Friday 30 December 2011

मावळतीचा सूर्य

संध्याकाळी ५ ची वेळ  ...
अविरत वाहणारा तो सागर, दगडांवर आपटून फुटणार्या लाटा, सूर्यप्रकाशाने चमचमणार पाणी जणू समुद्रभर पसरलेली चांदीच!! आणि तो सुर्यगोल दाह न देणारा पण तेज:पुंज्य!! हळू हळू प्रखर प्रकाश मंद मंद करत, स्वत:बरोबर आकाशभर लाली पसरवणार ते सूर्यबिंब मावळतीकडे झुकलेलं!! संध्येच्या सुखद मिठीत शिरणारा तो निसर्ग आणि पश्चिमेच्या क्षितिजावर विसावताना प्रकाशाचा स्त्रोत हलक्या हाताने झाकणारी ती सुंदर संध्या :) अहाहा ... लालसर, केशरी, पिवळे रंग कोण्या चित्रकाराने कॅव्हासवर पसरावे असे सुंदर सजलेले आकाश ,, आणि ,, आणि अवकाशातील त्या रंगात रंगलेला तो जलाशय जणू ती अद्भुत रंगांची डबी हिंदकळून रंग सांडावेत आणि पाण्यावर ते सारे पसरावेत असा नजारा !!.. आणि समुद्रात उठणार्या लाटांवर हेलकावणारे ते केशरी-लाल सूर्यबिंब !!! मंद मंद थंड हावा आणि कृत्रिम दिव्यांनी झगमगणारा तो किनारा!! हे वर्णन ऐकून  कोण्या शांत सुंदर ठिकाणचा सूर्यास्त वाटावा पण .., पण हे वर्णन आहे मुंबईच्या सूर्यास्ताचं आणि जागा ,,, marine  drives ...

गजबजलेली मुंबई.. चाकरमान्याची घराकडे पळण्याची तयारी. taxi  पासून ते फोर्ड, Mercedes  एक ना अनेक महागड्या गाड्यांचा मुंबईच्या रस्त्यांवरचा "स्पीड"  !! घाई, गर्दी आणि स्पीड मुंबईची ओळख. marine drives  चे ते कट्टे... त्यांच्या एका बाजूला तुफान वेगात चाललेली आयुष्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामांना जुंपलेले मुंबईकर आणि दुसरीकडे अथांग समुद्र .. दोन्ही कडे गती..  किनर्‍या लगतच्या मोठमोठाल्या इमारती, हॉटेल्स त्याचे डोळे दिपवणारे झगमगाट आणि दुसरीकडे मास्तीत  गरजणारा समुद्र!!
marine  drives  चा हा किनारा न जाणे किती वर्षे हे अनुभवतोय??? आकाशातले सूर्याचे खेळ, लाटांचे आवाज, पाणी, चंद्राच्या कला, रात्रीचे टिपूर चांदणे आणि दुसरीकडे उन्मत्त वेग!! एकीकडे शांत आणि सुरेख निसर्ग सूर्यास्ताच्या देखाव्याने आणि रंगानी न्हालेला समुद्र, थंड मोकळा वारा आणि दुसरीकडे तुफान वेगात धावणाऱ्या गाड्या, नुकत नुकत सुरु होणार मुंबईच night  life आणि मायानगरीतल एक सत्य "पैसा बोलता है| " पण किती करंटे आपण?? हे आयुष्य जगणारे, त्या कट्ट्याना रोज पहाणारे मुंबईकर, ते मात्र त्या कट्ट्याच्या अल्याडचे आणि पल्याडचे अशी दोन्ही दृश्ये एकत्र पाहू आणि अनुभवू शकत नाहीत कारण एकाकडे पाठ फिरवल्याशिवाय दुरसे मुळात दिसतच नाही!! आणि marine drives  चा कट्टा तो... संपूर्ण गजबजाटात राहून  "स्थितप्रज्ञ " !!!

अरबी समुद्र!! शाळेत पाठ केलेला, न्यूज पेपर्स मध्ये वाचलेला, TV  वर पाहिलेला आणि प्रत्यक्षात रोजच दिसणारा..तो समुद्र !! असंख्य सूर्योदय आणि सूर्यास्त बघितलेला, पावसाळ्यात उसळणारा आणि ओहोटीला शांतपणे मागे मागे सरणारा तो मुंबईचा समुद्र... असंख्य माणसे,गजबजाट, भांडण, प्रेम, हासू तर कधी आसू पाहणारा आणि  किनर्‍यावर मायानगरीचा झगमगाट वागवणारा आणि तरीही मस्तीत गरजणारा तो अरबी  समुद्र !! तिन्ही त्रिकाळ बारा महिने मुंबापुरीला सोबत करणारा.. सकाळच्या सूर्याबरोबर खुलणारा, माध्यान्हीला तापणारा, संध्याकाळी मुंबापुरीचे चे रुपडे खुलवणारा, वातावरण फुलकीत  करणारा हा समुद्र!! मन शांत करणारा, जगण्याची उर्मी, उत्साह देणारा, प्रेमी युगुलांना खुणावणारा, मुंबईबाहेरच्या प्रत्येकाला भुलवणारा, मुंबईकरांना  अक्षरश:  रोज भेटणारा तो समुद्र... पण किती वेळा हे सौंदर्य अनुभवतो आपण??? धावून धावून दमून नेमक्या वेळेस कितीवेळा तो समुद्र आणि ते निरागस आकाश पाहतो आपण?? खरच शेजारच सौदर्य, शांतता रोजच्या रोजमार्राच्या आयुष्यात हारवून बसतो  आणि मग शोधात फिरतो शांतता आणि समाधान - मुंबई पासून लांब, गावात !!!  

जवळ जवळ रोज marine drives  च्या आस पास फिरत असतो मुंबईकर... पण..  धकाधकीच्या आणि स्पीड च्या मागे पळणारा मुंबईकर किती वेळा marine drives  च्या त्या कट्यांवर शांतपणे विसावतो आणि अनुभवतो ते सृष्टीतील बदल??? मायानगरीच्या मायेला झगमगाटाला भूललेले सारेच मुंबई येतात आणि जुंपून घेतात स्वत:ला कामामध्ये, tyaa त्या स्पीड शी cope -up  करायच्या नादात आणि छन छन करणार्या नाण्यात सुख शोधत फिंरतात. शांती, निरागस सौंदर्य आणि समाधान मुंबईत नाहीच असे बिनधास्त म्हणतात. पण मुंबईचा साधा सूर्यास्त .. इतका सुंदर निरागस नजारा मात्र अनुभवायचा विसरूनच जातात :( :( .. समुद्र पाहतो पण त्याच सौदर्य आणि असा निर्मल निखळ सुंदर देखावा तीपायाचाच विसरतो खरच फार क्वचित अनुभवलेला  असेल आपण हा नजारा !,.. मायानागारीची ही पण  एक मायाच म्हणावी लागेल का???

जिथे सुर्यास्ताचा देखावा मन भुलवून टाकणारा असा दिसतो, अश्या जगातल्या कोणत्याही जागेवर सुर्यास्ता च्या नंतर एक अनामिक हुरहूर, असह्य शांतता आणि रुख-रुख पसरते पण मुंबई?? इथला सूर्यास्त तितकाच सुंदर असतो, भुरळ घालतो, पण सूर्यास्तानंतर समुद्राकडे पाठ केली की एक वेगळंच जग समोर येत ,, किनारा अजूनही प्रकाशित असतो कृत्रिम उजेडात झगमगत असतो आणि "स्पीड" वेडा मुंबईकर त्याच वेगात कोणत्याही टोचणी शिवाय धावत असतो... हे भावना शून्य असल्याच प्रतिक म्हणायचं?? की एक मस्तवाल  attitude ??  की गरज?? उत्तर कठीण आहे. SO, तूर्तास आपण फक्त marine drives  च्या कट्ट्याच हे  नशीब म्हणू किंवा त्या कट्ट्याच वेगळेपण !!!!
काळोखाच्या गर्तेत समुद्र पूर्णपणे दिसेनासा होतो पण किनारा मात्र झगमगत असतो कृत्रिम lights च्या उजेडात,,, सूर्यबिंब संपूर्ण मावळलेलं असत पण किनारा लख्ख असतो झगमगाटात हरवलेला!!!
मुंबई धावतच असते ... समुद्र वाहतच असतो ,,, फक्त  किनार्याची , marine drives  ची एक बाजू अंधारात अदृश्य झालेली असते... मुंबई आणि बेफिकीर मुंबईकरासाठी फक्त एक working day संपलेला असतो.


                                                                                                ... रेश्मा आपटे 

Tuesday 22 November 2011

2.30pm ची ठाणे लोकल

गेल्या आठवड्यात ठाण्यात एक काम होते म्हणून ऑफिस मधून दुपारीच निघाले. एरवी माणसांनी तुडुंब बहरून ओसंडून वाहाणारी लोकल दुपार असल्यामुळे एकदम शांत होती. first  class च्या डब्यात आम्ही ३नच जणी होतो. मस्त पाय पसरून बसले पण झोप येत नव्हती, नेहमी सारखी विचारांची तंद्री सुध्धा  लागत नव्हती :( वाटल ह्या सुख बोचत आपल्याला रोज त्या मरणाच्या गर्दीत आणि घामाच्या वासात सुद्धा झोप लागते किंवा विचारांचे चक्र सुरु असते. आज दस्तूर भी है मोका भी ( नो गर्दी + विंडो सीट)  पण झोप काही येत नाही :(

तर समोर बसलेली एक २८-२९ वर्षाची क्युट गोरीपान मुलगी हुंदके द्यायला लागली. वाटल बरे वैगरे नसेल म्हणून पाणी विचारलं पाणी प्याली तरी तेच. म्हटलं काय वैताग आहे. तर शेजारची ६० च्या आस पास ची आजी मध्ये पडली तिला सरळ विचारलं " काय आहे तुझ्या मनातला सल? आता सांगू नको  उन्हाने रापले आणि पाणी आले. हे काळ्याचे पांढरे असेच नाही झाले." तशी ती आणिकच रडायला लागली. झोप तर येताच नव्हती ( आणि दुसर्याच्या आयुष्यात डोकावणे हे सगळ्याच मुलींचे फेवरेट काम).

ती:  काय सांगू आजी. मी आता माझ्या बॉयफ्रेंड शी बोलत होते, म्हणजे X म्हणू की काय म्हणू माहित नाही कदाचित उद्या X म्हणेन पण सध्या तरी माझा बॉयफ्रेंड! ६ वर्ष आम्ही रेलातीओन मध्ये आहोत आणि आता ह्याला साक्षातकार झालाय की we dont have future together, का??? कारण आमच नातं म्हणे कांटाळवाण झालाय.( ती मध्येच थांबली काहीतरी विचार करत. सांगू नको यात अडकत कदाचित, पण बोलली, कदाचित कधीच परत आम्ही एक-मेकीना दिसणार नव्हतो म्हणून असेल) मी ,, मी ते टिकवायला असमर्थ ठरलीये तो चार्म ती ओढ मी नाही टिकवू शकले. आताच हे, मग नन्तर काय? म्हणून वेगळे होणे चांगले असे म्हणणे आहे त्याचे. खूप विनवण्या केल्यावर एक चान्स देऊयात आपल्या नात्याला म्हणतो. चान्स ??? उपकार करतोय का????? मला खरच कळत नाहीये मी कुठे चुकले? तो म्हणेल ते आणि तसेच केले नेहमी, सगळ्या adjustments केल्या, त्याच्या घराचे.. त्यांना आवडणार नाही म्हणून गलेलठ्ठ पगाराची नोकरी फक्त शिफ्ट्स असतात म्हणून सोडली. तर आता हा म्हणतोय, मी कमी पडल??. माझ्यातली मीच उरले नाहीये म्हणे.

आजी: मग आता पुढे काय? तुला काय हवाय तो की सुटका?? बघा बुवा तुम्हाला option  आहेत आम्हाला नव्हते असले options .

ती: अर्थात,  मला "तो " आमच नातं हवाय त्याच्या शिवाय माझ आयुष्याच नाहीये. आणि जर गेलाच दूर तर?? स्वत:ला संपवण्याची ताकद किंवा त्याला दुसर्या मुलीबरोबर बघायची हिम्मत पण नाहीये माझ्यात. मला भिती वाटते ती एकटेपणाची! तो गेला तर क्षणात मी एकटी होऊन, सगळी स्वप्न संपून जातील, एक पोकळी निर्माण होईल, त्याने विचार करायला वेळ मागितला तेव्हा वाटल जमिनीत गाडली जातेय मी, कोणीतरी मी निरुपयोगी म्हणून दूर करताय मला. मी सजीव आहे की एक वस्तू?? माझा कंटाळा आला? ६ वर्षाचं नात ३ शब्दात चुरगाळून अडगळीत कसा टाकू शकतो तो? मी खूप रडले तर उपकार केल्यासारखा एक चान्स देऊ म्हटला दोघानाही. मला भिती वाटली ती माझ्या विचारांची एकट पडण्याची!!! जगण्याचा आधार गमावण्याची. मी विचार करत बसले माझ नक्की काय चुकल? सुंदर नातं(??) माझं असं वाळूसारखं हातातून निसटताना मला कळलं कस नाही? की खरच तो म्हणतो तशीच आहे मी? साध आपल माणूस सुध्धा सांभाळता न येणारी? स्वत:त एकट जगायचा विश्वासच आणि सामर्थ्य नसलेली? त्याच्याशिवाय अस्तित्वच नसलेली? तो होता म्हणून लोक मला ओळखत होते, मी काय केलय? त्याला वेळ हवा सेटल व्हायला म्हणून जबरदस्तीने शिकत राहिले तर म्हणे फक्त शिक्षण कामच नाही व्यवहारीपणा हवा तो तुझ्यात नाही.

मी: (खरा तर तोंड उघडायची काहीच गरज नव्हती मला, ती आजीशी बोलत होती. पण गप्प बसले तर ती मी कसली नाही का? lolz ). what the hell ? तो काहीबाही बोलला आणि तू ऐकून घेतलं? का तुझ्यात हिम्मत नाही असे का वाटते तुला? चल मला एक सांग ,. त्याच्या म्हणण्या प्रमाणे तू कमी पडलीस राईट? now, assuming without admitting, you falied in keeping the relation moving or just failed to maintain the charm in the relation rite? what did he do to maintain the same? त्याने काय इनपुट्स टाकले तुमच रीलेशन टिकवायला? ही काय फक्त तुझीच जबाबदारी आहे का? आणि... (पुढे मी स्त्रीमुक्ती वादी विचारांची यादीच वाचणार होते, तुला त्याला नियम सारखे, आणि तुझ प्रेम आहे आणि तो हवाय तर काहीतरी कर ते नातं टिकवायला पण त्याला या गोष्टीची जाणीव करून देऊनच ... हे आणि बरेच शब्द मला पड्जीभे खाली ढकलावे लागले ... कारण आजी मध्येच बोलली....)

आजी:  ( मला तोडत आजी म्हणे...) हो तुझच काम आहे. मी जबाबदारी म्हणेन. हो; आहे तुझीच कारण तुझ्यातच ती ताकद आहे आणि कलाही कारण तू मुलगी आहेस. मुलगी मुलगा यातल्या कोणत्याही वादात मला अडकायचं नाही. तुम्ही तरुण मंडळी जे स्त्री-पुरुष समानता म्हणता ते पटत मला पटत पण...
नाती जोडायची असतात. ती जोडायलाही कमी वेळ लागतो तोडायला तर क्षणाचा ego पुरतो पण ती नाती संभाळण (maintain )कारण महत्वाच!!! ते कोणी शिकवत नाही कोणतेही पुस्तक किंवा शाळा-कोलेज तुम्हाला हे शिकवणार नाही ते आपण अनुभवातून शिकायचं असतं. नाती जपण हे मुलीना आपसूकच येत. आणि ह्या अश्या नाजूक नात्यांना तर फारच जपावं लागत, फुलवावं लागतं. स्वत:च अस्तित्व विसरून निष्ठा विसरून त्याला महत्व द्या म्हणत नाही पण "आयुष्य म्हणजे तारेची कसरत असते एक पाऊल चुकलं न की सगळा खेळच उध्वस्त होतो". माझे विचार तुम्हाला पटणार नाही म्हातारे वाटतील माझ्यासारखेच!! पण एक लक्षात ठेवा नाती ही "रेसिपी" सारखी असतात.
फोडणीत जसे मोहरी, मिरची मीठ बरोबर पडावे लागते ना?  त्याला चव यायला? आणि नंतर ती डीश सजवाविपण लागते तरच ती खावीशी वाटते आणि या सगळ्यात एक सेक्रेट गोष्ट सुधा असते ते म्हणे प्रेम, मन तो पदार्थ तुम्ह्च्या भाषेत perfect  होण्यासाठी :)
हा तर तसेच असते नात्याचे, भांडू नका असे नाही म्हणणार मी; कारण, त्यानेच जीवनाला रंगत येते. जेव्हा तुमची चहाच्या पेल्यातली भांडणे कमी होतील किंवा बंद होतील तेव्हा समजा की तुमच आयुष्य खूप निरास तरी झालाय किंवा जागून पूर्ण तरी झालाय चला निजधामाला (amazing आजी भारीच बोलत होती. आम्ही दोघी ऐकत होतो फक्त) हा तर, नातं जपायचं असत गुलाबाच्या फुलासारखं. चूक कोणाची याची उत्तर भांडण झाल्यावर लगेच नाही शोधायची!, ते मिटवायचं आणि मग शांतपणे चूक दाखवायची समोरच्याला!!. वेळ द्यायचा आणि  घ्यायचाही!!  घाईत काहीच निर्णय नाही घ्यायचा. हे नातं खरच नाजूक असतं!! ते तसच ताज तवान रहाण्यासाठी थोडासा बदल महत्वाचा असतो., Surprise  का काय म्हाणताना तुम्ही लोकं ते द्यायचे. कधी वागणं  तरी कधी दिसणं-नेसण थोडस बदलायचं. स्वत:ला त्याच्यासाठी बदलायचं पण अस्तित्व कायम ठेवून,  आपल्या निष्ठा जपून.

 तुझ्या बाबतीत मी म्हणेन तुला आधी स्वत:च्या नजरेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल. त्याने वेळ दिलाय चान्स दिलाय तो सकारात्मक घे असा विचार कर की त्यामुळे तुझा आत्मविश्वास गेलाय तो परत मिळेल तुलाच! आणि एकदा तो मिळाला की तुझा "तो" कुठे जात नाही. तू जो निर्णय घेशील त्याच्याबद्दल तो आत्मविश्वास  परत मिळाल्यावर तो जो काही असेल तो असो., पण मुलीनो तुम्हाला कितीही बोर ,,, असेच म्हणता न तुम्ही लोक ते तसे वाटले तरी ऐका, ही नाती प्रेमात गुंफायची असतात. लगाम ठेवायचा प्रयत्न केलात तर सुटलाच सर्व हातून. बेदी घालायची नवर्याला पण ती मनाला त्याच्या पायात नाही!! किती खेचायच आणि कुठे सोडायचं हे कळले ना की सगळे काही सोपे होऊन जाते बघा!! आणि हेही खरच आहे ग बायानो. सगळ काही मुलीच्या हातात असते. नाते जपणे पण आणि ते तोडणे पण!! सीता-द्रौपदी मुळे रामायण महाभारत घडत आणि जिजाई मुळे शिवाजी.!!  दुर्गा, राणी लक्ष्मिबाई सगळे तुझ्या-माझ्यात असतातं गरज असते ती स्वत: वरल्या विश्वासाची!!

प्रेम, माया, आपुलकी, रुसवा, थोडी तू-तू मै-मै, थोडी माघार, थोडा आक्रमक पणा, थोडासा attitude and ego , कधी तुझ म्हणण तर कधी त्याच बरोबर, खूप सामंजस्य आणि प्रचंड विश्वास बस; नातं PERFECT!!!

हे इतक आणि बराच काही समजावलं मी माझ्या लेकीला जर तिला नात्यांची किंम्मत, त्यातली गंम्मत आणि ते जपायची कला जमली असती ना??? .. तर,,, आज तिचं लेकरू पोरकं नसतं झालं.

(सुन्न झाले मी... ही बाई सोयर-सुतक नसताना स्वत:हून विचारते काय आणि सगळ बोलते काय. का कशासाठी??? त्या मुलीला मोकळ करण्यासठी?? की.. की स्वत:च दुख: हलक होण्यासाही?? ... मुंबईची लोकल आणि त्यातला अजून एक चेहेरा.... )

तेव्हड्यात ठाणे आले. आम्ही तिघीही उतरलो. तीन दिशांना चालत सुटलो मागे वळूनही न पहाता. परत एक-मेकींसाठी तितक्याच अनोळखी आणि detached होतं.गर्दीत मिसळत गेलो धूसर होत गेलो एक-मेकिंपासून दूर पण गर्दीत... कदाचित एकटेपणाची भीती असेल अजून मनात कुठेतरी तिघींच्याही!! आम्ही तिघी आता अनोळखी होतो, चेहेरे विसरणार होतो पण,,, विचार , त्याला चेहर्याची आणि ओळखीची गरज नसते तो डोक्यात रहाणार कायमचा!!.. आणि सोबतीला होता एक विश्वास! आजीनं दिलेला, स्वत: समर्थ असण्याचा.
                                                                                       
                                                                                                 
                                                                                                ...  रेश्मा आपटे





मुक्तबंध

मलाही एकदा मृद्क्कण बनून 
गरारा वार्यावर भरारायचय  
खूप खूप उंच जाऊन 
एकदा त्या आभाळाला शिवायचं

नात, मुलगी, बहिण, प्रेयसी
मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय  
हात पसरून खुल्या मनान
फक्त मी म्हणून जगायचंय 

बांधीव उंबरा ओलांडून
मला स्वत:ला ओळखायचंय 
मोकळा मोकळा श्वास घेऊन 
मनावरल मळभ पुसायचंय 

तो उंबरा ओलांडताना
मन स्थिर ठेवायचंय 
खोल काही तुटेल आत
तरी स्वत:ला सावरायचंय  

स्वैर करताना संचार
जगापासून अलिप्त राहायचंय 
सारे सारे तुटतील आधार
तरी स्वप्नांना जागावायचंय  

त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन
वेड्यासारख त्यांमागे धावायचंय 
सारी सारी बंधने झुगारून
फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय  

                                  ...  रेश्मा आपटे 



Tuesday 8 November 2011

द्वंद्व

खुपदा कस होत की सगळ काही सुरळीत नियमित सुरु असतं. म्हणजे "रुटीन लाइफ़" सुरु असतं. तसं बघितलं तर सगळ कस जगाच्या जागी आणि नीट!! तरीही एक रुख-रुख असते एक अशांतता मनात घर करून असते. सगळ असून विरक्तीची भावना देणारी! प्रत्येक पाऊल लख्ख प्रकाशात पडत असतं पण.. पण त्याच प्रकाशात स्वत:चीच दिसणारी सावली!! ती मात्र मन झाकोळू पहाते. दिवसा-उजेडी अचानक काळोखाच्या स्वाधिन झालो असे वाटायला लागते. मनात आत आता काहीतरी सलत रहाते. संपूर्ण  आयुष्याला  पुरेल  असे नैराश्य बेसूर हसत जणू आपलं अस्तित्वच त्याच्यात सामावू पहाते. 

हल्ली खुपदा मला असेच होतं. मनाचा नुसता गोंधळ उडतो का कस? कश्यामुळे ? काहीच सुचत नाही ... :( .. खूप खूप confident वाटत असताना मध्येच भीती वाटते काहीतरी चुकेल, जमेल का? नक्की हे करू शकू ?? असे एक ना दोन १०० प्रश्न मनात येतात! प्रत्येक प्रश्नासरशी मनात एक नैराश्य, एक अस्वस्थता दृढ होत जाते. ही भावनाच विचित्र अपरीचित असते मला! आज पर्यंत कोणताही निर्णय घेताना मी खूप ठाम असायचे. पण मग अचानक हे असे का व्हावे? म्हणजे प्रेम भंग किंवा total अपयश वैगरे अशी काहीच भानगड नाहीये मग तरीही हे का? उत्तर नाहीत आणि सापडतही नाही प्रयत्नपूर्वक शोधून सुध्धा नाही, उरतात फक्त प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न मनाचा गोंधळ वाढवतो. एखादी गोष्ट सुरु करते किंवा करायचा निर्णय घेते पण त्यावर ठाम होता येत नाही. हे करू का? ते जमेलच किंवा मी ते जमावेनच याची स्वत:चच मन ग्वाही देत नाही...   मलाच होते आहे का असे? आणि का होते आहे? 

फक्त मीच? की माणसाचे मनच असे आहे, सगळ्यांच्याच मनात ह्या अश्या दोन परस्पर विरोधी भावना आशा आणि निराशा एकत्रित वास्तव्य करीत असतात? एक दुसर्यावर हावी होण्याची धडपड करत असतात?..  आणि जिचे पारडे ज्या वेळी जडं तसा त्या व्यक्तीचा मूड! किवा स्वभाव आशावादी किंवा निराशावादी!
 व्यक्ती एकच पण .. पण विचार अनेक.. प्रत्येकाच्याच मनात असतात ह्या दोन्ही बाजू सतत, सतत एकमेकांशी झगडणार्या! एक आशावादी, हसरी, उत्साही, प्रेराणादाई तर एक निराश, उदास, निराशावादी! सगळ्यांच्याच मनात दडलेल्या असतात दोन विरोधी भावना एक लख्ख प्रकाशासारखी स्वच्छ, निर्मळ तर दुसरी स्वत:बरोबर निराश करणारी काळोखात खेचत नेणारी कुट्ट काळ्या सावलीसारखी निराशावादी!!. 

माणसाचं इवलस ते मन पण..  भावना त्या मात्र अनेक! ते मन भारीच चमत्कारिक असत नाही, उगी नाचवत रहात, एका क्षणी सगळ काही शक्य वाटतं, तर पुढचाच निराश उदास क्षण सार काही अशक्य करून जातो. प्रत्येकजण नेहमीच एक झगडा, एक युद्ध अनुभवत असतो. आशा-निराशा दोघीही एकमेकीनवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. सतत सतत आपल्यावर ताबा मिळवू पहातात आणि आपण त्या पैकी एकीच्या स्वाधिन होतोही. कसे? कोणत्याक्षणी?  हे आपले आपल्यालाही नाही समजत! पण आशा-निराशेच्या मधली ती अदृश्या रेषा ओलांडून नेहमीच प्रत्येकजण एका बाजूला खेचला जातो. पण जोवर आपण रेषेच्या एका बाजूला असतो, मग ती कोणतीही असो, तोवर सगळाच ठीक असतं; कारण रोजचा दिवस सारखाच नसतो ना? पण जेव्हा कधी आपण त्या रेषेवर उभे असतो आणि तळ्यात मळ्यात सुरु असतं तेव्हा? तेव्हा काय? काय करायचं आणि कस आवरायचं मनाला? कस पुन्हा वेसण बांधून आशेच्या आश्रयाला सोडायचं?

हल्ली हे मी सतत अनुभवतेय एक द्वंद्व !! सतत मनात चालणार एक युद्ध. आशेचे - निराशेशी. उत्साहाचे- निरुत्साहाशी. punch  me असते ना तशी अवस्था झालीये माझी सध्या! त्या अदृश्या रेषेच्या अलीकडून आणि पलीकडून सारखेच धक्के बसतायत आणि मी मात्र गडबडतेय त्या रेषेच्या पलीकडे जाण्यासाठी. तो उत्साह खुणावतोय पण ते नैराश्य वरचढ ठरतेय माला वाकुल्या दाखवत परत परत स्वत:त कोंडतय! 

आणि मी झगडतेय प्राणपणाने बाहेर पडायला!!!  कशी? ते मात्र समाजात नाहीये. 

हे सगळ उतरवू की नाही इथे इतक _ve  नको लिहीत जाऊ असे काल एक मित्र म्हणाला पण माग विचार केला कदाचित हा एक मार्ग असू शकतो मनातला गोंधळ समजाऊन घ्यायचा आणि फायदा नाही झाला तरी तोटा तर नाहीच होणार ना? म्हणून मग खरडलं  ..........

                                                                                                ,,, रेश्मा आपटे 

Saturday 29 October 2011

दिवाळी

परवा ऑफिस मधून घरी यायला जरा उशिरच (रोजच्या सारखाच :D ) झाला  ..आणि मग त्या नन्तर ओघानेच होणारी आईची चिडचिड, बाबांचं फक्त घड्याळ पहाण, आणि आजी कडून मिळणारे भाल मोठ lecture हे सगळ असून शांत राहायचं अस स्वत:लाच बजावत building मध्ये शिरले. आणि कशात तरी अडखळले ,, नशीब धप्प दिशी पडले नाही. पण चांगलीच ठेच लागली. मूर्ख कुठची पोरं, खेळतात ते तिथेच टाकून जातात कोणाला लागेल, पडेल कोणी याचा विचार सुद्धा करत नाहीत!!! stupids पहिल्यांदा मला त्या चिल्लर gang चा मनापासून राग आला. तो सगळा राग त्या दगडावर काढत मी त्याला लाथ मारली तर दगड जास्ती हलला पण नाही, नीट वाकून बघितलं तर ती किल्ल्याची तयारी असल्याच लक्षात आलं!


मस्तच किल्ला! दिवाळी आली नाही का? वा वा! दुखरा पाय सांभाळत नीट पुढे टाकून मी आत शिरले, त्या चिल्लर gang वरचा राग त्या ओबड-धोबड  लहान मोठाल्या दगडांकडे आणि मतीकडे बघून सुंदर वार्याच्या झुळकी सरशी पळून गेला! मी यंत्रवत पावले टाकत जिने चढत होते, पण लक्ष मात्र त्या किल्यात अडकल होतं! आमच्या किल्ल्याची जागा आज कित्येक वर्ष fix  आहे. फक्त तो बनवणारी, माती लीम्पणारी आणि हात बरबटवून त्यात रमणारे चेहेरे मात्र बदललेत. .. मला त्या किल्ल्या समोर मीच दिसायला लागले ते मोठ-मोठे दगड जमा करणारे, ते कल्पकतेने मांडून त्यावर माती लिंपून त्याचा किल्ला बनवणारे माझे सवंगडी आठवले. आई कडून मोहरी घेऊन त्या किल्ल्यावर आम्ही फुलवलेली हिरवळ, रचलेले मावळे आणि सगळ्यावर वरती विराजमान असलेले "राजे" ..  किल्ल्याच्या बाजूला तलाव हवाच या माझ्या हट्टापाई माझ्या मित्राने तलाव म्हणून कल्पकतेने रचलेली करवंटी आणि दुसर्या दिवशी त्यातील सर्व पाणी वाहून गेल्यामुळे हिरमुसलेला त्याचा नि माझा चेहरा सगळाच आठवल २ मिनिटात ... :) :)

घरी पोहोचले तर घरातून चकल्यांचा खमंग वास आला.. वा वा !! पणत्या, किल्ला, रांगोळ्या, आकाश कंदील, आणि चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनारसे, शेव, करंज्या वा वा  !!! आली आली दिवाळी आली यंदाची !
एरवी सारखी घरी चिडचिड नाही झाली, आणि मीही नेहमीसारखी थकले म्हणून कटकट केली नाही ,,,

दिवाळी... खरच सणांचा राजा ! दिव्यांचा सण ... हवेत नुकताच जाणवत असलेला गारवा, खाऊ मिठाई, फटाके, मित्र नातेवाइक यांच्या गाठी भेटी, उत्साह, रंग, रोषणाई, वातावरणच पवित्र आणि आनंदी होऊन जाते ना सगळे? लहानपणी शाळेला मिळणारी सुट्टी, फटके, कपडे आणि खाऊ यात रमणारी मी अचानक मोठी आणि sad  झाल्यासारखी वाटयाला लागले मलाच!! रांगोळीच्या रंगात रंगणारी, पणतीच्या जोती बरोबर हसणारी, कंदिलाच्या प्रकाश धरायला धावणारी, किल्ल्याच्या मातीत हात आणि फ्रोक मलवणारी आणि करंज्या-चाकल्यांवर यथेच्च ताव मारणारी मी!! दिवाळी उद्या परवा वर आली तरी no shopping no colours  and no  lights  :(  छ्या छ्या ते काही नाही जेवण खाण करून चेहर्यावर पाणी मारून मस्त उठले आणि पणत्या, रांगोळीचे रंग माळ्यावरून काढायला घेतले आणि सज्ज झाले दिवाळीच्या स्वागताला :). तेव्हढ्यात शेजारची चिंगी माझा आवाज ऐकून धावत धावत आली आणि मला म्हणे ताई रांगोळी कधी काढणार किल्ला उद्या पूर्ण होईल :)

बस हे ऐकून खूप खूप खुश झाले मी आणि तिला उत्साहाने सांगितले उद्या रात्री नक्की :)

त्या एका वाक्याने मला जाणीव झाली की अजून मी "त्यांच्यातलीच" आहे आणि तो चिमुकला किल्ला माझाच आहे. ते फिलिंग सुध्धा सुखावून गेले. :) खूप समाधान वाटले. आणि एक गोष्ट लक्षात आली की हा खो-खो तर सुरूच रहाणार काल मी नाचत होते आज ही चिंगी, आणि  न जाणो अजून काही वर्षात ही सुध्धा अशीच माझ्यासारखी दगडावर ठेचालाल्यावर तिचे फ्रोक मधले दिवस आठवेल :)

हेहेहे ते असो चला पणत्या लावू आज-उद्या मध्ये ते राहून जायचे काय ?? आणि पणत्या लावण खूप महत्वाच कारण जो स्वत: प्रकाशतो आणि दुसर्याला प्रमाषित करतो तो "दीप" असतो.
आजीच्या भाषेत  " दीप्यते दिपयति वा स्वं परं चेति "

Monday 26 September 2011

त्या वळणावर ...


सोडून गेलास माझी साथ
निघून गेलास तोडून सारे पाश 
अन झिडकारून ते मोहक आकाश
त्या वळणावर...

प्रेमात आकंठ बुडत स्वप्न रंगवत    
एक घरट विणत सजवत
इतका कसा कोरडा झालास  
त्या वळणावर ....

माझ्या सवे हसलास तू, रुसलास तू 
गुलाबी मिठीत विरघळलास  तू 
अचानक कुठे हारवलास तू? 
त्या वळणावर ...

सरण पेटले उरल्या आठवणी 
जिथे गुंफिली मंजुळ गाणी 
आज ऐकते ती विराणी 
या वळणावर ....


अश्रू अलगद एक कलंडला
तुझ्या आठवांचा मोती होऊन
गालावरतून हळुच निखळला
त्या वळणावर  ..



                                    ....  रेश्मा आपटे 


Sunday 25 September 2011

क्या फायदा तुम्हारी पढाई लिखाई का???

काल सकाळी सकाळी कोर्टात एक evidence सुरु होता. ती मुलगी सांगत होती, तिच्या सासरच्यांनी तिला कस छळलं? तिच्याकडून पैश्याची वारंवार मागणी केली गेली, उपाशी ठेवलं गेलं, नोकरी करून आल्यावर प्रचंड घरकाम आणि नणंदेच्या मुलाची काळजी हे करावेच लागत असे. अशात ती स्वत: ३  महिन्यांची बाळंतीणं तरीही घरात पैश्यांची चणचण म्हणून नोकरी करीत होती. दिवसभर नोकरी मग घरकाम, मुलं त्या नन्तर तिच्या ३ महिन्यांच्या असहाय्य लेकराला छातीशी कवटाळून, मुलीला जन्म दिल्याबद्दल त्या पिल्ला इतक्याच असहाय्य पणे शिव्या आणि मार खात होती. रोजच्या शिव्या, मार, दारूचा शिशारी आणणारा वास पैशांची वाढत जाणारी मागणी आणि त्या निरागस जीवाला सतत सतत दिलेली दुषणे याने ती इतकी पिचली होती की ती एका प्रश्नाच उत्तर देताना जोरात ओरडली " साहब ये आदमी नाही है साला हैवान है | उसे औरत चाहिये बीबी नाही, सुभे खाना बनाव, दिन भर पैसा कमाओ, और रात को बिस्तर मै लेटो बस| मेरी लडकी तब ३ महिने की थी जब ये उसे मारना चाहता था| अब बडी हो गई तो उसे उसपे हक चाहिये| मत देना, मत अरे ये तो मेरी बेटीको भी बेच खायेगा,,,, सहाब|"    

ती जे म्हणत होती बोलत होती अगदी १००% खर नसेलही.,,, पण त्यात आता पडायचे नाही आपल्याला! पण आजच्या जमान्यात शिकल्या सावरलेल्या घरात हुंडा, पैसा, स्त्री ला कमी लेखणे, मार-हाण आणि हत्या हे प्रकार होतात??  आजही "मुली वाचवा" वाले संदेश लोकांपर्यंत पोहोचवावे लागतात हेच दुर्भाग्या आहे आपल्या देशाच!

तिथून ऑफिस ला गेले घडलेला प्रकार as usual discuss केला तर एक colleague म्हणाला,
तो :     "अरे आज या कल कुछ नाही होता. होती है mentality , जब तक वो नाही बदलेगी ना, तब तक ये सब           
           शुरुही रहेगा! XXXX आहेत XXX डावरी मागणारे. पण तुला माहितेय माझ्या एका मित्राच लग्न ठरत    
           होतं बघ मी काल बोललो ? 
मी:      " हा त्याच काय?
तो :-    "त्याच लग्न मोडल :(  can  u  gusee  the  reason ?" 
            मी चार पाच common  reasons  दिली तर म्हणे
तो:       "WRONG ...." त्याने सांगितले की मी हुंडा घेणार नाही. सिर्फ लडकी दो काफी है| "
                त्या मुली कडच्याना वाटलं की, मुलात काहीतरी दोष आहे म्हणून हे लोक हुंडा घेत नाहीयेत म्हणून           
                लग्न मोडल .. 
unbelievable 
सुन्न झाले मी हे reasoning  ऐकून!!! मी " अरे काय फालतूगिरी आहे. म्हणजे गुजराती, मारवाडी जे कोणी असाल तुम्ही पण हे वागण म्हणजे हुंडा प्रथेला support करण्यासारखच आहे की ...." मला अजूनही काही बोलायचं होतं पण.. तो colleauge  म्हणे don 't  take  it  on heart  jus chill  n  lets leave ,, its  २.३० almost  

मग दुसर्या कोर्टात जायला Rik पकडली म्हातारा मुस्लिम चाचा होता driver! खूप काही बाही बडबडत होता आणि मला जाम irritate होतं होतं त्याच बोलानं!! पण परीयाय नव्हता सो मी ऐकत होते..
चाचा : " आप वकील हो न madamji ?"
  मी      "हंमम" 
मग तो जो सुरु झाला तो एकदम कोर्ट येईपर्यंत बोलताच होता.
चाचा:   " कैसा है ना मै इधर बंबई मै २० साल से हू और ऑटो चला रहा हू| अब वो दिन दूर नाही जाब लाडकीया   
            जायेंगी लाडका देखणे और 'ना' करके आयेगी| आज कल की बेटिया होतीही सयानी है!! लडके लडके 
             करने क्या है? बीबी आतेही पल्लुसे बंध जाते है| क्या कहेते हो madam जी मैं सही हूं ना? अभी आपही 
            बतावो लडकी पढी-लिखी चाहिये, वो नोकरी भी करनी चाहिये, और उपरसे लडकेवाले दहेज मांगते है 
           ?? मै कहेता हु क्यों ? क्यों दे वो दहेज ? जिंदगीभर की कमाई दे रहे है, तेरे हाथ मै उनकी जिंदगी, ख़ुशी,            
           उनकी बेटी सोप रहे है| फिर भी पैसोंका लालच क्यों?, सही केहे रहा हूं ना madamजी? औरत की किंमत 
           नाही जानते और बात करते है, "हम ओफ्फ्सर है... " आप ही बोलो, क्या फायदा आईसी पढाई लिखाई 
           का???"

मी ऐकत होते. आधी परियाय नाही म्हणून मग इंटरेस्टिंग वाटलं म्हणूनं! मी आवाक झाले ते ऐकून! त्या सध्या, अनपड चाचाचे स्पष्ट आणि पुढारलेले समजूतदार विचार ऐकून. मी स्तब्ध झाले. high  profile  लोकाना, स्वतःला सुशिक्षित म्हणणार्याना जे कळत नाही, जे आपल्या सारख्या पांढर पेशी माणसाला समजूनसुद्धा  दुसर्या पर्यंत पोहोचवता येत नाही, ते त्या चाचाने फक्त १० मिनिटात माझ्यापर्यंत पोहोचवलं. खरच हुंडा बळी, मानाषिक शारीरिक छळ, स्त्रीभ्रूण हत्या हे सगळे समाजाला जडलेले रोग आहेत आणि त्यांचे निवारण हे फक्त फक्त विचारांच्या प्रगल्भतेने किंवा समजुतीनेच होणे शक्य आहे. जोपर्यंत सगळ्यांचे विचार त्या रीक्षेवाल्या चाचासारखे प्रगल्भ होत नाहीत ना, तोवर खरचं .. 

"क्या फायदा तुम्हारी पढाई लिखाई का?.... "

                                  
                                                                                              ...  रेश्मा आपटे 

Wednesday 7 September 2011

अनोखी ( भाग ६ )

तिच्या अंगावरले सिगारेट्स चे डाग, पट्यांचे वळ आणि तिचे निबर डोळे स्वत:च खूप बोलके होते.नवरा कसला तो हैवानच! माणूस म्हणायच्याही लायकीचा नव्हता तो! पण त्याचा संसार तिने मेहेनतीने आणि  नेटाने केला. ३ मुलं तिला पण मोठ्याचे नि तिचे सूरच कधी जुळले नाहीत हेच खरं! दोघे एक-मेकांना कधी उमगलेच नाहीत. हे ऐकून त्याचं काळीज हलल. मग त्यानं ठरवलं, शेवटचे काही महिने तर महिने पण तिला सुखात ठेवायचे. तिने जिवंतपणी भोगलेल्या मरण यातानांवर मरणाच्या दारात का होईना पण फुंकर घालायची याच एका निष्ठेने आणि जिद्दीने त्याने हे पाउल उचलले. ती जाणार!! त्याला जास्तीच एकटा करून जाणार हे निश्चित होतेच ते स्विकारून!!आणि त्या आयुष्यभराच्या दुख:साठी स्वत:हून तयार होऊन त्याने तिच्या सकट त्याच्या घराचा उंबरा ओलांडला. त्या उंबर्याच्या आत तीच सुख होतं, आणि ज्या क्षणी ती तो ओलांडेल त्या क्षणी त्याच नरक्प्राय आयुष्य सुरु होणार होतं.

काही महिने म्हणता म्हणता त्या उंबर्या आतल्या सुखाने किंवा त्याच्या सहवासाने किंवा तिच्या इच्छा शक्तीने किंवा त्यांची दुख: बघून स्वत:च रडू न आवरू शकणार्या नियतीने त्याना चक्क ३ वर्ष दिली एकत्र एक-मेकांबरोबर!! ,.. आणि मग कालचा काळा दिवस!!! नकोसा ... त्याची हिम्मत तोडणारा! ती जगायला हवीही होती आणि तिची वेदना संपवायला फक्त मृत्यूच उपाय होता म्हणून ती सुटायलाही हवी होती.विचित्र कात्रीत फसलेला तो फटफटीत डोळ्यांनी त्या बंद काचेच्या दाराआड जीवाच्या आकांताने श्वास घेणार्या तिला 'मेहेसुस' करण्याचा मूकपणे प्रयत्न करत होता. आणि त्याला तिचे बोल आठवले: "माझ्या प्रेताला अग्नी माझा मोठा देणार नाही आणि माझी तिरडी शशीच बांधेल" हे शब्द त्याच काळीज चिरत गेले... असह्य कळ गेली त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत हृदय जाळत!!

तेव्हढ्यात तिचा भाऊ, मुलं, शशी, तिची आई सुमी सगळेच पाठोपाठ पोहोचले. डॉक्टरांनी निर्णय घ्या म्हणताच सगळेच अडखळले. तोही उभा होता भेदरलेल्या कोकरासाराखा!! तिची आई पुढे झाली त्याच्या गालावरून हात फिरवत,"खूप केलास बेटा तीच खूप केलंस पैश्याने आणि कष्टाने!!आता जाऊदेत तिला नको असं अडकवून ठेवूस..." मानेवर मणा-माणाचं ओझं असल्यासाख वाटलं त्याला कष्टाने मानेनेच संमती देतं तो खाली बसला. ती जिद्दी होतीच पण खूप हट्टी, हेकट, चिडचिडी, तुसडी,झाली होती.. पण त्याची काळजी घेणारी, पुन्हा एकदा त्याच्या जगण्याला दिशा देणारी, परत नव्याने स्वप्न पहायला लावणारी, खूप असह्य वेदना सोसून, अशक्त शरीराला जपून, वेदनेने विव्हळून सुध्धा जगण सुंदर आहे.. तुझ्या साथीने तर खूपच सुंदर आहे!! म्हणणारी, कोणत्याही औषधाशिवाय फक्त इच्छाशक्तीवर १ च्या जागी ३ वर्ष जगणारी !!! ICU च्या काचेच्या आत आत्ताही मृत्यूला झुंजवणारी "ती" खरच "अनोखी" आहे नाही "होती." .............

आहे आणि होती ची अस्पष्ट रेषा पार करून त्याची अनोखी त्याच्या समोर त्याच्या परवानगीने मुक्त झाली. ......

                                                                                                           
                                                                                                  ...   रेश्मा आपटे

Tuesday 6 September 2011


अनोखी ( भाग ५)

अनोखीची मागची बहिण सुमी!!!..तिने दादा म्हणून हाक मारली नसती आणि स्वताची ओळख पटवून दिली नसती तर ती बाजूला बसलेली मध्यम वयीन निटनेटकी बाई म्हणजे,,काही वर्षांपूर्वीची परकर-पोलक्यातली गोरी माऊ सुमी हे स्वप्नात सुध्धा त्याला वाटण अशक्य होतं. ती तोंडभरून हसली उणी-पुरी २०-२५ मिनिटे त्याच्या बाजूला बसली असेल ती. पण त्याला सुन्न करून गेली. ती उतरून गेली त्याला कोड्यात टाकून, काही वर्षे त्याला मागे ढकलून. ,...

तिचे शब्द त्याला आठवत होते. .."दादा, खूप चिडला असशील ना रे आम्हा सगळ्यांवर, मी सुधा गुन्हेगार आहे तुमची. तिच्यावर अविश्वास दाखवून, आमच्या सुखा खातर आम्ही तिला लग्नासाठी हो म्हणायला भाग पाडलं. ती चिडली, भांडली, रडली जे शक्य ते सारकाही केलं तिने स्वत:च म्हणण घराच्या मोठ्यांना पटवण्यासाठी!! पण नाही जमल तिला. तू जवळ असतास तर कदाचित काही होऊ शकाल असतं पण तू तू नव्हतास रे... तिने विशू दादाला सांगून तुला ट्रंक call सुध्धा करायचा प्रयत्न केला. पण नाही जमलं त्याला!! त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांकडे न पहातच ताईन त्याला जन्माचा गुन्हेगार ठरवून टाकला...२ वर्ष खिंड लढवली तिने एकटीने.. शेवटी माझं कारण सांगून भगदाड पडलं बघ  आणि तिला लग्नासाठी होकार द्यायला भाग पडलं दादानं!! तुला चिडून तिरमिरीत एक पत्र लिहिलं "..हरली तुझी अनोखी म्हणून.." तिला वाटत होतं तू येशील. तिला हारू नाही देणार तू पण तू नाही आलास. जेव्हा आलास तेव्हा किती सहज तिच्या हसर्या मुखवट्यावर विश्वास ठेवून परतलास रे ?? कसा रे कसा??? हेकट, संशयी, हट्टी नवरा, पदरात तीन मुलं, नोकरीची गरज, तिथल्या जबाबदार्या ताप आणि घराचा मनस्ताप ... आयुष्याचीच होळी झाली रे दादा तिच्या!! तुला दोष नाही देत पण तुझ्याशी बोलून जरा हलक वाटलं कारण तिच्या आयुष्यात तिचे असे दोघाच होतो ना आपण? "
          ती उतरून गेली,.. तिची वाक्य घोळत राहिली त्याच्या डोक्यात, मनात.. तिच्या आयुष्याची होळी झाली ... होळी, होळी .. त्या आगीत होरपळत मात्र तो राहिला. ...

तो उगीचच जागेवरून उठला आणि फेर्या मारू लागला. जणू सुमी त्याला कालच भेटली होती आणि तिच्या शब्दांनी तो अस्वस्थ झाला होता. चूक-बरोबर, खर-खोट, का, कसं? जणू प्रश्नांनी त्याला घेरल आताच... तेव्हा सारखं. तो जड,अस्वस्थ,गोंधळलेल्या मन:स्थितीत परत आला. शशी,शमा,विशाल,अजय,आई-पप्पा सगळ्यांना घडलेला प्रकार त्याने सांगितला. पुढे काय??सगळ्यांच्या समोर मोठ्ठा प्रश्न उभा राहिला? आता काय? नेहमी प्रमाणे सगळे शामाकडे पाहू लागले.ती स्पष्ट आणि शांत पण हुकमी स्वरात म्हणाली "समांतर रस्ते जोडायला जाऊ नका. जे झालं ते दुर्दैवी होतं. पण तुझं तिच्या आयुष्यात परत जाणं म्हणजे तिच्या ठिगळं लावण्याच्या प्रयत्नांना फाडून आत शिरण ठरेल. तर सध्या तरी शांत रहा." पण ..त्याचं मन काही शांत होत नव्हत. त्याने वेगवेगळ्या sources ने तिची माहिती काढणे सुरु केले.  त्याला कळल की त्याचा त्रास असह्य होऊन ती वेगळी राहातेय.पोरं तिच्या आईकडे आणि होस्टेल वर अशी असतात.मग न राहून तो तिला भेटला. संपूर्णपणे थकलेली, पोक्त, अशक्त, पण 'मानी',... "अनोखी"  खूप वर्षांनी भेटला तिला. काही मिनिटांचीच भेट पण दोघांचीही आयुष्य घुसळली गेली. डचमळलेल्या भावना दुख: शांतच होईनात!!!

तिचा नवरा गेला तेव्हा तिला आधार द्यायला तिचे नातेवाईक आणि मित्र मंडळी होती. तो त्यादिवशी तिला भेटला पण मग त्याने तिला भेटायचं टाळलं मुद्दाम!! तिला भेटण टाळायच नेमक कारणं काय  त्याला तिची दुख: पहावणार नाहीत म्हणून? की समाज? की आणखी काही??? हे तो आताही सांगू शकत नव्हता.
आणि कितीही झाल, कितीही वाटलं तरी तिचं एक छोटसं विश्व होतं. त्यात तिची 3 मुलं होती. पण जेव्हा त्याला कळलं की तिला hepatitis B आहे आणि त्याला उपाय नाहीत. लिव्हर संपूर्णपणे damage झालीये. ती फक्त काही दिवसांची किंवा फार-फारतर वर्षाची सोबती आहे. त्याने जगातल्या कोणाचीही पर्वा केली नाही. तो तडक जाऊन तिच्या समोर उभा होता. त्याच टेचात त्याच घुश्यात जसा मिलीतरीत जाण्या आधी असायचा तसाच!!.सुरुवातीला ती आवघडली.पण तिच्याकडे परीयायाच नव्हता.जेव्हा डोक्टरांनीही सांगितले होते की आता काहीच होऊ शकत नाही. त्याने तिला काहीच बोलू न देता चेक अप्स करायला भाग पडले.खूप प्रयत्न केले.पैसा गेल्याच दुख: नव्हत पण लांब का असेना पण ती जगायला हवी होती त्याला. blood transmission सुधा आता अशक्य होतं.


तेव्हा तिला शांतपणे भेटायची गरज त्याला वाटू लागली. शेवटच बोलायचं होतं.. मग तो तिला भेटेल अशी एकच हक्काची जागा आता शिल्लक होती. शशी नि शमा च घरं!! त्यांनीही परवानगी दिली. त्याने ठरवलंच होतं सगळं सगळं बोलून टाकायचं कोणत्याही मुखवट्याला भुलायचे नाही.एक तर भळभळणारी जखम वाहती होईल नाहीतर खपली तरी धरेल तिच्यावर!!काळ उंबर्यापलीकडे उभा आहे हा शेवटचा मोका म्हटल्यावर तीही बोलली ..भरभरून बोलली मोकळी मोकळी होतं.तिच्या अंगावरले सिगारेट्स चे डाग स्वत:च खूप बोलके होते.पण मुलाबद्दल ऐकून त्याच काळीज हलल.२-३ दा भेटल्यावर त्यांनी एकत्र रहाण्याचा निर्णय सगळ्यांसमोर जाहीर केला.अपेक्षेप्रमाणे तिचे नातेवाईक तयार झाले कारण आता आजारी बाई करणार कोण? वेळ,पैसा आहे कोणाकडे? हे प्रश्न होतेच. मुलांनी थोडा वेळ घेतला पण मग काकाला accept केले. शेवटी तीही तिचीच मुलं प्रक्टीकॅल !!! की स्वार्थी परस्पर जबाबदारी घेणारं कोणी भेटलं मग मोठेपणाने परमिशन देणारी स्वार्थी तिच्या नावार्यासारखी. काही का असेना पण शेवटी ते दोघे एकत्र आले.

                                                                                                              क्रमश:

Saturday 27 August 2011

अनोखी (भाग ४)

तो war front वर होता. युद्धाची सुरुवात नव्हती अजून पण चिन्ह दिसत होती. संपूर्ण तयारीत ते सगळे बोर्डरवर होते. असह्य, अनिश्चित वातावरण कधी काय होईल सांगता येत नाही, होईलच याचा नेम नाही. छोट्या छोट्या गावातील ते गावकरी त्यांची आयुष्य वाचवण, त्याना घर-दार सोडून बोर्डर पासून लांब जायला तयार कारण,त्याचं संरक्षण करणं, डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस करून ती अनिश्चितता, ती घुसमट तो इतरांच्या बरोबरीने मनाचा तोल ढळू न देता सहन करत होता. तिची पत्रं वारंवार वाचत होता. तिला उत्तर लिहित होता पण ती पोस्ट करायची राहून जात होती. तिची पत्र मात्र न चुकता येत होती. ते शेवटल पत्र आलं,.. नेहमीच्याच उत्साहाने त्याने ते पत्र उघडल. त्याचं energy ड्रिंक, त्याचं optimism याचं राजं असलेलं ते पत्रं. !! हावरटासारख ते पत्र त्यानं फोडलं. सुंदर मोत्यासारख वळणदार अक्षरात " प्रिय फौजी" ,.. परिचित सुरुवात. तो खूप सुखावला नेहमीसारखाच!!  पण पुढचा फक्त अर्ध्यापानाचा मजकूर २-३ वेळा वाचूनही त्याच्या मेंदूत शिरेच ना!!!
 तो त्या पत्राकडे फक्त बघत राहिला. त्याच्या कपाळाची शीर ताणली गेली, चेहरा विचित्र झाला, तो सुन्न पणे जागीच थिजला. त्याचा front वरचा जिवलग मित्र 'सुलेमान'ने असा विचित्र अवतार पाहून त्याला विचारलं "क्या हुआ भाई?" तो काही बोलणार तोच एका हल्ल्याची बातमी कानावर आली. अनोखी , त्याचं दु:ख त्याने तात्पुरतं त्या कागदाच्या घडीत बांधल आणि तो कागद खिशात कोंबत तो उठला.

सुलेमान!!  त्याच्या आठवणीने त्याचा गळा दाटून आला... पण भाभिजान च्या दुख:पेक्षाही आज त्याच्याच   दुख:चं पारडं त्याला जड वाटत होतं. त्या दिवशी अनोखीच ते अनोख पत्रं खिशात कोंबून ते दोघे धावले, अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सर्व ५ अतिरेकी ठार झाले तर एक .. फक्त एकच जवान कामी आल!!. संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटला. फक्त एक जवान !! फक्त ??? त्या विचार सरशी तो दुखावला ऐन तारुण्यात   स्वत:च्या नवजात अर्भकाला न बघता त्याचा सुलेमान ... त्याचा सुलेमान त्याच्याच देशात तुम्ही लोक म्हणून त्याला परकं करणार्या देशवासीयांसाठी प्राण पणाने लढत शेवटी अल्लाला प्यारा झाला,... तो फक्त एक जवान??? ,.. त्याला खूप चीड आली त्याने तो दुख:चा कड मोठ्या शरतीने परतवला. तेव्हा परतवलेला ना?? अगदी तसाच.  त्याच मनं आत आत अंतर्मनात त्याच दुख: कैद करतं होतं. आणि तो कोरड्या डोळ्यांनी कुराण आणि पत्रं पहात होता. सुलेमान गेल्यावर तो दुख: 'व्यक्त' न करता पिऊन टाकायला शिकला. "गम में रम " असं सुलेमान का म्हणायचा त्याचं गमक त्याने त्याच्या परीने जाणलं तेव्हा!! त्याच्या मनाचा ताण सहन न होऊन त्याचे डोळे पुन्हा अलगद बंद झाले. परत तो नकोसा अंधार... त्यात वर्ष मास पुढे सरकात होते. तो ते सगळं जगला होता, यावरच विश्वास नव्हता. एक नकोसा उलटा प्रवास,... पण ते थांबवणही नव्हतं त्याच्या हातात.

त्याला शशीच्या पत्रातून कळलं अनोखीच. त्याच्या अनोखीच ..  लग्न झालं. त्याच उरल-सुरलं अवसान तेव्हा गळून पडलं. पण .. हारून चालणारच नव्हत!! थांबून आयुष्य थांबत नाही.तिच्या लग्नानंतर ३ महिन्यातच सगळीकडे शांतता झाली. आणि त्याला सुट्टी मिळाली. एकदा वाटलं जाऊच नये पण.. तो घरी परत आला. सगळ्याना भेटला, "तिला" ही!! तिला संसारात रमलेली पाहून सुखावला आणि दुखावलाही.!! ती सेक्रेटरी बनली होती. नवर्याची नाही हा.. जोब करत होती. स्मार्ट आणि चक्क सुंदर दिसत होती.  तो पुन्हा कामावर रुजू झाला तेव्हा त्याला पटले. की पाटी कोरी झालीये, पुनश्च श्री गणेशा करायला हवा. शमाने सांगितल्याप्रमाणे दुख: होणार पण इथवर त्याचा पहिला कड ओसरला असेल आणि आता पुन्हा भावनांच्या हाताचं खेळण बनण्यापुर्वीच त्यांचा तो अगम्य आणि प्रचंड पसारा आवरलाच पाहिजे होता.

त्याने ठरवले परत डाव मांडायचा!! मग काय त्याने ४-५ वेळा मग प्रेमात पडण्याचे असफल प्रयत्न केले. म्हणजे त्याला कोणी नाही म्हणाली नाही tall dark handsome कबिल होता अनोखीचा फौजी !! पण सगळेच वेळी तो प्रेमात जोरदार आपटला. "प्रेमात करणे ला प्रेमात पडणे का म्हणतात या अनोखीच्या प्रश्नच उत्तर त्याला त्याच्याच ४-५ प्रेम कहाण्या आठवल्यावर मिळालं. तो याही परिस्थितील पडणे .. आपटणे या शब्दांवर हसला. मग स्वत:ला अजून एक संधी देत त्याने लग्नाचाही घाट घातला. पण ते लग्न म्हणजे एक चुकलेला डाव होता. त्यांच्या विस्कटलेल्या संसारात त्यांची चिमुरडी मात्र काहीच चूक नसताना भरडली गेली. तिची आठवण झाली... त्याला वाटलं आता धीर सुटणार, त्याला घाम फुटला त्याचा ..त्याचा तोल जाऊ लागला पण तेव्हाद्यातच शमा चा फोन आला. शमा शशीची बायको... पण त्या आधी त्यांची आणि अनोखीची बाल मैत्रीण!! त्या दोघाना सावरणारी.वेळ पडली तर रागावणारी... शमा!! तो वाचला त्याच्या मनाच्या कोपर्यात कोंडलेली ती अपराधी भावना उचंबळून येता येता तशीच आत कोंडली गेली. मनाचे दरवाजे घट्ट घट्ट मिटून. आत कोंडून गेली.

तो त्याच्या उमेदीची संपूर्ण १८ वर्ष देशाला बहाल करून परत आला.!!! कारण त्याच्या दृष्टीने पुन्हा नव्याने, नव्या नियमांनी आणि हिमतीने डाव मांडायची गरज होती. परत येऊन आई कडे लक्ष देत तिच्यासाठी जगायला त्याने सुरुवात केली. एक नोकरी पत्करली वेळ जायचं साधन आणि हाती चार पैसेही येणार होते.
आई-पप्पा , शशी-शमा त्यांची लेक, अजय,विशाल त्यांची बायका-मुलं असं ओढ लावणार एक विश्व पुन्हा बनल त्याच. त्यांची सुख-दुख: आपली म्हणत तो हसू आणि रडू लागला. सगळं तसं बरच चाललं होतं!!! तो ह्या आयुष्यात रमाला होता. त्याच मन जरा तळ्यावर आलं होतं. पण नियतीला त्याच आयुष्य सरळ आणि त्याच्या मर्जीने चालणं म्हणजे बहुदा तिचा अपमान वाटत असावा. पूर्व जन्मीचा तिचा गुन्हेगार असल्यासारखी ती त्याला हवं तेव्हा हवं तसं फेकत होती. परत आल्यावर वर्षाचा अवधी गेला असेल नसेल.. त्याला सुमी भेटली बस मध्ये. सुमी ,.. अनोखीची मागची बहिण ..

                                                                                                         क्रमश:

Friday 26 August 2011

अनोखी (भाग ३)

त्या दिवसानंतर त्यांनी कितीतरी संध्याकाळी एक-मेकांच्या साथीने घालवल्या. दिवसा मासाने त्यांचे प्रेम खुलत होत आणि mature होत होतं. दोघेही practicle होते. एक-मेकांवर जिवापाड प्रेम करत होते. पण दोन वेळेला जेवायला लागतच .. आणि फक्त प्रेमाने भूक भागत नाही. तसेच स्वप्न पहायची तर ती पूर्ण करायची. त्यांची दिवा स्वप्न नाही बनू द्यायची!! अश्या स्पष्ट मताची girl friend मिळाल्यावर त्याचा नाईलाज होता. आणि शेवटी हेही खरच होत की त्यालाही स्वत:ला proove करायचे होते. सगळ काही दोघांनी मिळून प्लान केलेलं. अस वाटत होतं की सगळं किती सोप्प आहे. ती सेक्रेटरी बनेल आणि हा defense सेर्विसिस मध्ये join होऊन देशाचं रक्षण कारेलं. घरून विरोध झालाच तर पळून जाण्यात आणि तिला पळवण्यात काही गैर आहे असे त्या दोघानाही वाटत नव्हतेच कधी! धर्म बुडेल, समाज काय म्हणेल? याची चिंता "अनोखी"ला आणि तिच्या "फौजी" ला कधीच नव्हती. होती ती आस, स्वप्नांचा वेध घ्यायची!! स्वत:च अस्तित्व निर्माण करून एक-मेकांच व्हायची!!!

प्लान करताना सोप्प सोप्प वाटलेल्या आयुष्यातलं पाहिलं वळण म्हणजे त्याला आलेला ट्रेनिंग चा call .पहिली  कसोटी त्यांच्या स्वप्नातल्या आयुष्यातली !! ते लेटर घेऊन तो अशाच एका संध्याकाळी तिच्यासमोर बसला. बराच वेळ सगळीकडे शांतता होती. त्यांच्या लाडक्या जागी वडाच्या पारावर दोघेही स्थब्ध बसले होते. शेवटी ती नकोशी शांतता तिने संपवली " कधी निघतोयस?" .. "परवा " ... "......."  तो :" बघ विचार कर एकदा,.. एक चांगली job ऑफर आहे इथली" ,.ती: "तुला काय हवाय?"  उत्तरादाखल त्याने तिला मिठी मारली, तू  म्हणत असशील, तर.. तो जोब स्विकारतो मी .. तू बोल ... तिने डोळे मिटले! आता निर्णय तिलाच घ्यायचाय हे तिने पुरते जाणले होते, मग नेहेमीसारख स्वच्छ हसत ती म्हणाली " तुझी स्वप्न, तुझं passion मला कळतं, आणि मी प्रेमच  केलय "फौजी" वर .. मग चला तयारीला लागा! ,, " Go and make me feel proud " आणि निश्चिंत मनाने जा, पत्र पाठव पण अक्षर निट काढ ... सगळं तसचं असेल फक्त जेव्हा सुट्टीवर येशील तोवर तुझी अनोखी "सेक्रेटरी" झालेली असेल. परवा जाणारेस ना? तेव्हा ग्रुप मध्ये भेट्शीलच पण आज कारण न देता थांब. तो हसला ,.. ते दोघे तिथेच बसून होते खूप वेळ,.. सगळीकडे काळोख भरून राहिला होता. ते परिचित झाड अचानक भयाण वाटायला लागलं तसे  ते उठले. पुन्हा: इथचं भेटायचं वाचन देत आणि घेत !!! दोघेही निघाले ठरवलेलं आयुष्य घडवायला.!! 

त्याचा हात भाजला सिगारेट संपली होती त्याची. तो पुन्हा यंत्रवत हॉस्पिटलच्या पायर्या चढू लागला. त्याला वाटलं खरच किती नि काय काय आखलेलं, रंगवलेलं पण.. पणं आपल्याच चित्रात आपल्याला रंग भरण्याचाही अधिकार नसतो!! तो अधिकार नियतीचा!! सुंदर सुंदर चित्रातले रंग कसे लीलया उडवून नेते ही नियती!!! आणि आपण नाचत राहातो फरफटत रहातो तिच्या मर्जीनुसार! त्याला तिची पत्र, त्यातला मजकूर, तिची प्रगती सगळ अंधुक अंधुक आठवत होतं. प्रत्येक पत्रात सगळ्यात पहिले वाक्य कोंबडीचे पाय बरे पण तुझं अक्षर नाही. सुधार सुधार ... आणि शेवटचही ठरलेलच... "खूप खूप आठवण येते तुझी!! कधी येणारेस?" ,. त्याने पत्रातून कळवलं की त्याची " बदली झालीये war front वर. मिळालेली नोकरी व्यवस्थित कर. डोकं शांत ठेव भटक भवानी सारखी उगीच फिरू नकोस, काळजी घे माझ्या "अनोखी"ची. मला माहितेय तू माझी वाट बघातेयस एक वर्ष झालं मला तुला भेटून आणि ही राजाही रद्द झाली. मी सुखरूप आहे आणि असेन कारणं तुझं प्रेम माझ्याबरोबर आहे. काळजी करू नकोस काही झालाच तर नव्याने डाव मांड, तुझ्याच म्हणण्याप्रमाणे  आयुष्य खूप सुंदर आहे ते सुंदरपणे जगं. "


मग शेवट शेवटची पत्र आठवली त्याला .. घरातून लग्नाचा विषय खूपच डोक  वर काढत आहे. थांबवणं अशक्य होतयं ,, एकदा ये, घरच्यांना भेट. मग मी तुझ्या अशी मागे नाही लागणार. असेच सांगितले तर परवानगी नाही मिळणार आणि ते पण लग्न लावून द्यायला इरेला पेटतील. त्या पत्राला याने दिलेलं उत्तर तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे ते पोस्टचा काहीतरी प्रोब्लेम झाला होता. त्याला तिची पुढेही ५-६ पत्र आली पण त्याची २-३ पत्र युद्धाच्या सावटाखाली त्याच्या बेस कॅम्पलाच विसावली. वय आणि घराचा फोर्स दोन्ही वाढत गेला. तिने शेवटी घरी सांगून टाकलं सगळं सगळं ,.. त्यानंतर जे रामायण घडल ते त्याला तिच्या पत्रांमधून कळलंच होतं. आणि शेवटचं पत्र ज्यात तिने फक्त इतकाच लिहिलेलं " राजा तुझी अनोखी हरली रे, खूप खूप भांडली, रडली, चिडली पण आईच्या ब्लाक्मेलिंग पुढे आणि सुमीच्या लग्नाच्या विषयामुळे, तसच "स्वार्थी " हे विशेषण चिकटवून नाही घेऊ शकली म्हणून, घरच्यांची सोय म्हणून, ती झुकली ... आज सगळ्या वचनांतून मला मोकळं कर..!! थकलेय आता रे दोन वर्ष झाली रोजची भांडण, चिडचिड मग तुझा उद्धार .. आणि रोज वाट पहाणं तुझ्या पत्राची" आयुष्य संपून गेलं तरं बरं असं  वाटू लागलं पण तुझी एका "फौजी" ची "अनोखी: इतकी कमकुवत पळ्पुटी असूच शकतं नाही."

तो इचू पर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा तिला काचेतून शांत झोपलेलं पाहिलं आणि बेसिन जवळ गेला. तोंडावर  भसा भसा पाण्याचे हापके मारले त्याने!! त्याच्या मनात त्या शेवटल्या आता पिवळ्या पडलेल्या कागदावरल्या शेवटच्या दोन ओळी घोळत राहिल्या. "त्यामुळे आयुष्य संपवण्याची हिम्मत आणि इच्छा दोन्हीही माझ्यात नाही. तेव्हा ह्या हरलेल्या अनोखीसाठी रडू नकोस राजा!!. का ? कसं? याची उत्तर न शोधता पुढे चालत रहा. थांबू नकोस, नव्या उमेदीने जगं कारण आयुष्य खूप सुंदर आहे!!! "

                                                                                                    क्रमश:


Thursday 25 August 2011

  अनोखी (भाग २)

त्याला समजत होत की ती आता फक्त एक मैत्रीण असण्यापेक्षाही खूप काही जास्ती आहे. त्याच्या आयुष्यात आणि मनात ती भरून राहिलीये, त्याला ती आवडू लागली सुरुवातीला तरुण्यासुलभ आकर्षण असेल कदाचित (हा विचार मनात आला आणि तो जरास हसलाही) कारण "प्रेम" या अद्भुत, मती गुंगवून टाकणार्या शब्दाचा अर्थ तो "ती" तशी आवडायला लागल्यावरच जगला, समजला होता. ते मयुरपंखी दिवस! ते सुंदर अवर्णनीय क्षण! आता त्याच्या आठवणीत जाऊन बसले होते. ते तिच्याचमुळे त्याला गवसले होते. त्याला वाटले हे 'क्षण' सुधा कसे समजूतदार आणि  practical पुढचा आला की पहिला शहाण्यासारखा जाऊन बसतो आठवणींच्या रांगेत!! कधी तरी मग मागे वळून बघताना ओठांवर हसू आणतो तर कधी डोळ्यांना धार लावतो. ते हुरहूर लावणारे दिवस ते वेडं वयं!!

 मग काय लहानपणापासून एक-मेकांबरोबर असल्याने शशी, अजय आणि विशाल यांच्यापासून त्याच "अनोखी" वेड काही लपून राहूच शकल नाही. मग वेगवेगळ्या कुप्त्या, युक्त्या तिला "पटवण्याच्या"! प्रयत्न सगळ काही सुरु झालं. तोही मुळातच जिद्दी, बिनधास्त, strong , सेन्सेटिव, अभिमानी, मानी, तिच्याहून काकणभर जास्ती बोलघेवडा आणि मनस्वी.!! पण ते वय आणि वेळ नाजूक असते न!! कितीही हिम्मत वाला असला गडी तरी त्याची "ती" समोर आली की दातखीळ बसायचीच.  मग तो बिचारा तरी अपवाद कसा असेल याला? त्याचीही तिच अवस्था! वेग-वेगळ्या मार्गाने आणि प्रकाराने प्रयत्न करुन झाले पण काही फ़यदा नाही.. दिवसेंदिवस याचे अनोखी प्रेम वाढ्त होते. आणि ... करियरच्या द्रुष्टिने काहीतरी निर्णय घेणेही महत्वाचे होवू लागले. मग काय टेन्शन का काय म्हणतात ते पहिल्यांदाच त्याला अनुभवायला मिळाले. मग अश्या टेन्शन्स ना उपाय असतो आणि तो म्हणजे 2mm जाडीची आणि काही इंच लांबीची एक जादूची नळकांडी! तिच्यातून घेतलेला धूर आपल्या तोंडावाटे नाकावाडे बाहेर सोडला की म्हणे तो धूर आतली अस्वस्थता, टेन्शन्स, दु:ख घेऊन बाहेर पडतो. मग ओघानेच आठवली ती पहिली शिलगावलेली सिगरेट !!! 

आजूबाजूला अनोखी आणि आई पप्पा नाहीत ना याची खात्री करून मग चहाच्या टपरीवर, कॉलेजच्या बाहेर मित्रांशी share करत फुकलेल्या त्या सिगारेट्स,.. तो शांतपणे उठला हॉस्पिटलच्या खाली गेला आणि एक सिगारेट light केली, तो नाका-तोंडातून धूर सोडत राहिला पण आज मात्र काहीच जादू होत नव्हती त्याच मन स्थिरच होत नव्हत. त्या धुराकडे तो फक्त पहात राहिला. त्या सिगरेटशीही तिच्याच आठवणी जोडलेल्या होत्या. एकदा तिची वाट बघताना सहजच मित्रांच्या टोळक्यात त्याने एक सिगरेट शिलगावली आणि "ती" दिसताच ती नुकतीच पेटवलेली सिगरेट  तशीच टाकून पळला होता, तिच्या हाकेला ओ देत.(सिगरेट  साठी नंतर मित्रांनी त्याला जाम धुतला होता) तो अस्पष्ट हसला. मग थोडा सुखावला कारण तोच दिवस होता, त्याची अनोखी त्याच्या बरोबर आयुष्यभर चालायला त्याला साथ द्यायला तयार झाली होती. तिच्या जवळ जात त्याने," काय कुठे गाव  कोळपत फिरताय संध्याकाळच्या?" असा नेहमीचाच प्रश्न विचारला. पण तिने "स्वत:च बोला आधी" मग मला बोल" हे परिचित नेहमीचे उत्तर नाही दिले. ती फक्त हसली आणि म्हणाली मी ,.. short hand ,typing चा क्लास लावलाय,.. तो " good , first step towards your dream ". ती पुन्हा शांत हसली अपरिचित आणि म्हणाली  आपल काय? की, सदाच्या टपरीमागे सिगरेट ओढत बसायचं ???

ती जेव्हा सिरीअसली बोलते तेव्हा नो मस्ती हे इतके वर्षांच्या अनुभवातून त्याला कळून चुकल होत. तो शांतपणे म्हणाला "defence चेच पक्के करेन बहुदा." ती फक्त हुंकारली. काही क्षण शांत बसून नेहेमीसारख स्वच्छ हसत म्हणाली ," आलाय मोठा फौजी बनायला!! खूप ताकद हिम्मत आहे ना तुझ्यात?? आकाशाला गवसणी घालायची स्वप्न तुझी! पण कसा रे तू एव्हढ सगळ करणार? मनातली साधी गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवायलाही धजावत नाहीस, आणि येईल त्या प्रसंगाला कसा सामोरा जाणार म्हणे तू? ...." ती पुढेही खूप काही बोलली  पण त्याने काहीच ऐकल नाही तो सुन्न झाला. शेवटी ती वळली, तिला  पाठमोरी पाहिली आणि त्याला वाटल हातातून सगळच निसटून जातंय क्षणात!! कुठूनस त्याच्यात बळ संचारल ... त्याच्या डाव्या हाताची मजबूत पकड तिच्या उजव्या मनगटावर जाणवली. त्या पकडी बरोबर ती मागे खेचली गेली त्याच्या खूप खूप जवळ!!! तिच्या  शरीरावर  रोमांच फुलले ,. तिच्या हृदयाचे ठोके त्याला ऐकू जातील इथवर वाढले,.. आणि शेवटी त्याने तिला विचारले. ती तशीच होती त्याच्या जवळ,.. तिने फक्त "तू माझी होशील? .. देशील मला साथ आयुष्यभर ..........??," इतकच ऐकल. कारण पुढच काही तिच्या मेंदूपर्यंत पोहोचतच नव्हत. त्याचा तालबद्ध श्वास आणि तिच्या हृदयाचे ठोके ती शांतपणे ऐकत राहिली. ...

                                                                                                    क्रमश: 

Wednesday 24 August 2011

अनोखी ..

( भाग १ )
तो आत बाहेर येरझार्या घालत होता. म्हणजे करण्यासारखं अजून काहीच नव्हत त्याच्या हातात नाहीतर तिच्यासाठी त्याने आकाश पाताळ एक केल असतं. पण .. आता .. आता कशाचाही फायदा नव्हता आणि जरी प्रयत्न केलेच तरी तिच्या वेदना.. त्या मात्र तो थांबवू शकणार नव्हता. थांबवू काय कमीही करू शकणार नव्हता. ती आत मृत्यूशी झुंज देत होती आणि तो बाहेर कण्हत होता. तो डॉक्टर्स ना  विनंती करत होता त्यांना वारंवार सांगत होता  "she is a real fighter doc, she will come back .. do , do something doc " ...

 पण त्याला मनोमन कळून चुकल होतं, की आता खेळ संपला, तो असहाय्य होता. जे घडेल ते पाहाणे इतकेच त्याच्या हातात होते आता. पण .. "ती", त्याची होती आणि म्हणून एक वेडी आशा त्याच्या मनात अजून जागी होती. तिला आतं life support sysytem वर ठेवलं होतं. चारी ठाव चिवचिवणारी त्याच्या भोवती बडबडत राहणारी, सतत त्याला ओरडणारी, प्रेमाने जेवायला वाढणारी, सिगरेट जर हातात जरी दिसली तर तुला सोडून जईन म्हणणारी, असह्य वेदना सहन करूनही जीवन किती सुंदर आहे म्हणणारी, त्याने चुकीच्या गायलेल्या सुंदर गाण्यामुळे चिडणारी आणि त्याच्यावर खूप खूप प्रेम करणारी,, फक्त त्याची,. अशी "ती" शांत शांत झाली होती .. जणू काही शांत झोपली होती!! तो काचेतून आत बघत कधी उगीच येरझार्या मारत बाहेर उभा होता "एकटाच" .. खूप खूप एकटा .. त्याला सगळ्यात जास्ती गरज होती कोणीतरी त्याच, त्याच्या जवळ असण्याची तेव्हा त्याची सगळ्यात जवळची व्यक्ती आत व्हेंटिलेटर वर होती. 

 डॉक्टरांनी त्याला आत बोलावून घेतलं. परिस्थितीची जाणीव आणि नाजूकता त्याला समजावली. गांभीर्य त्याला घरातून निघतानाच उमगल होत.  आता काय आता तर सगळच मशीनवर अवलंबून होते. किती दिवस किती तास, किती मिनिटे की फक्त काही सेकंद !!!  हे कोणालाच सांगता येणार्यातल नव्हत. शेवटी त्याने सगळी शक्ती आणि धैर्य एकवटल, जड अंत:करणाने फोन उचलला आणि तिच्या मोठ्या मुलाचा नंबर फिरवला. त्याला परिस्थितीची कल्पना दिली. आणि दुसरा फोन केला त्याच्या जिवलग मित्राला! आता मात्र त्याच्या आवाजातलं दु:ख तो फौजी असूनही त्याला लपवता आले नाही. "तू लगेच ये" इतकाच बोलून त्याने फोने बंद केला.

त्याचा मित्र,..  सध्या तरी त्याला तोच आधार होता त्याचा मित्र शशी! .. शशी फक्त हो म्हणून घरातून निघाला पण त्यालाही तिथे पोहोचायला कमीत कमी ३ साडेतीन तासाचा आवधी होता. तिची मुलं आणि भाऊ मात्र लगेच निघाले. तो गौताम बुद्धाच्या शांततेत बाहेरच्या कोचावर स्थब्ध बसला होता. वरून तो फार फार शांत आणि धीराचा दिसत होता. स्वत:च्या मनालाही तो वारंवार बजावत होता. पण ते काही ऐकतच नव्हते. तो आतून हादरला होता. समोर काय वाढून ठेवलय याची कल्पना त्याला ती पुन्हा भेटली तेव्हाच ५ वर्षांपूर्वीच आली होती. फक्त त्याला समोर जायची वेळ आज आली होती. हे घडणार होतेच हे माहित असले तरीही ते मान्य  करायला त्याचे मन अजिबातच तयार नव्हते. जणू त्याच्या मनाने त्याच्याविरुध्द बंड पुकारलं होतं ,.. ते त्याच्या गतीने मागे - पुढे धावत होत. विचारांचा गोंधळ  उडवून देत होत. ते भूत आणि भविष्यात तळ्यात मळ्यात नाचत होतं आणि त्याचा तो क्षण अधिकच कठीण करत होतं.


डोळे मिटून डोकं मागे टेकून तो भरकटलेल्या मनाला वेसण घालण्याचा प्रयत्न करत होता. पण.. मिटल्या डोळ्यांपुढे जसा अंधार पसरला,,  त्याचे ४०- ४५ वर्षांचे उणे पुरे आयुष्य त्याच्यासमोर चित्रपटासारखे सरकत राहिले. त्याच शहर, त्याच घर, आई पप्पा, केलेली मस्ती, चोरून खाल्लेल्या कैर्या,चिंच,जांभळ,बोरं, मिळालेल्या शिक्षा, आई चा ओरडा बाबांचा मार, त्याचे जीवाभावाचे सवंगडी, शाळेतला ग्रुप, आणि त्यांची शाळा आणि शाळेतली "ती" ... युनीफोर्म मधली, दोन वेण्या आणि रिबीन बांधलेली. अवखळ, स्पष्ट बोलणारी, अल्लड, मस्तीखोर (त्याच्या इतकीच). हुशारीच्या बाबतीत सगळ्यांचा आनंदच होता. पण मस्ती मारामार्या यात एक नंबर!! त्यांचा ग्रुप  खूप खूप चांडाळ होता. शाळेत असताना "ती" त्याची खूप जवळची मैत्रीण होती!. दोघांची छान गट्टी जमायची. भटकताना, खेळताना, ओरडा खाताना सगळ्यातच! शाळेचे अल्लड आणि मस्तीचे दिवस संपले आणि त्यांनी मोरपंखी कोलेज विश्वात प्रवेश केला.शाळेतल्या ह्या back benchers नी शाळेत एक-मेकांचे पकडलेले हात अजूनही हातात घट्ट होते.


"ती" पहिल्या पासूनच बिनधास्त होती. एकदम बिनधास्त, जिद्दी, हट्टी. कॉलेजच्या दिवसांत ती त्याला अधिकच उमगू लागली, समजू लागली, मनात कुठेतरी आवडू लागली. तारुण्यात पदार्पण केलेली त्याची ती बिनधास्त मैत्रीण आता त्याच्या मनात उमटत गेली. वय वाढले तशी समाज वाढली तिची जिद्द,हट्ट,ते मनस्वी वागण त्याला मनात कुठेतरी आवडत होत.ती फक्त कितीही बिनधास्त असली तरी भावनाप्रधान होती,स्वप्नाळू होती, बघितलेली स्वप्न पूर्ण करायला कितीही कष्ट करायची तिची तयारी होती. त्याला नेहमी वाटे ही कशी अशी? एक मुलगी असून इतकी practical , हिम्मतवाली, वेळ पडली तर उसळलेल्या दारीयात मस्तीत फुटणार्या लागेवर उडी घ्यायची तयारी हिची!!. ती नेहमी म्हणायची मला "वार्याच्या वेगाने" जगायला आवडत. मैत्रिणींमध्ये बोलतानाही तिचे स्पष्ट विचार उठून दिसायचे "मला नवरा म्हणून असा माणूस हवा जो माला साथ देईल आणि माझी सोबत त्याला आवडेल, असा मिळाला तर मी त्याला माझ स्वत्व देईन पण माझ्या निष्ठांच    आणि स्वप्नांनच अस्तित्व मात्र त्याने जपल पाहिजे!"


तिच्या बेछूट, स्पष्ट इतरांहून वेगळ्या वागण्यामुळे तो तिला "अनोखी" म्हणत असे. 


                                                                                                         क्रमश:



Saturday 20 August 2011

"अण्णा हाजारे" या नावाबारोबार सध्या जोडलं जातय ते एकाच नाव ते म्हणजे "जन लोकपाल बिल" रोज पेपर मध्ये वेगवेगळ्या उलट्या सुलट्या बातम्या वाचनात येतात. आज काय तर उपोषण , उद्या काय तर rally, मग अण्णांना अटक, त्यांची सुटका, जेल भरो आंदोलन, candle rally नि काय नी काय ...

सगळाच सावळा गोंधळ ! 

सगळ्यात आधी इथे मी एका गोष्ट clear करू इच्छिते ती म्हणजे : माला अण्णानबद्दल  आदर आहे. ते जे काम करतायत ते खचितच विधायक आणि स्तुत्य आहे. त्यांना अटक करण्याचा सरकारने घातलेला घाट हा आतिशय लाजीरवाणा प्रकार असून मी त्याचा निषेधच करते. भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली कीड आहे आणि वेळीच प्रतिबंध केला गेला नाही तर ती समाज आणि माणुसकी पोखरून टाकल्या शिवाय राहाणार नाही. 

आणि मला ही गोष्ट सुध्धा मान्य आहे की काही कायदे बनण्या आधी आणि बनल्या नंतरही  समाजातील वेगवेगळ्या स्तरातून असे बरेच साद प्रतिसाद उमटले होते. ज्यांचा विचार होऊन काही कायदे modify सुधा करण्यात आले. प्रोटेस्ट करणे, मते मांडणे किंवा भाषणातून स्वत:ला व्यक्त करणे हा व्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे आणि यावर कोणीही गदा आणू शकत नाही. ज्या संविधानाने हे व्यक्ती-स्वातंत्र्य दिले त्याच संविधानाने कायदे बनविण्याचा आणि आमलात आणण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संसदेकडेच विहित केलेला आहे. असे असताना कोण्या एका व्यक्तीच्या मताप्रमाणे (कितीही आदर्श असली तरीही ) किंवा त्याच्या इच्छे खातर किंवा कल्पनांप्रमाणे कायदा बनूच शकत नाही आणि तो तसा बनावा असा अट्टाहास धरणे हे केवळ चुकीचे आहे.

एक देश चालवणे म्हणजे सोप्पी गोष्ट नाही. देशाचा कारभार नीट चालावा यासाठी काही नियम आणि त्यांच्या चौकटी सांभाळणे गरजेचे असते. नियमांच्या चौकटी झुगारून मोठ्ठा जमाव गोळा करून निर्णय घ्यायचे झाले तर ही लोकशाहीची सर्वात मोठ्ठी हार असेल. स्वत:चा मुद्दा मांडणे तो  लोकांपर्यंत पोहोचवणे हा प्रत्येकाचा  अधिकार आहे. आपल्या मागण्या आंदोलना मार्फत जगासमोर ठेवणे त्यातून ते सत्याग्रहाच्या मार्गाने करणे हे निश्चितच चांगले. पण या आंदोलनाला स्वत:च्या मर्यादा असायलाच हव्यात. जर त्या मर्यादा सांभाळल्या नाही गेल्या तर आपल्या देशातली लोकशाही जाऊन जंगलचा कायदा लागू होईल ज्याच्याकडे शक्ती आणि जास्ती पाठींबा त्याचे राज्य. लोकशाहीत शेवटी आपण संख्येला आणि मातांनाच महत्व देतो परंतु जर सगळीकडे हाच नियम वापरायचे ठरले तर हा स्वतंत्र देश चालवणे अशक्य होऊन जाईल. 

आज एक माणूस उभा राहिला निश्च्चीतच त्याची करणे ही योग्य आणि स्तुत्य आहेत पण आज जनमत त्याच्या बाजूने आहे म्हणून त्याच्या मागण्यांना आणि कल्पनांना ( काही अवास्तव आणि बर्याचश्या वास्तव) कायदा बनवून त्याच्या विचारांना संरक्षण देणे कितपत  योग्य ठरेल? याचा एकदा विचार करणे गरजेचे आहे.कारण उद्या जर असाच कोणी दुसरा उभा ठाकला आणि जनमानसाला घेऊन शक्ती प्रदर्शन करू लागला मग? मग तेव्हाही त्याच्या म्हणण्यानुसार संविधानाला बाजूला सारून कायदे केले जाणार काय? आणि तसे घडले तर त्याचे काय परिणाम होतील हेही लक्षात घेणे गरजेचे आहे.  

संसदेत कोण बसतात? आपण निवडून दिलेले प्रतिनिधीच ना? मग ? ते स्वत:चे खिसे भारतात आणि आपल्याला मात्र "as a common man " म्हणून आपल्याच मागण्या त्या प्रतिनिधींनी निदान संसदेच्या समोर ठेवाव्यात म्हणून सत्याग्रह, आंदोलन आणि उपास करावे लागतात?? किती लाजिरवाणी गोष्ट आहे आहे ही!
ज्यांना खरच देशाचे भले व्हावे असे वाटत असेल त्याने "रंग दे बसंती " म्हध्ये म्हटले तसे राजकारणाच्या त्या दलदलीत उतरावे कारण चिखलात उतरल्या शिवाय तो साफ करता येत नाही. नुसत्या प्रकाश फेर्या, आंदोलने,उपास हे उपाय करून भागणार नाही. तर मुळात शिरण्याची गरज आहे. जे नेते सत्याग्रह करू शकतात त्यांनी मिळालेल्या पाठीम्ब्याचा, त्यांच्या मागे उभ्या थकलेल्या जनसमुदायाचा फायदा घेऊन निवडणूक लढून संसदेत जावे जेणेकरून सुशिक्षित प्रतिनिधी म्हणून ते देशाचे कल्याण करू शकतात.

शेवटी एक नमूद करावेसे वाटते ते म्हणजे आण्णांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्या बद्दल माझ्या मनात खूप
खूप आदर आणि आभिमान आहे. पण त्यांच्या मार्ग मला तितकासा पटलेला नाही, कारण, माझ्या मते प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही रस्त्यावर उतरून मिळत नसतात.

note : ही माझी वैयक्तिक मते आहेत. कोणी याच्याशी सहमत झालेच पाहिजे असा माझा अट्टाहास नसला तरीही माझा ब्लोग ही माझे मते मांडण्याचे निश्चित योग्य ठिकाण आहे. आणि मी ती स्वच्छ आणि स्पष्ट पाने मांडलेली आहेत.

Monday 1 August 2011

पाऊस (2)


पाउस बोलता बोलता गप्प करणारा 
पाऊस लिहिता लिहिता हात धरणारा.


कधी वाकुल्या दाखवत क्षणात गायब होणारा
पाऊस, आठवणीत दाटणारा 


पाऊस सरींतून बोलणारा 
आठवणीतल्या 'त्या'ला जागविणारा 


पाऊस पुन्हा हळुवार गाणारा
त्या मोरपंखी दिवसांत झुलवणारा


पाऊस बेभान, माळरान भिजवणारा
त्या धुंद आठवणींत चिंब करणारा


पाऊस मध्येच गंभीर होणारा
त्याच्या नसण्याची जाणीव करून देणारा


पाऊस स्वत:च्याच मस्तीत कोसळणारा
माझ्या एकटेपणावर हसणारा


पाऊस बेधुंद बाहेर कोसळणारा
माझ्या मनात आठवणींतून पाझरणारा ...

                                              ... रेश्मा आपटे 

Sunday 31 July 2011

पाऊस

पाऊस बाहेर कोसळणारा
पाऊस मनात झिरपणारा

पाऊस रिमझिम निनादणारा 
थेंबा थेम्बातून आनंद वाटणारा

पाऊस संतत धारेत पडणारा
सतत सुखाची बरसात करणारा 

पाऊस मुक्त बेधुंद बरसणारा
तना मनाला भुलवणारा



पाऊस धीर गंभीर कोसळणारा
पार अंतर्मनाचा ठाव घेणारा 

पाऊस धुंद, बेभान करणारा,
सर्वस्वात भरून राहणारा

पाऊस वेडा पिसा भिजवणारा
आठवणींच्या गावात नेवून चिंब करणारा  .....

                                                         . .  .रेश्मा आपटे 

Wednesday 6 July 2011

पिकनिक

पाऊस म्हणजे भिजरी पायवाट, पाऊस म्हणजे झाडी :) वा वा !! किती सुंदर या ओळी! 

त्यात अशा या पावसात मस्त पिकनिक मग काय ,.  त्यात जर ती पिकनिक river touch resort वर असेल तर , मस्तच न?? एक दोन मीट्स झाल्या जाऊ जाऊ पिकनिक ला हे फिक्स केल आणि आज -उद्या, हा वीक एंड तो वीक एंड करतात करता एकदा झाली फायनल आमची पिकनिक ... "वांगणी ला ",, मग काय bags pack केल्या नी सुटलोच की :) .... 

निघायला झालेला उशीर ( एका मित्राच्या कृपेने) आणि थोडीशी कटकट या नन्तर ओघानेच (हेहेहे ) पण पिकनिक मस्त सुरु झाली,, इप्सित ठिकाणी पोहोचलो ( बर्‍याच उशिराने) आणि त्या सुंदर निसर्गाने भूल घातली की राव आम्हाला ,,,  रूम वैगरे फ़यनल करून आणि जरा झोपाळ्यावर झुलून आम्ही आताच नदीवर जायचं असे फिक्स केलं. या नंन्तर जरा क्लिक क्लिक्लीकाट झाला आणि मग आमची स्वारी निघाली नदीवर,,, अहाहा!! सुंदर नितळ पाणी,दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी, नदीच्या पल्याडच्या देवळाचा दिसणारा कळस, सुंदर फुलं, त्यावर भिरभिरणारी ती फुलपाखर, निळ निळ आकाश, सुंदर गार वारा, झुळू झुळू वाहणार नदीच पाणी, सगळ्या जणांनी पटापट जागा पकडल्या म्हणजे दगड reserve केले :D :D :D ,... मी त्यातल्या त्यात जरा बाजूचा पण सगळ्यांच्यात असेल असा दगड निवडला. पाण्यात पाय टाकून हातात कॅमेरा घेऊन मस्त निवांत बसले. काही जणी पाण्यात पाय आपटून आपटून ते शांत पाणी अशांत करत होत्या. ते तुषार अंगावर उडल्यावर मस्त फ्रेश वाटत होत. आता काही वेळ फक्त हातातला कॅमेरा बोलत होता आणि पाय त्या नदीतल पाणी फील करत होते बाकी फारस कुठे माझ लक्ष नव्हत..

 तेव्हढ्यात माझ्या फोटोग्राफी करण्याच्या इंतरीम इच्छेला सुरुंग लागेल की काय असे वाटले, कारण  काही काळे ढग आकाशात गोळा व्हायला लागले होते. तो निसर्ग मला कॅमेरात बद्ध करायचा होता म्हणून मग त्यांना (ढगांना ) "जरा थांबा, बरसू नका जरा वेळ! असेच सुंदर फिरत रहा," असे सांगण्यासाठी, आणि त्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी मी पटापट त्यांचेच ४-५ फोटो काढले. सूर्य आता मावळतीकडे झुकला होता, त्याची लाली आकाशात पसरली होती आणि बिंब पाण्यावर तरंगत होत. ते तरंगत बिंब मला खुणावत होत. केशरी लाल रंग पाण्यावर सांडला होता, वार्याने तो पाण्यावर  हेलकावत होता. ते रंग ती लाली मला खूपच खुणावत होती. तिच्या जवळ जवळ जाव अस वाटत होत. पण तेव्हाढ्यात लक्षात आले की आपल्याला पोहता येत नाही सो (नको शहाणपणा! : हे अर्थातच मनात म्हटलं) मग असा आव आणला की पाय टाकून पाण्यात बसण या सारखा आनंद नाही, ते उगीच नदीत पूर्ण भिजण्यापेक्षा ( जे मला खूप खूप आवडत पण काय करणार :(  ..) हे बर! मग तो नजारा, ते सौदर्य निदान कॅमेरात टिपू शकतच होते की मी!! मग  ते कॅमेरात टिपायची सगळ्यांचीच धडपड सुरु होती.. पण !!!! ते मस्तीखोर ढग :( ...सारखे मध्ये मध्ये येत जात होते,, त्यांचा तो पोरकट मस्तीखोर पणा बघून की काय कोण जाणे पण मग त्या धीर-गंभीर सुर्यनारायणांनाही लपाछुपी खेळायचा मूड आला ,,, कॅमेराने पोझिशन घेतली रे घेतली की लपलेच हे महाशय ढगांच्या मागे पण आम्हीही पठ्ठे सोडणा‌र्‍यातले नव्हतो काढलेच आम्ही काही पिक्स :) ... केलेच ते केशरी, लाल बिंब कॅमेरात कैद!!

मग आम्ही सगळेच मी, माझे सवंगडी, वारा, पाणी सगळेच जरा शांत झालो. ते वेडे पिसे ढग मात्र पसरत होते, भिर-भिरत होते, वार्‍याबरोबर आणि वार्‍यावर झुलत होते, जणू आकाशात एक चित्र रेखाटत होते. खूप खूप खुश होऊन फिरून फिरून, नाचून, दमून मग ते जड झालेले ढग हळुवार खाली येत होते आणि हलकेच मोकळे होऊ पहात होते. त्यांचा आनंद , उत्साह ते पाण्याच्या थेंबांनी आमच्यापर्यंत पोहचवू पहात होते. सोनेपे सुहागा काही थेंब भरभर खाली आले, पाऊस, पाऊस  कॅमेरा ठेवा म्हणे पर्यंत तो आलाच!  वा वा!! कॅमेरे आणि फोनस ठेवायला कोणीतरी आत पळाला आणि आम्ही सगळे त्या मुसळधार पावसात  भिजत होतो. माला त्याने वेड लावलं होत. दोन्ही हात पसरून मी त्या धारा झेलत होते. तो सहस्त्र धारांनी बरसत होता. मला गाव नाही सो मग नदीवर पावसाच्या धारांमध्ये चिंब चिंब होण्या मागची धम्माल अनुभवायची ही माझी पहिलीच वेळ होती. मग काय हवाराटा सारखा तो क्षण मनात भरून घेत होते. खूप जोरदार  कोसळल्यावर तो थोडा शांत झाला.

तशी मीही जरा वरचा दगड शोधून टेकले. आणि बघत राहिले त्याचे नाट्य... नदीच्या पाण्यात पडणारे थेंब उठणारे तरंग,...  केवळ सुंदर, पाऊस आता जवळ जवळ गेलाच होता. जाताना वातावरण मात्र सुंदर सुंदर, भारावून, फ्रेश करून, गेला होता. . एक मैत्रीण कानाच्या मागे फुल खोवून इकडून तिकडे हिंडत होती, एक मित्र मस्त बिनधास्त बनला होता, दुसरा त्या ग्रुप मध्ये नवीन असून मस्त मिक्स झाला होता, आमच्यातला फोटोग्राफर निसर्गाचं ते प्रत्येक रूप आणि आमच्या सगळ्यांच्या मनावरचे कवडसे उमटलेल्या चेहऱ्यांचे रुपडे कॅमेरात बध्द करण्यात गुंग होता. एक सगळ शांत पणे बघत होता, एक जण आपल्याच विचारात आणि नैराश्यात जरा काही क्षण गढून गेली होती, तर दुसरी खूप आनंद लुटत होती पावसाचा पाण्याचा!! कोणी पाण्यात दगड मारत होता आणि पाणी उडाल्याचा आवाज येत होता, तर कोणी कलात्मकतेने चपटे दगड शोधून, ते विशिष्ट प्रकारे पकडून, ठराविक उंचीवरून, लयबद्ध्तेने नदीकडे भिरकवत होता ... आणि ते सगळ correct जमल की मग पाण्यावर उठणारे ते नाजूक तरंग !!! वाह वाह !! अप्रतिम, किती सुंदर,, पाणी कापत गोल गोल तरंग बनवत,   दगड टप्पे खाऊन शेवटी बुडून जात होता

निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत आणि कृतीत नाद आणि सौंदर्य दडलेलं असत ना मला ते जाणवत होत. पाण्याच्या संथ प्रवाहात, वार्‍याच्या वाहण्यात, फुलांच्या फुलण्यात, फुलपाखरांच्या उडण्यात, नदीपल्याडच्या देवळाच्या  कळसात, दोन्ही काठांवर डोलणार्‍या झाडांत, पक्षांच्या आवाजात, उमललेल्या फुलांच्या रंगत, अगदी नदीकाठच्या दगडांत सुंदर सगळ काही सुंदर. आणि त्या निसर्गाच्या सानिध्यात बसलेले, वावरणारे आम्ही ८ जण !! प्रत्येक जण आपल्या स्वभाव, मनःस्थिती   आणि विचारांप्रमाणे त्या निसर्गाला प्रतिसाद देत होता. तो निसर्ग प्रत्येकाला काहीतरी देत होता. कोणाला सुख, कोणाला समाधान, कोणाला शांती, कोणाला फक्त निव्वळ आनंद, कोणाला अंतर्मुख बनवत होता, तर कोणाला मन मोकळ करायला भाग पडत होता!! प्रत्येकाचा अनुभव वेग-वेगळा आणि तरीही एक साम्य तो खूप बोलका आणि सुखावणारा .....

मग जरा काळोखाच्या छटा उमटायला लागल्या, नदीकाठ हळुह्ळू काळोखाच्या कुशीत शिरत होता. तसे मग आम्हीही इच्छा नसताना तिथून हललो. निघताना मी एकदा मागे वळून ते निसर्गच सुंदर निरागस रूप पुन्हा डोळ्यात साठवून घेतलं!! ... स्वतःला खुश राहायचं आणि सर्वाना सामावून घ्यायचं असं वचन देऊन!! एकदाच डोळे बंद केले मनापासून मोकळा श्वास घेतला आणि ...
 आणि मग निघालो आम्ही रूम्स कडे. पोटातले कावळे आता जरा खाऊ मागत होते. मग आता पुढे काय? पत्ते? की  गप्पा? की गाणी? की अजून काही ... असे discussion करत करत आम्ही सगळे निघालो आणि रूम वर पोहोचलो. जेवण खाण करून जरा गप्पा गोष्टी करून शेवटी सगळ्या ideas सोडून आम्ही "डम शेराज"  खेळलो धम्माल धम्माल धम्माल ,,,, एकेकांच्या अक्टिंग बघताना हसून हसून आणि चिडवून, पीडून रात्रीचे ( खरेतर दुसर्या दिवशीच्या  सकाळचे) ४.३० कधी वाजले कळलेच नाहीत मग एक एक ढेपाळले. हळू हळू गाद्या पसरून स्वतःला त्यावर उलगडायला लागले. हे हे हे हे मग दिवस संपला एक सुंदर धुंद दिवस !!!!!!

एका दिवसात किती किती मस्ती केली. खूप काही अनुभवलं. खूप काही बघितलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि तो नदीवरचा एक दीड तास वा वा!!! बस अजून काय हव? थोडस miss management झालं त्यामुळे पिकनिक चा उत्तरार्ध आणि म्हणजे दुसरा दिवस रटाळ गेला ,,, पण त्या नदीकाठच्या एक-दीड तसा साठी आणि नदीवरून परत आल्यापासुनचा  वेळ ते " डम शेराज" संपेपर्यंतच्या वेळासाठी सगळ माफ तुला रे !!!! हेहेहे  m i right guys ???

fun fun fun