Friday 22 April 2011

तुझ्या-माझ्यात


तुझं माझं नात विणणारी
होती एक रेशमाची लडी
सुंदर क्षण गुंफ़ुन खुलली
जशी चाफ़्याची कळी

भावलं मला तुझं बिनधास्त वागणं
कोणालाही न घाबरणं, अन स्वच्छंदी असणं
पण माझा पाय मुरगळला ना जरी,
तरी लगेच कवरं-बावरं होणं

कॅन्टीन मध्ये शिरता शिरता
आण्णा, एक डोसा.. दो कटिंग, म्हणत
आलेले बील चक्क डीब्या समोर सरकवणं
पण माझ्या कॉफ्फी चे पैसे, मात्र तूच देणं

तुझं असणं,सांगणं, बोलणं, बघणं
तोंडभर हसणं आणि पारदर्शी जगणं                                        
औपचारिकतेच्या नियमांना सरळ फाटा देणं
मी तुझ्यात यामुळे अधिकच गुंतत जाणं                          
                       
किती झपाटलेले होते ना रे ते दिवस?
तासंतास घालवले आपण कट्यावर
मित्र मैत्रिणींच्या घोळक्यातसुद्धा
जपत होतो आपले मंतरलेले स्वतंत्र क्षण ..

कॉलेज संपले , कॅन्टीन, कट्टा
मित्र मैत्रिणी सारे सारेच भूतकाळ झाले
तुझ्या माझ्यातले ते रेशमी बंधही
त्या चाफेकळी बरोबर कोमेजून गेले

त्या दिवशी फेअरवेल पार्टी नन्तर
स्वप्न आणि वास्तव खूप झगडले,
तुझ्या करिअर ग्राफ पुढे मी खूपच छोटी ठरले
एकटीच मग कितीवेळ त्या चाफ्याखाली रडले

आज reunion साठी पुन्हा इथे आलेय
खूप वर्षांनी आज त्या चाफ्याखाली थांबलेय..
किती हासू किती आसू ह्या चाफ्याने बघितलेत,
तरी माझे हरवले क्षण त्याने अजून प्रेमाने जपलेत!

"आण्णा"ला पाहून बसलेला अजून त्याच खुर्चीत,
सारे सारेच रंगून गेलेत college च्या आठवणींत ..
माझ्या मात्र मनात, पिंगा घालतोय तो चाफा
"तू "आणि तो सोडून आठवणीच नाहीत रे माझ्या

वाटले सारी बंधने झुगारून तुझ्यासमोर यावे
खूप खूप रडून "का निघून गेलास?" विचारावे
आवेगात उठले मात्र आणि  नजरा- नजर झाली
त्या परक्या नजरेने पाउलाताली ताकदच गेली
  
आज पहिल्यांदाच पाहतेय मी
तुझे औपचारीक, फसवे हासू ..
आणि ऐकतेय  yes dear , thanks, sweety, ok , fine
असले बुळबुळीत शब्द वापरलेले तू !

आज तू order केलीस cold coffee,
तोलून मापून बोलत होतास मध्येच काही ..
खिशात हात घालत राजा आज उदार झाला,
डिब्या नावाचा दोस्त मात्र, उगीच उदास झाला!

एक मोरपीस आणलेले मी खास तुझ्यासाठी
ते पाहून, फक्त हसून हळूच म्हणालास
"आतातरी स्वप्नातून बाहेर पड ग 'शोना' 
हे समजावून पण तप लोटले पुरे आता"

ते मोरपीस बघ कसं कवर-बावर होतंय 
तुझं- माझं नातच जणू पोरकं झालय
आपली ओंजळ पुरी रिती करून
सोनचाफ्याचे झाडही सुकून गेलेयं

खरचं तुझ्या-माझ्यात आता उरलय काय?
गढुललेल्या आठवणी , मळभलेल आभाळ
सुकलेला तो चाफा, ती अनोळखी नजर
आणि ..  दाबलेला फ़क्त एकच हुंदका!!

                                        ...  रेश्मा आपटे 

9 comments:

  1. भावना पोचल्या.
    मोरपिस जपुन ठेव. कधी कामी येईल सांगता नाही येत.
    All the best. Keep it up....!

    ReplyDelete
  2. kya baat hai reshma.........

    ReplyDelete
  3. vakilin bai vishwasach basat nahi hi tumhi keli aahe kavita mhanun....
    ekdam class........ masta....

    ReplyDelete
  4. @ KAUSTUBH : :P :P :P

    @omkar n rohan n kaka : thanks :)

    @ sane :mech lihiliye ho :P

    ReplyDelete
  5. अप्रतिम शब्द. बाकी शब्दांच्या खेळत वकील कुणाला हार जात नसावेतच! ;)

    ReplyDelete
  6. Resh keep it up fakta te kaatya badal n katta kar ga

    ReplyDelete