Monday, 14 April 2014





पुन्हा पुन्हा तू समोर यावे, अन पुन:पुन्हा मी गप्प व्हावे 



 बोलता बोलता शब्द सरावे, तुझ्याकडे मी पहात रहावे, 

पाहता पाहता मी हरवावे,  लाजून मग हळूच हसावे... 

शब्द कुठले कसे निवडावे, मनात ते कितीदा घोकावे

हळुवार मग तू जवळ यावे, कटाक्षात एका जिंकून घ्यावे...  

गुज मनीचे नजरेत झुरावे, स्पर्शात तुझ्या ते त्रिवार हरवावे, 

पुन्हा पुन्हा तू समोर यावे, अन पुन:पुन्हा मी गप्प व्हावे...  

3 comments:

  1. सुन्दर

    ReplyDelete
  2. hi

    thanks ... but to whom I am thanking to?

    who has replied? i cant see your identity ,,, can you tell me who is this?

    ReplyDelete