मोरपीस जणू फिरते तनी,
वेणू नाद हा पडता कानी,
काहूर मनात, अन हुरहूर आगळी
मोहरते आठवता, छबी सावळी
थरथरते अधर, लाली गाली
किंचित लाज, अधीर नयनी
ललना साजिरी, नटली सजली
शाम सख्यावर, आणिक भाळली
बावरे मन, अन आशा कोवळी
मिलनास आसुसली, राधा भोळी
पाहून अधीर राधा, बोले सखी
"होईल बोभाटा ग गोकुळी!",
नयनी पाणी, मिटे पापणी
अस्वस्थ राधा,आजही नंदनवनी!!!
... रेश्मा आपटे
ata chhaaan jamli ahe
ReplyDeleteमनाला भावलेली कविता .
ReplyDeletethanks a lot :)
Delete