Monday 9 May 2011

प्रेम आणि मंगळसूत्र

" " प्रेम! "  जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट, सुंदर फिलिंग,... आपण कोणालातरी आवडण्यात किती सुख असत, किती समाधान मिळत हे अस सांगून नाही समजायचं कोणाला...,, त्यासाठी ते अनुभवाव लागतं, ते त्याने माला बघणं, ते  डोळ्यातून मनात साठवून घेणं,  त्याच बोलणं, त्याच दिसणं, त्याचा स्पर्श,,.. सगळं सगळं अद्भुत असतं,.. मी अनुभवलंय ते सगळं, thats called seventh heaven ....प्रेम प्रेम असतं कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरत.  आयुष्याच्या कोणत्या ना  कोणत्या वळणावर आपण प्रेमात पडतोच,.. कोणतीतरी नजर प्रत्येकाला आव्हान देऊन जातेच तोच तो 'क्षण' असतो जेव्हा तुम्ही स्वत:चे नाही रहात,,  प्रवाहा बरोबर वाहत राहाता ,.. ते वाहत जाणं  तेही खूप खूप वेड लावणार असत,...

कोणीतरी तुमच्यासाठी काहीही करू शकत, करत, त्याला मी आवडते ही भावनाच खूप confidence देते ... खूप बोल्ड बनवते,,,, न बघितलेल्या माणसावर मनापासून प्रेम करणे आणि ते निभावणे, किंवा arrange marriage करून   ते निभावून नेण हे महान आहेच! पणं,.. जसं वाटत तसं मनापासून जगणं यात काय चूक आहे??? चोरून लांबून मनातल्या मनात प्रेम करत बसण्यापेक्षा, जो आवडतो त्याला "ती" ने जाऊन भेटणे त्याला ते सांगणे आणि तो मिळावा म्हणून प्रयत्न करणे, यात आज काल काही नवल नाही राहिलेले.. पण "तो" जर उत्कट पणे प्रेम करत असेल तर कोणाचा आक्षेप नसतो पण "ती" जर तशी वागली, कोणत्याही भावना आणि इच्छा न लपवता बिनधास्त जगली तर ती मात्र  "लाज लज्जा सोडली .." या category मध्ये गणली जाते असे का??? 

मी ही प्रेम केलं मनापासून केलं....  हे सांगण्याची आणि स्विकारण्याची माझ्यात हिम्मत आहे कारणं मला नाही वाटतं मी काही चूक केलीये. मी त्याला माझं म्हटलं आणि त्यानेही मला!  मी विश्वास ठेवला आणि तो ठेवण्यासाठी मला कोणत्याही प्रोमिसची किंवा commitment ची गरज नाही वाटली ,,, आम्ही एकत्र आलो कारण आम्हाला एकमेकांची कंपनी आवडली, आमचे विचार जुळले ( professional  आणि emotional level वर ( जो खूप rare combo असतो )  ). मग  life मध्ये अजून काय हवे? एक जोडीदार जो माझ्यावर प्रेम करतो जो माला समजून घेतो आणि जो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे ,,, बस माझे life असेच सुंदर बनले, फुलले. आम्ही एकत्र आलो कारण आम्हाला मनापासून तसे वाटले. एक-मेकांना साथ द्यावी सोबत करावी. मला नाही आवडत मानात एक आणि ओठावर अजून दुसरेच काहीतरी. त्याच्या बरोबर bike वरून फिरणे, हातात हात घालून खूप वेळ गप्पा मारणं, bandstand वर जाऊन एकमेकांना फील कारणं, त्याच्या मिठीत विरघळून जाणं, त्याने मला सुंदर म्हणणं आणि मग सगळं काही विसरून माझ्याकडे बघतं बसणं... त्याने आणि मी  बिनधास्त पणे आमचं नात स्विकारल होतं. मी बिनधास्त असणं त्याला पटायचं आणि त्याला हे पटण माला आवडायचं. 

माझ प्रेम महान नसेल कदाचित!! पण मी माझ्या कोणत्याच भावनांना कधी झिडकारल किंवा नाकारलं नाही. मी कधी स्वतःवरचा कंट्रोल सिध्ध करण्याचा प्रयत्नही केला नाही..,,  उलट मी प्रवाहा बरोबर वाहत जाणं आणि तो क्षण जगणं निवडलं , त्यानेही हेच तर निवडलं.... दारू सिगरेट ला वर्ज न मानण किंवा मिठी मारणं, अगर किस कारण, हे तर सगळेच करतात पण ,.. गुपचूप. , ते चारचौघात स्विकारणे हेही माला चूक नाही वाटत. लग्न वैगरे च्या फंदात ना त्याला पडायचे आहे ना मला. कायद्यानेही live -in  ला protection दिलेय आता. पण हे घरच्यांना कोण समजावणार?? जर तो आणि मी एकमेकांना समजून घेऊन mutually लग्नाशिवाय एकत्र आलो तर त्यात बिघडले कुठे??

 शेवटी लग्नं लग्नं म्हणजे तरी काय ?? दोन मनांचे आणि शरीरारांचे एकत्र येणे. विश्वास आणि प्रेमाने स्वतःचे विश्व निर्माण करणे. सुख-दु:खात आधार देणे आणि आयुष्य भरासाठी साथ करणे. पण ते तसे जर आम्ही लग्नाशिवाय करत असू तर आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला ??? असे कसे म्हणता येईल?? हो मी झाले surrender त्या क्षणाला,, स्वतःला थांबवू शकले नाही म्हणून नाही हं .,.. तर ते नाकारायचे नव्हते म्हणुन ,, ते समोर होते ते हवे हवेसे होते म्हणून,.. तन मनाने समरस झाले त्याच्यात, आमचे नाते समजून घेण्यासाठी किंवा ते सर्वमान्य होण्यासाठी माला हे आणि इतकेच पुरेसे आहे की आज ८ वर्षांनतरही आमचे नाते फ्रेश आहे ती ओढ ते passion   अजून एक-एकांसाठी आम्ही फील करतो. मग हे नात माला कोणत्याही married couple सारखेच पवित्र वाटते. मी आमच्या त्या नात्याला respect करते. मला ते नातं इतरांनी स्विकारावं किंवा त्याला पावित्र्याच्या कोणत्याही साच्यात कोंबाव आणि  फिट बसवावं  यासाठी त्या काळ्या मण्यांनी गरज वाटत नाही. त्यालाही हेच वाटत होत काल -परवा पर्यंत घरच्यांना समजावण ही  कठीण गोष्ट आहे,.. पण दोघे मिळून हे करू यावर  विश्वास होता आमचा, कोणत्याही promise च्या ओझ्याखाली मला माझं नातं गुदमरू नाही   द्यायचं,, तर ते जगावस वाटतं म्हणून जगायचं ,... त्याच्याबरोबर.!!

पण आज,, मी.., मला,.. म्हणजे .. मी त्याच्या वागण्याने confuse झालेय. त्याला आता लग्न करायचय, त्याला त्याच घर हवय, बायको हवी आहे, मुल-बाल संसार सगळं हवाय, आमच्या मुलांना त्याला त्याचे नाव द्यायचेय. हे सगळ मलाही हवाय आमची मुल त्याचेच नाव लावणारेत पण त्यासाठी लग्नाची काय गरज??? माला आमचं नातं आहे तस जगायचेय फ्री आणि सुंदर कोणतीही commitment नसतानाही एक-मेकांबद्दल असलेली passion  जपायचीये माला. बाकीच्यांचे ठीक आहे पण ह्यालाही आता आमच नातं बेड्यात डांबून टाकायचं???. बेडी ,.. नात्यातली सहजता घालवणारी,.. मग आहे ते जसं आहे तसं फरफटत जगात राहायचे, दिवस खेचत राहायचे, आणि नशिबाला  दोष देत बसायचे. माझी best frnd जी लग्न संसार यात रमणारी होती तिचे हाल मी बघतेय, तिला क्षणोक्षणी गृहीत धरल जातंय, तिची स्वप्नं, "ती" च मनं, तिचे विचार, तिचं लिखाणं सगळं सगळं तिच्या कवितांच्या कागदांसकट चुरगळून गेलय,..तिच्यातली "ती"च हरवलिये आणि उरलीये ती फक्त  तिच्या नवर्‍याची बायको आणि त्यांच्या मुलांची आई,..  मला,, मला स्वतःचे अस्तित्व जपून त्याच्या साथीने जगायचेय. .

आता तो," म्हणतोय की जर इतकं प्रेम आहे, विश्वास आहे तर मग commitment का नको? आई-डॅड साठी हे एवढाच हवाय ते मला दे". माला हे emotional blackmailing सहन नाही होत, त्याला माहितेय की मला त्याच्याबद्दल काय वाटत,, मग त्याला का गरज पडावी कोणत्याही promise ची? त्याच्या आई- डॅड समोर नो ड्रिंक्स, नो स्मोकिंग मी स्वीकारलं. पण मी हे अस काही करताच नाही अजिबात हे त्यांना त्याने का सांगावे? मी ज्याच्याबरोबर जगले ज्याच्यावर प्रेम केलं तो कोणी वेगळाच होता का? गोंधळ उडालाय गं माझा पुरता. आता फोन वर म्हणतोय मला पटत तुझ्या मम्मा च म्हणणं "स्वातंत्र्य आणि  स्वैराचार यात फरक आसतो.  जे जगणं आपण स्वीकारायचे म्हणत आहोत ते स्वतंत्र नाही तो 'स्वैराचार' आहे.. जर आपल्याला एक-मेकांबद्दल पूर्ण खात्री आहे की आपणं एक-मेकांना जन्मभर साथ देऊ तर मग commitment देण्यापासून का पळायचे? आई म्हणते, " लग्न म्हणजे बंधन नाही,, तर तो एक संस्कार आहे तुमच्या नात्यावर होणारा. शेवटी आयुष्यात कधी ना कधी स्थैर्य,. तुमच्या भाषेत stability हवीच आणि ती प्रत्येक जण शोधात असतो. लग्नं तिच stability देते. तुम्हाला एक-मेकांचे आहोत ही जाणीव करून देते आणि मग जबाबदार्‍या तुम्ही मनापासून पार पाडता.आणि शेवटी संस्कृती म्हणून  काही आहे की नाही ,,, western culture आपण का पाळायचे ,,, ते त्यांचे पाळतात मग आपण आपले जपायला का लाजायचे ?? का कमी पण वाटतो त्यात?? "

 culture चा मीही respect करते ग ,, पण मनाला न पटणार्‍या गोष्टी मी नाही करू शकत. त्याचे नाव लावण्यासाठी स्वतःचे नाव बदलले म्हणजेच त्याच्याशी एकरूप झाले असे असते का??? तो किंवा मी हरून आल्यावर फक्त आधाराची नाही तर खंबीरपणे त्याला सावरण्याची गरज असते मग ते मी आताही करतेय, तोही करतोय. फक्त culture म्हणून लग्न करून आणि त्याच्या नावचे मंगळसूत्र किंवा कुंकू लावून आम्ही किती गोड गोड संसार करतो हे कोणाला दाखवण्यात काय अर्थ?? अशी किती जोडपी आहेत जी लग्न करुन सुध्धा सुखी नाहीत. मंगळसूत्र  घातलं की तुम्ही एकत्र येणं valid नाहीतर तो स्वैराचार??? ,. मग ते लग्न करणारे जोडपे किती खुश आहे? rather आहे की नाही? त्यांना नक्की काय वाटते याबद्दल कितीदा विचार केला जातो?? मग जरी पटले नाही तरी एकमेकांना सहन करत राहायचे. मंगळसूत्र च्या  बेडीत स्वतःला पूर्णपणे जखडून नात्यातला हळुवारपणा हरवून बसायचा का????? मला त्याची, त्याच्या फमिलीची होऊन राहण्यापेक्षा माला त्यांनी मी आहे तसे स्विकारणे आणि मी त्यांना  मनापासून respect करणे जास्ति पटेल आणि रुचेल.... ""

ती बोलत होती, फक्त फक्त बोलत होती,,, तिची भळभळणारी जखम आमच्या समोर मोकळी करत होती. आणि आम्ही दोघी फ़क्त ऐकत होतो मुग्ध होऊन, तिचे विचार फार स्पष्ट होते,.. आम्ही भारावून ऐकत होतो..,, ती खूप प्रश्न विचारात होती आम्ही तिघी मिळून दोन पिढ्यातल्या विचारांची सांगड घालत होतो. काही प्रश्न पडू शकतात मुलीना हे तिच्याशी बोलून झाल्यावर माला कळल,. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली आम्हाला,.. काही आम्ही पटवली तिला, काही तिचीही मते आम्हाला पटली.. खूप उहापोह केला. खूप  विचार केला पण marriage आणि live -in मध्ये marriage कसं perfect आणि  " get married dear " हे मात्र तिला पटवून नाही देऊ शकलो, तिच्या आईने दिलेली एकच कामगिरी पण ती नाही पूर्ण करू शकलो. तिचे विचार तिचे प्रश्न सगळ सगळ ऐकून आम्ही दडपून गेलो. आमच्या परीने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती नाहीच समजली...

हे सगळ आठवण्याचे कारण म्हणजे ...काल ती online भेटली पूर्ण दीड - दोन वर्षांनी ,,.. तिच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका mail केली तिने लग्नाला नक्की यायचं हं अश्या आग्रह सकट.ती आता अमेरिकेत आहे, बहिणीच्या लग्नाचा खर्च ती करतेय संपूर्ण.. आणि तो he got married to thier common friend and they both are happily married (???) .ती .. ती मात्र शोधतेय अजून तिच्या प्रश्नाची उत्तर, आणि आशा बाळगून आहे अजून तिचं अपूर्णत्व कधीतरी पूर्ण होईल,.. उत्तरे मिळतील आणि जोडीदार सुध्धा या बद्दल ,...........

                                                                                .....   रेश्मा आपटे

 Note
देव करो नि "ती" च्या स्वप्नातला "तो" तिला लवकर मिळो....... all the best dear  

9 comments:

  1. छान...
    pratyek paragraph goshtichyha eka weglya wate wr gheun jato..
    Radio wr konitari gosht sangtay asach watat........ :)

    न बघितलेल्या माणसावर मनापासून प्रेम करणे आणि ते निभावणे, किंवा arrange marriage करून ते निभावून नेण हे महान आहेच!

    ReplyDelete
  2. आपण कोणालातरी आवडण्यात किती सुख असत, किती समाधान मिळत हे अस सांगून नाही समजायचं कोणाला...,, त्यासाठी ते अनुभवाव लागतं...

    he wachun ch excitement wadhte pudhe wachnyachi.......... :)

    ReplyDelete
  3. Actually both the concepts are not wrong, infact its about our perception towards it. Truly speaking its all about understanding beetween the partners.

    ReplyDelete
  4. actually prem kelya var kalata ki ....
    ki he jivapad japanya sarakha kahi tari aasat aani barach veli te puarta hi nahi aani uraat hi nahi.....

    ReplyDelete
  5. thanks friends :)

    @ KAustubh :
    Radio wr konitari gosht sangtay asach watat..

    :) :) thanks :)
    @ Ganesh : hummmm
    @ samarth: yah rite .. its al abt how u understand

    ReplyDelete
  6. रेश्मा, मला तू लिहिलेले सगल्या गोष्टी आवडल्या आणि पातल्या पण , पण सगळ्या मध्ये तीच का ?? नेहेमी तिनेच का हार मानवी .. एक गोष्ट नक्की , पुरुष वर्चस्वी जगात स्त्रीला नेहेमी मागे राहव लागत ... तिने स्वताहून हा निर्णय घेतला पण तो तिच्या साठी थांबू शकला नाही ... मग ते खरच प्रेम होत का ?
    लोक खर प्रेम सोडून गेलेली मी पाहिलेट ह्याच गोष्टी साठी , समाजासाठी , घरच्यांसाठी ... ते कदाचित प्रेम नसाव .. अथवा त्याच्या मध्ये हिम्मत नसावी ....
    प्रीती

    ReplyDelete
  7. hey priti thanks a lot :)

    haar nahi manali tine ulat hyatali " tee" tham rahili ,, with or without ...

    prem khar asat nasat kharach nahi mahit .... yach uttar shodhatala jav tar khup gondhal udel ,,,,

    thanks priti for liking and commenting on my posts :)

    ReplyDelete