Tuesday 24 June 2014

बीन नावाच नात


देता आल तितक नेहमीच तू दिलस
भरल्या डोळ्यात हसू सुद्धा पेरलस

निराशेत आशा, काळोखात वात
एकटेपणात दिलीस निरंतर साथ

मलम झालास ठणकणाऱ्या जखमेवर
वाहतं केलस पाणी पुन्हा एकवार

कोमेजल्या भावांना घालून अलवार फुंकर
करून गेलास साऱ्या  जाणीवांवर शिंपण

जागवलीस स्वप्न उघड्या डोळ्यांत
आणि रोमांच शरीराच्या कणाकणांत

क्षणही दिलास एक निसटता, मोहाचा
जपलेलं संचित बेभान उधळण्याचा

सारं सारं देत मनाचा घेतलास ठाव
पण नाही दिलस कधी या ..

' बीन नावाच्या नात्याला "नाव" '…


                              रेश्मा आपटे

No comments:

Post a Comment