Friday 9 June 2017

शोध गोष्टीचा भाग २

तर या शोध मोहिमेत माझ्या मैत्रिणीने जिला आपण गोष्ट मैत्रीण म्हणतोय तिने एका काकांबद्दल सांगितलं. तर ते काका एका गोव्हरमेंट ऑफिस मध्ये कामाला होते. स्वछन्दी माणूस अत्यंत दिलदार आणि आयुष्याचा उपभोग घेणारा. ९ ते ५ काम झालं की घराच्या बागेत काम करणारा, बायकोला रविवारी फक्कड चहा करून देणारा, क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन तेंडुलकर म्हणजे देव असल्यासारखा क्रिकेट पाहणारा आणि किशोर कुमार रक्तात भिनलेला. ऑफिसात फायलींचे गड्डे च्या गड्डे वाळवीच्या गतीने खाऊन टाकायचा पण कॉम्प्युटर ही काळाची गरज हे नाकारणारा. आम्ही निवृत्त होईस्तोवर काही तुमचा संगणक सरकारी दफ्तरात येत नाही आणि तो शिकायची गरज तुमच्या सारखी नव्या पिढीला जी मुळातच आळशी आणि स्मरणशक्तीची कमी आहे त्यांना आहे. आऊटकी पर्यंत परवचा पाठ आमचा आम्हाला काय गरज नाही त्या संगणकाची.

तर असा हा अवलिया आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणारा आणि सतत आनंदी वावरणारा. निवृत्तीला दोन वर्ष राहिली आणि मन लावून काम केलेलं आजाराचं कारण देऊन कधी सुट्टी घेतली नाही आणि इंडियाचा क्रिकेट सामना असताना कधी कामावर गेला नाही. असा माणूस अलीकडे बऱ्याचदा घरी असतो. सुट्ट्या संपवत असेल म्हणून सुरुवातीला कोणी लक्षदिलं नाही पण चिडचिड वाढली, ऑफिसातून मेमो आला, आदळ आपट सुरु झाली, आवारातली तुळस वैकुंठाला गेली तरी माणूस काही पाण्याचा थेंब घालेन तेव्हा माझ्या मैत्रिणीने जिला ते मुलगी मानतात तिने त्यांना विचारलं. खूप टाळाटाळ गेली पण मग कळलं की गाडी संगणकाशी अडतेय आणि गडी पहिल्याच बोल वर आऊट झालाय. इतकं काही कठीण नाही हो काकाअसं म्हणत काकांना संगणकाचा श्री गणेशाकरायला लावला.  पण काका काही हात लावेनात.शॉक बसेल या भीतीने काका हात लावत नव्हते हे कळल्यावर आम्ही दोघी खूप हसलो.

ती पुढे सांगत होती, काकांच्या ८० वर्षाच्या आई म्हणाल्या अरे काळाप्रमाणे बदलावच लागत. मी नाही का नऊवार सोडून पाचवारी लुगड्यात आले आणि आता गाऊन पण घालते. बदल हाच काय तो अटळ असतो रे बाबा. आधीच हे जाणून वागला असतास तर आत्ताचा मनस्ताप टळला असता. पण काही हरकत नाही याचेही काही फायदे असतील. भीड चेपली की सहज जमेल, त्याची गोडी लागली की त्यातही रमेल मन. पण जुनेर घेऊन बसलास तर मात्र नवीन काहीच कळणार नाही आणि मनस्ताप टळणार नाही. काळाप्रमाणे डोळे उघडे ठेऊन चालावं म्हणजे आपण मागे पडत नाही आणि जुनाट होत नाही.

 मी उत्साहाने विचारलं, "सो? काळाबरोबर बदल ही theme का?" तर म्हणाली, "इतक्या पटकन कळलं तुला? हे तर who moved my cheese मधेही आहे हो ना?" मी म्हटलं, "हो". मग म्हणे, "तर मग नाही दम नाही या theme मध्ये" काहीतरी नवीन हवं स्वतःचं. थोडक्यात काय तर शोध सुरूच.

 आहे का तुमच्याकडे एखादी गोष्ट?
जी कमी करेल माझे कष्ट?

भाग २: धडा २:
 खरंच आजीने who moved my cheese चा गाभा सोप्पा करून सांगितला. :
१: old beliefs do not led you new cheese
2:noticing small changes early helps you to adapt bigger changes which are to come
3: move with cheese
4: When you move beyond fear, you feel free

No comments:

Post a Comment