Saturday 17 June 2017

शोध गोष्टीचा : भाग ४

आमचा गोष्टीचा शोध वेगवेगळ्या विषयांना हात घालत होता. तर आता वेळ होती पौगंडावस्थेतील मुलांची. तर आयुष्याच्या सर्वात सुंदर वळणावर नेणारा हा प्रवास आम्ही परत अनुभवाला youth म्हणजे अगदी १६-१७ वर्षांचे होऊन विचार केला हा सगळ्यात सुंदर टप्पा होता आमच्या गोष्टीच्या शोधाचा.

तर पुनश्च कॉलेजात गेलो म्हणजे virtually हा. मुद्दा खूप छान होता कॉलेजातील पाहिलं प्रेम किंवा आकर्षण! मग काय जो तो उठसूट वर्णन करत सुटला. त्या ग्रुप मध्ये जे ओळखीचे होते त्यांनी ती सध्या काय करते चा एक प्रयोग पण केला. प्रत्येक जण विशेषतः मूले आपले अनुभव सांगत होती. तिला कस पाहिलं, कसा नंबर मिळवला, खर्चाला पैसे कसे जमवले,  कस पटवलं किंवा कसे सपशेयल तोंडावर आपटले. सगळं वाचून मज्जा येत होती. मग एक मुलगी खूप भडकली मुलींना तेव्हा कसा वाटत असेल याच अगदीच अचूक वर्णन केलं तिने. मला तीच कौतुकच वाटलं कस बाई जमत याना मनातल्या प्रत्येक भावनेला, आंदोलनाला वाट करून द्यायला? मला तेव्हाही नाही जमल आणि आत्ताही नाही. असो.

मग एक गम्मत झाली एका मुलाने खूप बारकाईने एका मुलीच वर्णन केलं, एक सुकलेल्या गुलाबाच फुल पाठवलं आणि एक पिवळसर कागदाचा फोटो पाठवला त्यावर लिहिलं होत,"मला सिनेमे पाहायला आवडत नाहीत,  कवी कल्पना सुचत नाहीत, काव्य कळायला पण थोडा वेळ लागतो, तुझ्यावर कविता लिहावी इतकी माझी कुवत नाही, तुझ्या गुणांचं आणि सौंदर्याचं वर्णन करता येईल इतके कोणत्याच भाषेत शब्द नाहीत. पण तुझ्या भावना मला कळतात, तुझी तगमग, धडपड मला समजते. हो म्हणालीस तर तुझ्याबरोबर म्हणशील ते सिनेमे पाहीन फक्त काव्यात्मक romance  ची अपेक्षा ठेऊ नकोस, जितका आणि जसा जमेल तितका तुला support करेन तुझी प्रत्येक शॉर्ट फिल्मसुंदर व्हावी म्हणून प्रार्थना कारेन".

त्या खाली एक नोट : तेव्हा बोललो असतो तर माझा आज बदलला असता. पण रोज डे ला तुझ्या हातातल्या फुलात डोलणार एक लालगुलाब पाहिला आणि नाही सांगता आलं तुला. आज रहावल नाही म्हणून सांगितलं. मला माहितेय तुझ्या आयुष्यात झालेली उलथा पालथ, भारावून घेतलेले निर्णय, सगळं काही सोडून तुझं जनजागृती आणि शॉर्ट फिल्म्स नावाचा श्वास कोणासाठी तरी सोडायला निघालेलं वेड धाडस आणि नंतर ज्याच्यासाठी केला अट्टाहास त्याने सोडलेली साथ अगदी त्यानंतर आलेली वादळं सुद्धा. पण तू मला त्या सकट  आजही तितकीच आवडतेस.

हे वाचून त्यावरून एकाच हलकल्लोळ उठला. कोणी त्याला हा फोरम वापरला म्हणून दूषण देत होत, कोणी हिमतीची दाद देत होत, कोणी त्याला romantic म्हणत होत तर कोणी भित्रा!
मग कोणीतरी पटकन पोस्ट केली,. कॉलेजच्या शेवटच्या दिवशीपासून आजपर्यंतचा प्रवास काय कमी फिल्मी आहे का तुझा?  उगीच आपलं स्टोरी स्टोरी करत फिरतेय. हो जा सुरू.
या सगळ्यात माझी गोष्ट मैत्रीण मात्र गप्प होती बहुतेक आठवत होती तिचा  ८ वर्षाचा संघर्ष! आमच्या ग्रुप ऍडमिनने यानंतर जवळ जवळ २ आठवडे ग्रुप सोडला.
ती पुन्हा तो प्रवास रंगवेल इतकी ताकद निदान अत्ता तिच्यात नव्हती.
हा पण तिच्या गोष्टीतल्या होरोचा विचार तिने करायला काही हरकत नव्हती.  

Friday 9 June 2017

शोध गोष्टीचा : भाग ३

technology चा उपयोग कोणाला कसा होईल माहित नाही पण या शोध मोहिमेकरता एक whatsapp ग्रुप सुरु केला तिने "in search of story "असं नंतर नामकरण करण्यातआलं त्याचं . तर याच ग्रुप वर एका मित्राने पोस्ट केलेली की लहानपानाची धम्माल, खेळ, मस्ती यावर काहीतरी बनाव तू (तो तिचा शाळेचा मित्र होता म्हणे) तर  ठिक्कर, लपाछुपी, मामाच पात्र हरवलं ते अगदी आव मीना ... पर्यंत सगळ्याच्या चर्चारंगल्या  त्या थांबवायला हिने पोस्ट केलान
स्टोरी मैत्रीण  "please stop such discussions dont spam the group"
मैत्रीण २ : its already spam darling. अरे करुदेत ना बडबड तुला काहीतरी सुचेल काहीतरी क्लीक होईल यातून काय सांगावं.
स्टोरी मैत्रीण : नाही अश्या असंबद्ध बडबडीतून काहीच साध्य होणार नाही. आणि आता मला तुम्ही चिडवताय. तुम्हाला माझी तडफड दिसत नाहीए का?
मित्र १: रीलॅक्स यार मस्ती करत होतो. तुझ्यावर नाही हसते कोणी प्रयत्न करतोय तुला मदत करायचा पण यामुळे आनंद मिळतोय खूप हसतोय आम्ही गेले काही दिवस
मित्र २: ए आता जर कोणी फालतुगिरी केली तर ग्रुप मधून काढून टाकू.
मित्र ५,४, १ :- आता हास बघू काय लहान मुलांसारखी रडते?
मैत्रीण २ : अरे सॉरी. पण I am loving this group
स्टोरी मैत्रिणी : ठीक आहे. हरकत नाही मला कळतंय तुम्हाला वैताग येत असेल पण तुम्ही रिझल्ट पाहाल तेव्हा समजेल तुम्हाला. आता कामाला  लागा आणि काही सुचलं तर नक्की पोस्ट करा.
मी: on lighter note guys. मी सांगू का एक गोष्ट?
स्टोरी मैत्रिणी : कसली गोष्ट?
मी: "कापूसकोंड्याची?" लोल हाहाहाहाहा
गोष्ट मैत्रिण: angry faces
मित्र ४:  हाहाहा  हिला रिमूव्ह करा रे ग्रुप मधून.
मी : रिमूव्ह करा काय म्हणतोस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
few members :laughing f aces
मी; laughing faces काय टाकताय कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?

५ मिनिटे कापूसकोंड्याने धम्माल केली आणि गोष्ट मैत्रिण पण हसायला लागली. तिने तर कापूसकोंड्या इतका एन्जॉय केला की काही वेळ तरी तिच्या मेंदूने फक्त हास्य अनुभवलं असेल. नाहीतर तिच्या मेंदूच सध्या तेच झालय काही ऐकलं, पाहिलं की एकाच प्रश्न "गोष्ट मिळाली?"

भाग ३ : धडा ३
मित्र मैत्रिणी हा आयुष्यातला अविभाज्य घटक असतो आणि खळखळून हसण्यासारखं दुसरं औषध नसत. हसणं आणि हसवणं यासारखं दुसरं समाधान नाही. निखळ हास्यात एक जादू असते.

गोष्ट ऐकायची ये का कोणाला? सांगू? कापूसकोंड्याची? 

शोध गोष्टीचा भाग २

तर या शोध मोहिमेत माझ्या मैत्रिणीने जिला आपण गोष्ट मैत्रीण म्हणतोय तिने एका काकांबद्दल सांगितलं. तर ते काका एका गोव्हरमेंट ऑफिस मध्ये कामाला होते. स्वछन्दी माणूस अत्यंत दिलदार आणि आयुष्याचा उपभोग घेणारा. ९ ते ५ काम झालं की घराच्या बागेत काम करणारा, बायकोला रविवारी फक्कड चहा करून देणारा, क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन तेंडुलकर म्हणजे देव असल्यासारखा क्रिकेट पाहणारा आणि किशोर कुमार रक्तात भिनलेला. ऑफिसात फायलींचे गड्डे च्या गड्डे वाळवीच्या गतीने खाऊन टाकायचा पण कॉम्प्युटर ही काळाची गरज हे नाकारणारा. आम्ही निवृत्त होईस्तोवर काही तुमचा संगणक सरकारी दफ्तरात येत नाही आणि तो शिकायची गरज तुमच्या सारखी नव्या पिढीला जी मुळातच आळशी आणि स्मरणशक्तीची कमी आहे त्यांना आहे. आऊटकी पर्यंत परवचा पाठ आमचा आम्हाला काय गरज नाही त्या संगणकाची.

तर असा हा अवलिया आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणारा आणि सतत आनंदी वावरणारा. निवृत्तीला दोन वर्ष राहिली आणि मन लावून काम केलेलं आजाराचं कारण देऊन कधी सुट्टी घेतली नाही आणि इंडियाचा क्रिकेट सामना असताना कधी कामावर गेला नाही. असा माणूस अलीकडे बऱ्याचदा घरी असतो. सुट्ट्या संपवत असेल म्हणून सुरुवातीला कोणी लक्षदिलं नाही पण चिडचिड वाढली, ऑफिसातून मेमो आला, आदळ आपट सुरु झाली, आवारातली तुळस वैकुंठाला गेली तरी माणूस काही पाण्याचा थेंब घालेन तेव्हा माझ्या मैत्रिणीने जिला ते मुलगी मानतात तिने त्यांना विचारलं. खूप टाळाटाळ गेली पण मग कळलं की गाडी संगणकाशी अडतेय आणि गडी पहिल्याच बोल वर आऊट झालाय. इतकं काही कठीण नाही हो काकाअसं म्हणत काकांना संगणकाचा श्री गणेशाकरायला लावला.  पण काका काही हात लावेनात.शॉक बसेल या भीतीने काका हात लावत नव्हते हे कळल्यावर आम्ही दोघी खूप हसलो.

ती पुढे सांगत होती, काकांच्या ८० वर्षाच्या आई म्हणाल्या अरे काळाप्रमाणे बदलावच लागत. मी नाही का नऊवार सोडून पाचवारी लुगड्यात आले आणि आता गाऊन पण घालते. बदल हाच काय तो अटळ असतो रे बाबा. आधीच हे जाणून वागला असतास तर आत्ताचा मनस्ताप टळला असता. पण काही हरकत नाही याचेही काही फायदे असतील. भीड चेपली की सहज जमेल, त्याची गोडी लागली की त्यातही रमेल मन. पण जुनेर घेऊन बसलास तर मात्र नवीन काहीच कळणार नाही आणि मनस्ताप टळणार नाही. काळाप्रमाणे डोळे उघडे ठेऊन चालावं म्हणजे आपण मागे पडत नाही आणि जुनाट होत नाही.

 मी उत्साहाने विचारलं, "सो? काळाबरोबर बदल ही theme का?" तर म्हणाली, "इतक्या पटकन कळलं तुला? हे तर who moved my cheese मधेही आहे हो ना?" मी म्हटलं, "हो". मग म्हणे, "तर मग नाही दम नाही या theme मध्ये" काहीतरी नवीन हवं स्वतःचं. थोडक्यात काय तर शोध सुरूच.

 आहे का तुमच्याकडे एखादी गोष्ट?
जी कमी करेल माझे कष्ट?

भाग २: धडा २:
 खरंच आजीने who moved my cheese चा गाभा सोप्पा करून सांगितला. :
१: old beliefs do not led you new cheese
2:noticing small changes early helps you to adapt bigger changes which are to come
3: move with cheese
4: When you move beyond fear, you feel free

शोध गोष्टीचा : भाग १


माझी एक मैत्रीण खूप दिवस तिच्या शॉर्ट फिल्म साठी एक गोष्ट शोधतेय. तिला काहीतरी हटके स्टोरी हवीये म्हणे. जो भेटेल जिकडे जाईल तिथे ती तिची गोष्ट.. नव्हे नव्हे स्टोरी शोधण्यात मग्न होते. मित्रांबरोबर कट्ट्यावर काही love stories वर चर्चा झाल्या, झोपडपट्टीत जाऊन भारतातील गरीबी वैगरे पाहून झाली, एका सैनिक मित्राच्या आईशी गप्पा झाल्या, थोरा मोठ्यांची आत्मचरीत्र पालथी घालुन  झाली, अगदी तर अगदी इंग्रजीत मनुस्मृती सुद्धा वाचून झाली. गीता बायबल कुराण यांच्या contains  (तिचा शब्द) वर तज्ज्ञांशी चर्चा झाल्या पण पठ्ठीला तिची गोष्ट काही सापडत नव्हती.

मग तिने एक whatsapp ग्रुप बनवला गोष्ट शोधण्यासाठी. त्यात आऊच्या काऊलाही जागा मिळालीये. हा तर तिला मराठी ब्लॉग्स वाचायचा छंद लागलाय सध्या आणि म्हणून तिची आणि आमची मातृभाषा तिला सोपी करून समजावण्याची जबाबदारी अस्मादिकांनवर मैत्रीचे ऋण म्हणून आली. तिच्या निमित्ताने परत वाचन सुरु झालं हा एकच काय तो फायदा बाकी सगळा त्रास. सुरुवातीला आम्ही तिला उत्सहाने साथ दिली. मग मात्र तो जाच वाटायला लागला. आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो पण तिला काही तिची गोष्ट सापडेना. हातातला प्रत्येक कागद, भेटणारी प्रत्येक व्यक्ती या सगळ्याकडे ती फक्त मला माझी "स्टोरी" मिळेल या आशेवर बघते. परवा whatsApp group वर तिने झपुर्झा चा अर्थ विचारला. मी सांगितला तर लिहिते;

स्टोरी मैत्रीण : " nope word is sexy but not the meaning need to search something else"
यावर माझा मित्र खूप भडकला आणि तिला म्हणाला;
मित्र १ : चुलीत गेली तुझी शोधमोहीम. जगण्यातला अर्थ विसरलीयेस. वर्तमानात जग, तू स्टोरीच्या मागे धावणं बंद कर आणि तुझी तू जग, जरा मेंदूला आराम दे. मिळणाऱ्या नव्या अनुभवांना cherish कर.
मैत्रीण २: lol  हिच्या नादात आपण सगळेच फिलॉसॉफिकल आणि काव्यात्मक बोलायला लागलोय.
मित्र १: बघ मग तुझी गोष्ट तुला मिळेल. आम्ही आहोतच पण असा ध्यास घेऊ नकोस ग.
मित्र ५: relax dear things will happen when they are suppose to happen. its all divine time relax and breath.
स्टोरी मैत्रीण : आईला म्हणजे i am in a state of झपुर्झा
मित्र २ , मैत्रीण ३ आणि मित्र ४ :- angry faces,
मी : नाही ग याला झपाटलेला म्हणतात
ALL :- laughing symbol LOL LOL
स्टोरी मैत्रीण : surprise face

तिला तिची गोष्ट नाही मिळाली अजून पण मला माझा टॉपिक मिळालाय. तिच्या गोष्टीच्या शोधात मला मिळालेले विषय आणि गोष्टी यांचा हा भाग :१

तिच्या वेडेपणावर हसताना मला मिळालेली किंवा समजलेली गोष्ट म्हणजे. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ यावी लागते. आपल्याला हवं म्हणून काहीच घडत नाही. मग अश्या वेळी panic न होता विश्वास ठेवायचा आणि एक दिवस प्रत्येकाला आपली "गोष्ट" सापडतेच. : भाग १: धडा १: 

Wednesday 7 June 2017

परवा एक आजोबा सांगत होते की आज कालच्या लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. एक बाप मुलगा रस्त्याने जात होते तेव्हा एक आंधळा माणूस रास्ता ओलांडण्यासाठी उभा होता, तर मुलाच्या वडीलांनी म्हणे त्या माणसाला रास्ता ओलांडायला मदत केली. वडील परत आले तर मुलगा चिडला आणि म्हणाला, "डॅड तू का गेलास? माझी २ मिनिटे कमी झाली ना ? माझा वेळ होता ना? मग तू माझ्यावेळातली २ मिनिटे दुसऱ्याला का दिलीस?"

या संभाषणावरून त्या आजोबानी निष्कर्ष काढला की नवीन पिढीत लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. खरंच प्रसंग ऐकून असं वाटेलपण कोणालाही. मीही ऐकून घेतलं आजोबाना बोलून दिल, पण मग मला हे तितकस पटल नाही. त्यांना मी बोलले नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुलगा म्हणाला तुझा हा वेळ माझ्यासाठी होता त्यातली दोन मिनिटे कमी झाली. आज काल अती बिझी work schedule मुळे मुलांना आई -वडील वेळ देऊ शकत नाहीत. आपल्या पिढीला आई वडिलांचा मुबलक प्रमाणात मिळायचा तेव्हा मुलांसाठी वेळ राखीव ठेवायची गरज नसायची. कामाच्या appointments मध्ये मुलांचा वेळ असा काही राखून ठेवण्याची गरज नव्हती पण आज काल अपरीहार्य असलेल्या कामाच्या तणावामुळे, प्रचंड गतिमान जीवनामुळे किंवा मग पैश्याच्या अति गरजेमुळे पालकांना हा असा राखीव वेळ मुलांसाठी ठेवावा लागतो. एकुलती एक मुलं आणि व्यस्त असलेले आई वडील यांमुळे मुलांना एकटे पणाची जाणीव खात राहते. आई वडिलांनाही बरेचदा मनावर दगड ठेऊन उंबरा ओलांडावा लागतो. मग ते अव्यक्त प्रेम limited वेळात तरी व्यक्त व्हावं आणि मुलांना थोडातरी वेळ मिळावा म्हणून असा वेळ हल्ली राखून ठेवला जात असावा. मुलांना त्यांच्यासाठीच्या वेळात सगळी माया absorb करायची असते. तेव्हढ्या वेळात त्यांना त्यांच्या सगळ्यात जवळची माणस त्याच्याबरोबरचा अनुभव साठवायचा असतो कदाचित पुढील appointment  (वेळ )  पर्यंत .

राखून ठेवलेल्या कमी वेळातली २ मिनिटे वडिलांनी घालवली माझा बाबा दुसरी गोष्ट करत राहिला इतकच त्या निरागस जीवाला कळलं असणार त्यातली सामाजिक जाणीव पोहोचण्याइतकं त्या मुलाचं वय नक्कीच नाही.
असा विचार डोक्यात आला. वाटलं "हल्लीच्या पिढीत माणूसकीच नाही हो" असं नसतं लगेच.  एका घटनेला अनेक कंगोरे असू शकतात म्हणून लगेच हल्लीची पिढीचं "अशी स्वार्थी" अश्या निष्कर्षाप्रती पोहोचणं  तितकस योग्य नाही असा मलावाटतं .