Wednesday 2 March 2011

कोपरा


मनाची घालमेल, नि:शब्द कातरवेळ
मनातल्या भावना साधतात मग हिच वेळ
साज लेऊन सोनेरी, आठवणी येतात सामोरी,
स्वच्छ कॅनव्हास मनाचा
त्यावर चितारला जातो चेहरा त्याचा!
हर्षभरीत होते त्याच क्षणी ती खरी ....
गोड आठवणीत न्हाते, ते सोनेरी क्षण सुखाने न्याहाळते
एक सुक्ष्म स्मित ओठी फुलतं .....
तेव्हढ्यातच एक बेसूर हास्य जन्म घेत !
निघून जरी गेला असला तो,खरं प्रेम तिने केलेल असत
मन तळमळतं, भावना आक्रंदु लागतात
ओठांचा बांध घालता येतो, डोळे मात्र दगा देतात
ते त्या भावनाना जणू वाट करून देतात
मनातला एक कोपरा जणू रिता करू पाहतात
गालावरचे अश्रु पुसत जेव्हा जड मनाने ती उठते
मनाचा तो अव्यक्त कोपरा, तसाच बंदिस्त पाहते ........

                                                           ... रेश्मा आपटे 

3 comments:

  1. Reshmaa... truly awesome... nvr knew ths hidden talent of urs... all are very good, really surprising...

    ReplyDelete
  2. Reshma,,, chan.,.... pratyekakade asa ekhada avyakta kopara astoch asto... :)

    ReplyDelete