Monday 26 September 2011

त्या वळणावर ...


सोडून गेलास माझी साथ
निघून गेलास तोडून सारे पाश 
अन झिडकारून ते मोहक आकाश
त्या वळणावर...

प्रेमात आकंठ बुडत स्वप्न रंगवत    
एक घरट विणत सजवत
इतका कसा कोरडा झालास  
त्या वळणावर ....

माझ्या सवे हसलास तू, रुसलास तू 
गुलाबी मिठीत विरघळलास  तू 
अचानक कुठे हारवलास तू? 
त्या वळणावर ...

सरण पेटले उरल्या आठवणी 
जिथे गुंफिली मंजुळ गाणी 
आज ऐकते ती विराणी 
या वळणावर ....


अश्रू अलगद एक कलंडला
तुझ्या आठवांचा मोती होऊन
गालावरतून हळुच निखळला
त्या वळणावर  ..



                                    ....  रेश्मा आपटे 


12 comments:

  1. जब तेरी बात चले तो...

    तेरे साथ बिताए पल मुड जाते है
    वो बहारें फिर से आती है
    जाडो की नर्म धुप में तेरी
    बाहों में सिमटना याद आता है...
    .
    .
    आज वो सब है...मगर...
    तु मुड गया कहीं और....


    ---आलमगीर.

    ReplyDelete
  2. chaan........

    Maze suggestion.......

    सोडून गेलास माझी साथ
    तर घालेन कमरेत लाथ ....
    :-):-):-):-):-):-)

    कस आहे? :D
    - kavi Kaustubh.

    ReplyDelete
  3. like! :-)

    n next time i want one happy mood kavita :-)

    keep writing madam!

    ReplyDelete
  4. @ saurabh

    heheh this is jus a KAVITA re:P

    still ok will try

    ReplyDelete
  5. बावरले , हसले, सावरले,
    तातातुटीस पाहून आपल्या
    तेथेच आक्रंदले...
    त्या वळणावर.....

    ReplyDelete
  6. @ sameer: thanks
    @ kaustubh : :P :P :P

    @ rutuja

    besttttttt mast :)

    ReplyDelete
  7. kasa suchata ga tula he???
    full2 fan

    ReplyDelete
  8. नका रेंगाळू आता त्या वळणावर :D :D good one

    ReplyDelete