Friday 4 March 2011

संध्याकाळ

एक संध्याकाळ स्वत:साठी जगलेली,
सर्वांकडून हिरावून घेऊन फक्त माझ्यासाठी राखलेली ..

ना  ट्रेन मिळण्याचे टेन्शन, ना कामाचे मेन्शन,
आरामाचे मिळाले मस्त एक सेशन .

शांत शांत सगळीकडे मस्त हा एकांत ! 
हातात कप  कॉफीचा आणि मीही होते निवांत !

फुला फुलांवर उडून उडून मन फुलपाखरू झाले  
पाहता पाहता निसटून ते भूतकाळात हरवले ...

काही माणसे सहजच भेटली, नकळत आपलीशी झाली
काही आपली आपली म्हणता, तुकडा मोडून चालू पडली

कधी कोणी भेटली ज्यांनी डोळा आणले पाणी 
तर कित्येक  जणांना  प्यारी होती फक्त नाणी 

कधी खूप मिळाले, सुखाने डोळेही पाणावले
तर कधी किती उसासे प्रयत्नाने परतवले  ...

अशी  काही  निमिष  हुकती  चुकती 
 तर कित्येक  क्षणांनी गायलीयेत  गाणी 

बसल्या बसल्या सहज काही आठवलं
इवलेसे मन त्यात किती काय काय साठवलं

किती माणसे, किती गोष्टी, किती किती ह्या आठवणी, 
या निवांत संध्याकाळी मानाने केली सगळ्याचीच उजळणी !

                                                     ... रेश्मा  आपटे 

1 comment:

  1. kharach kadhi tari asa jagun baghayala kay harkat ahe
    Pan hi kavita jeva lihili hotis tyacha anubhav ghyayala matra 2012 ujadava lagla

    ReplyDelete