पाऊस बाहेर कोसळणारा
पाऊस मनात झिरपणारा
थेंबा थेम्बातून आनंद वाटणारा
पाऊस संतत धारेत पडणारा
पाऊस संतत धारेत पडणारा
सतत सुखाची बरसात करणारा
पाऊस मुक्त बेधुंद बरसणारा
तना मनाला भुलवणारा
पाऊस धीर गंभीर कोसळणारा
पार अंतर्मनाचा ठाव घेणारा
पाऊस धुंद, बेभान करणारा,
सर्वस्वात भरून राहणारा
पाऊस वेडा पिसा भिजवणारा
आठवणींच्या गावात नेवून चिंब करणारा .....
. . .रेश्मा आपटे
पाउस बोलता बोलता गप्प करणारा
ReplyDeleteपाऊस लिहिता लिहिता हात धरणारा.
कधी वाकुल्या दाखवत क्षणात गायब होणारा
पाऊस, आठवणीत दाटणारा
mast zaliye pavsavar kavita...5/5
ReplyDelete