Saturday 11 July 2020

लॉक डाऊन डायरीज

खूप प्रेम करून लग्न केलं तिने. लग्न ठरलं, ते दोघे भेटत राहिले रुसवे फुगवे ते मनवण यातला रोमान्स कधी त्याला उकललाच नाही. कळली ती चिडचिड! त्याच ठरलेलं होत हे योग्य ते अयोग्य. तिच्यापेक्षा खूपसा वेगळा रोमान्सशी  फारसा संबंध नसलेला ' तो ' तिला आवडला. फार क्लिअर वाटायचा तो तिला. 

तिला बोलायला खूप आवडायचं त्याला अवडीचंच बोललेलं आवडायचं. ती वाहत होती तिच्या मनातल्या त्याच्या प्रतिमेत तो अलिप्त होता बहुतेक. 

ती स्वतःला स्मार्ट म्हणायची, समाजाच्या योग्य आयोग्यतेची गणित तिला फार जमायची. कुठे हसायचं, कुठे हटकायच, कुठे भांडायचे अन कुठे एक पाऊल पुढे तर कधी एक पाऊल मागे टाकायचं हे तिला बरोबबर उमगायच. नाती त्यामुळे फुलतात हा तिचा अनुभव होता.

ते दोघे भेटत राहिले. ती स्वप्नात आणि तो भविष्यात जगायचा. त्याचे ते प्लॅन्स ऐकून ती भारावून जायची. तारुण्याची उमेदीची वर्ष त्यांनी एकत्र घालविली, म्हणजे लग्न संस्कार? की सोहळा? काय तो करून एका पवित्र बंधनात दोघे  एकत्र आले की बांधले गेले समाजाच्या चौकटीत? 

ते काही असो, तर ती दोघे लग्न करून एक सुखद संसाराची स्वप्ने पहात एकत्र नंदू लागली. ती रुळत होती, शिकत होती सासू सासरे, दीर, नणंदा अशी नवी नाती स्वीकारायला,  या नंतर आपसूक येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलायला. ती खुलत होती,  शोधत होती तिच्या मनातल्या प्रतिमेत त्याला...

काही दिवस, महिनेही नाही गेले आणि तणावाने आधी बेडरूम मग घर आणि मग मनं ओतप्रोत भरली. आधी लग्नास योग्य असलेली ती त्याला असमंजस, त्याला त्रास द्यायला लग्न करून आलेली खलनायक वाटायला लागली. तिची कथा काही निराळी नव्हती तिलाही तो रुक्ष आणि स्वमग्न वाटायला लागला. त्यात भर म्हणजे सासर आपलं मानून सगळं करत असूनही बेजबाबदार पणाचं लेबल तिच्या माथी चिकटलच.

हळू हळू बोलण्याची भांडण झाली. अबोला नव्हता पण एक घुसमट होती. नात्यात एक दुरावा पसरत होता. वाद नको म्हणून सो कॉल्ड सोडून दिलेल्या गोष्टी मनात साचत रहायच्या.  एकमेकांना सोडायची हिम्मत नव्हती किंवा नात फरफटत न्यायची सवय झालेली काही असेल पण ते एकत्र राहिले.

 आजारपणात साथ, गरजेला हात मिळत होता पण मनं मात्र कोरडीच होती कित्येक वर्ष्यापासून. भांडून चिडून कंटाळून काही विषय कायमचे बंद झाले ते मॅच्युरिटी च्या गोड लेबल खाली  मिरवले. वरवर प्रगल्भ वाटणार नातं आतून पोकळ आहे, हे फक्त त्याच दोघांना माहीत होते आणि त्या दिखाव्याच्या आत सोसलेले एकटेपण आज त्यांना सलत होतं.
मोकळं व्हायचं होत त्यांना. २ वर्ष्यापासून प्रयत्न करत होते वेगळं होण्याचा पण पंढपेशी मन धजत नव्हते.  गुंता फार वाढत होता.

अशात मग सक्तीची बंदी आली. मुलगा घरी येऊ शकत नव्हता आणि हे कुठे जाऊ शकत नव्हते. कित्येक वर्ष  एकमेकांच्या नसण्याची सवय असलेल्या या दोघांना 2 आठवड्यानंतर एकमेकांशी बोलावेच लागले आणि आश्चर्य म्हणजे या समांतर जगणाऱ्या जीवांना एकमेकांशी भांडत भांडत मग बोलताही आले.

5 आठवड्यांनंतर  गुंता सुटला, पण वेगळे न होण्याच्या निर्णयावर. नव्याने ते दोन जीव उतार वयात एकमेकांना भेटले होते. अधिक पोक्त अधिक विचारी बनून.

 6 व्या आठवड्यात त्यांच्या लग्नाला 33 वर्षे पूर्ण होतील.

म्हणजे त्याचा anniversary cake खयला काही मला जाता येणार नाही पण निदान लॉक डाऊन संपल्यावर यांच्या बरोबर कोर्टात मात्र जावे लागणार नाही हे निश्चित.

लॉक डाऊन चा positive effect 

टीप: हे माझे नातलग लागत नाहीत त्यामुळे कोण ग असे पर्सनल वर विचारू नका. फक्त खूप नकारात्मक वातावरणात एक पोसिटीव्ह गोष्ट अनुभवली ती लिहावीशी वाटली म्हणून हा लेख प्रपंच

.... रेश्मा आपटे

No comments:

Post a Comment