Wednesday 2 March 2011

साठवण


एक गोष्ट वाटते तुला सांगाविशी
नाजूकपणे जपलेली मनाच्या तळाशी,

तुला पाहून वाटायाचें माला मनापाशी 
जग सुरू होते की संपते माझे तुझ्यापाशी ?

तुझे समोर असणे, बोलणे, कॉल करणे
सारेच काही भासे मोरपीसा सरशी

स्वप्न तुझी कळलीच नाहीत, झाली कधी माझी कशी?
त्यांच्यात हरवणे, तुला आठवणे, स्वत:शीच हसणे!
सारच अडकलंय त्या दिवसन पाशी..

मध्येच काही बोलून, "तू नाही सामझेगी"  म्हणणे,
त्याच म्हणण्यातून मला सगळं काही समजून जाणे

आज बसलिये मी त्या स्वप्नातल्या नदी काठाशी,
पुन्हा: तुझ्याच विचारांच्या डोंगर पायथ्याशी

खरंच कळले नाही का रे तुला कधी?
सारेच कळत होते मला, तेव्हा आधी ...

अर्थच नाहीये आता का, कसे, कधीला ?
कारण उत्तरही नाहीयेत आता तुझ्यापाशी ...

पण मी मात्र गुंतलीये अजून त्या स्वप्नवत क्षणांपाशी,
आता आठवण तुझी इतकीच राहिलीये साठवण माझ्यापाशी ..

एक गोष्ट वाटते तुला सांगाविशी,
नाजूकपणे जपलेली मनाच्या तळाशी...

                                             ...  रेश्मा आपटे 

No comments:

Post a Comment