Thursday, 26 July 2018

Soulmates 4

भाग 4
ओंकारने त्याच्या खांद्यावर हात ठेवला., "मित्रा माझं चुकलं रे. तुमचं नातं नाही समजलं मला तेव्हा. आणि तू ती फोन वर असं काही बोलली म्हणालास मग माझाही गोंधळ उडाला, मला तेव्हा कळलेलं तुमचं नातं बरोबर होतं की त्या दिवशी पूर्वा आणि तिने उलगडलं ते? तुमच्या सारखी शब्दांशीवायची भाषा मला नाही कळत, पण आज तुला बोलायला मित्राची गरज आहे हे समजून तुला इथे बोलावलं, १६ वर्ष्यांपुर्वी जिथे तुमच्या नात्याचं तत्वज्ञान 'ती" ने पहिल्यांदा आपल्याला दिलं तिथे."

मी: तिच्या मनात कसलाच गोंधळ नव्हता. भावनांचा पूर, कल्लोळ यातून होणारी दमछाक, चिडचिड नव्हती. स्वच्छंदी आहे ती, पण बेदरकार नाही. मगाशी म्हटलं तस मी असेन तसा पळत येईन पण ती, ज्या परिस्थितीत जे लागेल ते माझ्यासाठी समोर ठेवेल. विचारांची स्पष्टता आणि वागण्या बोलण्यातला सुसंगतपणा ह्याचमुळे मी तिच्यात गुंतत गेलो. जेव्हा जेव्हा गोंधळलो, नात्यात गल्लत होईल असं वाटलं तेव्हा तेव्हा तिने रास्ता दाखवला. ती आणि मी वेगळे नाही एकच आहोत. शारिरीक आकर्षणापलीकडे आम्ही संवेदनेच्या एका वेगळ्याच स्तरावर एकमेकांचे आणि एकमेकांसाठी आहोत हे तिनेच मला शिकवले. फक्त बायको नाही तर मुलं , बॉस आणि माझे वडील इतकंच काय तर तू सुद्धा सगळ्यांना भावनिक पातळीवर समजून घ्यायला तिने मला शिकवलं."

मी पुन्हा चुकतोय रे तिला समजून घ्यायला. हो तिच्यातला एक कोपरा माझा होता नाही आहेच. मला आधाराचा खांदा म्हणून बघतेय ती? कमिटमेंट द्यायची कटकट नाही म्हणून आत्ता व्यक्त होतेय? हे खरं नाहींये ओम्या, परत मनाचा गोंधळ गल्लत करतोय"

" तुला जे वाटतं ते बोल, ती च्या बद्दल तू कधीच काही बोलला नाहीस आज १६ वर्ष्यात पहिल्यांदा तू शब्दात मांडतोयस सगळं. मी तुला जज नाही करते,मित्रा तुही नको करुस. मोकळा हो." ओंकार म्हणाला.

मी: "पण मग ती असं का बोलली फोन वर? आत्ता काय झालं? व्यक्त व्हायचंय तिला? आत्ता ? आयुष्याच्या या वळणावर? माझे विचार स्वछ आणि स्पष्ट करून तिला पुन्हा मला गोंधळात का टाकायचय? भेटायला येऊ का तर स्पष्ट नाही म्हणाली. पहिल्यांदा नाही म्हणाली भेटायला. फक्त ऐक म्हणाली. खरं सांगू तिने माझ्यासाठी सगळं केलं इतकंच राहील होतं. ते शब्द माझ्या मनात तरंगत पोहोचले पहिल्या पावसात मातीचा गंध दरवळावा तसे दरवळे शरीर आणि मन भर. शरीर आणि मन हलकं हलकं झालं. तिचा फोन लागत नव्हता मग तुला फोन केला. "

तेव्हढ्यात ओमी चा फोन वाजला.
आणि ती समोर आली. माझ्या जवळ, खूप जवळ आणि पुन्हा बोलली जे काल फोन वर बोलली., "माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. व्यक्त करायची माझी भाषा तुला समजली की नाही माहित नाही, पण गेली खूप वर्ष तुला हे शब्द मझ्याकडून ऐकायचे होते हे मला माहित आहे. म्हणून फोन चा खटाटोप."

मी संमोहीत झाल्यासारखा तिच्याकडे पाहत होतो. पुढे ती काहीच बोलली नाही. डोळ्यातून वाहत राहिली. पण तिचे डोळे! हे काय? अग ऐक कुठे चाललीस? मला हलताच येत नाहीये. ओम्या तिला थांबव. ती चाललीये ओमी! ओमी! मी आकांताने ओरडलो.

ओमी धावत आला. मला म्हणाला, " मित्रा we lost her. ती गेली"
" अरे मी तेच सांगतोय ती चाललीये ती बघ, समोर तिला थांबव माझ्यासाठी. ओमी मला बोलायचंय. मी तिच्यावर खूप... .
ओमीने मला घट्ट मिठी मारली आणि खूप रडला. माझ्या जाणिवाच गोठल्या जणू. मी हललो नाही रडलो नाही.
ओमीचे शब्द कानावर पडत होते पण डोक्यात जात नव्हते. मी कोसळलो.

चार दिवसांनी जेव्हा जाग अली तेव्हा ओमी आणि पूर्वा भेटायला आले होते. तेव्हा समजलं, तिने त्या दिवशी 3 फोन केले. मला, पूर्वाला आणि डॉक्टरला. त्यानंतर ती ऍडमिट होती. आणि मला दिसली ( ओम्याच्या म्हणण्या प्रमाने भासली) त्या वेळी ती या जगातून गेली. माझ्या नातेवाईकांना माझं ब्लड प्रेशर वाढलं म्हणून ऍडमिट केल्याचं सांगण्यात आलं.

माझं मन सुन्न होतं. जाताना पूर्वा हळूच कुजबुजली." relation and person may or may not be around but she has filled your being with immense love.
ती गेली प्रेमाचा अखंड झरा मागे ठेवून."


No comments:

Post a Comment