परवा ऑफिस मधून घरी यायला जरा उशिरच (रोजच्या सारखाच :D ) झाला ..आणि मग त्या नन्तर ओघानेच होणारी आईची चिडचिड, बाबांचं फक्त घड्याळ पहाण, आणि आजी कडून मिळणारे भाल मोठ lecture हे सगळ असून शांत राहायचं अस स्वत:लाच बजावत building मध्ये शिरले. आणि कशात तरी अडखळले ,, नशीब धप्प दिशी पडले नाही. पण चांगलीच ठेच लागली. मूर्ख कुठची पोरं, खेळतात ते तिथेच टाकून जातात कोणाला लागेल, पडेल कोणी याचा विचार सुद्धा करत नाहीत!!! stupids पहिल्यांदा मला त्या चिल्लर gang चा मनापासून राग आला. तो सगळा राग त्या दगडावर काढत मी त्याला लाथ मारली तर दगड जास्ती हलला पण नाही, नीट वाकून बघितलं तर ती किल्ल्याची तयारी असल्याच लक्षात आलं!
मस्तच किल्ला! दिवाळी आली नाही का? वा वा! दुखरा पाय सांभाळत नीट पुढे टाकून मी आत शिरले, त्या चिल्लर gang वरचा राग त्या ओबड-धोबड लहान मोठाल्या दगडांकडे आणि मतीकडे बघून सुंदर वार्याच्या झुळकी सरशी पळून गेला! मी यंत्रवत पावले टाकत जिने चढत होते, पण लक्ष मात्र त्या किल्यात अडकल होतं! आमच्या किल्ल्याची जागा आज कित्येक वर्ष fix आहे. फक्त तो बनवणारी, माती लीम्पणारी आणि हात बरबटवून त्यात रमणारे चेहेरे मात्र बदललेत. .. मला त्या किल्ल्या समोर मीच दिसायला लागले ते मोठ-मोठे दगड जमा करणारे, ते कल्पकतेने मांडून त्यावर माती लिंपून त्याचा किल्ला बनवणारे माझे सवंगडी आठवले. आई कडून मोहरी घेऊन त्या किल्ल्यावर आम्ही फुलवलेली हिरवळ, रचलेले मावळे आणि सगळ्यावर वरती विराजमान असलेले "राजे" .. किल्ल्याच्या बाजूला तलाव हवाच या माझ्या हट्टापाई माझ्या मित्राने तलाव म्हणून कल्पकतेने रचलेली करवंटी आणि दुसर्या दिवशी त्यातील सर्व पाणी वाहून गेल्यामुळे हिरमुसलेला त्याचा नि माझा चेहरा सगळाच आठवल २ मिनिटात ... :) :)
घरी पोहोचले तर घरातून चकल्यांचा खमंग वास आला.. वा वा !! पणत्या, किल्ला, रांगोळ्या, आकाश कंदील, आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे, शेव, करंज्या वा वा !!! आली आली दिवाळी आली यंदाची !
एरवी सारखी घरी चिडचिड नाही झाली, आणि मीही नेहमीसारखी थकले म्हणून कटकट केली नाही ,,,
दिवाळी... खरच सणांचा राजा ! दिव्यांचा सण ... हवेत नुकताच जाणवत असलेला गारवा, खाऊ मिठाई, फटाके, मित्र नातेवाइक यांच्या गाठी भेटी, उत्साह, रंग, रोषणाई, वातावरणच पवित्र आणि आनंदी होऊन जाते ना सगळे? लहानपणी शाळेला मिळणारी सुट्टी, फटके, कपडे आणि खाऊ यात रमणारी मी अचानक मोठी आणि sad झाल्यासारखी वाटयाला लागले मलाच!! रांगोळीच्या रंगात रंगणारी, पणतीच्या जोती बरोबर हसणारी, कंदिलाच्या प्रकाश धरायला धावणारी, किल्ल्याच्या मातीत हात आणि फ्रोक मलवणारी आणि करंज्या-चाकल्यांवर यथेच्च ताव मारणारी मी!! दिवाळी उद्या परवा वर आली तरी no shopping no colours and no lights :( छ्या छ्या ते काही नाही जेवण खाण करून चेहर्यावर पाणी मारून मस्त उठले आणि पणत्या, रांगोळीचे रंग माळ्यावरून काढायला घेतले आणि सज्ज झाले दिवाळीच्या स्वागताला :). तेव्हढ्यात शेजारची चिंगी माझा आवाज ऐकून धावत धावत आली आणि मला म्हणे ताई रांगोळी कधी काढणार किल्ला उद्या पूर्ण होईल :)
बस हे ऐकून खूप खूप खुश झाले मी आणि तिला उत्साहाने सांगितले उद्या रात्री नक्की :)
त्या एका वाक्याने मला जाणीव झाली की अजून मी "त्यांच्यातलीच" आहे आणि तो चिमुकला किल्ला माझाच आहे. ते फिलिंग सुध्धा सुखावून गेले. :) खूप समाधान वाटले. आणि एक गोष्ट लक्षात आली की हा खो-खो तर सुरूच रहाणार काल मी नाचत होते आज ही चिंगी, आणि न जाणो अजून काही वर्षात ही सुध्धा अशीच माझ्यासारखी दगडावर ठेचालाल्यावर तिचे फ्रोक मधले दिवस आठवेल :)
हेहेहे ते असो चला पणत्या लावू आज-उद्या मध्ये ते राहून जायचे काय ?? आणि पणत्या लावण खूप महत्वाच कारण जो स्वत: प्रकाशतो आणि दुसर्याला प्रमाषित करतो तो "दीप" असतो.
आजीच्या भाषेत " दीप्यते दिपयति वा स्वं परं चेति "