Wednesday 30 March 2011


वारा सुटला,वादळ झाले
द्श दिशा बुडल्या अंधारात,
निश्चल उभा हा वृक्ष तरी
पाही प्रकाशाची वाट!
दृढ निश्चय अन् संकल्पाने
सोसली सैतानाची रात,
कवेत घेण्यात्याही अनुभवा
फैलावले त्याने हात,
राखेतूनही पुन्हा उगाविण्याची !
जिद्द त्याची फिनिक्स पक्षाची!
 
   
आदर्श निर्मिण्यास नवा
सारला पर्णसंभार जुना,
वसंताच्या पालविने उभारला 
पुन्हा स्वप्न गाव न्यारा 
हलला नाही डुलला नाही 
संकटात कधी विचलला नाही,
वास्तवाशी झुंज़ताना 
कर्तव्य कधी विसरला नाही,
पर्ण राशी पायावर विसावल्या!
खंत त्याची बाळगली नाही!

पण.... वेळ जेव्हा फुलावर आली
कणखर वृक्षही तो हेलावला,
उमलण्या आधी मिटल्या
पाकळ्यां साठी तो रडला,
सार्‍या वेदना मनात दडवून
जगण्याचा त्याने यत्न केला,
वेदनांचा आक्रोशच जेव्हा असह्य झाला
उभा वृक्षही तो ढासळला,
वादळाशी झुंझणारा तो वृक्ष !
फुलच्या वेदनेने स्वत:च संपून गेला..
 
... Reshma

2 comments: