बागडली दिसभर, कौतुकात न्हाली
साज शृंगारात, ही नवरी सजली
आला निरोपाचा क्षण, दाटे गहिवर
निसटले काही हातून, वाटे क्षणभर
मिठीत आईच्या, मुसुमुसती डोळे
बाबांच्या प्रेमाने, मन गलबले
बाबांच्या प्रेमाने, मन गलबले
स्वप्न नवे आज, खुणावते जरी
बावरते मन, पाऊल अडते दारी
तितक्यात येई खंबीर, खांद्यावर हात
जागवी विश्वास, पाणावल्या डोळ्यांत
जागवी विश्वास, पाणावल्या डोळ्यांत
त्याच्या सवे आज, चाले सासुराची वाट
जपून मनात, बंध नाळेचे अतूट
… रेश्मा आपटे
No comments:
Post a Comment