Friday 13 May 2011

नजरा

तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्‍या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !!
                आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,...

त्यांची नजरा नजर होते:  एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,.. दुसरी अस्वस्थ, काळजीत, उदास त्या पहिल्या नजरेचा हेवा करणारी तरी खूप स्वतंत्र ,...


तो शाळेतून घरी येणारा मस्ती करत, मोत्रांबरोबर खेळत, मारामारी करत, waterbag मधलं पाणी एक-मेकांच्या अंगावर उडवत, अवखळ ,.. धबधब्या सारखा,,  चिंता काळजी याचे सावटही न पडलेला, चेहऱ्यावर आनंद शाळा सुटलेली असण्याचा आणि घर गाठण्याची घाई, बस यायला थोडा वेळ असतो, मग तो समोरच्या चिंचा बोरांच्या गाडीवर जातो ,,, बोरं घ्यायला ....
                    आणि तो त्याच गाडीवर छोट्या बहिणीबरोबर बोरं, चिंचा विकत, झाडाला दगड मारून विकण्यासाठी त्या जमवतं,.. सकाळचाच अवतार याचाही.., पण तो स्थिर गाडीवर उभा, चिंचा, बोर विकण्यासाठी मस्त typical स्वरात लावलेला आवाज गाडीवर व्यवस्थित मांडलेली बोरं चिंचा गोळ्या वैगरे ,, चेहर्‍यावर आनंद कोणीतरी गिर्हाईक आलं म्हणून,... चार पैसे मिळणार म्हणून ,.....

त्यांची नजरा नजर होते : एक नजर पुन्हा बेफिकीर, थोडासा रुबाब आलेला असतो आता त्या नजरेत,.. हातातले पैसे खुळखुळवत  नजरेत एक हुकमीपण ,.... दुसरी नजर आशाळभूत, सचिंत, गहिरी आणि खूप खूप जबाबदार, एक छोटीशी इच्छा त्या नजरेत दिसते, कधी तरी शाळेत जाण्याची आणि त्या मुलांमधला एक होण्याची,, त्या नजरेत असते एक आशा शिकण्याची आणि पुस्तकातले तक्ते गिरविण्याची


तो T shirt आणि half pant पायात sports  shoes , हातात बॉल  कधी फुटबॉल चा तर कधी क्रिकेटचा आणि bat सुद्धा, कधी rakets कधी skettings सायकल तर रोजचीच,.. तो संध्याकाळी, बागेमध्ये  मित्रांबरोबर..., खूप खूप ओरडणारा, मस्त मस्त खेळणारा हुशार आणि त्याच्या मित्रांना खूप खूप आवडणारा,.. त्याला खूप मित्र मैत्रिणी आहेत, रोज काही तरी खाऊ आणणारे किंवा त्याचा खाऊ हक्काने मागणारे,..
                        आणि तो बागेच्या बाहेर भेळ-पुरीच्या गाड्यांवर बश्या विसळणारा, अजूनही सकाळचाच आवतार, अनवाणी पाय आता थोडे थकलेले, तो त्याच्या कडे बघणारा, यंत्रवत अचुक स्वतःचे काम करणारा, बॉल बागेच्या बाहेर आलाच तर तो आत फेकणारा आणि गाडीपासून लांब गेला म्हणून त्या गाडीच्या मालकाच्या शिव्या खाणारा ... तरीही बॉल मात्र अचूक त्याच्याकडे फेकणारा

त्यांची नजरा नजर होते बॉल देता-घेताना:  एक नजर आनंदी, खूप खूप बोलकी, फ्रेश, बेफिकीर, थोडीशी गर्विष्ठ, बॉल हातात आल्यावर "त्या" नजरेशी अगदी सहजच संबंध संपवणारी ,.... दुसरी नजर वाट बघणारी बॉल बागेबाहेर यायची,.. आशाळभूत, स्वप्नाळू, थोडीशी दु:खी, कधीतरी त्या बागेत प्रवेश मिळेल या आशेवर दुप्पट जोमाने गाडीवर काम करणारी,..


जेवण वैगरे करून आई बाबांबरोबर cartoons बघून मऊ मऊ गादीत आणि Ac च्या गारव्यात भीती वाटते म्हणून आईचा हात हातात घेऊन, तिच्या प्रेमाच्या उबेत त्या घराचा राजकुमार, "तो" शांत शांत झोपणारा ,..... 
               समोरच्याच झोपडपट्टीत आई विना भावंडाना चार अन्नाचे घास भारावू शकलो या खुशीत त्या चिल्ल्या पिल्यांचा अन्नदाता त्या घराचा राजा, "तो" जमिनीवर आणि छताचे पांघरूण करून स्वस्थ झोपलेला ,,, डोळ्यात काही स्वप्न घेऊन,.. त्याच्या नजरेला आठवत आणि ती आपल्या भावंडांमध्ये शोधत ....

आणि त्या नजरा:  एक bus stop च्या आलीकडे आणि दुसरी त्या पलीकडे बंद पापण्यांत दडलेल्या ....


                                                                                        
                                                                                      ..... रेश्मा  आपटे 



Monday 9 May 2011

प्रेम आणि मंगळसूत्र

" " प्रेम! "  जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट, सुंदर फिलिंग,... आपण कोणालातरी आवडण्यात किती सुख असत, किती समाधान मिळत हे अस सांगून नाही समजायचं कोणाला...,, त्यासाठी ते अनुभवाव लागतं, ते त्याने माला बघणं, ते  डोळ्यातून मनात साठवून घेणं,  त्याच बोलणं, त्याच दिसणं, त्याचा स्पर्श,,.. सगळं सगळं अद्भुत असतं,.. मी अनुभवलंय ते सगळं, thats called seventh heaven ....प्रेम प्रेम असतं कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरत.  आयुष्याच्या कोणत्या ना  कोणत्या वळणावर आपण प्रेमात पडतोच,.. कोणतीतरी नजर प्रत्येकाला आव्हान देऊन जातेच तोच तो 'क्षण' असतो जेव्हा तुम्ही स्वत:चे नाही रहात,,  प्रवाहा बरोबर वाहत राहाता ,.. ते वाहत जाणं  तेही खूप खूप वेड लावणार असत,...

कोणीतरी तुमच्यासाठी काहीही करू शकत, करत, त्याला मी आवडते ही भावनाच खूप confidence देते ... खूप बोल्ड बनवते,,,, न बघितलेल्या माणसावर मनापासून प्रेम करणे आणि ते निभावणे, किंवा arrange marriage करून   ते निभावून नेण हे महान आहेच! पणं,.. जसं वाटत तसं मनापासून जगणं यात काय चूक आहे??? चोरून लांबून मनातल्या मनात प्रेम करत बसण्यापेक्षा, जो आवडतो त्याला "ती" ने जाऊन भेटणे त्याला ते सांगणे आणि तो मिळावा म्हणून प्रयत्न करणे, यात आज काल काही नवल नाही राहिलेले.. पण "तो" जर उत्कट पणे प्रेम करत असेल तर कोणाचा आक्षेप नसतो पण "ती" जर तशी वागली, कोणत्याही भावना आणि इच्छा न लपवता बिनधास्त जगली तर ती मात्र  "लाज लज्जा सोडली .." या category मध्ये गणली जाते असे का??? 

मी ही प्रेम केलं मनापासून केलं....  हे सांगण्याची आणि स्विकारण्याची माझ्यात हिम्मत आहे कारणं मला नाही वाटतं मी काही चूक केलीये. मी त्याला माझं म्हटलं आणि त्यानेही मला!  मी विश्वास ठेवला आणि तो ठेवण्यासाठी मला कोणत्याही प्रोमिसची किंवा commitment ची गरज नाही वाटली ,,, आम्ही एकत्र आलो कारण आम्हाला एकमेकांची कंपनी आवडली, आमचे विचार जुळले ( professional  आणि emotional level वर ( जो खूप rare combo असतो )  ). मग  life मध्ये अजून काय हवे? एक जोडीदार जो माझ्यावर प्रेम करतो जो माला समजून घेतो आणि जो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ,,, बस माझे life असेच सुंदर बनले, फुलले. आम्ही एकत्र आलो कारण आम्हाला मनापासून तसे वाटले. एक-मेकांना साथ द्यावी सोबत करावी. मला नाही आवडत मानात एक आणि ओठावर अजून दुसरेच काहीतरी. त्याच्या बरोबर bike वरून फिरणे, हातात हात घालून खूप वेळ गप्पा मारणं, bandstand वर जाऊन एकमेकांना फील कारणं, त्याच्या मिठीत विरघळून जाणं, त्याने मला सुंदर म्हणणं आणि मग सगळं काही विसरून माझ्याकडे बघतं बसणं... त्याने आणि मी  बिनधास्त पणे आमचं नात स्विकारल होतं. मी बिनधास्त असणं त्याला पटायचं आणि त्याला हे पटण माला आवडायचं. 

माझ प्रेम महान नसेल कदाचित!! पण मी माझ्या कोणत्याच भावनांना कधी झिडकारल किंवा नाकारलं नाही. मी कधी स्वतःवरचा कंट्रोल सिध्ध करण्याचा प्रयत्नही केला नाही..,,  उलट मी प्रवाहा बरोबर वाहत जाणं आणि तो क्षण जगणं निवडलं , त्यानेही हेच तर निवडलं.... दारू सिगरेट ला वर्ज न मानण किंवा मिठी मारणं, अगर किस कारण, हे तर सगळेच करतात पण ,.. गुपचूप. , ते चारचौघात स्विकारणे हेही माला चूक नाही वाटत. लग्न वैगरे च्या फंदात ना त्याला पडायचे आहे ना मला. कायद्यानेही live -in  ला protection दिलेय आता. पण हे घरच्यांना कोण समजावणार?? जर तो आणि मी एकमेकांना समजून घेऊन mutually लग्नाशिवाय एकत्र आलो तर त्यात बिघडले कुठे??

 शेवटी लग्नं लग्नं म्हणजे तरी काय ?? दोन मनांचे आणि शरीरारांचे एकत्र येणे. विश्वास आणि प्रेमाने स्वतःचे विश्व निर्माण करणे. सुख-दु:खात आधार देणे आणि आयुष्य भरासाठी साथ करणे. पण ते तसे जर आम्ही लग्नाशिवाय करत असू तर आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला ??? असे कसे म्हणता येईल?? हो मी झाले surrender त्या क्षणाला,, स्वतःला थांबवू शकले नाही म्हणून नाही हं .,.. तर ते नाकारायचे नव्हते म्हणुन ,, ते समोर होते ते हवे हवेसे होते म्हणून,.. तन मनाने समरस झाले त्याच्यात, आमचे नाते समजून घेण्यासाठी किंवा ते सर्वमान्य होण्यासाठी माला हे आणि इतकेच पुरेसे आहे की आज ८ वर्षांनतरही आमचे नाते फ्रेश आहे ती ओढ ते passion   अजून एक-एकांसाठी आम्ही फील करतो. मग हे नात माला कोणत्याही married couple सारखेच पवित्र वाटते. मी आमच्या त्या नात्याला respect करते. मला ते नातं इतरांनी स्विकारावं किंवा त्याला पावित्र्याच्या कोणत्याही साच्यात कोंबाव आणि  फिट बसवावं  यासाठी त्या काळ्या मण्यांनी गरज वाटत नाही. त्यालाही हेच वाटत होत काल -परवा पर्यंत घरच्यांना समजावण ही  कठीण गोष्ट आहे,.. पण दोघे मिळून हे करू यावर  विश्वास होता आमचा, कोणत्याही promise च्या ओझ्याखाली मला माझं नातं गुदमरू नाही   द्यायचं,, तर ते जगावस वाटतं म्हणून जगायचं ,... त्याच्याबरोबर.!!

पण आज,, मी.., मला,.. म्हणजे .. मी त्याच्या वागण्याने confuse झालेय. त्याला आता लग्न करायचय, त्याला त्याच घर हवय, बायको हवी आहे, मुल-बाल संसार सगळं हवाय, आमच्या मुलांना त्याला त्याचे नाव द्यायचेय. हे सगळ मलाही हवाय आमची मुल त्याचेच नाव लावणारेत पण त्यासाठी लग्नाची काय गरज??? माला आमचं नातं आहे तस जगायचेय फ्री आणि सुंदर कोणतीही commitment नसतानाही एक-मेकांबद्दल असलेली passion  जपायचीये माला. बाकीच्यांचे ठीक आहे पण ह्यालाही आता आमच नातं बेड्यात डांबून टाकायचं???. बेडी ,.. नात्यातली सहजता घालवणारी,.. मग आहे ते जसं आहे तसं फरफटत जगात राहायचे, दिवस खेचत राहायचे, आणि नशिबाला  दोष देत बसायचे. माझी best frnd जी लग्न संसार यात रमणारी होती तिचे हाल मी बघतेय, तिला क्षणोक्षणी गृहीत धरल जातंय, तिची स्वप्नं, "ती" च मनं, तिचे विचार, तिचं लिखाणं सगळं सगळं तिच्या कवितांच्या कागदांसकट चुरगळून गेलय,..तिच्यातली "ती"च हरवलिये आणि उरलीये ती फक्त  तिच्या नवर्‍याची बायको आणि त्यांच्या मुलांची आई,..  मला,, मला स्वतःचे अस्तित्व जपून त्याच्या साथीने जगायचेय. .

आता तो," म्हणतोय की जर इतकं प्रेम आहे, विश्वास आहे तर मग commitment का नको? आई-डॅड साठी हे एवढाच हवाय ते मला दे". माला हे emotional blackmailing सहन नाही होत, त्याला माहितेय की मला त्याच्याबद्दल काय वाटत,, मग त्याला का गरज पडावी कोणत्याही promise ची? त्याच्या आई- डॅड समोर नो ड्रिंक्स, नो स्मोकिंग मी स्वीकारलं. पण मी हे अस काही करताच नाही अजिबात हे त्यांना त्याने का सांगावे? मी ज्याच्याबरोबर जगले ज्याच्यावर प्रेम केलं तो कोणी वेगळाच होता का? गोंधळ उडालाय गं माझा पुरता. आता फोन वर म्हणतोय मला पटत तुझ्या मम्मा च म्हणणं "स्वातंत्र्य आणि  स्वैराचार यात फरक आसतो.  जे जगणं आपण स्वीकारायचे म्हणत आहोत ते स्वतंत्र नाही तो 'स्वैराचार' आहे.. जर आपल्याला एक-मेकांबद्दल पूर्ण खात्री आहे की आपणं एक-मेकांना जन्मभर साथ देऊ तर मग commitment देण्यापासून का पळायचे? आई म्हणते, " लग्न म्हणजे बंधन नाही,, तर तो एक संस्कार आहे तुमच्या नात्यावर होणारा. शेवटी आयुष्यात कधी ना कधी स्थैर्य,. तुमच्या भाषेत stability हवीच आणि ती प्रत्येक जण शोधात असतो. लग्नं तिच stability देते. तुम्हाला एक-मेकांचे आहोत ही जाणीव करून देते आणि मग जबाबदार्‍या तुम्ही मनापासून पार पाडता.आणि शेवटी संस्कृती म्हणून  काही आहे की नाही ,,, western culture आपण का पाळायचे ,,, ते त्यांचे पाळतात मग आपण आपले जपायला का लाजायचे ?? का कमी पण वाटतो त्यात?? "

 culture चा मीही respect करते ग ,, पण मनाला न पटणार्‍या गोष्टी मी नाही करू शकत. त्याचे नाव लावण्यासाठी स्वतःचे नाव बदलले म्हणजेच त्याच्याशी एकरूप झाले असे असते का??? तो किंवा मी हरून आल्यावर फक्त आधाराची नाही तर खंबीरपणे त्याला सावरण्याची गरज असते मग ते मी आताही करतेय, तोही करतोय. फक्त culture म्हणून लग्न करून आणि त्याच्या नावचे मंगळसूत्र किंवा कुंकू लावून आम्ही किती गोड गोड संसार करतो हे कोणाला दाखवण्यात काय अर्थ?? अशी किती जोडपी आहेत जी लग्न करुन सुध्धा सुखी नाहीत. मंगळसूत्र  घातलं की तुम्ही एकत्र येणं valid नाहीतर तो स्वैराचार??? ,. मग ते लग्न करणारे जोडपे किती खुश आहे? rather आहे की नाही? त्यांना नक्की काय वाटते याबद्दल कितीदा विचार केला जातो?? मग जरी पटले नाही तरी एकमेकांना सहन करत राहायचे. मंगळसूत्र च्या  बेडीत स्वतःला पूर्णपणे जखडून नात्यातला हळुवारपणा हरवून बसायचा का????? मला त्याची, त्याच्या फमिलीची होऊन राहण्यापेक्षा माला त्यांनी मी आहे तसे स्विकारणे आणि मी त्यांना  मनापासून respect करणे जास्ति पटेल आणि रुचेल.... ""

ती बोलत होती, फक्त फक्त बोलत होती,,, तिची भळभळणारी जखम आमच्या समोर मोकळी करत होती. आणि आम्ही दोघी फ़क्त ऐकत होतो मुग्ध होऊन, तिचे विचार फार स्पष्ट होते,.. आम्ही भारावून ऐकत होतो..,, ती खूप प्रश्न विचारात होती आम्ही तिघी मिळून दोन पिढ्यातल्या विचारांची सांगड घालत होतो. काही प्रश्न पडू शकतात मुलीना हे तिच्याशी बोलून झाल्यावर माला कळल,. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आम्हाला,.. काही आम्ही पटवली तिला, काही तिचीही मते आम्हाला पटली.. खूप उहापोह केला. खूप  विचार केला पण marriage आणि live -in मध्ये marriage कसं perfect आणि  " get married dear " हे मात्र तिला पटवून नाही देऊ शकलो, तिच्या आईने दिलेली एकच कामगिरी पण ती नाही पूर्ण करू शकलो. तिचे विचार तिचे प्रश्न सगळ सगळ ऐकून आम्ही दडपून गेलो. आमच्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती नाहीच समजली...

हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे ...काल ती online भेटली पूर्ण दीड - दोन वर्षांनी ,,.. तिच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका mail केली तिने लग्नाला नक्की यायचं हं अश्या आग्रह सकट.ती आता अमेरिकेत आहे, बहिणीच्या लग्नाचा खर्च ती करतेय संपूर्ण.. आणि तो he got married to thier common friend and they both are happily married (???) .ती .. ती मात्र शोधतेय अजून तिच्या प्रश्नाची उत्तर, आणि आशा बाळगून आहे अजून तिचं अपूर्णत्व कधीतरी पूर्ण होईल,.. उत्तरे मिळतील आणि जोडीदार सुध्धा या बद्दल ,...........

                                                                                .....   रेश्मा आपटे

 Note
देव करो नि "ती" च्या स्वप्नातला "तो" तिला लवकर मिळो....... all the best dear  

Thursday 5 May 2011

want to go back in those days :( :(

मध्ये काही कारणास्तव शाळेत जाण्याचा योग आला ,,, 
शाळेच्या आवारातील काही छोटे- छोटे बदल सोडले तर शाळा काहीच नाही बदललीये ,,, मस्त मस्त मस्त ,,, पुस्तकातील काही पाने जशी वार्‍याने उडून सहज मागे जावीत न तितक्याच सहजपणे मी माझ्या आयुष्यातली काही वर्ष मागे गेले. ते मैदान, ती इमारात, तो जिना, ती मोरावरली सरस्वती सगळं सगळं माला खुणावत होत माला मागे मागे घेऊन जात होत माझ्या सुंदर सुंदर दिवसात ... काही सेकंदात इतका प्रवास केल्यावर हातावर बसलेल्या छोट्याश्या बॊल ने भानावर आले मी, अगदी पुढच्याच क्षणी  ... 

मग सहाजिकच माझ लक्ष तो बॊल उचलण्यासाठी आलेल्या चिमुरड्याकडे गेले त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती,, हा आता ती भीती  "ही बाईना सांगेल?... मग ओरडा बसेल का?? " ह्याची होती, की "बॊल गेला तर??" किंवा "या मुळे उद्यापासुन खेळणेच बंद झाले तर???" "आता ही काय करेल नक्की ??? " याची होती, ते माला नि त्याला दोघानाही सांगता नाही यायचं ,,, हं पण एक मात्र खर की, मी स्वच्छ हसून तो बॊल त्याला परत केल्यावर मात्र त्या मोठ्या डोळ्यातले भाव क्षणात बदलले भीती ची जागा आनंदाने घेतली कारण आता  ना त्याला ओरडा बसणार होता ना त्याचा बॊल जप्त होणार होता,,, किती किती निरागस आणि खरे डोळे होते ते! त्याच्या निरागस मनाचा आरसाच जणू! खरच लहापण म्हणजे वरदान असत ईश्वराच... जे जस वाटत ते तसच्या तस व्यक्त करता येत.... कोणताही मुखवटा नाही बळेच हासण नाही की खोटी स्तुती नाही. 

शाळेत प्रवेश केल्या केल्या समोर येत ते सुंदर मोठ्ठ मैदान, नजर खिळवून  टाकणार... ती देवी, ते वर्ग, ते गेट, सगळ जिथल्या तिथे अरे पण ते झाड?? उन्हां पावसात सावली देणार, लापाछुपिच्या खेळात हमखास मदतीला येणार, दप्तरांची ओझी झेलणार, आमच्यातल्या एकाच डोक फुटल्यावर घाबरलेल्या आम्हाला बघणार, शाळा सुटली की त्याच्या मुळांशी आम्हाला सामावून घेणार, मैदानाच्या कोपर्‍यात आणि शाळेच्या आत प्रवेश केल्यावर डाव्याबाजूला डौलाने वार्‍यावर झुलणार आमचं लाडकं झाडं! ते मात्र नाही दिसलं कुठेच..,, आत गेले, जिना चढून वर गेले तर आमचा ४ वर्ष एकाच असलेला वर्ग ... माला खुणावू लागला मग काय सरळ आत शिरले, ते छोटे छोटे बेंच तेव्हा किती मोठाले वाटायचे आता चिमुरडे दिसत होते,,, तिथे केलेली मस्ती, मधल्या सुट्टीत खेळलेले गोल्स्पोट, छोटे छोटे बैठे गेम (काही खेळांची तर नावेही नाही आठवत), केलेली भांडणे, मारामारी, त्यानंतरची रडारड, मग दुसर्‍याच  क्षणी कट्टी ची होणारी बट्टी आणि परत एक-मेकांचे हात पकडून,जोक सांगून पोट दुखेपर्यंत हसणार्‍या आम्ही सगळ्या जणी,.. काही दोस्तांची मस्ती, शाळेत दिलेले पर्फोर्मंस, पहिला निबंध, पहिली कविता, भाषण, नाच सगळं सगळं काही आठवत होत. त्या आठवणीत शाळेतल्या सगळ्या बाई, ताई, मुख्याध्यापिका होत्याच, खूप आनंद, मस्ती, होती तशाच शिक्षाही होत्या,...

मी ज्या कामासाठी शाळेत गेले होते ते व्हायला थोडा वेळ लागणार होता. मग काय माझ्या त्या शाळेत माझी पावले इकडे तिकडे फिरत होती, माझ्या आठवणी ताज्या करत होती, लहानपणी वाटणार सगळ्यात मोठ ’जग’ म्हणजे हीच शाळा, जिने मला उभ राहायला शिकवलं, पाटीवर पेन्सिल फिरवून अक्षर ओळख करून दिली, माझ्या रेघोट्यांना भाषा इथेच तर मिळाली. माझी पहिली मैत्रीण, पाहिलं बक्षीस, पाहिलं भाषण, पाहिलं नाटक, सगळ सगळ काही माला इथेच मिळाल. मी मला पहिल्यांदा इथेच सापडले का?,.

शाळा म्हणजे भीती, कटकट, अभ्यास, आईला सोडून येण अशी करून घेतलेली धारणा, मग माझी रडारड, पहिल्याच दिवशी चालता चालता शाळेला घेतलेला साष्टांग नमस्कार ( आई-बाबांकडून कळले) .. या सगळ्यातून अंजू ताईंच्या वर्गात मी कधी रुळले ते काळेच नाही. मग अलका ताईंच्या वर्गात पहिली आले (ती पहिल्यांदाच आणि शेवटचीही  :D :D :D ). मग शाळेच्या जीवनाला खरी सुरुवात झाली पाटील बाई आणि पटवर्धन बाईंच्या बरोबर इतर सगळ्याच शिक्षिकांनी खूप खूप प्रेम दिल, आधार दिला, Confidence दिला. शाळा सोडून आता बरीच वर्षे झाली पण त्या आठवणी मनावर कोरल्या गेल्यात कायमच्या.. आज शाळेतून फेरफटका मारताना अस वाटत की आता कालच तर आपण ३री -४थित होतो,... अजून आपण तितकेच आहोत, तसेच आहोत, इमारत, बेंच, शिक्षक , त्ताई काहीच बदलले नाहीये आणि मी.. मी ही तशीच, डोक्यात काहीतरी घेऊन शाळेत हुंदडणारी ... एका खिडकीत उभी राहून मी सगळं काही विसरून, मैदानावरची मज्जा पाहात राहिले,... ती खेळणारी मुलं-मुली, मध्येच हसणारी, भांडणारी, सगळे जण आपापल्या ग्रुप बरोबर खेळण्यात मग्न होते, आणि मी त्यांना बघण्यात ,,,

त्या लपाछुपी खेळणार्‍या मुलींना पाहून उगीच वाटल अरे काहीच तर नाही बदललाय,.. सगळ तसाच आहे, ,, खेळ तोच आहे..लापाछुपिचा, नियम तेच आहेत, थप्पा किंवा भोज्जा होणारे हे अटळ, राज्य जाईल तरी नाहीतर परत तरी येईल .., भिडू मात्र बदललेत, आता या खेळातले .. इथे लपाछुपी आहे ती सुख -दुखाची, जया -पराजयाची.,, डेड लाईन्स  आणि अचिव्हमेंट ची,  आणि या खेळात राज्य ... ते मात्र सतत माझ्यावरच.!! .. आज मी आंधळी कोशिबिरही खेळते, डोळ्यावर बांधलेली ती पट्टी आहे अजून तशीच तशीच, यात लोक खुणावू शकतात, आवाजाने दिशाभूल करू शकतात, पण राज्य घेणार्‍याने अंधारात चाचपडत पुढे जायचे वेध घ्यायचा खेळाडूंचा.. इथेही अंधार आहे सगळीकडे....  शोध सुरु आहे ,,, शोध घ्यायचा आहे तो स्वप्नांचा, गाठीशी आहेत प्रयत्न आणि विश्वास ( याच आंधळी कोशिबिरीच्या खेळातून कमावलेला ) की ज्यांना शोधात फिरतोय ते आहेत त्यांची चाहूल लागलीये  ते मिळणारेत. ..

तेव्हड्यात माझा फोन वाजला आणि मी सरावानेच उत्तर दिले, " yes , i will meet u directly in the court ,... ok ok in case you want to discuss any thing just call in the office .. .now m in court ,lil busy lets talk afterwards .."
आणि मी माझ्या विचारांच्या लांगडीतून जरा भानावर आले .. आणि पटले माला की, नाही, मी ती नाहीये,,, सगळं सगळं शिक्षकांसकट तसच्या तसं आहे पण ,,, ती खरी खुरी मी कुठाय??? खूप खूप बोलणारी, मनापासून हसणारी, रडणारी, आणि बिनधास्त असणारी ,,,  त्या मातीत खेळणार्‍या मुलीसारखी.., मनसोक्त मन लावून, हातांसोबत पाय आणि ड्रेस मळवणारी.,...  मी मनसोक्त मन लावून मातीत अक्षर गिरमितवत बसू शकते का आता?? संत्र लिंबू पैश्या पैश्याला म्हणून गोल गोल फिरण्याचा खेळ तो साधा, पण आज तो ऐकून काय सुचते तर,किंमत,.. पै पै ची,,, विष - अमृत चा खेळ ! तो तर चक्क आपल्याला आयुष्यातले चढ-उतार दाखवत असतो. हे बालपणीचे खेळ आपल्याला आयुष्याच तत्त्वद्यान शिकवत असतात ?.. की, आता मोठे होऊन आपण त्या खेळांना, खेळांकडे निरागस पणे पाहूच शकत नाही?? की माझेच विचार भारकटतायत?? देव जाणे,,, पण एक नक्की की आज मी जशी खिडकीत उभी राहून विचार करतेय तशी ही मुलही करतील काही वर्षांनी शेवटी ते माझा "काल" आहेत आणि मी त्यांची "उद्या" ,... जणू मी त्यांना खो द्यायलाच इथे आलेय या विचाराच मालाच आता हसू येतंय ,,,
  
पण,,,, anyways , ह्या सगळ्या चित्र विचित्र विचारण नंतरही मी म्हणेन that I want my picnics ,, i want those      days to be back in my life ,,,, सुंदर दिवस, सुंदर नाती, सुंदर अनुभवं, आणि हो सुंदर खेळ :) :)  खरच आपले नि शाळेचे नातेच असे असते की ते ज्याने त्याने अनुभवायचे असते,,, ते असे शब्दात वक्त कर म्हणालात तर माझ्या नि तुमच्या भावनेचा अपमान होईल,, कारण, शब्दांचा पसारा मांडूनही ती अव्यक्तच राहील ....... म्हणून ह्या फंदात न पडता मी म्हणेन common SVJ 's lets reunite आणि मस्त अनुभवू ते दिवस ,,,,,,,,,,,,,,

miss those days n friendz  :( :( :(......