Sunday 23 August 2020

गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया. 
बाप्पा.. मला कळायला लागल्यापासून बाप्पा हा माझा जिव्हाळ्याचा विषय ( सगळ्यांचा असेल म्हणा). तर गणपती चे हे दिवस सणापेक्ष जास्ती नवचेतना, उत्साह आणि आनंदाची पेरणी करण्याचे असतात. बाप्पा जसा पहावा लोभस, गोड आणि गोजिराच दिसतो. त्याच्याशी असलेलं नातं अनामिक, न समजावता येणारं तरी मनात खोल रुजलेलं आहे. 

बरं हा आवडायला भाविक, धार्मिक किंवा आस्तिक असायची गरज नाही फक्त निरागसता आणि सौंदर्य बघायची क्षमता असली की भरतोच हा मनात. 

जितके वेळा पाहू प्रेमात पडतो त्याच्या. यंदा मार्च पासून इतकं शांत आणि बिनघोर कधी वाटलंच नाही जितकं आता वाटतंय. याच्या आगमनाची चाहूल लागली आणि निमिशात विश्वास, उत्साह आणि आशा (hope) सचेतन झाली. भीती, अस्थिरता, दुःख, वेदना, कोरोना महावारीने आलेली मरगळ या परिस्थितीत चेतनेची आणि विश्वासाची फुंकर घातली ती बाप्पाच्या आगमनाने आणि दर्शनमात्रे कामना पूर्ती ची प्रचिती अली. 

बाप्पाचं शक्ती, बुद्धी,प्रेम, प्रेरणा, विश्वास, नीती, सखा, सांगाती. 
आणि तोच चेतना. 

टिप: 
मानसिक शांतता जरूर मिळलीये या दोन दिवसात. पण म्हणून विसर्जनाला गर्दी करून हेल्थ वोरीयर्स ची चिंता आणि विघ्न न वाढवण्याची बुध्दी ही यानेच दिलीये आणि म्हणून  विसर्जन घरात कुंडीतच करणार



No comments:

Post a Comment