Friday 22 April 2011

तुझ्या-माझ्यात


तुझं माझं नात विणणारी
होती एक रेशमाची लडी
सुंदर क्षण गुंफ़ुन खुलली
जशी चाफ़्याची कळी

भावलं मला तुझं बिनधास्त वागणं
कोणालाही न घाबरणं, अन स्वच्छंदी असणं
पण माझा पाय मुरगळला ना जरी,
तरी लगेच कवरं-बावरं होणं

कॅन्टीन मध्ये शिरता शिरता
आण्णा, एक डोसा.. दो कटिंग, म्हणत
आलेले बील चक्क डीब्या समोर सरकवणं
पण माझ्या कॉफ्फी चे पैसे, मात्र तूच देणं

तुझं असणं,सांगणं, बोलणं, बघणं
तोंडभर हसणं आणि पारदर्शी जगणं                                        
औपचारिकतेच्या नियमांना सरळ फाटा देणं
मी तुझ्यात यामुळे अधिकच गुंतत जाणं                          
                       
किती झपाटलेले होते ना रे ते दिवस?
तासंतास घालवले आपण कट्यावर
मित्र मैत्रिणींच्या घोळक्यातसुद्धा
जपत होतो आपले मंतरलेले स्वतंत्र क्षण ..

कॉलेज संपले , कॅन्टीन, कट्टा
मित्र मैत्रिणी सारे सारेच भूतकाळ झाले
तुझ्या माझ्यातले ते रेशमी बंधही
त्या चाफेकळी बरोबर कोमेजून गेले

त्या दिवशी फेअरवेल पार्टी नन्तर
स्वप्न आणि वास्तव खूप झगडले,
तुझ्या करिअर ग्राफ पुढे मी खूपच छोटी ठरले
एकटीच मग कितीवेळ त्या चाफ्याखाली रडले

आज reunion साठी पुन्हा इथे आलेय
खूप वर्षांनी आज त्या चाफ्याखाली थांबलेय..
किती हासू किती आसू ह्या चाफ्याने बघितलेत,
तरी माझे हरवले क्षण त्याने अजून प्रेमाने जपलेत!

"आण्णा"ला पाहून बसलेला अजून त्याच खुर्चीत,
सारे सारेच रंगून गेलेत college च्या आठवणींत ..
माझ्या मात्र मनात, पिंगा घालतोय तो चाफा
"तू "आणि तो सोडून आठवणीच नाहीत रे माझ्या

वाटले सारी बंधने झुगारून तुझ्यासमोर यावे
खूप खूप रडून "का निघून गेलास?" विचारावे
आवेगात उठले मात्र आणि  नजरा- नजर झाली
त्या परक्या नजरेने पाउलाताली ताकदच गेली
  
आज पहिल्यांदाच पाहतेय मी
तुझे औपचारीक, फसवे हासू ..
आणि ऐकतेय  yes dear , thanks, sweety, ok , fine
असले बुळबुळीत शब्द वापरलेले तू !

आज तू order केलीस cold coffee,
तोलून मापून बोलत होतास मध्येच काही ..
खिशात हात घालत राजा आज उदार झाला,
डिब्या नावाचा दोस्त मात्र, उगीच उदास झाला!

एक मोरपीस आणलेले मी खास तुझ्यासाठी
ते पाहून, फक्त हसून हळूच म्हणालास
"आतातरी स्वप्नातून बाहेर पड ग 'शोना' 
हे समजावून पण तप लोटले पुरे आता"

ते मोरपीस बघ कसं कवर-बावर होतंय 
तुझं- माझं नातच जणू पोरकं झालय
आपली ओंजळ पुरी रिती करून
सोनचाफ्याचे झाडही सुकून गेलेयं

खरचं तुझ्या-माझ्यात आता उरलय काय?
गढुललेल्या आठवणी , मळभलेल आभाळ
सुकलेला तो चाफा, ती अनोळखी नजर
आणि ..  दाबलेला फ़क्त एकच हुंदका!!

                                        ...  रेश्मा आपटे 

Saturday 9 April 2011

रेषा - रेघोट्या

परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र मैत्रिणी नाती, त्यांचे  संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतील असेही नाही." मी म्हटले असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch " तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, u will come to know ,  कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात this is life dear :) "  

मी त्याच्याशी initially अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम मस्त best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG " ’no,’ i don't !! strange but truth" ... मग? किती सहज accept  करतो ना आपण आयुष्यातले बदल बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक मित्र मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?).. किती वरवरची नाती असतात सगळी??? 

ह्या fast life मध्ये आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने call केला नाही मी का करायचा? नाही तर नाही गेली उडत... असे का होऊन जाते??? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समाजात नसते का आपल्याला की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की  लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO  मुळे,,,  पण काही झाले तरी परीणाम एकाच राहातो एक नात संपत ...... का, कसे, कधी, कोणाचे चुकले हे न कळताच  नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch  ... यावर संभाषण संपते.... आधी आठवड्यातून एकदा मग महिन्यातून एकदा मग काही महिन्यातून एकदा असे बोलणे होते ... त्यात संवाद नसतोच असते ती चौकशी मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड ,.. हे समजत असते दोघींना तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू ...

रेषा - रेघोट्या
असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय नसूच शकते. आणि प्रत्येक जण आयुष्यात काही शिकवण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठीच येत असतो. :) ते वाक्य होते .... "माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......


वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ... मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचा अस्वस्थ 'क्षण' ??  तो"ही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला हा आकार तोही नीट बघायचा accept करायचा, कारण तो सृष्ठीचा नियम आहे... ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे, 

मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची  ,,,मग vision clear झाले आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे,, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही .. नाही का??? :) :) :) :)  so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील ! 

अश्या बर्‍याच रेषा अजून "रेघोटी"ला  छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या  :)

पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि :रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल :) :) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत ,................

थोडक्यात काय yet  more to come !!!!!!! ....... 
                                      

                                                                                        ....  रेश्मा आपटे