Wednesday, 11 October 2017

सकाळ :

एक सकाळ सजलेली, नवी आशा ल्यालेली 
रवीकिरणात सजलेली, लख्ख प्रकाशात न्हालेली 

प्रेमाने तिने शिकवलेली, अंतर्मनात मग गवसलेली
स्वछ विचार पेरणारी, अलगद शांत करणारी

भीती, मरगळ चिंता सगळी, हळूच कवेत घेणारी
प्रेम विश्वास उत्साहने, मनावर रुंजी घालणारी

भाषेविणं जरी बोलणारी, तरी मनापर्यंत पोहोचणारी
स्वछ विचार पेरणारी, जगण्याची ऊर्जा पुरवणारी. 

No comments:

Post a Comment