घाम ,चिपचीप, मरगळ, रख रख, खूप खूप विचार, मी गलरीत उभी होते,,,, समोर दिसेल ते बघत (बघत होते की नाही देव जाणे पण डोळ्यासमोरून काहीतरी सरकत होत ) माझ्या मनावरच मळभ, एक अस्वथपण, कशातच लक्ष लागत नव्हत! सगळच कसं निरस वाटत होतं, त्यात पोरांचा गलका!!, एरवी मी घरात म्हणजे त्यांची मजा असते त्यांचा श्रोता आणि खेळातला पार्टनर असते मी, कधी त्यांचा जज्ज तर कधी चक्क कुक ( जास्ती वेळा ते माला कुक किंवा spare partner बनवण पसंत करतात) आजही नेहमी सारखेच ते सगळे माझ्याकडे येऊन गलका करत होते,, हे सांग, त्याला ते पाहिजे, तिची चूक, तिला ओरड and all पण मी मात्र नेहमीसारखी त्यांच्यात mix नाही झाले जोरदार ओरडले त्यांच्यावर तसा तो ताफा हिरमुसून परत गेला ,,, सगळं कस शांत शांत झालं,,
आणि त्यात भरीला " जब दिलही तुट गया ... हम जिके क्या करे.. " सारखी भयानक गाणी समोरचे काका ऐकत होते ( म्हणजे त्यांनी चुकीच्या वेळेला चुकीची गाणी लावणं किंवा कोणतीही sad songs कधीही ऐकणं यात आता काहीच नवल नाही,) पण तरीही मला आपल उगाचच हिंदी पिच्चर मधल्या त्या " मे लुट गई, बरबाद हो गई .. " वैगरे च्या situation मध्ये गेल्या सारख वाटलं,... इतकी भडकले ना मी की वाटलं जाऊन सरळ बोलाव त्या "काकांना" आजी म्हणते तसं " भिकेची लक्षण कुठली ,,, तिन्हीसांजेला काय हा तमाशा लावलाय???? " ,,, पण मग स्वतःला आवरलं! ,,, मी अजूनही तशीच त्याच स्थितीत उभी होते ,,, उदास हाताश !!
तेव्हढ्यात,.. अचानक एक वार्याची झुळूक आली, एक हळुवार फुंकर मारून गेली, मागोमाग काही वेडे पिसे ढग आमच्या गल्लीतल्या चिमुरड्यांन प्रमाणे धावू लागले,,, उष्ण- गरम, सगळ करपवून टाकेल अशी हवा अचानक शांत शीतल बनत होती, आणि ती माला जाणवत होती ,,, त्या तालावर पान-फुल डोलू लागली ,,, आताशा वारा जरा भाराराच सुटला,... आमच्या बिल्डिंग मधली बच्चे कंपनी माझा मागचाचा ओरडा विसरून परत गलका करायला लागली ,,, आणि .. आणि तो आला ,,,, ज्याची वाट पाहत होतो, ज्याच्या साठी अधीर झालो होतो, ज्याच्या येण्याच्या नुसत्या कल्पनेने खुलून फुलून जातो,.. तो आला ,,, येईल येईल म्हणता उशिरा की लवकर कधी येईल आता की उद्या म्हणता म्हणता तो आला, त्याचा पहिला स्पर्श, पहिला गंध, पहिला ओलावा अहा काय वर्णावा,... उहू ,,, तो फक्त अनुभवायचा,... ते सार सार जमिन आसुसून साठवून घेत होती ,,, उडणारी धूळ, गळणारी पान, गोंधळलेले पक्षी, धावणारी घाबरलेली जनावर, वातावरणात अचानक होणारा तो बदल, कशा काशाच भान नव्हत तिला! ती फक्त साठवून घेत होती.. त्याला! स्वतःत. आणि तिचा तो आनंद, सुख ती त्या सुखाची उधळण मृद्गान्धातून करत होती, सर्वाना तो आनंद वाटत होती...
पहाता पहात सगळ काही बदलून गेल होत ,, एक नव चैतन्य आजूबाजूला पसरत होत ... आता मस्त कोसळत होता तो,, पाणी नव्हे खूप खूप उत्साह, आनंद घेऊन आला तो ,,, मी अजूनही तशीच उभी होते , पण चेहर्यावाचे भाव rather मनातले विचार निरुत्साह सगळच मावळल होत,, लोकांची धांदल छात्रांचे रंग पहात होते, त्या रंगांनी माझ्या चेहर्यावर हलकाच हसू पसरलं .., वा वा आता सगळे कडे रंगच रंग, नवीन पालवीचे, लवकरच उमलणार्या फुलांचे, आकाशाचे, पानांचे, वार्यावर डोलणार्या झाडांचे, हिरवा रंग एकाच पण त्याच्या किती अगणित shades पहायला मिळणार आता ,,, आणि आवाज, ते पण किती वेग-वेगळे पावसाचा आवाज, वाहत्या पाण्याचा आवाज, पाण्यातून भरधाव जाणार्या गाडीचा आवाज आणि त्या पाठोपाठ ( नालायक किंवा तत्सम ) ज्याच्या अंगावर हे पाणी उडालं त्याचा आवाज ,... हे हे हे हे ,, सगळच सुंदर !!! अरे पण आता तर कुठे तो आलाय, त्याला येऊ देत, स्थिरवूदेत, मग आवाज, रंग सगळ अनुभवायचं .. थोडक्यात काय तर त्याच्या फक्त काही थेंबानेच सगळं काही खुलूनं गेलं ,, आणि त्या सुंदर वातावरणात मी कशी दु:खी राहीन??? तो आला ना मग? माझ मनही हसलं, खुललं, आणि त्याच्यावर भाळलं, भुललं :) :) :) ,,,, सगळी मरगळ शीण अचानक नाहीसा झाला ,,, अस्वस्थ मन अचानक खुलून गेले ,,, पाऊस ,, त्याने सगळच धुतलं मनावरची मरगळ पण :) :) :)
त्यात आमचे बंधुराज त्यांच्या सवंगड्यांना म्हणतात कसे " dont worry , मी आहे ना, तिला काहीतरी प्रोब्लेम असेल, माझी ताई आहे ना , मी विचारेन ना तिला ... हे ऎकून मी खूप खूप हसले ,,, ते चुमुरड पिल्लू ,,, माझ्याशी माझ्या प्रोब्लेम बद्दल बोलणार होतं :D :D :D हे ही हे हे ,,,, sweetheart bro ....
मग काय, ताई ओरडली, चिडली याची शिक्षा काय तर कांदा भाजी ,,, सो मग, आमच्या बिल्डिंग मधल्या बच्चे कंपनीने मस्त कांदा भाजींवर ताव मारला ,,,, ( माझं चिडणं त्यांच्या पथ्यावर आणि माझ्या आजीच्या पित्तावर पडलं) ,, कारण भज्यांच्या घाट घातला मी पण,. मागचं आवरण वैगरे तिलाच कराव लागल, त्यात पोरांसकट माझा गलका :) :) :) वर पोर ताईने भाजी केली मस्त म्हणत गुल :D :D :D :D
,... रेश्मा आपटे
khoopach chan.... mastch
ReplyDeletevery nice..keep them coming...
ReplyDeletefantastic work....
ReplyDeletebtw marathi word dictionary help
rather la kimbahuna
shades la chata
cook la swayampakin :P
khup chhan lihile aahe! tumchya blog che naav tar mala khupach aavadle aahe! reghoti! khup veglepana aahe ya naavat. mast!
ReplyDeleteखूप छान... :-))
ReplyDeletethanks friends :)
ReplyDeleteSaurabh : that was intentional re :P
MAithili : thanks
@ rohini
:) thanks a lot :) n spl thanks for liking my blog name :)
paavasachya aagamanache surekh varnan...
ReplyDeleteuttam.....
ReplyDeletewachtana asa watat k baher paus ch padat aahe......
पहिला स्पर्श, पहिला गंध, पहिला ओलावा अहा काय वर्णावा,... उहू ,,
zakkas ga...... kharach..... tula sangate maza hya varshicha pahila paus asach kahisa hota.. farak fakt me kihdakit navhate train madhe hote ani bycalla to dombivali hya pravasala 2 taas lagale.......... pan nantar sagala malabvh door zala... pan sagala aabhal barsun jaiparyant sagalikade nusati ghusmat hot hoti......
ReplyDeletebtw well written...good.... AWESOME!!!!! :)
well done..... :)
ReplyDeleteAwaiting next :)
मस्त...!!!, असाच पाऊस पडत राहू देत...
ReplyDeleteanirudha, kaustubh, rutuja, prasanna and sameer
ReplyDeletethanks friends :)
prasanna
Lavakarach next :) ... mostly by tomorrow
छान..!
ReplyDeleteआहे का थोडी शिल्लक भजी रेश्मा ताई.. :P
निट लिही गं.........
ReplyDelete