Wednesday 16 March 2011

चूक कोणाची?

सगळे धाव पळ करत होते,... घरातला फोन ठण ठाणत होता ,... छोटा चिंटू एका कोपर्‍यात बसला होता  ... तिच्या बाबांच्या डोळ्यातले पाणी तर आज लपतच नव्हते ... आजोबा, देव न मानणारे आजोबा, चक्क देवाच्या दारी हात जोडून उभे होते, ... आजीने देवाला पाण्यातच ठेवले होते ,... tommy सुद्धा शांत शांत होता .... तिचे बाबा आणि काका हॉस्पिटल मध्ये गेले होते ... आणि बाकी सगळे जाणं घरी त्यांची वाट पाहत होते,

आई तिच्या बेडरूम मध्येच बसली होती पायाखालून जमिनच सरकली होती म्हणा तिच्या. हातात तिचे ते पत्र घेऊन त्याकडे वेड्यासारखी पाहात बसून होती ती ,, थरथरणारे हात,... रडून रडून सुजलेल्या डोळ्यातले पाणीच आता आटले होते ... ते भयानक भावनाशून्य डोळे हातातल्या त्या पत्रावरून फक्त फिरत होते ... पत्रातली ती वळणदार अक्षरे .. एरवी "वा छकुली काय सुंदर अक्षर काढल्यास ग!" असे उद्गार निघाले असते आई च्या तोंडून पण ... आता निघत होता तो हुंदका फक्त हुंदका ,,,, त्या वळणदार अक्षरांनी जणू आई चे आणि घरच्यांचे आयुष्याच आडवळणावर नेवून टाकले होते. ,, डोळे फिरत होते तिच तिच अक्षरे, शब्द डोळ्यासमोरून नाचत होते ... अर्थ दरवेळी कळत होता की नाही? की तो समजून घ्यायचाच नव्हता आईला ते देवच जाणे ,, 

पत्र:

" प्रिय आई -बाबांस 

             मला माहीत आहे की, तुमच्या माझ्याकडून खूप खूप अपेक्षा होत्या, आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप मेहेनत पण घेतलीत ग. लहानपणापासून माला कुंभार सारखे घडवलेत, आई मला आठवतंय की तू स्वत: नोकरी सांभाळून मला शिकावायाचीस, मी काय वाचावे, काय पाहावे, काय ऐकावे, या सगळ्या बाबतीत तू खूपच जागरूक असायचीस, कसे बोलावे आणि कसे लिहावे हे तू माला खूप काळजी पूर्वक शिकवत होतीस. बाबाही मला टफ बनवायचे आणि मला पाण्याची असलेली भीती जावी म्हणून वेळात वेळ काढून माला त्यांनी swimming शिकवले स्वत: घेऊन जायचे ग मला ते swimming शिकवायला. मी रामरक्षा म्हटलीच पाहिजे या आजीच्या हाट्टाने माझे उच्चार स्वच्छ बनले, मी ही शाळेत नेहमीच पहिला नंबर मिळवायचे वक्तृत्व स्पर्धा तर मीच जिंकायचे. 
          मी १० वीत गेले, वर्षभर सगळ्यांनी खूप खूप adjustments केल्या, t v बंद, जेवण नाशता सगळे वेळेत, क्लास ला जायला आजी असल्यामुळे कधीच उशीर झाला नाही, तू तर सुट्टी घेऊन घरी बसलीस, बाबांनी सुधा सुट्टी घेतली, क्लास साठी भरपूर fees भरलीत, शाळेत principal सरांनी पाण मी पहिलीच आले पाहिजे असा हट्ट धरला होता, आई मला तू  खूप आवडतेस ग, खुप खुप आवडतेस .. पण हे अपेक्षांचे ओझे मला नाही पेलवते खरच, मी मनापासून अभ्यास केला पण  तरिही मला खूपच भीती वाटत होती ,,, सतत स्वप्न पडायची मी नापास झाले ,,, सगळे मला ओरडतायत ,,, आजी रडतेय, बाबा काहीच न बोलता निघून गेले माझ्या बाजूने, सर म्हणतायत की, "तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला " ते वाक्य खुपच लागल ग आई !!!!
             मला ,,, मला खुप खुप भीती वाटतेय ,,, आता मला हे सहन नाही होते ,,, जर मी पहिली नाही येऊ शकले तर????? उद्या माझा १० चा result आहे ग!!, शेजारच्या मावशी पण म्हणाल्या," तुला कसलं आलाय मेल tension आमच्या बंटीला आले तर ठिक आहे", तुझं आपले उगाच नाटक तू काय पहिलीच येणार. माझ्या डोळ्यासमोर अंधार येतोय आई मला भीती वाटतेय, वाटतंय की तुझ्या कुशीत शिरून रडावे, मी सुध्धा लहानच आहे ग मलाही भीती वाटते, tension येते ग! आई पण काय करणार रडले तर बाबा ओरडतील ना?? आजीने तर कालच सोनी च्या आजीला सांगितले परवा आमचा निकाल आहे मग येते पेढे घेऊन ,,, बाबा म्हणतात की "पहिला तो पहिला दुसरा कोणाच्याच लक्षात नाही राहत",, मी प्रयत्न केलेत ग पण मला science II चा पेपर जरा जड गेलाय ग, असे सराना नुसते म्हटले तरी सर म्हणाले,"उगाच काही बोलू नकोस मला मान खाली नको घालायला लाऊस हा" ,,,
              आई मी पळपुटी नाहीये ग पण मला आता काहीच सहन नाही होते, मला खूप खूप भीती वाटतेय पण ती बोलून दाखवायाचीही सोय नाहीये मी डायरीत लिहिले होते की मला भीती वाटतेय result ची ते कालच बाबांनी वाचले असे चिंटू सागत होता आणि ते खूप चीडलेतही होते ग, त्यांना वाईट वाटलेले, आता मला ओरडतील का ग ते??? नाही मी जर पहिली नाही आले तर सगळ्यांचा किती हिरमोड होऊल सगळे म्हणतील उगाच वर्षभर नाटकं केली आणि निक्काल लागलाय हो अगदी प्रगतिपुस्तकात ... नकोच ते मला result च नकोय, 
            तो पाहायची हिम्मतच नाहीये माझ्यात आता ,,, म्हणून मी ठरवलंय स्वत:ला संपवायचं .. मीच नसेन तर result मध्ये कोणालाच इंटरेस्ट नसेल आणि जरी कोणी काही बोलले तरी मला ते ऐकू नाही येणार ना ग .. माला समजून घे ,,,, तू तरी नको चिडूस ग माझ्यावर, बाबांना समाजाव की मी पळपुटी नाहीये पण भीती मलाही वाटतेच ग ,,, त्यांना सांग की चिंटू पण हुशार आहे पण त्याला समजून घ्या तो घाबरला तर त्याच्याशी बोला ,,, त्याला जवळ घे आई नाहीतर मार बसेल त्याला ,,, त्याला सांग खूप अभ्यास कर जिद्दीने पण तू त्याच्याबरोबर रहा हा आई ... आणि .. आणि मला कधी कधी विसरणार नाहीस न ग आई ??

तुझीच लाडकी
 छकुली


आई ने ते पत्र निदान १०० दा  तरी वाचले असेल पण ते खरच, खरच खरे होते की स्वप्न होते घाणेरडे, अप्रिय, भयंकर हे तिलाही ठाऊक नव्हते............

रोजच्या सारखा गरम दुधाचा ग्लास घेऊन आई तिला हाक मारत होती "छकुली लवकर आवर माझी बस मिस  होऊल, ए  छकुली SSSS " खूप हाका मारून बाहेर नाही आली तेव्हा आईच आत गेली बघते तर हातात चुरगळलेला कागद घेऊन तिची छकुली पंख्याला लटकली होती ,,,, काही सामाजायाच्या आताच तिच्या तोंडून किंकाळी फुटली आणि मग घरात वेगळेच नाटय सुरु झाले, सगळ्याना भयानक धक्का बसला बाबा आणि काका तिला घेऊन Central hospital ला गेले. आणि घरावर स्मशान कळा पसरली. चिंटू घाबरून एका कोपर्यात बसून होता. आजीने देवांना पाण्यात ठेवले आणि आजोबांनी आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडले .. 

आई !!!   ...  ती स्तब्ध बसली होती... तोंडातून ब्र ही न उच्चारता! हातात तो कागद, तिच्या भावनासारखा, मायेसारखा चुरगाळलेला! डोक्यात १०० प्रश्न, का? कसे? कुठे चुकले मी? समजून घेण्याचा प्रयत्न केला न मी तुला? ,,, माझ्याशीही बोलायलाही तू घाबरलीस?? का ग बाळा ? तुला भिऊ नकोस म्हटलेले कधीच हारू नकोस म्हटलेले पण आम्हालाच हारवून जा असे नाही म्हटले ग कधी,,, आणि हिम्मत आली कुठून ग इतकी तुझ्यात? आम्हाला खरच तुला इतकाही निर्भीड नव्हते बनवायचे की तू स्वत:चाच गाळ्याला फास लावून माझा जीव असा टांगणीला लावशील,... काय करू ग सोन्या कसे परत आणू तुला आता? लवकर घरी ये आम्ही वाट पाहतोय तुझी ,,, सगळेच तुझ्यावर खूप खूप प्रेम करतात ग सोन्या ...... आईची अवस्था तर खरच शब्दात मांडता येत नव्हती. 

बाबाही म्हणाले आई ला फोन वर की परीक्षेचे tension काय असते ते दाखवायला देवाने इतकी मोठी परीक्षा नको होती ग घ्यायला आपली...  समजतेय माला आता परीक्षेचे तेन्सिओन, ,,,, भीती, अस्वस्थता कशाला म्हणतात तेही समजलेय आता ,,,, मालाही गरज आहे आज तुझी; मालाही रडावेसे वाटतेय ,,,.. मी छकुलीला अती कणखर बनवू पाहत होतो का ग? तिला समजून घेण्यात फारच कमी पडलो ग मी ,,, पण ती कणखर झाली तर आयुष्यातल्या मोठ मोठ्या संकटानाही तोंड देऊ शकेल असे वाटले होते, त्या नादात मी तिच्या भावनांचा विचारच केला नाही कधी, एका मुलीचे हळुवार मन माला कधीच उमगले नाही. पण .. माला आज भीती वाटतेय, माझ्या छकुलीला गमवायची भीती!! ह्या Compititive world मध्ये तिने पुढे जावे प्रगती करावी अशीच इच्छा होती माझी ... पण आज ती हवीये माला आधी होती तशीच हसरी बाहुली !!!

आईला सगळे काही आठवत होते तिचे विचार चक्र खूप वेगात फिरत होते तिचा जन्म, तिचे बालपण, शाळा, मित्र मैत्रिणी, सगळे सगळे जसेच्या तसे आठवत होते तिला .. आणि समोर दिसत होता तो दोर आणि ते पत्र  मनाची घालमेल सुरु होती तिच्या. त्या उध्वस्थ अवस्थेत दारावरची बेल पण तिला ऐकू नाही आली...  बाबा आणि काका घरी आले परत, छकुलीला घेऊन पण ,,,,,,, ती खरच छकुली होती का??? थंड पडलेले शरीर, सताड उघडे आणि निस्तेज डोळे, उताणी पांढर्या चादरीत गुंडाळलेली ,,,,, ते पाहून सगळेच रड रड रडले ,,,, दुख:, भीती , आणि हुंदके याने ते हसरे घर पुर्णपणे भरून गेले ,,,

घरच जणू रडत होते उत्तर शोधात होते हजारो प्रश्नाची ,,, अशी कशी सुखाला दृष्ट लागली? कुठून आली इतकी हिम्मत आयुष्याच उधळून टाकायची त्या १५ वर्षांच्या आत बाहेरच्या वायात??? चूक कोणाची??/ खरच कोणाची??/ अपेक्षांचे ओझे लादणार्या मित्रांची,शेजार्यांची, शिक्षकांची?? की त्या अपेक्षांचे ओझे सहन न करू शकणार्या निष्पाप जीवाची ?? मुलांनी मोठे व्हावे नाव कमवावे म्हणून धडपडणाऱ्या, आणि याच धडपडीत मुलांचे मनोबल वाढवावे कसे हेच न उमगलेल्या आई - वडिलांची ???? आणि चूक कुठे झाली? अपेक्षा ठेवली ही? की त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हुशारी आणि जिद्दी बरोबरच विश्वास लागतो याचा विसरा पडून तोच निर्माण केला नाही इथे झाली चूक? की आदरयुक्त भीती आणि भीतीयुक्त आदर यातला फरकच पालकांना समाजाला नाही इथे? की आपयाशाला सामोरे जाण्याची हिम्मतच न ठेवता फक्त स्वत: पुरता (??) विचार करून पळपुटे पणाची वाट निवडली गेली इथे चूक झाली??

प्रश्न प्रश्न आणि प्रश्न ,.... उत्तरे मिळून काहीच फायदा नव्हता कारण "ती" आता परत येणार नव्हती ... मनाचे पिंजरे तोडून तिचा जीव केव्हाच भुर्रकन उडून गेला होता,
तेव्हढ्यातच दारावर शाळेचा शिपाई आला, ,,,, बाबारे! पण आता तू येऊनही उपयोग नाही कारण तिचे बोर्डात येणे ही बातमीही आता तिचा जीव परत अणू शकत नव्हती ,,, पण वर मात्र ती आता सुखावली असेल सर्वांच्या अपेक्षा तिने पूर्ण केल्या होत्या पण त्याचे अप्रूप आता कोणालाच उरले नव्हते कारण, "ती" बाहुलीच त्या घराच्या भिंती तोडून निघून गेली होती कायमची.......................

4 comments:

  1. too good.........n very very true........ well written,,, keep writing..

    ReplyDelete
  2. वा....
    सगळा सिन डोळ्यासमोर उभा केलास....
    छान... पेपर मधला लेख वाचल्यासारख वाटल...
    माझी एकतरी मैत्रिण ब्लॉगर आहे :)
    ग्रेट...

    ReplyDelete
  3. विदारक सत्य पुन्हा एकदा डोळ्यासमोर आलं.

    मस्त लिखाण. मात्र एक रिक्वेस्ट आहे," शुद्धलेखन बघ जरा" वाचायला अजुन मजा येईल.

    ReplyDelete
  4. yes boss taken aata kami hotil chuka ,,, baraha dw kele aata :)

    ReplyDelete