Saturday, 17 June 2017

शोध गोष्टीचा : भाग ४

आमचा गोष्टीचा शोध वेगवेगळ्या विषयांना हात घालत होता. तर आता वेळ होती पौगंडावस्थेतील मुलांची. तर आयुष्याच्या सर्वात सुंदर वळणावर नेणारा हा प्रवास आम्ही परत अनुभवाला youth म्हणजे अगदी १६-१७ वर्षांचे होऊन विचार केला हा सगळ्यात सुंदर टप्पा होता आमच्या गोष्टीच्या शोधाचा.

तर पुनश्च कॉलेजात गेलो म्हणजे virtually हा. मुद्दा खूप छान होता कॉलेजातील पाहिलं प्रेम किंवा आकर्षण! मग काय जो तो उठसूट वर्णन करत सुटला. त्या ग्रुप मध्ये जे ओळखीचे होते त्यांनी ती सध्या काय करते चा एक प्रयोग पण केला. प्रत्येक जण विशेषतः मूले आपले अनुभव सांगत होती. तिला कस पाहिलं, कसा नंबर मिळवला, खर्चाला पैसे कसे जमवले,  कस पटवलं किंवा कसे सपशेयल तोंडावर आपटले. सगळं वाचून मज्जा येत होती. मग एक मुलगी खूप भडकली मुलींना तेव्हा कसा वाटत असेल याच अगदीच अचूक वर्णन केलं तिने. मला तीच कौतुकच वाटलं कस बाई जमत याना मनातल्या प्रत्येक भावनेला, आंदोलनाला वाट करून द्यायला? मला तेव्हाही नाही जमल आणि आत्ताही नाही. असो.

मग एक गम्मत झाली एका मुलाने खूप बारकाईने एका मुलीच वर्णन केलं, एक सुकलेल्या गुलाबाच फुल पाठवलं आणि एक पिवळसर कागदाचा फोटो पाठवला त्यावर लिहिलं होत,"मला सिनेमे पाहायला आवडत नाहीत,  कवी कल्पना सुचत नाहीत, काव्य कळायला पण थोडा वेळ लागतो, तुझ्यावर कविता लिहावी इतकी माझी कुवत नाही, तुझ्या गुणांचं आणि सौंदर्याचं वर्णन करता येईल इतके कोणत्याच भाषेत शब्द नाहीत. पण तुझ्या भावना मला कळतात, तुझी तगमग, धडपड मला समजते. हो म्हणालीस तर तुझ्याबरोबर म्हणशील ते सिनेमे पाहीन फक्त काव्यात्मक romance  ची अपेक्षा ठेऊ नकोस, जितका आणि जसा जमेल तितका तुला support करेन तुझी प्रत्येक शॉर्ट फिल्मसुंदर व्हावी म्हणून प्रार्थना कारेन".

त्या खाली एक नोट : तेव्हा बोललो असतो तर माझा आज बदलला असता. पण रोज डे ला तुझ्या हातातल्या फुलात डोलणार एक लालगुलाब पाहिला आणि नाही सांगता आलं तुला. आज रहावल नाही म्हणून सांगितलं. मला माहितेय तुझ्या आयुष्यात झालेली उलथा पालथ, भारावून घेतलेले निर्णय, सगळं काही सोडून तुझं जनजागृती आणि शॉर्ट फिल्म्स नावाचा श्वास कोणासाठी तरी सोडायला निघालेलं वेड धाडस आणि नंतर ज्याच्यासाठी केला अट्टाहास त्याने सोडलेली साथ अगदी त्यानंतर आलेली वादळं सुद्धा. पण तू मला त्या सकट  आजही तितकीच आवडतेस.

हे वाचून त्यावरून एकाच हलकल्लोळ उठला. कोणी त्याला हा फोरम वापरला म्हणून दूषण देत होत, कोणी हिमतीची दाद देत होत, कोणी त्याला romantic म्हणत होत तर कोणी भित्रा!
मग कोणीतरी पटकन पोस्ट केली,. कॉलेजच्या शेवटच्या दिवशीपासून आजपर्यंतचा प्रवास काय कमी फिल्मी आहे का तुझा?  उगीच आपलं स्टोरी स्टोरी करत फिरतेय. हो जा सुरू.
या सगळ्यात माझी गोष्ट मैत्रीण मात्र गप्प होती बहुतेक आठवत होती तिचा  ८ वर्षाचा संघर्ष! आमच्या ग्रुप ऍडमिनने यानंतर जवळ जवळ २ आठवडे ग्रुप सोडला.
ती पुन्हा तो प्रवास रंगवेल इतकी ताकद निदान अत्ता तिच्यात नव्हती.
हा पण तिच्या गोष्टीतल्या होरोचा विचार तिने करायला काही हरकत नव्हती.  

No comments:

Post a Comment