Tuesday, 22 November 2011

मुक्तबंध

मलाही एकदा मृद्क्कण बनून 
गरारा वार्यावर भरारायचय  
खूप खूप उंच जाऊन 
एकदा त्या आभाळाला शिवायचं

नात, मुलगी, बहिण, प्रेयसी
मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय  
हात पसरून खुल्या मनान
फक्त मी म्हणून जगायचंय 

बांधीव उंबरा ओलांडून
मला स्वत:ला ओळखायचंय 
मोकळा मोकळा श्वास घेऊन 
मनावरल मळभ पुसायचंय 

तो उंबरा ओलांडताना
मन स्थिर ठेवायचंय 
खोल काही तुटेल आत
तरी स्वत:ला सावरायचंय  

स्वैर करताना संचार
जगापासून अलिप्त राहायचंय 
सारे सारे तुटतील आधार
तरी स्वप्नांना जागावायचंय  

त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन
वेड्यासारख त्यांमागे धावायचंय 
सारी सारी बंधने झुगारून
फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय  

                                  ...  रेश्मा आपटे 



4 comments:

  1. शेवट छान केला.
    पण पहिलीच लाईन bouncer गेली. मृद्क्कण म्हणजे काय god knows :P
    कवीचे मराठी चांगले असेल पण श्रोत्यांच्या level नुसार शब्द वापरावे. :)
    Length wise perfect aahe. 12 car train nahie te changle :)


    तो उंबरा ओलांडताना
    मन स्थिर ठेवायचंय
    वा.............

    ReplyDelete
  2. Kaustubh

    mruda mhanaje maati anai kan mhanaje kan ,,, mrudukkan mhanaje maatichaa kan .. got it???

    Lalit Adhare

    Dhanyawad :)

    ReplyDelete
  3. बांधीव उंबरा ओलांडून
    मला स्वत:ला ओळखायचंय
    मोकळा मोकळा श्वास घेऊन
    मनावरल मळभ पुसायचंय >>>> mastach

    lihit raha ashich :) kahi lines me dhapatey :)

    ReplyDelete