Saturday 9 April 2011

रेषा - रेघोट्या

परवाच एका मित्राशी chat करत असताना तो म्हणाला की "nothing is permanant , मित्र मैत्रिणी नाती, त्यांचे  संदर्भ सगळच बदलतं जातं, गरजेच्या वेळी आपले आपले म्हणशील ते मित्र मैत्रिणी जवळ असतीलच असे नाही. म्हणजे ते स्वार्थी आहेत असेही माझे म्हणणे नाही, पण... वेळ, काळ, busy schedule या सगळ्यात ते तुझ्या बरोबरच असतील असेही नाही." मी म्हटले असे कसे ? माझे मित्र मैत्रिणी आहेत ते, त्यांना नाही जमले touch मध्ये राहायला तर मी राहीन, my friends are special 4 me, i know we all will be in touch " तर म्हणाला, " contacts नाही राहत बये, u will come to know ,  कळेल तुलाही कळेल 'कालाय तस्मै नमः !', थोडा विचार कर, असे होतेच.जुने जातात, नवीन येतात this is life dear :) "  

मी त्याच्याशी initially अजिबातच सहमत नव्हते. पण मग विचार केला, लहानपणी माझा एक मित्र होता एकदम मस्त best friend आता तो कुठे असतो? काय करतो ? माहीत नाही. एक खूप छान मैत्रीण होती आजीकडे यायची ती तिच्या, मे महिन्याच्या सुट्टीत मीही तिथेच असायचे मग काय छानच गट्टी जमलेली आमची, पण आज ती job करते आणि कधीतरी २-३ वर्षांनी एकदा भेटते. माला तिची आठवण येते का? ohh उत्तर नको असतानाही हेच मिळतेय "नाही " do i miss him or her??? ohh OMG " ’no,’ i don't !! strange but truth" ... मग? किती सहज accept  करतो ना आपण आयुष्यातले बदल बदल!! खूप जण भेटतात, त्यांची आणि आपली life connect होते, कधी कधी नेहमी साठी तर कधी काही क्षणांसाठी! वय वाढते, विषय बदलतात तसे आजूबाजूचे लोक मित्र मैत्रिणीही बदलतात, जशी त्यांच्या असण्याची सवय झालेली असते तशी नसण्याचीही जडते (?).. किती वरवरची नाती असतात सगळी??? 

ह्या fast life मध्ये आपण खरच नाती जगतो का? जपतो का? की, आपले इगोच आपल्याला जास्ती प्रिय असतात??? आपल्या माणसांपेक्षा इगो महत्वाचे कसे आणि कधी होतात? तिने call केला नाही मी का करायचा? नाही तर नाही गेली उडत... असे का होऊन जाते??? समोरच्याला प्रोब्लेम असू शकतात हे समाजात नसते का आपल्याला की समजूनच घ्यायचे नसते?? लग्ना आधी सुंदर सुंदर, घट्ट असणारी मैत्री एकीचे लग्न झाले की  लगेच ढिली का पडत जाते??? आपल्या मैत्रिणीची सुख-दुखः आधी आपल्याला हसवतात रडवतात मग नंतर असे काय होते की ते हातातले हात न कळत सुटत जातात ?? कधी सहजपणे तर कधी EGO  मुळे,,,  पण काही झाले तरी परीणाम एकाच राहातो एक नात संपत ...... का, कसे, कधी, कोणाचे चुकले हे न कळताच  नात्यात दुरावा येतो ,,, आधी खूप खूप विषय असतात तुझ्या माझ्यात पण नंतर hi .. , hows u ?? whats up ? ok .. keep in touch और be in touch  ... यावर संभाषण संपते.... आधी आठवड्यातून एकदा मग महिन्यातून एकदा मग काही महिन्यातून एकदा असे बोलणे होते ... त्यात संवाद नसतोच असते ती चौकशी मैत्री अजून शिल्लक आहे हे दाखवायची धडपड ,.. हे समजत असते दोघींना तरीही पाउल पुढे कोणी टाकायचे? हा पश्न उरतो आणि एक अस्पष्ट पडदा तयार होतो दोघीत, नात्याची वीणच सैल होत जाते हळूहळू ...

रेषा - रेघोट्या
असे कसे? का ? खरच?? ह्या विचित्र मनस्थितीत आणि भरकटलेल्या विचारात असतानाच एक ब्लोग काल वाचण्यात आला त्यातल्या एका ओळीने मनाची मरगळ हे अस्वथपण, उदासीनता सगळेच दूर केले. जाणवले की आयुष्यात प्रत्येकाची एक जागा असते, कोणी दुसरी वक्ती त्याला परीयाय नसूच शकते. आणि प्रत्येक जण आयुष्यात काही शिकवण्यासाठी तुम्हाला घडवण्यासाठीच येत असतो. :) ते वाक्य होते .... "माणसं रेघोट्यांसारखी असतात. कुठली रेषा कुठल्या रेषेला कधी छेदून जाईल ते सांगता येत नाही. आणि ह्या रेषा एकमेकांना छेदूनच जात नाहीत तर त्यातून एक आकार बनतो. एक विश्व बनतं." ......


वाह खरच, आज जरी "त्या" दोघी एकमेकींपासून लांब असतील काहीश्या अलिप्त असतील तरी, त्यांच्या रेषा जेव्हा एक-मेकीना छेदल्या तेव्हा एक सुंदर चित्र निर्माण झालेच असेल ना? एका नात्याने तेव्हा आकार घेतलेलाच होता की ... मग त्या क्षणांना जपायचे आणि आजचा अस्वस्थ 'क्षण' ??  तो"ही स्विकारायचा, कारण तोही त्याच नात्याचा एक आकार आहे. काहीसा बोचरा, खुप खूप नकोसा पण आकार आहे, त्याच रेषांतून निर्माण झालेला हा आकार तोही नीट बघायचा accept करायचा, कारण तो सृष्ठीचा नियम आहे... ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहेच. गोड किंवा कडू पण शेवट नक्कीच आहे, 

मग ठरवले गोड आठवणींना मनात ठेवायचे आणि कडू क्षणांना तिलांजली द्यायची  ,,,मग vision clear झाले आणि मग काय एकदम लक्शात आले ... अरे,, जो गोड नाही, तो तर शेवटच नाही .. नाही का??? :) :) :) :)  so " पिच्चर अभी बाकी ही मेरे दोस्त ..." काय माहीत उद्या परत त्याच रेषा एक-मेकींना अजून एकदा छेदून जाईल, त्याच नाहीतर वेगळ्या नात्याने पुन्हा एकदा सामोरी येतील ! 

अश्या बर्‍याच रेषा अजून "रेघोटी"ला  छेदून जायच्यात, काही "छेद" देतील, तर काही चित्र बनवतील, काही नेहमीच समांतर चालत राहातील, खूप जवळ असून भेटणार कधीच नाहीत, किंवा काही दिशा बदलून "रेघोटी"ला छेदून जातील कायमच्या आठवणी मागे ठेऊन जातील जेव्हा त्या रेषा आठवतील एक स्मित नक्कीच फुलेल ओठी ... काही रेषा अश्याच कालप्रवाहात हरवून जातील out of sight out of mind सारख्या  :)

पण एक चित्र दर वेळी साकारेल, एक आकार दर वेळी बनत जाईल, बनलेला आकार बदलत जाईल, आणि :रेघोटी" स्वतःचा प्रवास सुरूच ठेवेल :) :) तो final आकार बघण्यासाठी वेग-वेगळ्या रस्त्यावर झोकदार वळणे घेत ,................

थोडक्यात काय yet  more to come !!!!!!! ....... 
                                      

                                                                                        ....  रेश्मा आपटे                    


18 comments:

  1. रेषांना कधी कधी आपण वळवतो, दुसऱ्या रेषांशी छेदने टाळतो, कधी मुद्दामच जोडतो. हे सर्व करतो आपल्या परीने सुंदर चित्र बनण्यासाठीच. प्रत्येक वेळेस चांगले चित्र बनेलच असे नाही. पण कळायला वेळ जावा लागतो, पण बनलेले चित्र मात्र सुधारू शकत नाही आपण. शेवटी एकच पर्याय उरतो, उरलेलं चित्र चांगले करायचा. शेवटी काय, there is always a ray of hope.

    ReplyDelete
  2. सुंदर मांडलं आहेस
    जो गोड नाही तो शेवटच नाही . नक्कीच
    पण असं होतं हे खरं कधी सहज कधी ego म्हणून
    काही नाती दुरावतात , जवळची लोकं परकी वाटायला लागतात
    आणि नवीन नाती जोडली जातात
    आता आपण ह्याचा प्रयत्न नक्कीच करू कि जुनी आणि नवीन नाती जपायचा
    आपापल्या परीने चित्रं रेखायची आणि रंग हि भरायचे नात्याचे, आठवणींचे

    ReplyDelete
  3. thanks both of u :)

    nakkich prayatna karu naati japaayacha aani ti jagaayacha :) ...
    yes god naahi to shevat nahi :) :)

    ReplyDelete
  4. apratim lihilay..

    pudhe pan asach lihit ja...

    ReplyDelete
  5. My dear friend, the life moves on, people get elder, I may not recall you in life maybe you too, but the truth of our relation is I respect all the moments together... The Karmey

    ReplyDelete
  6. @ prasanna, hrishi, n sameer

    thanks a lot guys :)


    wow karmey :)

    gr8 ,,, super like ur comment :) :) n ur charili (in english )

    ReplyDelete
  7. resh, kasa lihites ga itaka chan.... me tar tuzya likhanachi fan zaley.karan he agadi mazya manachya koparyatala ahe....... fakt kagadavar utravu nahi shakale kadhi.... goooooooooood....... keep writing..... proud to be 1 of REGHOTIs in ur life...... :)

    ReplyDelete
  8. hey rutuja
    :) thanks dear :) indeed u are 1 of the Reghoti :)

    @ vb

    thanks :)

    ReplyDelete
  9. लेख मस्त झालाय! विचार करायला लावणारा.

    तु ना सी फडक्यांचा "मित्र" हा लेख वाचला आहेस? आपण किती सहज एखाद्या व्यक्तीला - हा माझा/माझी मित्र/मैत्रिण म्हणतो पण मुळात "मित्र" किंवा "मैत्री" ह्यात किती खोल अर्थ असतो हे आपण कधी विचारातच घेत नाही? किती जण ’जवळचे’ आहेत? मैत्री आहे कि फक्त ओळख आहे? या बेसिकमध्येच आपला गोंधळ तरी असतो किंवा निष्काळजीपणा तरी. विचार करण्यासारखं खूप आहे. सावकाश लिहीन कधीतरी. :-)

    ReplyDelete
  10. waa...mstach!!!!!!!!
    mla avdl khupch...pratyekane asa vichar kela tr sglyanchyaca reghotyanch 1 sunder chitra tyar hoil,nahitar tya guntlya tr to gunta sodvaychya nadat 1 sunder chitr tyar honyaadhich pusl jail..

    so...all the very best to draw beutiful pics to u n all REGHOTIS.....

    ReplyDelete
  11. "देखी ज़माने की यारी, बिछडे सभी बारी-बारी".----- कैफ़ी आज़मी.


    खुद को खुशनसिब समझो के कुछ यार दोस्त ज़िंदगी की आपाधापी में भी हमारे लिये कुछ पल बाँटते है। सब अपने व्यक्तीगत जिवन में मसरुफ़ हुआ करते है हमेशा,लेकिन ये यार-दोस्त ही है जो हमारे चेहरे पर तबस्सुम लाते है। ये दोस्त हमेशा के लिये रहते है, लेकिन कुछ कम ज़्यादा मात्रा में हमारे ज़िंदगी में मुब्तिला होते है।

    आपका अंदाज़-ए-बयाँ काफ़ी बेहतरीन है,दुआ करता हुँ के ऐसेही कुछ हसीं पल आप हमसे बाँट ले।

    आलमगीर.

    मुब्तिला= To get Involved in.

    ReplyDelete
  12. thanks RJ :)

    n main thanks for explaining meaning of ur word :)

    ReplyDelete
  13. hello dear
    khup masta
    saglya junye divasanchi aathvan karun denara aahe he he vachala ki june mitra mayitrini aathavatat je aata contact madeh nahi aahet aani manat vich
    ar yeto ki aata te sagle kuthe aasatil kase aasatil................. thanks reshma tu yitka masta lihala aahes ki direct tu junya divasta aani junya mitra mayitrini cha duniyet nelas

    ReplyDelete