माझ्या शाळेतल्या मैत्रिणीसाठी खास काहीतरी : ( स्क्राप बुक मधला एक भाग )
लग्नाच छोटस गिफ्ट : 1/12/2011.
हातात गुंफलेले सुंदर हात
इवल्या पावलांचे नखरे सात
अ आ इ ई, कागदाची होडी,
कधीच नाही तुटली आमची जोडी
रुसवे फुगवे आणि कट्टी बट्टी
नकळत जमली आपली गट्टी.
रींगा रींगा, गोल्स्पोट, लंगडी, कब्बडी
रडत भांडत खेळत होतो पकडा पकडी
lazy merry , गणिते, अन अल्कली,
नकाशे, सिध्द्धाता आणि सन-सनावळी,
निबंध, कविता, भरताना प्रयोगाची वही
आलीसुद्धा leaving certificate वर शाळेतून सही
पुन्हा कधी? कुठे भेटू?? डोळे पाणावले
पण "जीन्स शॉपी" ने सारे प्रश्नच सोडवले
कोलेज ऑफिस आता "तुझ्या" लग्नाची तयारी
छोटासा प्रयत्न आठवायचा शाळेची वारी...
... रेश्मा आपटे
No comments:
Post a Comment