Friday 11 March 2011

          "आज पण लेट का ग ट्रेन?" "अरे देवा म्हणजे परत घरी जायला उशीर आणि सगळाच गोंधळ ग" , "रेल्वे वाले ना काही सिस्टिमच नाही", "अगदी वैताग आहे, "अरे ४ दिन भी ट्रेन time से आई ना तो वो central railway  ही नही" ... C. S .T .  स्टेशन वरची ती एक संध्याकाळ असते .. थोडक्यात दिवस नॉर्मल असतो, central railway च्या trains पुन्हा  एकदा काही अपरिहार्य, घोषित अथवा अघोषित कारणासाठी उशिराने धावत असतात ......  या सगळ्या गोंधळात "ती"ही अशीच सामान्य स्त्री सारखी गाडीची वाट पाहणारी, घारीसारखे पिल्लांकडे डोळे लावणारी, रोज तीळ तीळ खपणारी, स्वतःचे पोट मारणारी पण पिल्लांना खाऊ मात्र न विसरता नेणारी ,,, साडीचा पदर खोचून पर्स  छातीशी कवटाळून आक्रमाण च्या तयारीत उभी असलेली,... तेवढ्यातच  ट्रेन  येते ...  अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळाच फक्त दिसलेला महाभारतात तसेच तिलाही train चे door च फक्त  दिसत असते, सगळ्यांना ढकलून, स्वतः  धक्के खाऊन ती एकदाची आत जाते आणि 2 nd right window मिळाली म्हटल्यावर जग जिंकल्या सारखी खुश होते.

           मग कोणी 4th seat साठी भांडत असते तर कोणी स्वतःच्या group बरोबर मस्त गप्पा ठोकत असते, सुख- दुःख share करत असते तर कोणी मिळालेला वेळ मस्त एन्जोय करत असते, रुमालापासून ते अगदी ड्रेस मटेरियल पर्यंत आणि शेंग्दण्यांपासून ते खाकरे, सामोसे पर्यंत काहीतरी विकणारे विक्रेते ओरडत असतात   .... ती हे सगळे सरावाने बघत असते आणि त्यात गजबजाटात झोपायचा प्रयत्न ही करते, सकाळपासून दमल्याने कधी कधी तिचा डोळाही लागतो, आजही डोळ्यावर झापड येत असते तोच तिला पुसटसा हुंदका ऐकू येतो,.. आणि ती जागी होते बघते तर काय निलीमा काकू आणि त्यांचा ग्रुप शांत शांत आणि काकू डोळ्याला मध्येच पदर लावतायत ,,, हे बघून तिची झोप पार उडून जाते ,,, आणि जरा आजू बाजूला चौकशी केल्यावर कळते कि निलिमा काकू रीटायर होतायत ह्या महिन्याच्या ३० तारखेला ... अरे म्हणजे परवाच की ... ऐकून तिलाही जरा आत कुठेतरी वाईट वाटते ,,, मग त्या ग्रुपच्या आज शांत शांत असण्याचे कारण कळते ,,. ती जराशीच पण खिन्न होते,,,,,
              तिला आठवते तिची आणि निलीमा काकूंची पहिली भेट ..  नेहमीप्रमाणे ट्रेन मध्ये jump करताना  सुटलेला तिचा हात .. तिच्या हातावर पाय देऊन चढलेल्या त्या २ मुली  ...मग तिला झालेली जखम  ,,, आणि गाडी खाली जाता - जाता अचानक तिच्या हाताला मजबूत बसलेली पकड ,,,, जीवन दानच म्हणा ना ... हो निलीमा काकूच ती ,, स्वतःच्या स्पोन्डेलीसीस चा विचार न करता त्यांनी तिला दुखऱ्या हातानेही घट्ट पकडून ठेवले ,,  पाणी दिले, ती जरा शांत झाल्यावर तिला आईच्या मायेने यथेच्छ ओरडून, "तुला काही अक्कल आहे का तुला?? काही झाले मग? मुलांचे काय होईल ह्याचा तरी विचार करत जा जरा!", असे म्हणून त्या चक्क रडल्या ,,, तशी तिची नि त्यांची काही खास ओळख नव्हती नाही म्हणायला ७.४७ pm च्या S ट्रेन ला त्या दोघी डोंबिवली पर्यंत एकत्र असायच्या ... त्यातही फक्त smile exchange पुरतीच काय ती ओळख. पण ती बघायची त्यांच्या group मधली त्यांची जागा, त्यांचे प्रेम, त्यांच्याबद्दल तिच्या मनात एक आदर होता आणि तो दुणावलेला तिचा सुटलेला हात त्यांनी सावरल्यावर, तिच्या डोळ्यात सहज पाणी आले, ते पाणी 'त्या दिवशी त्या नसत्या तर काय झाले असते? म्हणून होते कि त्या उद्यापासून train मध्ये नसणारेत यामुळे जास्त होते? हे तिलाही आता सांगता नाही येणार".आणि तिच्या मनात सहजच एक विचार आला, खरच आपल्याला एखाद्या गोष्टीची व्यक्तीची किती सवय होते ना! ज्या गाडीच्या लेट होण्याला आणि प्रवासाला आपण त्रासून कटकट करून सामोरे जातो त्याची पण सवय होऊन जाते. रुळावरून धावणाऱ्या त्या ट्रेन च्याही पेक्षा जास्त वेगात तिचे विचार धावत होते, खरंच निलीमा काकू काय करणार उद्यापासून? घरात कोंडल्यासारखे तर नाही ना वाटणार त्यांना? ४ दिवस गावाला गेले आणि ट्रेन पासून लांब असले की  ऑफिस rejoin केल्यावर  आणि सकाळ संध्याकाळ त्या ट्रेन चे दर्शन घेतल्यावर आपले life रुळावर आल्यासारखे वाटते. दिवसाचे ३- ४ तास तर प्रवासातच सरतात. किती लोक भेटतात, खुप काही शिकवून जातात, कधी कधी आपल्यालाच आपण पुन्हा नव्याने भेटतो, तर कधी कोणामध्ये स्वतःला पाहत असतो नकळतपणे, काहींशी ऋणानुबंध जुळतात तर काहीवर दिवसभराचे frustration निघते ... आणि .."
               "३ Cheers for निलीमा aunty " yeeeee ... "ओये दिदी, केक लो ना aunty की send -off party हे  आज, ध्यान किधर है आपका?" ह्या sweety च्या वाक्याने "ती" भानावर येते तिच्या तुफान धावणाऱ्या विचारांना जरा लगाम घालते आणि black forest वर मस्त ताव मारते. निलीमा काकुना सगळ्या मिळून मस्तपैकी एक group फोटो gift करतात will miss u असे सांगतात आणि सगळ्या मिळून त्यांना bye bye करतात, त्यांच्या नवीन life साठी शुभेच्छा देतात आणि ती काकूंच्या मागूनच train मधून उतरते,.. आणि दोघीही एकमेकींकडे पाठ करून आपलाल्या घराचा रस्ता धरतात,
                  आणि सोमवार उजाडतो.. ती तिथेच तशीच आक्रमांच्या तयारीत उभी असते, धापडत आत शिरून जागा पकडते, बाजूच्या group मध्ये सगळे चेहेरे तेच असतात पण आजपण wrong window रिकामी ठेवलेली असते निलीमा काकूंसाठी ,,, मग कोणीतरी म्हणते "अरे आता त्या नाही ना येणार बस ग कोणीतरी दुसरे येऊन बसायच्या आत 'shift '  व्हा "... त्या window seat वर आज काकू नसतात पण त्यांच्या जागेवर कोणीतरी shift झालेलेच असते ,,,, 
                 ते पाहून तिला उगाच हसू येते, अजून एक धडा शिकते ना ती ७.४७ च्या कर्जत ट्रेन मध्ये, " आयुष्य कधी कोणासाठीच थांबत नाही, जागा बदलतात, चेहेरे बदलतात पण नवीन सूर्य नवा दिवस प्रत्येच आधीच्या दिवसाला "काल" बनवत असतो आणि कोणासाठी काहीच थांबत नसते बाकीच्यांसाठी सगळे काही तेच असते फक्त एक चेहेरा कमी झालेला असतो त्या दृश्यातून ..... sweety च्या भाषेत सांगायचे तर life goes on ... live your life to  its  fullest ... cheers and move on  


                                                                                                         रेश्मा आपटे 
                  
                  

6 comments:

  1. अप्रतिम रेशमा.........
    सुपर आहे..........
    आय एम प्राउड ओफ उ... :)
    असच लिहीत रहा.......

    ReplyDelete
  2. झक्कास जमलाय ..........

    ReplyDelete
  3. EKADAM TOPSSSSSSSSSSSSSSSSSSSSS

    ReplyDelete
  4. too good dear! :-)

    खूप आवडलं!

    ReplyDelete