Friday 13 May 2011

नजरा

तो झोपेतच यंत्रवत पावले टाकणारा, तेल लावून चापून पाडलेला भांग, गळ्यात अडकवलेली water bag , आईच्या खांद्यावर त्याचे दप्तर , बेफिकीरपणे आई बरोबर पडणार्‍या पावलांत बूट, अंगात uniform , गळ्याला टाय आणि रोजचाच प्रश्न आज डब्याला काय? ,... बस stop वर तो आई बरोबर उभा !!
                आणि तो बस stop च्या समोरच्या parking lot वर, अंगात half pant , आणि फाटलेला बनियन, चपला वैगरे चैन त्याला परवडण्यातली नव्हतीच, हातात फडका, लोकांच्या कार पुसत तो एकटा उभा ,...

त्यांची नजरा नजर होते:  एक नजर बेफिकीर, झोपाळू,घाबरी आणि शाळेत सकाळी जायचे म्हणून काहीशी वैतागलेली,,.. दुसरी अस्वस्थ, काळजीत, उदास त्या पहिल्या नजरेचा हेवा करणारी तरी खूप स्वतंत्र ,...


तो शाळेतून घरी येणारा मस्ती करत, मोत्रांबरोबर खेळत, मारामारी करत, waterbag मधलं पाणी एक-मेकांच्या अंगावर उडवत, अवखळ ,.. धबधब्या सारखा,,  चिंता काळजी याचे सावटही न पडलेला, चेहऱ्यावर आनंद शाळा सुटलेली असण्याचा आणि घर गाठण्याची घाई, बस यायला थोडा वेळ असतो, मग तो समोरच्या चिंचा बोरांच्या गाडीवर जातो ,,, बोरं घ्यायला ....
                    आणि तो त्याच गाडीवर छोट्या बहिणीबरोबर बोरं, चिंचा विकत, झाडाला दगड मारून विकण्यासाठी त्या जमवतं,.. सकाळचाच अवतार याचाही.., पण तो स्थिर गाडीवर उभा, चिंचा, बोर विकण्यासाठी मस्त typical स्वरात लावलेला आवाज गाडीवर व्यवस्थित मांडलेली बोरं चिंचा गोळ्या वैगरे ,, चेहर्‍यावर आनंद कोणीतरी गिर्हाईक आलं म्हणून,... चार पैसे मिळणार म्हणून ,.....

त्यांची नजरा नजर होते : एक नजर पुन्हा बेफिकीर, थोडासा रुबाब आलेला असतो आता त्या नजरेत,.. हातातले पैसे खुळखुळवत  नजरेत एक हुकमीपण ,.... दुसरी नजर आशाळभूत, सचिंत, गहिरी आणि खूप खूप जबाबदार, एक छोटीशी इच्छा त्या नजरेत दिसते, कधी तरी शाळेत जाण्याची आणि त्या मुलांमधला एक होण्याची,, त्या नजरेत असते एक आशा शिकण्याची आणि पुस्तकातले तक्ते गिरविण्याची


तो T shirt आणि half pant पायात sports  shoes , हातात बॉल  कधी फुटबॉल चा तर कधी क्रिकेटचा आणि bat सुद्धा, कधी rakets कधी skettings सायकल तर रोजचीच,.. तो संध्याकाळी, बागेमध्ये  मित्रांबरोबर..., खूप खूप ओरडणारा, मस्त मस्त खेळणारा हुशार आणि त्याच्या मित्रांना खूप खूप आवडणारा,.. त्याला खूप मित्र मैत्रिणी आहेत, रोज काही तरी खाऊ आणणारे किंवा त्याचा खाऊ हक्काने मागणारे,..
                        आणि तो बागेच्या बाहेर भेळ-पुरीच्या गाड्यांवर बश्या विसळणारा, अजूनही सकाळचाच आवतार, अनवाणी पाय आता थोडे थकलेले, तो त्याच्या कडे बघणारा, यंत्रवत अचुक स्वतःचे काम करणारा, बॉल बागेच्या बाहेर आलाच तर तो आत फेकणारा आणि गाडीपासून लांब गेला म्हणून त्या गाडीच्या मालकाच्या शिव्या खाणारा ... तरीही बॉल मात्र अचूक त्याच्याकडे फेकणारा

त्यांची नजरा नजर होते बॉल देता-घेताना:  एक नजर आनंदी, खूप खूप बोलकी, फ्रेश, बेफिकीर, थोडीशी गर्विष्ठ, बॉल हातात आल्यावर "त्या" नजरेशी अगदी सहजच संबंध संपवणारी ,.... दुसरी नजर वाट बघणारी बॉल बागेबाहेर यायची,.. आशाळभूत, स्वप्नाळू, थोडीशी दु:खी, कधीतरी त्या बागेत प्रवेश मिळेल या आशेवर दुप्पट जोमाने गाडीवर काम करणारी,..


जेवण वैगरे करून आई बाबांबरोबर cartoons बघून मऊ मऊ गादीत आणि Ac च्या गारव्यात भीती वाटते म्हणून आईचा हात हातात घेऊन, तिच्या प्रेमाच्या उबेत त्या घराचा राजकुमार, "तो" शांत शांत झोपणारा ,..... 
               समोरच्याच झोपडपट्टीत आई विना भावंडाना चार अन्नाचे घास भारावू शकलो या खुशीत त्या चिल्ल्या पिल्यांचा अन्नदाता त्या घराचा राजा, "तो" जमिनीवर आणि छताचे पांघरूण करून स्वस्थ झोपलेला ,,, डोळ्यात काही स्वप्न घेऊन,.. त्याच्या नजरेला आठवत आणि ती आपल्या भावंडांमध्ये शोधत ....

आणि त्या नजरा:  एक bus stop च्या आलीकडे आणि दुसरी त्या पलीकडे बंद पापण्यांत दडलेल्या ....


                                                                                        
                                                                                      ..... रेश्मा  आपटे 



5 comments:

  1. मस्त लिखाण!!

    ReplyDelete
  2. conflict of life चांगल्या पद्धतीने मांडले आहेस. पु ले शु.

    ReplyDelete
  3. चांगली आहे हो लेखिकेची नजर...
    पण शुद्ध्लेखनाच्या चुका सुधाराव्यात. एकदा स्वत: वाचावे म्हणजे , . ई. कुठे हवे आहेत ते कळते. कारण ते नसले तर वाचकाचा interest कमी होतो पुढचे वाचण्यास. Continuity लागल्यास मज्जा येते.
    All the Besht... :)

    ReplyDelete
  4. ok kaustubh ,,, got the point ,, next time pasun nakki laxat thevate :)

    ReplyDelete