भज्यांच्या घाट घातला मी पण,. मागचं आवरण वैगरे तिलाच कराव लागल, त्यात पोरांसकट माझा गलका :) :) :) वर पोर ताईने भाजी केली मस्त म्हणत गुल :D :D :D :D


                                                                                ,... रेश्मा आपटे