Saturday, 17 June 2017

शोध गोष्टीचा : भाग ४

आमचा गोष्टीचा शोध वेगवेगळ्या विषयांना हात घालत होता. तर आता वेळ होती पौगंडावस्थेतील मुलांची. तर आयुष्याच्या सर्वात सुंदर वळणावर नेणारा हा प्रवास आम्ही परत अनुभवाला youth म्हणजे अगदी १६-१७ वर्षांचे होऊन विचार केला हा सगळ्यात सुंदर टप्पा होता आमच्या गोष्टीच्या शोधाचा.

तर पुनश्च कॉलेजात गेलो म्हणजे virtually हा. मुद्दा खूप छान होता कॉलेजातील पाहिलं प्रेम किंवा आकर्षण! मग काय जो तो उठसूट वर्णन करत सुटला. त्या ग्रुप मध्ये जे ओळखीचे होते त्यांनी ती सध्या काय करते चा एक प्रयोग पण केला. प्रत्येक जण विशेषतः मूले आपले अनुभव सांगत होती. तिला कस पाहिलं, कसा नंबर मिळवला, खर्चाला पैसे कसे जमवले,  कस पटवलं किंवा कसे सपशेयल तोंडावर आपटले. सगळं वाचून मज्जा येत होती. मग एक मुलगी खूप भडकली मुलींना तेव्हा कसा वाटत असेल याच अगदीच अचूक वर्णन केलं तिने. मला तीच कौतुकच वाटलं कस बाई जमत याना मनातल्या प्रत्येक भावनेला, आंदोलनाला वाट करून द्यायला? मला तेव्हाही नाही जमल आणि आत्ताही नाही. असो.

मग एक गम्मत झाली एका मुलाने खूप बारकाईने एका मुलीच वर्णन केलं, एक सुकलेल्या गुलाबाच फुल पाठवलं आणि एक पिवळसर कागदाचा फोटो पाठवला त्यावर लिहिलं होत,"मला सिनेमे पाहायला आवडत नाहीत,  कवी कल्पना सुचत नाहीत, काव्य कळायला पण थोडा वेळ लागतो, तुझ्यावर कविता लिहावी इतकी माझी कुवत नाही, तुझ्या गुणांचं आणि सौंदर्याचं वर्णन करता येईल इतके कोणत्याच भाषेत शब्द नाहीत. पण तुझ्या भावना मला कळतात, तुझी तगमग, धडपड मला समजते. हो म्हणालीस तर तुझ्याबरोबर म्हणशील ते सिनेमे पाहीन फक्त काव्यात्मक romance  ची अपेक्षा ठेऊ नकोस, जितका आणि जसा जमेल तितका तुला support करेन तुझी प्रत्येक शॉर्ट फिल्मसुंदर व्हावी म्हणून प्रार्थना कारेन".

त्या खाली एक नोट : तेव्हा बोललो असतो तर माझा आज बदलला असता. पण रोज डे ला तुझ्या हातातल्या फुलात डोलणार एक लालगुलाब पाहिला आणि नाही सांगता आलं तुला. आज रहावल नाही म्हणून सांगितलं. मला माहितेय तुझ्या आयुष्यात झालेली उलथा पालथ, भारावून घेतलेले निर्णय, सगळं काही सोडून तुझं जनजागृती आणि शॉर्ट फिल्म्स नावाचा श्वास कोणासाठी तरी सोडायला निघालेलं वेड धाडस आणि नंतर ज्याच्यासाठी केला अट्टाहास त्याने सोडलेली साथ अगदी त्यानंतर आलेली वादळं सुद्धा. पण तू मला त्या सकट  आजही तितकीच आवडतेस.

हे वाचून त्यावरून एकाच हलकल्लोळ उठला. कोणी त्याला हा फोरम वापरला म्हणून दूषण देत होत, कोणी हिमतीची दाद देत होत, कोणी त्याला romantic म्हणत होत तर कोणी भित्रा!
मग कोणीतरी पटकन पोस्ट केली,. कॉलेजच्या शेवटच्या दिवशीपासून आजपर्यंतचा प्रवास काय कमी फिल्मी आहे का तुझा?  उगीच आपलं स्टोरी स्टोरी करत फिरतेय. हो जा सुरू.
या सगळ्यात माझी गोष्ट मैत्रीण मात्र गप्प होती बहुतेक आठवत होती तिचा  ८ वर्षाचा संघर्ष! आमच्या ग्रुप ऍडमिनने यानंतर जवळ जवळ २ आठवडे ग्रुप सोडला.
ती पुन्हा तो प्रवास रंगवेल इतकी ताकद निदान अत्ता तिच्यात नव्हती.
हा पण तिच्या गोष्टीतल्या होरोचा विचार तिने करायला काही हरकत नव्हती.  

Friday, 9 June 2017

शोध गोष्टीचा : भाग ३

technology चा उपयोग कोणाला कसा होईल माहित नाही पण या शोध मोहिमेकरता एक whatsapp ग्रुप सुरु केला तिने "in search of story "असं नंतर नामकरण करण्यातआलं त्याचं . तर याच ग्रुप वर एका मित्राने पोस्ट केलेली की लहानपानाची धम्माल, खेळ, मस्ती यावर काहीतरी बनाव तू (तो तिचा शाळेचा मित्र होता म्हणे) तर  ठिक्कर, लपाछुपी, मामाच पात्र हरवलं ते अगदी आव मीना ... पर्यंत सगळ्याच्या चर्चारंगल्या  त्या थांबवायला हिने पोस्ट केलान
स्टोरी मैत्रीण  "please stop such discussions dont spam the group"
मैत्रीण २ : its already spam darling. अरे करुदेत ना बडबड तुला काहीतरी सुचेल काहीतरी क्लीक होईल यातून काय सांगावं.
स्टोरी मैत्रीण : नाही अश्या असंबद्ध बडबडीतून काहीच साध्य होणार नाही. आणि आता मला तुम्ही चिडवताय. तुम्हाला माझी तडफड दिसत नाहीए का?
मित्र १: रीलॅक्स यार मस्ती करत होतो. तुझ्यावर नाही हसते कोणी प्रयत्न करतोय तुला मदत करायचा पण यामुळे आनंद मिळतोय खूप हसतोय आम्ही गेले काही दिवस
मित्र २: ए आता जर कोणी फालतुगिरी केली तर ग्रुप मधून काढून टाकू.
मित्र ५,४, १ :- आता हास बघू काय लहान मुलांसारखी रडते?
मैत्रीण २ : अरे सॉरी. पण I am loving this group
स्टोरी मैत्रिणी : ठीक आहे. हरकत नाही मला कळतंय तुम्हाला वैताग येत असेल पण तुम्ही रिझल्ट पाहाल तेव्हा समजेल तुम्हाला. आता कामाला  लागा आणि काही सुचलं तर नक्की पोस्ट करा.
मी: on lighter note guys. मी सांगू का एक गोष्ट?
स्टोरी मैत्रिणी : कसली गोष्ट?
मी: "कापूसकोंड्याची?" लोल हाहाहाहाहा
गोष्ट मैत्रिण: angry faces
मित्र ४:  हाहाहा  हिला रिमूव्ह करा रे ग्रुप मधून.
मी : रिमूव्ह करा काय म्हणतोस कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?
few members :laughing f aces
मी; laughing faces काय टाकताय कापूस कोंड्याची गोष्ट सांगू?

५ मिनिटे कापूसकोंड्याने धम्माल केली आणि गोष्ट मैत्रिण पण हसायला लागली. तिने तर कापूसकोंड्या इतका एन्जॉय केला की काही वेळ तरी तिच्या मेंदूने फक्त हास्य अनुभवलं असेल. नाहीतर तिच्या मेंदूच सध्या तेच झालय काही ऐकलं, पाहिलं की एकाच प्रश्न "गोष्ट मिळाली?"

भाग ३ : धडा ३
मित्र मैत्रिणी हा आयुष्यातला अविभाज्य घटक असतो आणि खळखळून हसण्यासारखं दुसरं औषध नसत. हसणं आणि हसवणं यासारखं दुसरं समाधान नाही. निखळ हास्यात एक जादू असते.

गोष्ट ऐकायची ये का कोणाला? सांगू? कापूसकोंड्याची? 

शोध गोष्टीचा भाग २

तर या शोध मोहिमेत माझ्या मैत्रिणीने जिला आपण गोष्ट मैत्रीण म्हणतोय तिने एका काकांबद्दल सांगितलं. तर ते काका एका गोव्हरमेंट ऑफिस मध्ये कामाला होते. स्वछन्दी माणूस अत्यंत दिलदार आणि आयुष्याचा उपभोग घेणारा. ९ ते ५ काम झालं की घराच्या बागेत काम करणारा, बायकोला रविवारी फक्कड चहा करून देणारा, क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन तेंडुलकर म्हणजे देव असल्यासारखा क्रिकेट पाहणारा आणि किशोर कुमार रक्तात भिनलेला. ऑफिसात फायलींचे गड्डे च्या गड्डे वाळवीच्या गतीने खाऊन टाकायचा पण कॉम्प्युटर ही काळाची गरज हे नाकारणारा. आम्ही निवृत्त होईस्तोवर काही तुमचा संगणक सरकारी दफ्तरात येत नाही आणि तो शिकायची गरज तुमच्या सारखी नव्या पिढीला जी मुळातच आळशी आणि स्मरणशक्तीची कमी आहे त्यांना आहे. आऊटकी पर्यंत परवचा पाठ आमचा आम्हाला काय गरज नाही त्या संगणकाची.

तर असा हा अवलिया आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेणारा आणि सतत आनंदी वावरणारा. निवृत्तीला दोन वर्ष राहिली आणि मन लावून काम केलेलं आजाराचं कारण देऊन कधी सुट्टी घेतली नाही आणि इंडियाचा क्रिकेट सामना असताना कधी कामावर गेला नाही. असा माणूस अलीकडे बऱ्याचदा घरी असतो. सुट्ट्या संपवत असेल म्हणून सुरुवातीला कोणी लक्षदिलं नाही पण चिडचिड वाढली, ऑफिसातून मेमो आला, आदळ आपट सुरु झाली, आवारातली तुळस वैकुंठाला गेली तरी माणूस काही पाण्याचा थेंब घालेन तेव्हा माझ्या मैत्रिणीने जिला ते मुलगी मानतात तिने त्यांना विचारलं. खूप टाळाटाळ गेली पण मग कळलं की गाडी संगणकाशी अडतेय आणि गडी पहिल्याच बोल वर आऊट झालाय. इतकं काही कठीण नाही हो काकाअसं म्हणत काकांना संगणकाचा श्री गणेशाकरायला लावला.  पण काका काही हात लावेनात.शॉक बसेल या भीतीने काका हात लावत नव्हते हे कळल्यावर आम्ही दोघी खूप हसलो.

ती पुढे सांगत होती, काकांच्या ८० वर्षाच्या आई म्हणाल्या अरे काळाप्रमाणे बदलावच लागत. मी नाही का नऊवार सोडून पाचवारी लुगड्यात आले आणि आता गाऊन पण घालते. बदल हाच काय तो अटळ असतो रे बाबा. आधीच हे जाणून वागला असतास तर आत्ताचा मनस्ताप टळला असता. पण काही हरकत नाही याचेही काही फायदे असतील. भीड चेपली की सहज जमेल, त्याची गोडी लागली की त्यातही रमेल मन. पण जुनेर घेऊन बसलास तर मात्र नवीन काहीच कळणार नाही आणि मनस्ताप टळणार नाही. काळाप्रमाणे डोळे उघडे ठेऊन चालावं म्हणजे आपण मागे पडत नाही आणि जुनाट होत नाही.

 मी उत्साहाने विचारलं, "सो? काळाबरोबर बदल ही theme का?" तर म्हणाली, "इतक्या पटकन कळलं तुला? हे तर who moved my cheese मधेही आहे हो ना?" मी म्हटलं, "हो". मग म्हणे, "तर मग नाही दम नाही या theme मध्ये" काहीतरी नवीन हवं स्वतःचं. थोडक्यात काय तर शोध सुरूच.

 आहे का तुमच्याकडे एखादी गोष्ट?
जी कमी करेल माझे कष्ट?

भाग २: धडा २:
 खरंच आजीने who moved my cheese चा गाभा सोप्पा करून सांगितला. :
१: old beliefs do not led you new cheese
2:noticing small changes early helps you to adapt bigger changes which are to come
3: move with cheese
4: When you move beyond fear, you feel free

शोध गोष्टीचा : भाग १


माझी एक मैत्रीण खूप दिवस तिच्या शॉर्ट फिल्म साठी एक गोष्ट शोधतेय. तिला काहीतरी हटके स्टोरी हवीये म्हणे. जो भेटेल जिकडे जाईल तिथे ती तिची गोष्ट.. नव्हे नव्हे स्टोरी शोधण्यात मग्न होते. मित्रांबरोबर कट्ट्यावर काही love stories वर चर्चा झाल्या, झोपडपट्टीत जाऊन भारतातील गरीबी वैगरे पाहून झाली, एका सैनिक मित्राच्या आईशी गप्पा झाल्या, थोरा मोठ्यांची आत्मचरीत्र पालथी घालुन  झाली, अगदी तर अगदी इंग्रजीत मनुस्मृती सुद्धा वाचून झाली. गीता बायबल कुराण यांच्या contains  (तिचा शब्द) वर तज्ज्ञांशी चर्चा झाल्या पण पठ्ठीला तिची गोष्ट काही सापडत नव्हती.

मग तिने एक whatsapp ग्रुप बनवला गोष्ट शोधण्यासाठी. त्यात आऊच्या काऊलाही जागा मिळालीये. हा तर तिला मराठी ब्लॉग्स वाचायचा छंद लागलाय सध्या आणि म्हणून तिची आणि आमची मातृभाषा तिला सोपी करून समजावण्याची जबाबदारी अस्मादिकांनवर मैत्रीचे ऋण म्हणून आली. तिच्या निमित्ताने परत वाचन सुरु झालं हा एकच काय तो फायदा बाकी सगळा त्रास. सुरुवातीला आम्ही तिला उत्सहाने साथ दिली. मग मात्र तो जाच वाटायला लागला. आम्ही सगळे प्रयत्न करून थकलो पण तिला काही तिची गोष्ट सापडेना. हातातला प्रत्येक कागद, भेटणारी प्रत्येक व्यक्ती या सगळ्याकडे ती फक्त मला माझी "स्टोरी" मिळेल या आशेवर बघते. परवा whatsApp group वर तिने झपुर्झा चा अर्थ विचारला. मी सांगितला तर लिहिते;

स्टोरी मैत्रीण : " nope word is sexy but not the meaning need to search something else"
यावर माझा मित्र खूप भडकला आणि तिला म्हणाला;
मित्र १ : चुलीत गेली तुझी शोधमोहीम. जगण्यातला अर्थ विसरलीयेस. वर्तमानात जग, तू स्टोरीच्या मागे धावणं बंद कर आणि तुझी तू जग, जरा मेंदूला आराम दे. मिळणाऱ्या नव्या अनुभवांना cherish कर.
मैत्रीण २: lol  हिच्या नादात आपण सगळेच फिलॉसॉफिकल आणि काव्यात्मक बोलायला लागलोय.
मित्र १: बघ मग तुझी गोष्ट तुला मिळेल. आम्ही आहोतच पण असा ध्यास घेऊ नकोस ग.
मित्र ५: relax dear things will happen when they are suppose to happen. its all divine time relax and breath.
स्टोरी मैत्रीण : आईला म्हणजे i am in a state of झपुर्झा
मित्र २ , मैत्रीण ३ आणि मित्र ४ :- angry faces,
मी : नाही ग याला झपाटलेला म्हणतात
ALL :- laughing symbol LOL LOL
स्टोरी मैत्रीण : surprise face

तिला तिची गोष्ट नाही मिळाली अजून पण मला माझा टॉपिक मिळालाय. तिच्या गोष्टीच्या शोधात मला मिळालेले विषय आणि गोष्टी यांचा हा भाग :१

तिच्या वेडेपणावर हसताना मला मिळालेली किंवा समजलेली गोष्ट म्हणजे. प्रत्येक गोष्ट घडायला वेळ यावी लागते. आपल्याला हवं म्हणून काहीच घडत नाही. मग अश्या वेळी panic न होता विश्वास ठेवायचा आणि एक दिवस प्रत्येकाला आपली "गोष्ट" सापडतेच. : भाग १: धडा १: 

Wednesday, 7 June 2017

परवा एक आजोबा सांगत होते की आज कालच्या लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. एक बाप मुलगा रस्त्याने जात होते तेव्हा एक आंधळा माणूस रास्ता ओलांडण्यासाठी उभा होता, तर मुलाच्या वडीलांनी म्हणे त्या माणसाला रास्ता ओलांडायला मदत केली. वडील परत आले तर मुलगा चिडला आणि म्हणाला, "डॅड तू का गेलास? माझी २ मिनिटे कमी झाली ना ? माझा वेळ होता ना? मग तू माझ्यावेळातली २ मिनिटे दुसऱ्याला का दिलीस?"

या संभाषणावरून त्या आजोबानी निष्कर्ष काढला की नवीन पिढीत लहान मुलांमध्ये माणुसकी नाही. खरंच प्रसंग ऐकून असं वाटेलपण कोणालाही. मीही ऐकून घेतलं आजोबाना बोलून दिल, पण मग मला हे तितकस पटल नाही. त्यांना मी बोलले नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुलगा म्हणाला तुझा हा वेळ माझ्यासाठी होता त्यातली दोन मिनिटे कमी झाली. आज काल अती बिझी work schedule मुळे मुलांना आई -वडील वेळ देऊ शकत नाहीत. आपल्या पिढीला आई वडिलांचा मुबलक प्रमाणात मिळायचा तेव्हा मुलांसाठी वेळ राखीव ठेवायची गरज नसायची. कामाच्या appointments मध्ये मुलांचा वेळ असा काही राखून ठेवण्याची गरज नव्हती पण आज काल अपरीहार्य असलेल्या कामाच्या तणावामुळे, प्रचंड गतिमान जीवनामुळे किंवा मग पैश्याच्या अति गरजेमुळे पालकांना हा असा राखीव वेळ मुलांसाठी ठेवावा लागतो. एकुलती एक मुलं आणि व्यस्त असलेले आई वडील यांमुळे मुलांना एकटे पणाची जाणीव खात राहते. आई वडिलांनाही बरेचदा मनावर दगड ठेऊन उंबरा ओलांडावा लागतो. मग ते अव्यक्त प्रेम limited वेळात तरी व्यक्त व्हावं आणि मुलांना थोडातरी वेळ मिळावा म्हणून असा वेळ हल्ली राखून ठेवला जात असावा. मुलांना त्यांच्यासाठीच्या वेळात सगळी माया absorb करायची असते. तेव्हढ्या वेळात त्यांना त्यांच्या सगळ्यात जवळची माणस त्याच्याबरोबरचा अनुभव साठवायचा असतो कदाचित पुढील appointment  (वेळ )  पर्यंत .

राखून ठेवलेल्या कमी वेळातली २ मिनिटे वडिलांनी घालवली माझा बाबा दुसरी गोष्ट करत राहिला इतकच त्या निरागस जीवाला कळलं असणार त्यातली सामाजिक जाणीव पोहोचण्याइतकं त्या मुलाचं वय नक्कीच नाही.
असा विचार डोक्यात आला. वाटलं "हल्लीच्या पिढीत माणूसकीच नाही हो" असं नसतं लगेच.  एका घटनेला अनेक कंगोरे असू शकतात म्हणून लगेच हल्लीची पिढीचं "अशी स्वार्थी" अश्या निष्कर्षाप्रती पोहोचणं  तितकस योग्य नाही असा मलावाटतं . 

Friday, 19 May 2017

local trains and philosophy

खूप अस्वस्थ होते मी सकाळ पासून. एक एक दिवस खरंच उजाडतो की एकही गोष्ट मनासारखी होत नाही.  उठायला उशीर मग सगळं भराभर उरकाव तर मिस्कर लावला आणि लाईट गेले. धावत पळत स्टेशन वर पोचले तर ट्रेन डोळ्यासमोरून सुटली. मिळेलत्या ट्रेन मध्ये स्वतःला कोंबून घेत ई-मेल चेक केला. तर काय क्लायंट चा रिप्लाय "there was no attachment with mail kindly resend it" स्वतःचा किंवा जिला हा मेल करायला सांगितलं तिचा गळादाबावा असं वाटायला लागलं, कारण सकाळ पासूनची धावपळ व्यर्थ होती. आता draft पोहोचलाच नाही म्हणजे मीटिंग मध्ये काहीच अर्थ नव्हता आणि किमान घाटकोपर पर्यंत ट्रेन मधून उतरायला मिळण्याचा संबंधच नव्हता. एका वाईट दिवसाची सुरुवात झाली,  ह्याची मला खात्री पटत होती कारण तेव्हढ्यातच माझ्या फोन ने बॅटरी लो चा सिग्नल दिला. दिवसाच्या सुरुवातीला फोन बंद पडण्याच्या मार्गावर होता आणि क्लायंट फोन वर फोन करत होता. त्या गच्च भरलेल्या ट्रेन मध्ये आणि गाजरे, खाण्याचे पदार्थ, perfumes आणि घाम यातून एक किळसवाणा गंध माझं मन अजूनच अस्वस्थ करत होता. त्यात ट्रेन मुंब्य्राला थांबली म्हणजे मी गडबडीत स्लो ट्रेन पकडली होती.

नवऱ्याचा फोन आला असं वाटलं त्याला सांगून टाकावं, मग म्हटलं काही गरज नाही, परत म्हणेल घाई घाई असते तुझी सगळी, त्यामुळे हे गोंधळ उडतात आणि मला तेव्हा तत्वज्ञान ऐकायची अजिबात इच्छा नव्हती. मग बॅटरी लो आहे असं सांगून फोन कट करून टाकला, आता अजून एक तास मला त्या गच्चं भरलेल्या ट्रेन मध्ये काढायचाय हे लक्षात घेऊन शेवटी मी सीट विचारली आणि अहो आश्चर्यम मला चक्क नाहूर सीट मिळाली त्यात ती मुलगी ठाणे गेल्यावर लगेच उठली वाह. त्यातल्या त्यात म्हणजे बसायला जागा मिळाली, तस मग जरा डोकं शांत झालं. उगाच ओंगळवाणा वाटणारा तो ट्रेन चा डब्बा जरा सुसह्य आणि सवयीचा वाटू लागला. माझ्या समोरच एक चिमुरडी हातात पाटी घेऊन बसली होती, त्या पाटीने माझं लक्ष वेधून घेतलं. मला खूप कुतूहल वाटलं. म्हणजे टॅब आणि i-pad च्या जमान्यात मुलीच्या हातात पाटी? मला आश्चर्यच वाटलं.

माझ्याजवळची cadbury दिली की लहान मुल एकदम friendly होतात हे मला माहित होत आणि तसचं झालं. त्या चिमुरडीला नाव विचारलं तर तिने पाटीवर मोत्यासारख्या अक्षरात "आशा" (name changed) अस लिहून दाखवलं. मला मज्जाच वाटली मग तिच्या आईशी गप्पा झाल्या तेव्हा तिने सांगितलं की त्या दोघी आशा च्या ट्रीटमेंट साठी जात होत्या कारण आशाला बोलता येत नाही. मोबाईल आणि टॅब त्यांना परवडत नाही म्हणून मग तिच्या आईने पाटीची शक्कल लढवली. ४ मुलात वेगळी वाटली की, आई तिला समजावते की तुझी पाटी डिस्चार्ज होत नाही आणि म्हणून तुला ती बाजूला ठेवायची गरज नाही.

"ऐकते का हो ही अस सांगून?" हा आपसूक प्रश्न मी विचारला तशी त्या म्हणाल्या," नाही ऐकत कधी कधी! पण परीयाय नाही हे समजून मग वापरते पाटीच. मोबाईल पेक्षा मला स्वतःला पटी आवडते परवडत नाही हे एकच कारण नाही. तर, ती पुसली की कोरी होते.आशाच्या ट्रीटमेंट मध्ये प्रत्येक अपयशानंतर मनाची पाटी पण अशीच कोरी करावी लागते आम्हाला आणि मग नवी उमेद त्या कोर्यापाटीवर मनातलं चित्र उमटण्याची. जेव्हा यशाच्या जवळ जाऊन काही उपाय फेल झाला अस समजतं तेव्हा मी हिच्याबरोबर बसून ह्या पाटीवर खूप रेषा मारते आणि मग पुसून टाकते जणू एक अभद्र दिवस पुसून टाकला मी आणि नवीन उमेद येते मला या पाटीमुळे!हीच उमेद तिला मिळावी म्हणून मग ही पाटी! अजून लहान आहे हे समजण्याची मानसिकता नाही तिची पण समजेल तेव्हा ह्या पाटीसाठी आभार मानेल ती माझे." बाजूच्या बाईने मधेच त्यांना परेल येईल आता अशी आठवण करून दिली, तशी त्या मायलेकी उठल्या मला टाटा करून आणि सीट खाली करून.

ऐकून मी सुन्न झाले. वाटलं खरंच सकाळचे ३ तास मनासारखे नाही गेले तर आपण दिवसालाच वाईट ठरवून टाकलं. अस करून कस चालेल? ते तीन तास पुसून टाकले तर दिवस झक्कास जाईल. पण जमेल का आपल्याला हे? कारण हे सगळं बोलायला ठीक असत पण करायला?

तेव्हढ्यात मला माझी जुनी मैत्रीण भेटली ट्रेन मध्ये. म्हणजे गर्दी कमी झाल्याने दिसली आणि तिच्याकडे चक्क पॉवर बँक होती. क्लायंट ला मेल मिळाल्याचं कॉन्फर्मेशन माझा फोने चालू होता क्षणीच मला दिसलं. एकूण दिवस रुळावर आला होता किंवा माझं डोकं, विचार रुळावर, ताळ्यावर आले होते. किंवा मग दिवस better  होऊ शकतो या पॉसिटीव्ह विचाराने करामत केली होती. एकुणात माझ्या निगेटिव्ह विचारांची पाटी कोरी होऊन त्यावर डे प्लांनिंग पूर्ववत सुरु झालं होत.काही का असेना माझ रुटीन मी ठरवल्या प्रमाणे सुरु झालं.

local trains and philosophy 


                                                                                                   ... रेश्मा आपटे 

Wednesday, 26 April 2017

नातं

उधाणलेला समुद्र अथांग पसरलेला, एकटाच तो किती वेळ मरीन ड्राइव्ह च्या कट्ट्यावर बसलेला. म्हणजे कट्टा तसा गजबजलेला नेहमी सारखा उत्सहाने फुललेला, प्रेमी युगुलांच्या प्रेमाने मोहरलेला, तुटलेल्या हृदयासाठी हळहळणारा,मैत्रीच्या आनंदात हसणारा, म्हाताऱ्याच्या डोळ्यात रडणारा. सगळ्याच भावना धीरगंभीरपणे स्वतःत सामावणारा. पण तो मात्र एकटाच आज तो उसळणार्या लाटांबरोबर फुलत नव्हता, फुटणाऱ्या लाटेत खळाळून हसत नव्हता. मावळतीच्या सूर्यबिंबाकडे टक लावून बघत, मी सूर्यालाही डोळ्यात सामावू शकतो असंही म्हणत नव्हता. खूप खूप बोलणारा स्वतः बरोबर तिलाही खुलवणारा तो काहीच बोलत नव्हता. जणू आज  मावळतीकडे झुकलेल लाल सूर्यबिंब त्याला सांगत होत " प्रकाशाला डोळ्यात साठवण माणसाच्या हातात नाही " 

समुद्र खवळलेला तस त्याच मनही! बेसूर शांततेचा भंग करत त्याच्या हातावर हात ठेवत शेवटी ती बोलली, "काहीच नाही का बोलणारेस?" तिच्या मऊ हातांच्या स्पर्शाने तो विजेचा झटका बसावा तसा भानावर आला. त्याच्या डोळ्यांत साठलेला समुद्र लपवत एक खोटं हसू ओठांवर चिकटवून म्हणाला, "बोल ना?".

ती : "तू बोल, नेहमीसारखं उत्साहाने भरलेलं ! जिवंत.  मला खूप मोकळं वाटतंय अरे, ह्या आधी वाटलं नव्हतं तेव्हढ. तुला आज  सुचत नाहीये एखादी कविता, चारोळी? ." तो काहीच बोलू शकला नाही फक्त तिच्याकडे पाहत बसला. फक्त "सॉरी" इतकच बोलला. तशी ती रागावली "स्वतः वर प्रेम करायला शिकवलंस म्हणून sorry ? मलाही भावना आहेत याची जाणीव करून दिलीस म्हणून sorry ? "ती बोलत राहिली ...
तो : " नाही ग माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातलं प्रेम हरवलं म्हणून."
तिने त्याला विचारलं "प्रेम म्हणजे काय रे?" तिच्या प्रत्येक problem  च solution असणारा, तिचा जीन आज नि:शब्द होता. काही सेकंदांच्या शांतते नंतर ती म्हणाली ह्या फुटणाऱ्या लाटा खूप काही सांगतात त्यांचे तुषार किती हवे हवेसे वाटतात. तुषार ह्या नावाने काही क्षण हळवी झाली. डोळ्यातून मुक्त वाहिली. त्याला खात्री पटत चालली होती की, आपण ह्या निरागस मुलीला खूप अस्वस्थ, एकटं करून टाकलाय. तिचा हात धरून आयुष्य काढायची कधीच स्वप्न पहिली नाही, तिलाही दाखवली नाही. कोणाचा हात धरून जगण्यापेक्षा स्वतः च्या पायावर उभं राहून त्याच्या साथीने जग असाच सांगत होतो. पण या नादात तिच्या प्रेमापासून तुषार पासून वेगळं करण्याचं पातक त्याला सहन होत नव्हतं.  तेव्हढ्यात ती त्याचा हात पकडून म्हणाली "श्रद्धांजली वाहूयात?" तो खुळ्यासारखं बघात राहिला तिच्याकडे काहीच अर्थबोध न झाल्यासारखा. अस्पष्ट पुटपुटला,"श्रद्धांजली? कोणाला? "  तिने त्याला डोळे बंद करायला लावले आणि २ मिनिट नि:शब्द गेली मग जसे त्याने डोळे बंद केले तसे तिच्या सांगण्यावरून ते उघडले यंत्रवत.

कॉफी? हसत तिने त्याला विचारलं? तसा मात्र तो उसळला तिचा हात पकडत त्याने तिला विचारलं, " काय चाललय तुझं?  तू वेडी झालीयेस का?  कोणाला श्रद्धांजली? भडाभडा बोल तुझ्या अगम्य असण्याचा त्रास होतो मला, आज गूढ वागणं नाही झेपते मला तुझं. आपण तुषार शी बोलूया का? त्याला आपलं नातं उमगलं नाहीये समजावूया त्याला मी बोलतो हवं तर , अग .. "
 त्याला तोडत  ती उठली नेहमीच मधाळ हसून म्हटली "तू तर माणूस झालास रे असहाय्य माणूस .. तुझ्या भाषेत सांगायचं तर ' डोक्यात मणभर negativity घेऊन त्या लाटे सारखा तुझ्या self  pity  चा फुगा फुगलंय need to empty your mind, detox it ".

तो:" तू काहीही बोलून मला guilt देऊच शकत नाहीस कारण मुळात मी काही चूक केलेलच नाहीये. मी तुला खोटी स्वप्न कधीच दाखवली नव्हती, मी तुला तुझ्या तुषार पासून कधीच तोडलं नाहीये. 

ती हसायला लागली खळखळून तुला guilt  नको म्हणून चुकीचं असतानाही तू माझं आणि तुषार च नातं साधायचा प्रयत्न करणार? जिथून आणलास तिथेच नेऊन सोडणार?  का  भीती वाटते  commitment  मागेन तुझ्याकडे  याची ? "

तो: नाही ग अस नाही. पण तू एकटी ..
ती: एकटी ?  अरे राजा तू मला जगायला शिकवलयस  you actually made me revisit myself and i am not going to leave it because " love myself". तू विचारायचास ना स्वतःवर प्रेम नसेल तर दुसऱ्याला काय प्रेम देणार?  एक वर्षांपूर्वी तू मला असे खूप प्रश्न विचारलेस. तेव्हा भंडावून गेले मी. तुला भेटूच नाही अस वाटायचं. माझ्या शांत आयुष्यात तू वादळ निर्माण करत होतास. पण व्यसन लागल्यासारखे भेटत गेलो आपण एकमेकांना. तुझ्याबरोबर घालवलेली काही मिनिट पण मला ऊर्जा देऊन जायची! जगण्याची ऊर्जा!. तुला आठवत एकदा तू मला तुझी एक कविता वाचून दाखवलीस आणि विचारलंस कशी आहे? मी म्हटलं 'अगम्य' तेव्हा हसून म्हणालेलास आज पहिल्यांदा मनापासून  बोललीस.  मी त्या अगम्य ओळीच्या प्रेमात पडले. मी तुषार शी बोलेन हे सांगायच्या आधी मी तुला विचारलेलं आपण एकमेकांचे कोण आहोत? तू म्हटलं "काही नात्यांना नावं  नसतात, ना ती समजावता येतात ती फक्त समजून घ्यायची असतात. मैत्री, प्रेम यात अडकणार नातं नाहीये आपलं", आणि  आणि मगाशी म्हणालास तुषार ला समजावूयात आपलं नातं! तुला तरी समजलंय का रे ते? मगाशी आपण जी श्रद्धांजली वाहिली ती माझ्या चुकीच्या व्यक्तिमत्वाला जे कस कोण जाणे कधी कोण जाणे पण मला घट्ट चिकटलं. तू भेटल्यावर पुन्हा एकदा मी नव्याने विचार करायला शिकले. जिवंत असणं आणि प्रेम करतो त्या माणसाबरोबर फरफटणं हे आयुष्य नाही, तर माझं जगणं  म्हणजे माझं मन, माझ्या भावना, स्वाभिमान, आवडी हे सगळं आहे याची मला नव्याने जाणीव झाली. मी माझ्यासाठी हसायला शिकले आणि भोवतालचं जग जणू काही खुलत गेलं. आनंदात जगणं  मग फारच सोपं वाटू लागलं. माझ्या शब्दाला काय भावनांनाही किंमत नाही पासून ते मी नोकरी करून स्वतःला आणि माझ्या मुलीला एकटी पोसू शकते पर्यंत निर्णय घेणं हा प्रवास मी फक्त एका वर्षात पार केला.

तुषारचा हात सोडताना माझा हात थरथरला नाही आणि म्हणूनच तो माझा हात झटकू शकला नाही.
मी माझ्या team leader ने दिलेली ऑफर संधी म्हणून स्विकारलीये. मी ४ महिन्यांसाठी चीन ला चाललेय. अर्थातच चिनू ला घेऊन हेच सांगायला आलेले आज.

मला माहितेय आपण फोन नंबर किंवा मेल एक्सचेंज करणार नाही कधीच हे आपलं ठरलाय. जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा वाटलं कशी जागें तुला भेटल्या शिवाय मग जाणवलं की, तू माझ्याबरोबर असशील कायम तू दिलेल्या  confidence  मधून!

 कॉफी मात्र आजही राहिली पण जर मी आल्यावर परत भेटलोच तर तेव्हा माझ्या success  ची कॉफी नक्की घेऊ. मनात guilt  ठेऊ नकोस. तू मला स्वप्न दाखवलीस पण चुकीची नाही. तुझ्या शब्दात सांगते बघ समजतंय का ? " मन, विचार आणि डोकं स्वच्छ असल की नातं निरागस आणि निर्मळ रहातं त्याच ओझं होत नाही. तिचे श्वास गालाला लागेपर्यंत ती जवळ अली आणि कुजबुजली "take care my dear motivational speaker"

सूर्य मावळला होता. ती निघून गेली तो तिच्याकडे पाहत बसला.
कदाचित त्यांचं नातं तिला उमगलं होत आणि तो मात्र  खूप बुकं वाचून कोरडा होता.