Wednesday, 7 June 2017

परवा एक आजोबा सांगत होते की आज कालच्या  लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. एक बाप मुलगा रस्त्याने जात होते तेव्हा एक आंधळा माणूस रास्ता ओलांडण्यासाठी उभा होता तर  मुलाच्या वडीलांनी म्हणे त्या माणसाला रास्ता ओलांडायला मदत केली. वडील परत आले तर मुलगा चिडला आणि म्हणाला," डॅड तू का गेलास? माझी २ मिनिटे कमी झाली ना ? माझा वेळ होता ना? मग तू माझ्यावेळातली २ मिनिटे दुसऱ्याला का दिलीस?"
या संभाषणावरून त्या आजोबानी निष्कर्ष काढला की नवीन पिढीत लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. खरंच प्रसंग ऐकून असं वाटेल पण कोणालाही. मीही ऐकून घेतलं आजोबाना बोलून दिल पण मग मला हे तितकस पटल नाही. त्यांना मी  बोलले नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुलगा म्हणाला तुझा  हा वेळ माझ्यासाठी होता त्यातली दोन मिनिटे कमी झाली. आज काल अती बिझी work schedule मुळे मुलांना आई -वडील वेळ देऊ शकत नाहीत. आपल्या पिढीला आई वडिलांचा मुबलक प्रमाणात मिळायचा तेव्हा मुलांसाठी वेळ राखीव ठेवायची गरज नसायची. कामाच्या appointments मध्ये मुलांचा वेळ असा काही राखून ठेवण्याची गरज नव्हती पण आज काल अपरीहार्य असलेल्या कामाच्या तणावामुळे, प्रचंड गतिमान जीवनामुळे किंवा मग पैश्याच्या अति गरजेमुळे पालकांना हा असा राखीव वेळ मुलांसाठी ठेवावा लागतो. एकुलती एक मुलं आणि व्यस्त असलेले आई वडील यांमुळे मुलांना एकटे पणाची जाणीव खात राहते. आई वडिलांनाही बरेचदा मनावर दगड ठेऊन उंबरा ओलांडावा लागतो मग ते अव्यक्त प्रेम limited वेळात तरी व्यक्त व्हावं आणि मुलांना थोडातरी वेळ मिळावा म्हणून असा वेळ हल्ली राखून ठेवला जात असावा. मुलांना त्यांच्यासाठीच्या वेळात सगळी माया absorb करायची असते. तेव्हढ्या वेळात त्यांना त्यांच्या सगळ्यात जवळची माणस त्याच्याबरोबरचा अनुभव साठवायचा असतो कदाचित पुढील appointment  (वेळ )  पर्यंत .
धीच राखून ठेवलेल्या कमी वेळातली २ मिनिटे वडिलांनी घालवली माझा बाबा दुसरी गोष्ट करत राहिला इतकच त्या निरागस जीवाला कळलं असणार त्यातली सामाजिक जाणीव पोहोचण्याइतकं त्या मुलाचं वय नक्कीच नाही.
असा विचार डोक्यात आला म्हणून हल्लीच्या पिढीत माणूसकी च नाही हो असा नसत. एका घटनेला अनेक कंगोरे असू शकतात म्हणून लगेच  हल्लीची पिढीचं "अशी स्वार्थी" अश्या निष्कर्षाप्रती पोहोचणं  तितकस योग्य नाही असा मला वाटत. 

No comments:

Post a Comment