Monday, 11 September 2017

शोध गोष्टीचा : भाग ५

गोष्टीचा शोध निरनिराळी वळण घेत होता. तर दोन आठवड्यांनी जेव्हा आमची ऍडमिन  finally ग्रुप मध्ये परत ऍड झाली तेव्हा परत ग्रुप मध्ये जीव आला. परत एकदा ग्रुप ऍक्टिव्ह झाला. सुरु झाला परत शोध गोष्टीचा.  मग पुढचे दोन आठवडे खूपच मनापासून चर्चा झाली. एक सुंदर माहितीचा कोष तयार झाला. विषय होता स्त्री भ्रूण हत्या. विविध विषयातील तज्ज्ञांनी भरलेल्या या ग्रुप मध्ये चर्चा सुरु झाली.एकीचं मत होत की शहरात असे चाळे  दाखवून काय फायदा? ह्या गोष्टी मुंबईत होत नाहीत. त्यावर एका मित्राने एक  पोस्ट केला. मुंबई आणि परीसरातील स्त्री भ्रुण हत्येच्या केसेस, त्यातील स्वयंसेवक (activists ) अशी संपूर्ण माहित्ती समोर ठेवली. मीही काही केसेस आणि PCPNDT कायदा आणि तरतुदी यांची माझ्या ज्ञानाप्रमाणे भर घातली. एका अनुभवी डॉक्टरने त्याच्या ओळखीत घडणाऱ्या काही गोष्टीवर प्रकाश टाकला. अश्या पेशंट्स ची मानसिकता एका counselor मैत्रिणीने उलगडण्याचा प्रयत्न केला.

डॉक्टरी पेशाचा मांडलेला  बाजार, लोकांची चुकीची वृत्ती, कोती मानसिकता या मध्ये भरडल्या जाणाऱ्या महीलांपासून ते दुसऱ्या एका मत्रिणीच्या घरी काम करणाऱ्या काकूंच्याभंडावून सोडणाऱ्या तत्वज्ञानापर्यंत सगळ्यावर चर्चा झाली. त्या काकूंनच म्हणणं अस होत की, " पोटचा गोळा कोणी मारून टाकत नाही पण २ मुलींच्या लग्नासाठी हुंडा जमा करताना नाकात दम येणारेत, आणि नाही झाला हुंडा जमा तर बिजवर, लुळा, मोठाड कशाही माणसाशी लगीन लावावं लागेल मग तिची रोज माझ्यासारखी अवस्था होणार. कधी काळचा गोरा रंग आणि रूप सुजलेल्या चेहऱ्यामुळे आणि नवर्याच्या संशयी स्वभावामुळे रोज पदर आड लपवावे लागेल आणि स्वतःहून फक्त ५-६ वर्षांनी लहान असलेल्या मुलीची आई व्हावं लागेल. तिच्या नवर्याच्या रूपात जर असाच नराधम मिळाला तर स्वतःची इज्जत वाचवणं कठीण त्यापरीस ती जन्माला न येताच मेलेली नाही का बरी?. माझ्या मैत्रिणीने तिला समजवायचा प्रयत्न केला तर म्हणे, "तक्रार कोणाकडे नोंदवायची? दुसरा पुरुष? वर्दीतील झाला तरी मळके कपडे बघून आमच्याशी वागायची पद्धत बदलते  बाय". तिला समजावलं अग तुम्ही गप्प राहाता म्हणून तुमच्या धन्याच भागत तर म्हणे, "मग काय रोज भांडण करून मार खायचा? की आपल्या पोटची नसली म्हणून वयात आलेली मुलगी बाप नावाच्या पुरुषाच्या हातात सोडून जायचं पळून? वर म्हणे तुमच्यासारखी नाती नसतात बाय सगळी. आम्ही राहतो तिथे फक्त दोन प्रकार असतात बाई आणि बाप्या ! आणि प्रत्येक घरात एका बाईला सोसावं लागतंच तरच बाकीच्या पोरी सुरक्षित राहतात. असं उघड जीण देण्यापरीस मारलेलं काय वाईट?"

यावर आमची खूप साधक बाधक चर्चा झाली (त्या हाती लागलेल्या ज्ञानाचा वापर उकृष्ट केला जातोय त्याबद्दल नंतर कधीतरी). तर ग्रुप मधील एकाने मांडलेल्या प्रस्तावाने आम्ही सगळे हुरळून गेलो की इतका गंभीर विषय विनोदातून पोचवून जागृती करायची.

 you tube वर सध्या गाजणाऱ्या मालिकांची चर्चा सुरु झाली आणि मग  you tube वर तुझा चॅनल सुरु कर आणि तिथे एक एक सिरीज पोस्ट कर असा सल्ला गोष्ट मैत्रिणीला दिला. ह्या चर्चेत तिचा अमूल्य वाटा  आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीच. ही आयडिया आम्हालाच इतकी आवडली की वाटलं, गोष्टीचा शोध संपला. she started living  happily ever after  वैगरे लिहावं लागेलं आता.

पण आमचा अंदाज सपशियल चुकला. कारण एक सुंदर सकाळी गोष्ट मैत्रीण (आमची admin ) ने एक पोस्ट टाकली. " एका सुंदर विषयाला सुरेख मांडण्याच्या कल्पनेसाठी सर्वांचे आभार. पण या ग्रुप चा उद्देश हा गोष्टीचा विषय शोधणे हा आहे आणि आता आपण परत त्याकडे वळूयात". प्रत्येकातील creativity ला सलाम.

हे वाचून आम्हाला ग्रुप चा भविष्य परत खडतर असल्याची जाणीव झाली.
म्हणजे परत ग्यानबा  तुकाराम.

No comments:

Post a Comment