Monday 11 September 2017

शोध गोष्टीचा - भाग अखेरचा

मित्रांच्या कट्ट्यावर गोष्ट मिळते हा म्हणे तिचा अनुभव. मग काय हा पारीयाय सोप्पा होता. तिने जाहीर केलं की मला स्टोरी हवीये हटके पटापट विषय सांगा. मग काय मित्रांच्या अड्ड्याला एक विषय मिळाला. सनसनाटी खोज सारखी तू बडबडणार का? इथपासून  "गोष्ट देता का कोणी गोष्ट" वगैरे पर्यंत खूप चर्चासत्र झाली.
एका मैत्रिणीने तर सांगितलं की लिखाण ही कला आहे शोधून सापडत नाही तर गोष्ट प्रसवावी लागते, कोणतीही नवनिर्मिती होताना वेदना होतातच तेच लक्षण असत नवनिर्मितीच.  म्हणजे कविता,गोष्ट होते, कलाकाराला कला शोधावी नाही लागत. आणि तुला शोधावी लागतेय म्हणजे तुझ्यातली कलाकार हरवलीय.
हे ऐकून माझी गोष्ट मैत्रीण खूपच हळवी झाली, जणू तिच्या आयुष्याचा आता काहीच उपयोग नाही. तिच्या आयुष्यच म्हणे ध्येय हेच आहे की काहीतरी हटके शोधायचं आणि शॉर्ट फिल्म बनवायची वेगळ्या आणि हटके स्टोरी साठी ती मेहेनत पण खूप घेत होती. पण तिला हल्लीच कळलेल्या किंवा तिच्या मैत्रिणीने शिकवलेल्या तत्वज्ञानाप्रमाणे तिला गोष्ट शोधावी लागतेय म्हणजे तिच्यातली कला संपलीय.
हे सांगताना ती रडत होती आणि मला मी  हे ऐकून मी दात काढून हसल्याच मला आठवतंय. खूप चिडली  माझ्यातली काल संपली हेच खर म्हणूनच सगळे टिंगल करतात माझी. मला आताही खूप हसायला येत होत (नशीब आम्ही फोन वर बोललो समोर असतो तर तिने माझी बत्तीशी घशात घातली असती) तर, मी माझं हसणं रोखून तिला समजावलं अस काही नसत ग. कला संपली वैगरे अतिच होतंय. मूर्ख आहे तुझी मैत्रिणी. तर म्हणे नाही संपलीच आहे, माझी स्वप्न, माझं ध्येय सगळंच संपलं आणि मग आता जगण्याला काही अर्थ नाहीच. ही अशी बडबड तिची जवळ जवळ आठवडाभर चाललेली तिला समजावताना नाकात दम आले आमच्या. पण ती आता डिप्रेशन मध्ये जाईल अशी भीती वाटायला लागली. मग तिच्या एका मित्राने शक्कल तो तिला म्हणाला कला संपली धरून चाल संपली. पण म्हणजे होती ना? आणि जी गोष्ट संपू शकते ती replenish होऊ शकते ना? त्यावरून तर तिने गोंधळ घातला कला काही स्टॊक  नाहीये replenish करायला.
गोष्टी खूपच हाता बाहेर जात होत्या, तस आम्ही ग्रुप वर तिला समजावलं राणी जर कला वस्तू नाहीये तर ती संपेल कशी आणि संपत असेल तर ती replenish करता येतेच. मग माझ्या लक्षात आलं की, ती आता आतून हललीये तिच्याशी वाद घालण्यात अर्थच नाहीये मग काय. तिची एक मैत्रीण आणि मी प्रयोग केला. त्याला आम्ही नाव दिल replenishing art/ creativity. आम्ही दोन दिवस तिला console केलं. आम्हाला सिरियसनेस कळलाय हे तिला पटवलं ती बिचारी आहे हे आम्हाला पटलंय असाही तिला विश्वास दिला.
मग माझ्या वाचण्यात आलेल्या placebo effect चा तिच्यावर प्रयोग करायचा ठरवलं आम्ही. तिच्या त्या मैत्रिणीने भरपूर चॉकलेट्स तिला गिफ्ट केली आणि सांगितलं creativity जागवण्याचा हमखास मार्ग म्हणजे चोकोलेट्स. काही टुकार आर्टिकल्स google करून तिला ती वेगवेगळ्या source कडून  मिळतील अशी सोय केली. चॉकलेट्स संपतायत अस तिच्या आईकडून कळल्यावर मग प्रयोग नंबर २ सुरु झाला.
मी आणि  तिच्या एका मैत्रिणीने एक लेख लिहिला आणि त्या मैत्रिणीच्या एका मित्राच्या नावाने ग्रुप वर फॉरवर्ड केला. त्यात मानसिक संतुलन, स्थैर्य आणि ताकद परत मिळवण्याचे काही नुस्के होते. आणि अनुभव म्हणून एका चित्रकाराचं उदाहरण दिलेलं.

एका चित्रकाराला खूप डिप्रेशन आलं होत कारण त्याने काढलेलं कोणतच चित्र त्याच्या मनास येत नव्हतं. माझ्यातली कला संपली आणि मला चित्रकार म्हणवून घ्यायचा अधिकार नाही म्हणून त्याने चित्र काढणंच  बंद केलं. सारखा हाच विचार करून त्याच्या मनालाही पटल की चित्र काढणं आता काही त्याला जमणार नाही. त्याचा बायकोने खूप समजावयाचा प्रयत्न केला पण तो काही हातात ब्रश धरायला तयार नाही. मग त्याला एक मोठा संत भेटला त्याने त्याला सांगितलं की तू meditation कर, ब्रश रंग घेऊन बस आणि तुझा हा डिप्रेशन चा प्रवास रंगव. तुझ्या मनात जी भावना असेल तो रंग कॅनवास वर उमटव. सुरुवातीला त्याला तो वेडेपणा वाटला, पण त्याने तो प्रकार सुरु केला. काही दिवसात त्याच मन शांत झालं आणि कॅनव्हस वर नवरस उतरले होते रंगांच्या माध्यमातून.
काही दिवसांनी तो चित्रकार त्या संतांकडे गेला त्याला ते चित्र दाखवलं आणि विचारलं हे कस झालं? माझी कला तर संपलेली. त्यावर त्या संताने जे सांगितलं ते खूप महत्वाचं होत. त्याने सांगितलंकी, " अरे वेड्या कला हृदयात असते ती कधी संपत नसते. मी तुला meditation करायला सांगितलं त्यामुळे काही क्षण तू त्या विचारातून मुक्त झालास आणि मग जे सुचेल ते काढ म्हटलं तुझ्यात कला आणि creativity देवानेच दिलीये. ती कशी कमी होईल? चुकतहोतं ते तू कलेची साधना नकरणं. स्वतःवरचा विश्वास हा कोणत्याही कलाकाराचा मोठा support असतो. देवाने दिलेली कला संपत नसते तर कमी पडत असतो तो विश्वास स्वतःवरचा, स्वतःच्या ताकदीवरचा आणि प्रयत्न कमी पडतात. हे खरंय की योग्य वेळ येईपर्यंत काहीच घडत नसतं पण ती वेळ कधी येणार हे आपल्यालामाहीत नसतं,  म्हणून मग आपण आपले काम सातत्याने, प्रामाणिकपणे करत राहायचं आणि विश्वास ठेवायचा स्वतःवर आणि निसर्गावर मग ती वेळ येतेच आणि तुम्हाला हवे ते मिळतेच.

मग आम्ही मेडिटेशन चे फायदे तिच्याशी discuss केले. वेगवेगळ्या प्रकारे तिला सुचेल ते उतरवं अस कानावर पडेल याची सोय केली. आणि मग महिन्याभाराच्या शांततेनंतर तिने अचानक फोन केला. विषय मिळाला. लिहायला सुरुवात केलीये. ग्रुप dissolve केलाय.

हे वाचून कटकट संपली, गंगेत आमची घोडी न्हाली अस वाटलं आणि पुढच्याच क्षणी हा प्रवास संपल्याची जाणीव झाली. शोध गोष्टीचा हा एक प्रवास होता आणि तो संपला.रीझल्ट चांगला असेलच पण हा प्रवास संपल्याची रुखरुख लागली.

भाग अखेरचा : धडा अजून एक

स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. काळोखातही एक एक स्पेट पुढचं दिसतच आणि जेव्हा असा काळोख येतो तेव्हा खचून न जात एक एक स्टेप पुढे जायचं कारण devine time काय असेल आपल्याला माहीत नाही मग प्रयत्न करत राहायचं वेळ आली की हव ते मिळतच. निसर्गाकडे खूप आहे आणि निसर्ग ते द्यायला उत्सुक असतो आपण नम्रपणे मागितलं पाहिजे आणि वाट पहिली पाहिजे.
तर आमच्या शोध प्रवासाची साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपूर्ण.
(तिला तिची गोष्ट, मला माझं वाचन,  छान मित्र मैत्रिणी, आणि सगळ्यांना काही ना काही धडे मिळून हा प्रवास सुफळ संपूर्ण )



No comments:

Post a Comment