Tuesday 22 November 2011

2.30pm ची ठाणे लोकल

गेल्या आठवड्यात ठाण्यात एक काम होते म्हणून ऑफिस मधून दुपारीच निघाले. एरवी माणसांनी तुडुंब बहरून ओसंडून वाहाणारी लोकल दुपार असल्यामुळे एकदम शांत होती. first  class च्या डब्यात आम्ही ३नच जणी होतो. मस्त पाय पसरून बसले पण झोप येत नव्हती, नेहमी सारखी विचारांची तंद्री सुध्धा  लागत नव्हती :( वाटल ह्या सुख बोचत आपल्याला रोज त्या मरणाच्या गर्दीत आणि घामाच्या वासात सुद्धा झोप लागते किंवा विचारांचे चक्र सुरु असते. आज दस्तूर भी है मोका भी ( नो गर्दी + विंडो सीट)  पण झोप काही येत नाही :(

तर समोर बसलेली एक २८-२९ वर्षाची क्युट गोरीपान मुलगी हुंदके द्यायला लागली. वाटल बरे वैगरे नसेल म्हणून पाणी विचारलं पाणी प्याली तरी तेच. म्हटलं काय वैताग आहे. तर शेजारची ६० च्या आस पास ची आजी मध्ये पडली तिला सरळ विचारलं " काय आहे तुझ्या मनातला सल? आता सांगू नको  उन्हाने रापले आणि पाणी आले. हे काळ्याचे पांढरे असेच नाही झाले." तशी ती आणिकच रडायला लागली. झोप तर येताच नव्हती ( आणि दुसर्याच्या आयुष्यात डोकावणे हे सगळ्याच मुलींचे फेवरेट काम).

ती:  काय सांगू आजी. मी आता माझ्या बॉयफ्रेंड शी बोलत होते, म्हणजे X म्हणू की काय म्हणू माहित नाही कदाचित उद्या X म्हणेन पण सध्या तरी माझा बॉयफ्रेंड! ६ वर्ष आम्ही रेलातीओन मध्ये आहोत आणि आता ह्याला साक्षातकार झालाय की we dont have future together, का??? कारण आमच नातं म्हणे कांटाळवाण झालाय.( ती मध्येच थांबली काहीतरी विचार करत. सांगू नको यात अडकत कदाचित, पण बोलली, कदाचित कधीच परत आम्ही एक-मेकीना दिसणार नव्हतो म्हणून असेल) मी ,, मी ते टिकवायला असमर्थ ठरलीये तो चार्म ती ओढ मी नाही टिकवू शकले. आताच हे, मग नन्तर काय? म्हणून वेगळे होणे चांगले असे म्हणणे आहे त्याचे. खूप विनवण्या केल्यावर एक चान्स देऊयात आपल्या नात्याला म्हणतो. चान्स ??? उपकार करतोय का????? मला खरच कळत नाहीये मी कुठे चुकले? तो म्हणेल ते आणि तसेच केले नेहमी, सगळ्या adjustments केल्या, त्याच्या घराचे.. त्यांना आवडणार नाही म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी फक्त शिफ्ट्स असतात म्हणून सोडली. तर आता हा म्हणतोय, मी कमी पडल??. माझ्यातली मीच उरले नाहीये म्हणे.

आजी: मग आता पुढे काय? तुला काय हवाय तो की सुटका?? बघा बुवा तुम्हाला option  आहेत आम्हाला नव्हते असले options .

ती: अर्थात,  मला "तो " आमच नातं हवाय त्याच्या शिवाय माझ आयुष्याच नाहीये. आणि जर गेलाच दूर तर?? स्वत:ला संपवण्याची ताकद किंवा त्याला दुसर्या मुलीबरोबर बघायची हिम्मत पण नाहीये माझ्यात. मला भिती वाटते ती एकटेपणाची! तो गेला तर क्षणात मी एकटी होऊन, सगळी स्वप्न संपून जातील, एक पोकळी निर्माण होईल, त्याने विचार करायला वेळ मागितला तेव्हा वाटल जमिनीत गाडली जातेय मी, कोणीतरी मी निरुपयोगी म्हणून दूर करताय मला. मी सजीव आहे की एक वस्तू?? माझा कंटाळा आला? ६ वर्षाचं नात ३ शब्दात चुरगाळून अडगळीत कसा टाकू शकतो तो? मी खूप रडले तर उपकार केल्यासारखा एक चान्स देऊ म्हटला दोघानाही. मला भिती वाटली ती माझ्या विचारांची एकट पडण्याची!!! जगण्याचा आधार गमावण्याची. मी विचार करत बसले माझ नक्की काय चुकल? सुंदर नातं(??) माझं असं वाळूसारखं हातातून निसटताना मला कळलं कस नाही? की खरच तो म्हणतो तशीच आहे मी? साध आपल माणूस सुध्धा सांभाळता न येणारी? स्वत:त एकट जगायचा विश्वासच आणि सामर्थ्य नसलेली? त्याच्याशिवाय अस्तित्वच नसलेली? तो होता म्हणून लोक मला ओळखत होते, मी काय केलय? त्याला वेळ हवा सेटल व्हायला म्हणून जबरदस्तीने शिकत राहिले तर म्हणे फक्त शिक्षण कामच नाही व्यवहारीपणा हवा तो तुझ्यात नाही.

मी: (खरा तर तोंड उघडायची काहीच गरज नव्हती मला, ती आजीशी बोलत होती. पण गप्प बसले तर ती मी कसली नाही का? lolz ). what the hell ? तो काहीबाही बोलला आणि तू ऐकून घेतलं? का तुझ्यात हिम्मत नाही असे का वाटते तुला? चल मला एक सांग ,. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तू कमी पडलीस राईट? now, assuming without admitting, you falied in keeping the relation moving or just failed to maintain the charm in the relation rite? what did he do to maintain the same? त्याने काय इनपुट्स टाकले तुमच रीलेशन टिकवायला? ही काय फक्त तुझीच जबाबदारी आहे का? आणि... (पुढे मी स्त्रीमुक्ती वादी विचारांची यादीच वाचणार होते, तुला त्याला नियम सारखे, आणि तुझ प्रेम आहे आणि तो हवाय तर काहीतरी कर ते नातं टिकवायला पण त्याला या गोष्टीची जाणीव करून देऊनच ... हे आणि बरेच शब्द मला पड्जीभे खाली ढकलावे लागले ... कारण आजी मध्येच बोलली....)

आजी:  ( मला तोडत आजी म्हणे...) हो तुझच काम आहे. मी जबाबदारी म्हणेन. हो; आहे तुझीच कारण तुझ्यातच ती ताकद आहे आणि कलाही कारण तू मुलगी आहेस. मुलगी मुलगा यातल्या कोणत्याही वादात मला अडकायचं नाही. तुम्ही तरुण मंडळी जे स्त्री-पुरुष समानता म्हणता ते पटत मला पटत पण...
नाती जोडायची असतात. ती जोडायलाही कमी वेळ लागतो तोडायला तर क्षणाचा ego पुरतो पण ती नाती संभाळण (maintain )कारण महत्वाच!!! ते कोणी शिकवत नाही कोणतेही पुस्तक किंवा शाळा-कोलेज तुम्हाला हे शिकवणार नाही ते आपण अनुभवातून शिकायचं असतं. नाती जपण हे मुलीना आपसूकच येत. आणि ह्या अश्या नाजूक नात्यांना तर फारच जपावं लागत, फुलवावं लागतं. स्वत:च अस्तित्व विसरून निष्ठा विसरून त्याला महत्व द्या म्हणत नाही पण "आयुष्य म्हणजे तारेची कसरत असते एक पाऊल चुकलं न की सगळा खेळच उध्वस्त होतो". माझे विचार तुम्हाला पटणार नाही म्हातारे वाटतील माझ्यासारखेच!! पण एक लक्षात ठेवा नाती ही "रेसिपी" सारखी असतात.
फोडणीत जसे मोहरी, मिरची मीठ बरोबर पडावे लागते ना?  त्याला चव यायला? आणि नंतर ती डीश सजवाविपण लागते तरच ती खावीशी वाटते आणि या सगळ्यात एक सेक्रेट गोष्ट सुधा असते ते म्हणे प्रेम, मन तो पदार्थ तुम्ह्च्या भाषेत perfect  होण्यासाठी :)
हा तर तसेच असते नात्याचे, भांडू नका असे नाही म्हणणार मी; कारण, त्यानेच जीवनाला रंगत येते. जेव्हा तुमची चहाच्या पेल्यातली भांडणे कमी होतील किंवा बंद होतील तेव्हा समजा की तुमच आयुष्य खूप निरास तरी झालाय किंवा जागून पूर्ण तरी झालाय चला निजधामाला (amazing आजी भारीच बोलत होती. आम्ही दोघी ऐकत होतो फक्त) हा तर, नातं जपायचं असत गुलाबाच्या फुलासारखं. चूक कोणाची याची उत्तर भांडण झाल्यावर लगेच नाही शोधायची!, ते मिटवायचं आणि मग शांतपणे चूक दाखवायची समोरच्याला!!. वेळ द्यायचा आणि  घ्यायचाही!!  घाईत काहीच निर्णय नाही घ्यायचा. हे नातं खरच नाजूक असतं!! ते तसच ताज तवान रहाण्यासाठी थोडासा बदल महत्वाचा असतो., Surprise  का काय म्हाणताना तुम्ही लोकं ते द्यायचे. कधी वागणं  तरी कधी दिसणं-नेसण थोडस बदलायचं. स्वत:ला त्याच्यासाठी बदलायचं पण अस्तित्व कायम ठेवून,  आपल्या निष्ठा जपून.

 तुझ्या बाबतीत मी म्हणेन तुला आधी स्वत:च्या नजरेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. त्याने वेळ दिलाय चान्स दिलाय तो सकारात्मक घे असा विचार कर की त्यामुळे तुझा आत्मविश्वास गेलाय तो परत मिळेल तुलाच! आणि एकदा तो मिळाला की तुझा "तो" कुठे जात नाही. तू जो निर्णय घेशील त्याच्याबद्दल तो आत्मविश्वास  परत मिळाल्यावर तो जो काही असेल तो असो., पण मुलीनो तुम्हाला कितीही बोर ,,, असेच म्हणता न तुम्ही लोक ते तसे वाटले तरी ऐका, ही नाती प्रेमात गुंफायची असतात. लगाम ठेवायचा प्रयत्न केलात तर सुटलाच सर्व हातून. बेदी घालायची नवर्याला पण ती मनाला त्याच्या पायात नाही!! किती खेचायच आणि कुठे सोडायचं हे कळले ना की सगळे काही सोपे होऊन जाते बघा!! आणि हेही खरच आहे ग बायानो. सगळ काही मुलीच्या हातात असते. नाते जपणे पण आणि ते तोडणे पण!! सीता-द्रौपदी मुळे रामायण महाभारत घडत आणि जिजाई मुळे शिवाजी.!!  दुर्गा, राणी लक्ष्मिबाई सगळे तुझ्या-माझ्यात असतातं गरज असते ती स्वत: वरल्या विश्वासाची!!

प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, थोडी तू-तू मै-मै, थोडी माघार, थोडा आक्रमक पणा, थोडासा attitude and ego , कधी तुझ म्हणण तर कधी त्याच बरोबर, खूप सामंजस्य आणि प्रचंड विश्वास बस; नातं PERFECT!!!

हे इतक आणि बराच काही समजावलं मी माझ्या लेकीला जर तिला नात्यांची किंम्मत, त्यातली गंम्मत आणि ते जपायची कला जमली असती ना??? .. तर,,, आज तिचं लेकरू पोरकं नसतं झालं.

(सुन्न झाले मी... ही बाई सोयर-सुतक नसताना स्वत:हून विचारते काय आणि सगळ बोलते काय. का कशासाठी??? त्या मुलीला मोकळ करण्यासठी?? की.. की स्वत:च दुख: हलक होण्यासाही?? ... मुंबईची लोकल आणि त्यातला अजून एक चेहेरा.... )

तेव्हड्यात ठाणे आले. आम्ही तिघीही उतरलो. तीन दिशांना चालत सुटलो मागे वळूनही न पहाता. परत एक-मेकींसाठी तितक्याच अनोळखी आणि detached होतं.गर्दीत मिसळत गेलो धूसर होत गेलो एक-मेकिंपासून दूर पण गर्दीत... कदाचित एकटेपणाची भीती असेल अजून मनात कुठेतरी तिघींच्याही!! आम्ही तिघी आता अनोळखी होतो, चेहेरे विसरणार होतो पण,,, विचार , त्याला चेहर्याची आणि ओळखीची गरज नसते तो डोक्यात रहाणार कायमचा!!.. आणि सोबतीला होता एक विश्वास! आजीनं दिलेला, स्वत: समर्थ असण्याचा.
                                                                                       
                                                                                                 
                                                                                                ...  रेश्मा आपटे





8 comments:

  1. छान आहे. पहिल्यांदाच अनपेक्षीतपणे काना मात्रा चुका नव्हत्या विशेष.
    आजीचे बोलणे थोडे बोर वाटले. काटछाट करू शकतेस.
    बाकी 28-29 वयाची मुलगी कशी असेल ह्याची उतसुकता लागलिए. :)
    मस्त वर्णन आहे.
    मेकअपचे पण वर्णन करावे.
    90/100 :))
    10 मार्क्स राखीव ठेवलेत प्रगतीसाठी...

    ReplyDelete
  2. वरती कौस्तुभ जे म्हणालाय त्याच्याशी असहमत. :( काना-मात्रा/शुद्धलेखनाच्या चुका दिसत आहेत (१. विचारांची तांद्रीसुधा, २. रेलातीओन, ३. निष्टा, ४. बेदी ५. जिजाई मुले). मस्त बिर्याणी खाताना दाताखाली गार आल्यावर जसं वाटतं तसं झालं.
    पण मुळात लेखाची मांडणी अप्रतिम, कथा खिळवून ठेवणारी आहे. खरंच आज्जीबाई म्हणतात तसं नाती टिकवून ठेवणे हे जमतच असं नाही. आणि ती कला कुठेही शिकवत नाहीत.
    कंटेंट वाईज उत्कृष्ट लेख. अगदी रेश्मा टच असलेला. :)

    ReplyDelete
  3. huhhh

    thanks for comments sudharalyaa chuka :)

    ReplyDelete
  4. Girls Talk & आजीबाईंचा बटवा....

    आता पु.लं. च्या भाषेत सांगायचं झालं तर," अरे झंप्या, शुद्धलेखन लिहिलयंस की पाटीवर हगलायंस?"

    तुझ्या विचारक्षमतेबद्दल आणि लेखन कौशल्याबद्दल तिळमात्र शंका नाही, पण शुद्धलेखनाचे बघावे. हे म्हणजे असं झालं, आमटी झक्कास जमलीय, पण त्यात जो कांदा घातला होता तो निट शिजला नाहिये. आमटीत कांदा कच्चा लागला की आमटीची मजा जाते.
    अशाच आमट्या करत रहा आणि पाजत रहा.


    अवांतर मत: आईने किंवा बायकोने केलेल्या आमटीचा पिताना होणारा "भुर्रर्र" असा जो आवाज असतो ना तो ओंकाराइतका पवित्र वाटतो.



    आलम.

    ReplyDelete
  5. हे सगळं असच्या असं माझ्या बाबतीत घडलं होतं रेश्मा.... मी सावरले....... आणि त्याला हि सावरलं. फेल्ट गुड... :) असो.... शेवटचा परिच्छेद वाचताना काटा आला अंगावर.... सुंदररररर.... :)

    ReplyDelete
  6. mastaa ... faktaa suddhalekhan sudharaa :)

    kaslyaaa +ve ahet tya aaji ... end sundar kela aahes :)

    khupda problem hey ati vichar ani chukiche vichar hya mulech create hotat .. tya muli ashi yogya disha denare imp thartat :)


    lihit raha :)

    ReplyDelete
  7. मस्त... शेवटचा परिच्छेद सुंदर....

    ल्हित र्‍हा.. ;) :D

    ReplyDelete