Friday 9 June 2017

शोध गोष्टीचा : भाग १


माझी एक मैत्रीण खूप दिवस तिच्या शॉर्ट फिल्म साठी एक गोष्ट शोधतेय. तिला काहीतरी हटके स्टोरी हवीये म्हणे. जो भेटेल जिकडे जाईल तिथे ती तिची गोष्ट.. नव्हे नव्हे स्टोरी शोधण्यात मग्न होते. मित्रांबरोबर कट्ट्यावर काही love stories वर चर्चा झाल्या, झोपडपट्टीत जाऊन भारतातील गरीबी वैगरे पाहून झाली, एका सैनिक मित्राच्या आईशी गप्पा झाल्या, थोरा मोठ्यांची आत्मचरीत्र पालथी घालुन  झाली, अगदी तर अगदी इंग्रजीत मनुस्मृती सुद्धा वाचून झाली. गीता बायबल कुराण यांच्या contains  (तिचा शब्द) वर तज्ज्ञांशी चर्चा झाल्या पण पठ्ठीला तिची गोष्ट काही सापडत नव्हती.

मग तिने एक whatsapp ग्रुप बनवला गोष्ट शोधण्यासाठी. त्यात आऊच्या काऊलाही जागा मिळालीये. हा तर तिला मराठी ब्लॉग्स वाचायचा छंद लागलाय सध्या आणि म्हणून तिची आणि आमची मातृभाषा तिला सोपी करून समजावण्याची जबाबदारी अस्मादिकांनवर मैत्रीचे ऋण म्हणून आली. तिच्या निमित्ताने परत वाचन सुरु झालं हा एकच काय तो फायदा बाकी सगळा त्रास. सुरुवातीला आम्ही तिला उत्सहाने साथ दिली. मग मात्र तो जाच वाटायला लागला. आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो पण तिला काही तिची गोष्ट सापडेना. हातातला प्रत्येक कागद, भेटणारी प्रत्येक व्यक्ती या सगळ्याकडे ती फक्त मला माझी "स्टोरी" मिळेल या आशेवर बघते. परवा whatsApp group वर तिने झपुर्झा चा अर्थ विचारला. मी सांगितला तर लिहिते;

स्टोरी मैत्रीण : " nope word is sexy but not the meaning need to search something else"
यावर माझा मित्र खूप भडकला आणि तिला म्हणाला;
मित्र १ : चुलीत गेली तुझी शोधमोहीम. जगण्यातला अर्थ विसरलीयेस. वर्तमानात जग, तू स्टोरीच्या मागे धावणं बंद कर आणि तुझी तू जग, जरा मेंदूला आराम दे. मिळणाऱ्या नव्या अनुभवांना cherish कर.
मैत्रीण २: lol  हिच्या नादात आपण सगळेच फिलॉसॉफिकल आणि काव्यात्मक बोलायला लागलोय.
मित्र १: बघ मग तुझी गोष्ट तुला मिळेल. आम्ही आहोतच पण असा ध्यास घेऊ नकोस ग.
मित्र ५: relax dear things will happen when they are suppose to happen. its all divine time relax and breath.
स्टोरी मैत्रीण : आईला म्हणजे i am in a state of झपुर्झा
मित्र २ , मैत्रीण ३ आणि मित्र ४ :- angry faces,
मी : नाही ग याला झपाटलेला म्हणतात
ALL :- laughing symbol LOL LOL
स्टोरी मैत्रीण : surprise face

तिला तिची गोष्ट नाही मिळाली अजून पण मला माझा टॉपिक मिळालाय. तिच्या गोष्टीच्या शोधात मला मिळालेले विषय आणि गोष्टी यांचा हा भाग :१

तिच्या वेडेपणावर हसताना मला मिळालेली किंवा समजलेली गोष्ट म्हणजे. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ यावी लागते. आपल्याला हवं म्हणून काहीच घडत नाही. मग अश्या वेळी panic न होता विश्वास ठेवायचा आणि एक दिवस प्रत्येकाला आपली "गोष्ट" सापडतेच. : भाग १: धडा १: 

No comments:

Post a Comment