Wednesday, 19 September 2018


नसती का रे मिटली भांडणं 
थोड्या गोडी गुलाबीने?
नसतं का टिकलं नातं 
दोघांच्या समजुतीने?

तुझ्या जागी तू बरोबर होतास, 
माझ्या जागी मी चुकीची नव्हते ,
भांडणं होती, तक्रारी होत्या, 
रुसवे फुगवेही अविरत होते,

पटत नव्हता पूर्ण माणूस 
की मुद्दा होता खटकत?
खदखदत राहिलो आतून
केली विचारांची गल्लत   

चूक बरोबर ठरवताना मात्र 
सगळं काही गुंतत गेलं 
अहंकार सुखावत होता पण 
नातं मात्र संपत गेलं. 

खूप खूप आलोय दूर 
बघूया सामोरे जाऊन या  प्रश्नांना 
ओळखून एकमेकांचा नूर 
जपता येतंय का काही क्षणांना ?                                                                              ... रेश्मा आपटे 


No comments:

Post a Comment