Thursday 26 July 2018

Soulmates 4

भाग 4
ओंकारने त्याच्या खांद्यावर हात ठेवला., "मित्रा माझं चुकलं रे. तुमचं नातं नाही समजलं मला तेव्हा. आणि तू ती फोन वर असं काही बोलली म्हणालास मग माझाही गोंधळ उडाला, मला तेव्हा कळलेलं तुमचं नातं बरोबर होतं की त्या दिवशी पूर्वा आणि तिने उलगडलं ते? तुमच्या सारखी शब्दांशीवायची भाषा मला नाही कळत, पण आज तुला बोलायला मित्राची गरज आहे हे समजून तुला इथे बोलावलं, १६ वर्ष्यांपुर्वी जिथे तुमच्या नात्याचं तत्वज्ञान 'ती" ने पहिल्यांदा आपल्याला दिलं तिथे."

मी: तिच्या मनात कसलाच गोंधळ नव्हता. भावनांचा पूर, कल्लोळ यातून होणारी दमछाक, चिडचिड नव्हती. स्वच्छंदी आहे ती, पण बेदरकार नाही. मगाशी म्हटलं तस मी असेन तसा पळत येईन पण ती, ज्या परिस्थितीत जे लागेल ते माझ्यासाठी समोर ठेवेल. विचारांची स्पष्टता आणि वागण्या बोलण्यातला सुसंगतपणा ह्याचमुळे मी तिच्यात गुंतत गेलो. जेव्हा जेव्हा गोंधळलो, नात्यात गल्लत होईल असं वाटलं तेव्हा तेव्हा तिने रास्ता दाखवला. ती आणि मी वेगळे नाही एकच आहोत. शारिरीक आकर्षणापलीकडे आम्ही संवेदनेच्या एका वेगळ्याच स्तरावर एकमेकांचे आणि एकमेकांसाठी आहोत हे तिनेच मला शिकवले. फक्त बायको नाही तर मुलं , बॉस आणि माझे वडील इतकंच काय तर तू सुद्धा सगळ्यांना भावनिक पातळीवर समजून घ्यायला तिने मला शिकवलं."

मी पुन्हा चुकतोय रे तिला समजून घ्यायला. हो तिच्यातला एक कोपरा माझा होता नाही आहेच. मला आधाराचा खांदा म्हणून बघतेय ती? कमिटमेंट द्यायची कटकट नाही म्हणून आत्ता व्यक्त होतेय? हे खरं नाहींये ओम्या, परत मनाचा गोंधळ गल्लत करतोय"

" तुला जे वाटतं ते बोल, ती च्या बद्दल तू कधीच काही बोलला नाहीस आज १६ वर्ष्यात पहिल्यांदा तू शब्दात मांडतोयस सगळं. मी तुला जज नाही करते,मित्रा तुही नको करुस. मोकळा हो." ओंकार म्हणाला.

मी: "पण मग ती असं का बोलली फोन वर? आत्ता काय झालं? व्यक्त व्हायचंय तिला? आत्ता ? आयुष्याच्या या वळणावर? माझे विचार स्वछ आणि स्पष्ट करून तिला पुन्हा मला गोंधळात का टाकायचय? भेटायला येऊ का तर स्पष्ट नाही म्हणाली. पहिल्यांदा नाही म्हणाली भेटायला. फक्त ऐक म्हणाली. खरं सांगू तिने माझ्यासाठी सगळं केलं इतकंच राहील होतं. ते शब्द माझ्या मनात तरंगत पोहोचले पहिल्या पावसात मातीचा गंध दरवळावा तसे दरवळे शरीर आणि मन भर. शरीर आणि मन हलकं हलकं झालं. तिचा फोन लागत नव्हता मग तुला फोन केला. "

तेव्हढ्यात ओमी चा फोन वाजला.
आणि ती समोर आली. माझ्या जवळ, खूप जवळ आणि पुन्हा बोलली जे काल फोन वर बोलली., "माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. व्यक्त करायची माझी भाषा तुला समजली की नाही माहित नाही, पण गेली खूप वर्ष तुला हे शब्द मझ्याकडून ऐकायचे होते हे मला माहित आहे. म्हणून फोन चा खटाटोप."

मी संमोहीत झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होतो. पुढे ती काहीच बोलली नाही. डोळ्यातून वाहत राहिली. पण तिचे डोळे! हे काय? अग ऐक कुठे चाललीस? मला हलताच येत नाहीये. ओम्या तिला थांबव. ती चाललीये ओमी! ओमी! मी आकांताने ओरडलो.

ओमी धावत आला. मला म्हणाला, " मित्रा we lost her. ती गेली"
" अरे मी तेच सांगतोय ती चाललीये ती बघ, समोर तिला थांबव माझ्यासाठी. ओमी मला बोलायचंय. मी तिच्यावर खूप... .
ओमीने मला घट्ट मिठी मारली आणि खूप रडला. माझ्या जाणिवाच गोठल्या जणू. मी हललो नाही रडलो नाही.
ओमीचे शब्द कानावर पडत होते पण डोक्यात जात नव्हते. मी कोसळलो.

चार दिवसांनी जेव्हा जाग अली तेव्हा ओमी आणि पूर्वा भेटायला आले होते. तेव्हा समजलं, तिने त्या दिवशी 3 फोन केले. मला, पूर्वाला आणि डॉक्टरला. त्यानंतर ती ऍडमिट होती. आणि मला दिसली ( ओम्याच्या म्हणण्या प्रमाने भासली) त्या वेळी ती या जगातून गेली. माझ्या नातेवाईकांना माझं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून ऍडमिट केल्याचं सांगण्यात आलं.

माझं मन सुन्न होतं. जाताना पूर्वा हळूच कुजबुजली." relation and person may or may not be around but she has filled your being with immense love.
ती गेली प्रेमाचा अखंड झरा मागे ठेवून."


Soulmates 3

भाग 3
यातच एकत्र काम करण्याचा परत योग आला आणि त्यावेळी तुही होतास प्रोजेक्ट वर. प्रोजेक्ट डिस्कस करत आपण सी सी डी मध्ये बसलेलो. तिला कॉफी कडू लागल्यामुळे मी प्यायली आणि माझी तिला दिली. माझ्या या वागण्यावरून तू थेट विषयाला हात घातलास आणि विचारलंस, "हे असं एकमेकांना भेटून आणि रोमान्स करून कोणत्या महान प्रेमाचा इतिहास घडवताय? वेळ होती तेव्हा गप्प बसलात आता कोणती नैतिकता शिकताय?" ती फक्त एक अडजस्टमेंट होती यात रोमान्स नाहीये, आपुलकी प्रेम आहे. मैत्री आहे." तुला समजवायचा तिने एक प्रयत्न केला. पण ती मला फायद्यासाठी वापरते ह्या संकल्पनेत तीच तुला काहीच ऐकायचं नव्हतं. त्यावरून तुमच्यात जवळ जवळ भांडण झालं. मी गप्प होतो, कारण तिला परत गमावण मला शक्यच नव्हतं आणि तू तर माझ्यासाठी महत्वाचा आहेसच. कसंबसं तुम्हाला शांत करून आपण निघालो कारण तुझ्या बायकोने, पूर्वाने केलेल्या प्लान नुसार दुसऱ्याच दिवशी तुझ्या घरी आपण सगळे भेटणार होतो. सहकुटुंब !

पूर्वा आणि ती खूप कमी दिवसात छान मैत्रिणी झाल्या होत्या, त्यामुळे तुझं घर असून तिला यायला लागणार होतं. झालेला प्रकार पूर्वाच्या कानावर घालून, तुम्ही एकमेकांशी बोलणारच नाही अशी सोय करायचं ठरवलं. पण, जेवणं झाली आणि पूर्वाने दिलेली स्मूदी घेताना तू म्हणालास, "तुला कसं मनातलं कळतं गं. मी नशीबवान आहे मला माझी soulmate मिळाली, त्यामुळे मला दुसऱ्या कोणाची गरजच पडत नाही. बोलायला सुद्धा." तू "ती"च्याकडे पहात कुजक हसलास. हे ऐकून 'ती' उठली आणि मला वाटलं ठिणगी पडली. तुम्हाला थांबवणं, तेही सगळ्यांसमोर मला शक्यच नव्हतं. पण तिच्या सप्रायझिंग एलिमेंट बद्दल बहुदा मी तेव्हाही अनभिज्ञ होतो, ती माझ्या बायकोला, शरूला म्हणाली ," चला सुटला तुझा नवरा एकदाचा, कॉलेज मध्ये तर हेच soulmates वाटायचे." मी चोरट्या नजरेने बायकोकडे बघितलं. आता काय समोर वाढून ठेवलाय म्हणून, तर दोघी टाळ्या देऊन जोर-जोरात हसत सुटल्या. नक्की हसण्यासारखं काय घडलं ते मला कळलं नाही, पण मी सुटकेचा निःश्वास सोडला.

ओम्या तू काही कमी नव्हतास, तू पुढे बोलणार तितक्यात पूर्वा आली धाऊन आणि ती ला आणि शरूला नाटकी दरडावत म्हणाली, " हसता काय ग माझ्या मित्राला आणि नवऱ्याला? soulmates म्हणजे romantic partner असं नाही. life partner आणि soulmates हे दोन वेगळे कॉन्सेप्ट आहेत. म्हणजे soulmate हा life partner असू शकतो पण lifepartner हा soulmate असेलच असं नाही. आपल्या सगळ्याचे प्रश्नांकित चेहेरे पाहून ती हसून म्हणाली, " समजायला हे काही कठीण नाही. बघा म्हणजे पटतंय का ते?
मला इंग्रजीत चांगलं मांडता येईल आणि i am sure you guys won't mind it. Basically soulmate is someone who help another soul to grow spiritually. As I mentioned it's another soul! it does not know any gender its just purest form of love. Everyone of us are very eager to meet our soulmates, we dream of some prince or princess right from our adolescent age misunderstanding a concept of soulmates and we feel our romantic partners or life partners means soulmates, but it is not true. Soulmates are those who come to our lives to give us directions to let our soul grow to higher consciousness and it is only possible when one is aligned with his own soul. This another soul establishes  different level of intense connection with our soul which is strong and clear. This relationship does not necessarily demands you to put your emotional and physical self in relationship. On the other hand, we have stable, emotional,responsible bond with our life partner or romantic partners. So far as life partner is concerned, there is no need to prepare yourself and gain alignment with your soul instead you just have to prepare emotionally, mentally and your physical self is necessarily to put out for establishing connection with your life or romantic partner. सोपं करून सांगायचं तर, राधा-कृष्ण, एका ठिकाणी मी फार सुंदर ओळ वाचली, आत्माचे परमात्म्याशी मिलन म्हणजे राधा कृष्ण. ते soulmates होते कारण ते एकच होते. आत्मा आणि परमात्मा एकमेकांपासून वेगळे कारण शक्यच नाही.



तू तिला तोडत विचारलंस, " दोन्ही पार्टनर्स एकत्र एका आयुष्यात असू शकतात? म्हणजे एका नात्यामुळे दुसऱ्या नात्यावर अन्याय न होऊ देता असू शकतात?"

राघव: नाही. मला नाही तस वाटतं. म्हणजे बघ आत्माच नातं आणि नश्वर नातं अशी दोन्ही कशी जपता येतील? परमार्थ मिळविण्यासाठी गृहस्थाश्रम सोडावा लागतो. ते कनेक्शन शोधत बसलो तर एका नात्यावर अन्याय होणार. हा soulmate जास्ती महत्वाचा झाला तर विरक्ती येणार. दोन्ही वेगळे जपायचे म्हणशील तर तेही शक्य नाही म्हणजे, शरीर आणि आत्मा यांना एकमेकांपासून वेगळं केलस तर माणूस संपला. मग life partner या नात्याचा विषयाच नाही.
राघव तिचाच नवरा मुद्देसूद बोलणारच आणि आग्रही नाही. मतं मात्र स्पष्ट देतो.

पूर्वा अर्थपूर्ण हसली, म्हणाली ,"अरे तुम्ही नीट ऐकलं नाहीत. इट्स अबाउट सोल, ज्याला जेंडर नाही म्हणतेय, त्याला राग, अन्याय या भावना असतील का?"

राघव: नाही. मान्य, पण life partner ला असतील ना? तो माणूस आहे. soul contracts वैगरे सामान्य माणसाला कसे कळणार? मग गोंधळ उडेल 'कपलस' चा  आणि दोघांची आयुष्य समांतर चालू लागतील. या गोंधळात एक नातं संपायचं की. त्यापेक्षा सामान्यपणे जे life partner हाच soulmate असणं वाटत ते पटत कारण त्याने दोघे निदान एका मार्गावर तरी राहतात.
मी पूर्वाला नजरेने खुणवुन गप्प बस म्हणत होतो. पण ती काही ऐकत नव्हती, जणू विषय थांबवायचाच नाहीअसं ठरवल्यासारखं तिने बोलायला सुरुवात केली, "  समांतर झाली आयुष्य तर एकतर ती त्या जोडप्याच्या विचारांच्या गोंधळामुळे असेल किंवा त्या नात्यातून बाहेर पडणे हाच एक पारियाय योग्य असेल म्हणून असेल. you know those dead relationships?
अरे soulmate would lead you to a life wherein you can achieve your life purpose and he/she will help you know yourself, which would refrain you from indulging in unwanted fights and then the life will become the way it should be. तुमचा जोडीदार जर फुटकळ भांडणात रमलाच नाही, राग-लोभाच्या खोट्या कल्पनांत रंगून मानापमानाचे प्रयोग त्याने केलेच नाही तर दोघांचंही आयुष्य एक छान वळण घेईल.

soulmates enriches your life, you feel like being in tune with that other soul even when your are miles apart. these relationships may or may not continue for longer period  as they come in life to challenge you, teach you some life lesson and thereby empower you. those relationships may end some or the other day but the element of love out of these relationships fill your entire being. ही दोन्ही नाती खूप महत्वाची असतात रे. सगळ्यांचा दोन्ही स्ट्रॉंग नाती मिळतं नाहीत. यातलं एक नातं मिळालं तरी आपलं नशीब बलवत्तर. ज्याला दोन्ही मिळतात त्याने ती मनापासून जपावीत आणि जागवीत.
हे बोलताना पूर्वाने एक अर्थपूर्ण नजर माझ्यावर टाकली. " ही नाती एकत्र जगताना गल्लत झाली तर?" शरूने विचारल, मी चमकलोच म्हणजे ही ऐकत होती? नव्हे चक्क भाग घेतेय चर्चेत. ती अश्या विषयात मतं मांडतेय. मनात आलं ही माझी भाषा शिकली का? तिच्याबद्दलचे सगळे पूर्वग्रह पुसले गेले. "ती" मागे म्हणाली तशी शरूची भाषा शिकायला मी तयार झालो असं वाटलं मला. काही क्षण मी सगळं विसरलो.
तितक्यात पूर्वाने उत्तर दिलं, " गल्लत होत नाही. होऊच शकत नाही गं, soulmate जर तुमचा lifepartner नसेल तर त्याच्यामुळे lifepartner वर अन्याय तर होत नाहीच पण निर्व्याज प्रेम करायची ऊर्जा मिळते, कारण lifepartners च नातं हे तन, मन,धन देऊन पूर्ण होत समर्पणाने ते खुलतं आणि soulmates एका झऱ्यासारखे असतात. अखंड प्रेमाचा न आटणारा झरा. शरीरिक अस्तित्वाच्या पुढे एका वेगळ्याच contiousness मध्ये अत्भुत अनुभव त्यांच्या अस्तित्वातून स्पर्शातून मिळतात.

पूर्वाचं वाक्य ऐकून अंगातून एक वीज सरसरत वेगाने बाहेर पडावी असं वाटलं मला. आपण दोघे आवासून एकमेकांकडे पहात होतो, जणू साधारण 15 वरष्यांपूर्वी "ती" जे बोलली ते पूर्वा उलगडून सांगत होती.काही क्षण कोणीच बोललं नाही बहुदा.

शेवटी ती म्हणाली
ती: पूर्वा किती छान मांडलस गं. नैतिक आणि अनैतिकतेच्या समाजमान्य व्याख्येच्या पलीकडे, शब्दांत न मांडता येणारं , ज्याला soulmate मिळालाय फक्त त्यालाच मनाच्या आत खोलवर समजलेलं आणि निर्भेळ असं नातं. महत्वाचं म्हणजे असं प्रेम मिळत असेल तर दुसऱ्याला ते दिल्यानेच वाढतं आणि ते निर्भेळ प्रेम आपल्यावर करणाऱ्यावर अन्याय पण होत नाही". "ती"ची अर्थपूर्ण नजर आरपार गेली आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला.
माझ्या बायकोला मी भरभरून देतं नाही, तीच असं असणं तस नसणं मला जास्ती खटकतं म्हणून मला तिला निर्मळपणे, पूर्ण प्रेम देता येत नाही. मी स्वतःला वचन दिलं माझ्या बायकोला समजून घेण्याचं. का कोण जाणे पण माझ्या बाजूला बसलेल्या माझ्या बायकोच्या हातावर मी हात ठेवला. आतून आज्ञा मिळाल्या सारखा. एरवी १० वाक्यात जे तिला समजत नाही असं वाटायचं ते १० सेकंदात कळलं. तिच्या डोळ्यांतून वाहणारी तिची भाषा मला वाचता आली. एरवी चार चौघात इशू केला असं वाटायचं आज शरूच्या पाठीवरून मी हात फिरवला. या सगळ्याच कारण "ती" च होती, प्रेमाचा निर्मळ झरा माझ्या आयुष्यात आणणारी "ती"
आणि मी? तिच्यावर शंका घेत होतो, मला अलंकारिक भाषेत प्रेमाच्या अतिउच्च बिंदूवर नेऊन ठेवून लागला तर असुंदेत अश्या अर्थाने "ती" माझ्याकडे बघत असल्याची! 15 वर्षा पूर्वीची "ती" डोळ्यांसमोर उभी राहिली. वाटलं आवेगाने तिला मिठीत घ्यावं सॉरी म्हणाव, पण तेव्हड्यात माझं मन वाचून की काय माहित नाही तू म्हणालास cheers to a lucky lady जीला lifepartner आणि soulmate एकाच माणसात मिळालेत, कोण काय? Ofcourse my wife पूर्वा.एकच हशा पिकाला आणि राघव म्हणाला cheers to philosofer पूर्वा.

"ती" ची आणि माझी नजरा -नजर झाली. ती नजर खूप काही व्यक्त करून गेली. "i am there always" ही खात्री दोघांना पटली. मला तिला सॉरी आणि थँक्स म्हणावसं वाटलं. " मी तुझ्यासाठी आहे नेहेमी" अस सांगावंसं वाटलं पण तिचे 15 वर्ष्यापुर्वीचे शब्द खरे वाटले, माहितेय आपल्याला मग बोलायलाच हवं का? आणि नाही बोललो. समजून घेतलं दोघांनी काहीच न बोलता.

क्रमशः

Soulmate 2

भाग 2
तुझं ऐकलं मी लग्नाला पण नाही गेलो तिच्या, तिच्याशी काहीच कॉन्टॅक्ट नाही ठेवला, वाटलं मुक्त केलं मी दोघांना फुकटच्या गुंत्यातून. माझही लग्न झालं. वेगळ्या आयुष्याची सुरुवात झाली. सगळं आलबेल होतं आणि ती पुन्हा भेटली. तुझ्या लग्नात. आधी ती वैतागली, मला टाळलं,अलिप्त राहिली पण राघव तिचा नवरा! त्याच्याशी ओळख करून देताना अवघडलेपण नव्हतं. माझ्या मनात खळबळ उडाली, म्हणजे मी मुक्त नव्हतो. ४ वर्षानेही तिच्या नजरेत मला गुंतवून टाकायची, अस्वस्थ करायची ताकद होती याची जाणीव झाली. त्या नंतर कसे माहीत नाही आम्ही परत बोलायला लागलो. एक वर्क असाईंमेंट पण एकत्र केली. आम्ही खूप बोलायचो, वेगवेगळ्या विषयावर. एकमेकांचा कंटाळा येणं शक्यच नव्हतं. मग माझी बायको तिचा नवरा अन चिल्ली पिल्ली मस्त जमून आलं.   

काहीही अगदी काहीही शेअर करायचो आम्ही एकमेकांशी. कोणा विषयीचा राग, मुलांचे प्रोब्लेम्स, वाचलेलं पुस्तक , तात्विक चर्चा नाहीतर फुटकळ जोक्स. पार्टनर चा खूप राग आला की ती व्यक्त करायला एक हक्कच ठिकाण होतं, करण आम्ही एकमेकांना जज करणार नव्हतो, जे जस व्यक्त व्हायचं ते ऐकून खूप विषयावर आम्ही सोल्यूशन काढली. आमची आमच्या नवरा किंवा बायको बरोबर ची नाती अधिक घट्ट केली. एकदा माझं आणि माझ्या बायकोच, शरयूच भांडण झालेलं, कडाक्याचं अशक्य झालं होत सगळं. नेहमी मतभेद असायचे आमच्यात आणि भांडणं पण. त्यादिवशी सगळंच असह्य झालं, मी "ती"ला फोन केला, भेटलो आणि आमच्या भांडणा विषयी सांगितलं. आत दडलेलं सगळं उघड करून सांगितलं तिला, "मी काहीही केलं तरी शरूला कळतच नाही. आम्ही समांतर रेषा आहोत आमच्या आयुष्याकडून अपेक्षा वेग-वेगळ्या आहेत. मला नाही वाटत आमचं आता जमेल. मला वेगाचं आयुष्य आवडतं तिला शांतता. पण मुलं आहेत मग खेचायचं." तिने मला सगळं बोलू दिलं मग शांतपणे विचारलं, "बर मग? काय करायचं? मी म्हटलं,"माहीत नाही, म्हणून तुला बोलावलंय ना?.". ती, " बरं बरं, एक गोष्ट समजून घेऊयात की, तुझी भाषा तिच्यापर्यंत नाही पोहोचते. तुला म्हणणं तर पोहोचवायचं, पण प्रश्नभाषेचा आहे. शरूची भाषा शोधून काढ. कसं आहे ना,तसं सांग जस तिला ऐकायला आवडेल. एकदा भाषा कळली आणि समोरच्याच्या भाषेत व्यक्त झालं की ते अपोआप पोहोचत समोरच्याला. मी भडकून म्हणालो, "तुला मूळ मुद्द्याशी नाही जाता आलं की भाषेला वळवून काहीतरी अगम्य बोलायला आवडतं का ग?" माझा आवेग बघून तिने मला पाण्याचा ग्लास पुढे केला. तो ढकलून देत मी तिला निघून जा म्हटलं. तशी तिने माझ्याकडे रोखून पाहिलं. माझ्या हातावर हात ठेवून म्हणाली, " शांत हो आणि ऐक तर, मी काय म्हणतेय, काही तत्वज्ञान किंवा अगम्य बोलत नाहीये." मी शांत झालो आणि तिच्याकडे पाहिलं, तशी ती पुढे बोलू लागली, " प्रत्येकाची खरंच एक भाषा असते शब्दांची, कौतुकाची, स्पर्शाची, नजरेची, काहीतरी विशेष कृती करून व्यक्त व्हायची. मी शब्दांत व्यक्त होते. तुला माझ्या नजरेची आणि स्पर्शाची भाषा भावते. तू शरूसाठी खूप करतोस, तिला खूप ऍप्रिशिएट पण करतोस पण तुझ्या भाषेत. आता विचार कर तिला काय आवडतं ? त्या प्रकारे व्यक्त होऊन तर बघ. तिच्यावर किंतू परंतू न ठेवता प्रेम कर." ते भाषा प्रकरणं तेव्हा मला तितकस कळलं नाही. पण जाणून घ्यावं अस जरूर वाटलं. ती म्हणाली, मला सांग तिला कशाने खूप आनंद मिळतो?" "फुलं? बहुतेक!" मी म्हणलो.
ती:" मग घेऊन जा आणि भांडण मिटवा पाहिले".
आणि माझं घर वाचलं रे. खूपदा माझ्याशी बोलल्यामुळे तिच्या आणि तिच्या नवर्यात होणारे वाद टळलेत. आम्ही सगळ्यांना घेऊन पुढे जात होतो.

खरच आम्ही एकमेकांची ताकद होतो. हसत होतो, शिकत होतो, घडत होतो. दिवस जात होते. आम्ही खुश होतो, मुलं, संसार, पैश्याची चणचण, वर्क प्रेशर सगळं पेलत होतो. अधून मधून फोन किंवा भेट व्हायची आणि प्रत्येक भेट नवी ऊर्जा देऊन जायची.

Soulmates 1

भाग 1:
तिच्यातला एक कोपरा कायम तुझाच होता रे", ओंकार म्हणाला. कदाचित आधी तिला समजलं नाही किंवा तू कधी विचारलंच नाहीस,
मला हसायलाच आलं, “शक्यच नाही रे मित्रा”, आजही आधाराचा खांदा म्हणून ती मला बघतेय आणि माझीही हरकत नाहीये, मग आता हा भावनांचा खेळ कशाला? आता व्यक्त होण सोपं म्हणून का? आयुष्याच्या या वळणावर बरोबरची 3 किंवा 4 आयुष्य पणाला कोण लावणार? थोडक्यात काय तर एक साथी हवा, इंटेलेकचूअल कंपटीबीलिटी असलेला. ती कायमच होती ना आमच्यात, विश्वास प्रचंड आहे तिचा माझ्यावर, माझाही तिच्यावर. एका हाकेत मी असेन  तिथून धावत येईन हे तिला माहितेय, आणि आता मला त्या बदल्यात कसलीच कमिटमेंट नकोय. मी हे करतोय आणि करणार करण मला ते आवडतं. ती मला ही स्पष्टता दिलीये. मग आता ही खळबळ उडवण्याचं काय कारण? का ही प्रत्येक वेळी अशी गोंधळ उडवते रे? माझं आणि तीच कुटुंब त्यांच्या आमच्या आयुष्यातल्या जागा सगळं जिथल्या तिथे आहे. खूप निर्मळ नातं आहे आमचं, वासना रहित, मोकळ, मनातला कोणताही कोपरा सहज उलगडता येईल असं.

अमच्या मैत्रीकडे ती अश्याच नजरेने पहत आलीये ना कायम? आठवतं तिच लग्न ठरलं आणि मोकळेपणे फुलपाखरू बनत तिने हे आपल्याला सांगितलं, तेव्हा तूच विचारलंस ना तिला, तिच्या माझ्या मध्ये काय होतं म्हणून? आठवतं ती काय बोललेली ते? “आमच्या नात्याला नावाची गरज नाही, तो हिरा नाहीये नात्याच्या कोंदणात सजवायला, तो झरा आहे अखंड प्रेमाचा, स्नेहाचा, समजुतीचा आणि निर्मळ भावनांचा सतत वाहता झरा! मैत्री चा अर्थ जपणार आणि जगणार नातं आहे आमचं”. अश्या उत्तराची अपेक्षाच नव्हती आपल्याला तिच्यासारख्या इमोशनल आणि कन्फ्यूज मुलीकडून! आपण पाहत राहिलो तिच्याकडे तिचे शब्द अगम्य असल्या सारखे.

तेव्हा मला खूप राग आला होता रे. वाटलं मी फक्त ऑप्शन आहे का? कसला आलाय झरा? आणि निर्मळ प्रेमाचा स्रोत वैगरे? लागलं तर असुदेत म्हणून बाळगलेला एक मित्र वाटतो का मी तिला? भावनांशी खेळताना काहीच नाही का वाटतं हिला?. नातं नाही जोडता येणार आणि गमवायचाही नाही म्हणून अलंकारिक भाषेत प्रेमाच्या उदात्त कल्पनेत सजवलेला एक मित्र? की एक मुलगा?. अरे मी कधी म्हटलं असं उदात्त काही करतोय म्हणून? मला सगळं हवं होतं. मला ती हवी होती पूर्ण! घाबरणार्यातला मी नव्हतो पण, नाही बोललो काहीच तेव्हाही. सेटल या व्याख्येत मी बसत नव्हतो तसाही तेव्हा. वेळ गेलेली हातातून, मग सगळं मनात ठेवलं बांधून.
फक्त बरं म्हटलं . तू खुश ना यावर तीच “ हो” ऐकलं आणि आतून राग दुःख याची जागा सुखद आनंदाने घेतली, सहज म्हणून गेलो, “कायम तुझ्या बरोबर असेन मी, तुला लागेल तेव्हा”. ती म्हणाली, "मी ही आहे कायम तुझ्याबरोबर". आपल्याला माहितेय हे मग बोलायची खरच गरज आहे का?”. चल येते असं म्हणत तिने मला मिठी मारली.

ओंकार न राहून मध्ये बोलला, "तेच तर ना, मित्रा अरे तू तेव्हाही बोलला नाहीस. तिला काही वाटतं का? तेही समजून घेतलं नाहीस. तुझं तूच ठरवलंस अगदी सगळं. ती लग्न करतेय, तिला माहीत नाही तुझ्या मनात काय आहे,मग तिने काय समजावं? मित्रा तू कधीच काहीच नाही बोललास. आता म्हणतोस उदात्त कल्पनेत मी अडकलो नव्हतो मग का नाही बोललास? तेव्हा कोणत्या अगम्य सक्रीफाईज मोड मध्ये होतास?"
त्याला मध्येच थांबवत मी म्हटलं,
ओमी, तिने मला मारलेली मिठी! ती जाणीव शब्दांत व्यक्त नाही करता येणार. ती जाताना तू मला काहीतरी सांगत होतास माझ्या मेंदूपर्यंत गेलच नाही रे ते. माझ्यासारख्या प्रॅक्टीकल माणसाला अस व्हावं नवलच! तीचा विषय निघतो तेव्हा आजही काही चूक बरोबर कळत नाही. तेव्हा तर गोष्टच वेगळी होती. ओम्या  तेव्हा भावनांचा इतका कोलाहल होता की, व्यक्त नाही होता आलं मला. म्हणून आज बोलतो तुझ्याशी, अरे तिने त्या दिवशी मला मिठी मारली, मला वाटलं माझा ताबा सुटेल पण मी त्या मिठीत मी शांत झालो. आमचं नातं जणू फक्त तिलाच समजलेलं, मी भ्रामक कल्पनेत जगत होतो असं वाटलं. त्या स्पर्शात त्या मिठीत “ इसी बहाने छू तो लिया” ही पुरुषसुलभ कल्पना मला शिवली पण नाही. तर एक शांतता, आधार, अद्भुत जाणीव अनुभवी मी त्या मिठीत. ती गेली, मी ते पचवत होतो.
क्रमशः

Monday 23 July 2018

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल


आज सकाळी उठले आणि सवयीने व्हॉट्स अप पहिले. वारकऱ्यांचे सुरेख फोटो, केशरी झेंडे, भक्ती, विश्वास  आणि समाधानाने भरलेले  सुंदर चेहेरे दिसले आणि मन एकदम प्रसन्न झाले. काही फॉर्वर्डस, मुख्यमंत्र्यांना पूजे पासून रोखले, भक्तीचे राजकारण, वारकऱ्यांची काळजी असल्यामुळे पंढरपुरास न गेलेलं मुख्यमंत्री आणि त्यांची पूजा स्विकारायला निघालेले विठ्ठल रखुमाई आणि काही अत्यंत बालिश विनोद असं बरच काही त्या सौंदर्यात  मिठाचे खडे टाकत होते पण त्या निरागस आणि निःस्वार्थी, निर्मळ चेहऱ्यांपुढे असे फॉरवर्ड्स विसरले जात होते. ती निर्मळता बघून ते विनोद आणि फॉरवर्ड्स ज्याचा त्याचा दृष्टिकोन शेवटी! असे म्हणून सोडून देता देता, चुकून डाउनलोड झालेला एक विडिओ प्ले झाला आणि  हरिनामाचा गजर मुक्तपणे कानी पडला. अत्यंत अद्भुत शक्ती या हरीनामात आहे. मंत्रमुग्ध करणारी. तना मनाला भुरळ घालणारी. लहान थोर सारे ठेक्यात नाचत झानजांचा नाद करत नाचत विठोबा माऊलीचा गजर करत होते.  खूप मित्रांचे मैत्रिणीचे फोटोज येत होते हॉकी मेडिकल हेल्प साठी, कोणी मोफत अन्न सेवा कोणी काय तर कोणी काय आपापल्या परीने त्या वारकर्यांना सेवा अर्पण करत होते. वारीची सुरुवात झाल्यापासून हे फोटोज मी नुसते पहात होते, दर वर्षी पहाते आणि पुढच्यावर्षी तरी योग येईल अशी आशा करते. यंदाही माझी खूप ईच्छा होती वारीला जायची तो अनुभव मनात साठवायची, आयुष्याला पुरेल अशी ऊर्जा शोषून घ्यायची पण यंदाही योग्य आला नाही. .

दर वर्षी एकादशीला हे असचं होतं. मन खट्टू होतं. पण आवरून कामावर निघावं लागतं. यावर्षी व्हिडीओ साठी आणि फोटोंसाठी मनोमन व्हॉट्सअप आणि मित्र मैत्रिणींचे
आभार मानले आणि निघाले. तर काय कलेक्टर ने सुट्टी दिल्याची बातमी अली. मग पूर्ण बिझी दिवस अचानक अर्धा दिवस काम वर येऊन ठेपला. बाहेर पडलेच आहे तर एक दोन काम करू असं ठरवून निघाले आणि रस्ते स्टेशन सगळीकडे दिंड्या आणि झांजा, बाळबोध हरिनाम याने वातावरण खूप सकारात्मक आणि भक्तिपूर्ण झाल्याचे दिसले.  मुंबापुरीतही  हातावरचे पोट भरत तारेवरची कसरत करणारा सामान्य माणूस घरातून अंमळ लवकर बाहेर पडला पंढरपुरात नाही तर मुंबापुरीतच पंढरपूरच्या वारीचा थोडा वेळ अनुभव घेऊन मस्टर भरायला धावला. तो भक्तिसागर, विलिनता आणि तन्मयता पाहून परत एकदा मुंबईकरांच्या स्पिरीट ची दाद द्यावीशी वाटली.
 हॅशटॅग भक्ती हॅशटॅग माऊली या पलीकडली भावना फेसबुक आणि इंस्टावर पण झळकली आणि ते दृश्य बघून त्या तल्लिनतेचा आस्वाद घेऊन मन तृप्त झाले. शांती, आनंद आणि  समाधान या त्रयीचा प्रत्येय गजबजलेल्या मुंबापुरीत आज वारीच्या दिवशी अनुभवायला मिळाला.

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!